हा ब्लॉग शोधा

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये


ग्राहकांचे हक्क,जबाबदाऱ्या आणि कर्तव्य।

कायद्याने ग्राहकांना हक्क ,अधिकार दिले आहेत .ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे . कारण , ग्राहक शक्ती अधिक न्याय शक्ती अधिक दंड शक्ती म्हणजेच शोषण मुक्ती हेच समीकरण आहे न्याय मिळवण्यासाठी न घाबरता तक्रार करायलाच हवी ग्राहकाने त्यास दिलेल्या हक्काचा योग्य वापर करून आपली कर्तव्ये लक्षात ठेवून बाजारपेठेत जागृत राहून खरेदी करणेही अपेक्षित आहे ,जेणेकरून तो फसवणुकीतून वाचू शकेल.

दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक ग्राहक हक्क दिवस’ हा ग्राहकांना त्यांच्या सर्व हक्कांबद्दल, तसेच वस्तूचे प्रमाण, गुणवत्ता, शुद्धता इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जागरूक करणारा असतो


तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

काय आहेत हे हक्क ?

सुरक्षेचा हक्क [Right to Safety]

एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकानी घेणे आवश्यक असते. जसे फ्रीज, टी.व्ही., वॉशिंग मशीन, मोटरबाईक, कार वगैरे कुठल्याही वस्तू. 

माहितीचा / माहिती मिळण्याचा अधिकार [Right to be Informed]

ग्राहक एखादी वस्तू विकत घेत असताना, त्या उत्पादनाबद्दल त्याला योग्य आणि अचूक माहिती देण्याचा हा हक्क आहे. यामध्ये ग्राहकांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, उत्पादन तारीख, एक्स्पायरी तारीख, उत्पादनाच्या वापरातून होणारे संभाव्य धोके इत्यादींसारखी कोणतीही माहिती ग्राहकाला देणे अनिवार्य असते.

आपण खरेदी करत असलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल माहिती विव्रेत्याने ग्रहकांना देणे बंधनकारक आहे. त्यात फसवणूक करू नये.

हा हक्क बाजारात उपलब्ध असलेल्या घातक पदार्थांपासून ग्राहकांचे दीर्घकालीन संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. ग्राहकांना उत्तम दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने बाजारात विकल्या जाणाऱ्या जवळपास सर्व उत्पादनांसाठी मानके (standards) निश्चित केली आहेत उदा. ISI, AGMARK, FPO mark, इत्यादी. त्यामुळे उत्पादक आणि विक्रेते सुरक्षा मानके आणि नियमांचे पालन करण्यासाठी बांधील असतात.

निवड करण्याचा हक्क [Right to Choose]

विक्रेता एकाच प्रकारचे उत्पादन, वा ब्रँडचा आग्रह करू शकत नाही. निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.

ऐकण्याचा / ऐकून घेण्याचा अधिकार [Right to be Heard]

ग्राहकाला आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर आपले म्हणणे, योग्य न्यायासाठी मांडण्याचा हक्क आहे.ग्राहक संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करू शकतात.

 


तक्रार करण्याचा, तसेच तिचे निवारणासाठीचा हक्क

फसवणूक झाली असेल तर, न्यायासाठी तक्रार निवारण करून घेण्यासाठी ग्राहक मंच, राज्य ग्राहक परिषदेत जाण्याचा हक्क आहे.ग्राहकांच्या हक्काविषयी शिक्षणाचा अधिकार हक्क  ग्राहकांना हक्क, कर्तव्ये माहीत नसल्यामुळे बाजारपेठेत फसवणूक होते, ते समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था, शासनाकडून 'जागो ग्राहक जागो'सारख्या उपक्रमाद्वारे प्रबोधन केले जाते..

ग्राहकांनो, दुकानदार MRP पेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तक्रार कुठे करावी? जाणून घ्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/07/mrp.html

ग्राहक शिक्षणाचा अधिकार [Right to Consumer Education]

ग्राहकांनी त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक राहणे हे प्रत्येक नागरिकाचे, तसेच ग्राहकाचे कर्तव्य आहे. म्हणूनच ग्राहक शिक्षणाच्या अधिकारात या संबंधित कौशल्ये आणि आवश्यक ते ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. या शिक्षणामुळे ग्राहकांना उत्पादनांची माहितीपूर्ण निवड करण्यास आणि चुकीच्या व्यापार पद्धतींपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत होते.

ग्राहक आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीनं तक्रार सादर करता येणार आहे.  https://edaakhil.nic.in/edaakhil/    या वेबसाइटवर तक्रार नोंदवता येणार आहे.

 काय आहे ती कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ?

1) बाजारपेठेत एका उत्पादनासाठी अनेक उत्पादक असतात. त्यात स्पर्धा ही असणारच. फसव्या जाहिरातीला ग्राहकाने बळी पडू नये.

2) बऱयाचदा धमाका सेल ऑनलाइन खरेदीवर असतात, सणावारालाही डिस्काऊंट सेल असतात, अशा वेळी न खपलेला किंवा काही दोष असलेला माल असू शकतो. सावधपणे खरेदी करावी.

3) खरेदी करताना मालाचे बिल घेणे आवश्यक आहे. बिलाचा आग्रह धरावा. न दिल्यास विव्रेत्याची तक्रार करावी. कारण माल दोषयुक्त असेल तर बिलाशिवाय आपण काहीच करू शकत नाही.


4) एम.आर.पी.(मॅक्झिमम रिटेल प्राईज)पेक्षा जास्त किंमत देऊ नका. खरेदी करताना ती बघा.

5) वस्तूंची मुदत तपासा. (एक्स्पायरी डेट) ती संपली असेल तर वस्तू नाकारावी. अशा वस्तूचा वापर हानिकारक ठरू शकतो.

6) पेट्रोल भरताना मीटरवर शून्याकडे लक्ष द्या. शुध्दतेविषयी शंका असल्यास पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांचेकडे तक्रार करा.

7) सोने खरेदी वेळी हॉलमार्ककडे लक्ष द्या.

8) ऑनलाइन खाद्य पदार्थ मागवताना योग्य काळजी घ्या. पदार्थ खराब आढळून आल्यास ताबडतोब तक्रार करावी.

--------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp


1 टिप्पणी:

विलास म्हणाले...

साळवे साहेब आपण खूप परिश्रम घेऊन महत्त्वपूर्ण माहिती ब्लॉग व व्हॉट्सअँप ग्रूप चे माध्यमाने निरंतर देतं असतात व सर्व माहिती वाचनीय असतें

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...