हा ब्लॉग शोधा

रविवार, १८ एप्रिल, २०२१

रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार कशी करायची व आपले हक्क काय आहेत. इतरही फायदे जाणून घ्या!!


( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
 

रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार कशी करायची व आपले हक्क काय आहेत. इतरही फायदे जाणून घ्या!!

तुमच्याकडेही रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मोफत धान्याशिवाय इतरही फायदे मिळतात.

रेशन कार्डचे फायदे...

रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही.

याशिवाय याच्या अनेक सुविधा मिळतात. एक ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्ड उपयुक्त आहे. मतदार ओळखपत्र काढायचे असेल, तर रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तरी रेशन कार्डची आवश्यकता असते. बँकेशी संबंधित काही काम असेल, तरीही त्यातील बहुतांश कामांसाठी रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. मोफत आरोग्य विम्यासाठी रेशन कार्डचा उपयोग होतो.

कोण करू शकतं अर्ज?

तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली असाल, म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न 27 हजारांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही बीपीएल (Below Poverty Line) रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यापेक्षा जास्त असेल तर एपीएलसाठी अर्ज करता येतो. राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शासनाने दिलेली कोणतीही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड बनविण्यासाठी आयडी पुरावा म्हणून देता येईल. या व्यतिरिक्त, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रेसुद्धा पत्त्याच्या पुरावा म्हणून आवश्यक असतील.


रेशनिंगचे नियम, माहिती आणि आपले हक्क:

1) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य हे आपल्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते.

2) स्वस्त धान्य दुकानामध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा काही नियम नाही.

3) स्वस्त धान्य दुकानामध्ये घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे.कारण पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

4) दुकानदाराला रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही.

5) स्वस्त धान्य दुकानामध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक असले पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद,रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन,रेशनकार्ड संख्या, भव व देय प्रमाण उपलब्ध असलेला कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
6) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य जर आपण मागील महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.स्वस्त धान्य दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास चालू असलेच पाहिजे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी चालू असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे तारीख व  वेळेसहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. तसेच त्याची सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

7) प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.

8) स्वस्त धान्य दुकानामध्ये आपल्याला ज्या व जेवढ्या वस्तू हव्या असतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्टी घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही.

9) स्वस्त धान्य दुकानामध्ये रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. त्याचा हप्ता बुडत नाही.

10) जर वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धमकी दाखवत, तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्हा म्हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्या, की स्वस्त धान्य दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

11) स्वस्त धान्य दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती नेमलेली असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर नजर ठेऊ शकते तसेच दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्य सचिव असतो.

12) आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन जे रेशन घेतो त्याची रेशन दुकानदार कधीकधी पावती मात्र देत नाही. म्हणुन महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

13) आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. तसेच या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

14) रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.


15) रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे. 




रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी कसे करावे?

रेशनदुकानदारा याबाबत तक्रार असल्यास खालील वेबसाईट, हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.
 

वरील सर्व वेबसाईट ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करता येईल.व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

मित्रांनो,

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो.  परंतु  रेशन दुकानदार आपल्याला पावती माञ देत नाही. म्हणुन

महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे.  आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करुन शकतो.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp


रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे.  जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे. 


*रेशनकार्ड धारकानो तुम्हाला माहीती आहे का ? आता घर बसल्या मिळणार माहीती, हे सरकारी अ‍ॅप येणार कामी*

मेरा राशन मोबाईल ॲप्लिकेशन ची लिंक 
मेरा राशन एप्लीकेशन डाउनलोड डाऊनलोड करा.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजना चालविली जाते. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते.सरकारने मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सुरू केलंय. याद्वारे आता आपण घरी बसून माहीती मिळवू शकता.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

*मेरा रेशन अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग*

हे अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहेयाद्वारे आपण घरी बसून रेशन बुक करू शकता. एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान (Fair Price Shop) किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अॅपचे उद्दिष्ट आहे.

*नोंदणीनंतर आपण घेऊ शकता लाभ*

माय रेशन अॅपचा लाभ घेण्यासाठी प्रथम ते Google Play Store वरून ते डाऊनलोड करा. इंस्टालेशननंतर अ‍ॅप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्डचा तपशील भरा. असे केल्यावर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण अ‍ॅपवरून रेशन मागवू शकता.

*अ‍ॅपचे फायदे*

>> या अ‍ॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, कारण एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना त्यांना अनेकदा रेशन सेंटरबद्दल माहिती नसते. परंतु या अॅपद्वारे या समस्येवर मात करता येईल.

>> या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशन कार्डधारक या अ‍ॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.

>> रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते कार्डधारक या अ‍ॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील.

>> रेशन कार्डधारकांना या अ‍ॅपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल ते पाहण्यासही ते सक्षम असतील.

*14 भाषांमध्ये अ‍ॅप उपलब्ध होईल*

मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच अन्य 14 भाषांमध्येही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारण बहुतेक स्थलांतरित इतर राज्यांमधून आलेत, त्यामुळे त्यांना भाषेची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच त्यांची सोय लक्षात घेऊन त्यामध्ये प्रमुख प्रादेशिक भाषा जोडल्या जातील. जेणेकरून अ‍ॅप वापरण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419 

२ टिप्पण्या:

विलास म्हणाले...

खूप छान माहिती दिली आहे. प्रतेक माहिती ग्राहक उपयोगी असते. माहिती बद्द्ल खूप खूप अभिनंदन

अनिकेत गांधी म्हणाले...

मला रेशनकार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो कसा करायचा याची माहिती द्यावी

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...