हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे,


 


आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे,

खासगी तसंच सरकारी अनेक कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आता आधार कार्डसाठी UIDAI कडून नवं फीचर जारी करण्यात आलं आहे. या नव्या फीचरमुळे 12 अंकी आधार नंबर कव्हर केला जाऊ शकतो, जेणेकरुन तो अधिक सुरक्षित केला जाऊ शकेल. याला आधार मास्क (Aadhaar Masked) करणं असं म्हटलं आहे. ज्यावेळी तुमचा आधार नंबर इतर कोणाशी शेअर करायचा नसेल, त्यावेळी आधार मास्क करण्याची सुविधा वापरता येऊ शकते.

आधार कार्ड Masked केल्यानंतर Aadhaar नंबरमधील पहिले 8 अंक लपवले जातात. लपवलेल्या 8 अंकाच्या जागी ती संख्या XXXX-XXXX अशी दिसेल. या Masked Aadhaar मध्ये शेवटचे केवळ चार अंकच दिसतील. अशाप्रकारे UIDAI द्वारे जारी करण्यात आलेली ही Masked Aadhaar ची सुविधा जवळपास सर्व ठिकाणी वैध मानली जाणार आहे. जिथे महत्त्वाचं कागदपत्र म्हणून आयडेंटिटी प्रुफ Aadhaar Card दाखवण्याची गरज असते, त्या सर्व ठिकाणी हे Masked Aadhaar Card वैध मानलं जाणार आहे. उज्ज्वला योजना, LPG सबसिडी या सरकारी योजनांसाठी हे Masked Aadhaar वापरता येणार नाही.

Masked e-Aadhaar कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी संपर्क करा.. 7900094419 संतोष साळवे

Aadhaar Card अपडेट करणं आता आणखी सोपं; या हेल्पलाईनवर तक्रार करुन सोडवली जाईल समस्या

देशात बँकिंगपासून रेशन कार्ड बनवण्यापर्यंतच्या कामांसाठी आधार कार्डची (Aadhaar Card) गरज असते. आधार कार्डशिवाय कोणतंही काम होत नाही. अशात आधार अपडेट करणं, आधार कार्ड हरवणं किंवा आधारसाठी अप्लाय करणं यासाठी आधार केंद्रात जावं लागतं. परंतु आता आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करणं सोपं होणार आहे.

UIDAI टोल फ्री हेल्पलाईन नंबर -

आधारसंबंधी कोणत्याही समस्येसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1947 वर ग्राहक कॉल करू शकतात. UIDAI ने ग्राहकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिला आहे. ही स्पेशल सर्विस ग्राहकांना 12 भाषांमध्ये मदत करेल. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, उर्दु, आसामी, बंगाली या भाषांमध्ये हेल्पलाईन सपोर्ट मिळेल.

Email द्वारेही तक्रार 

ग्राहक मेलद्वारेही तक्रार दाखल करू शकतात. यासाठी help@uidai.gov.in वर ग्राहक आपली समस्या पाठवू शकतात. UIDAI चे अधिकारी वेळोवेळी मेल चेक करतात आणि ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतात. तक्रार सेल ई-मेलवर उत्तर देऊन समस्यांचं समाधान करतात.

आधार ऑनलाईन अपडेट 

ऑनलाईन आधारमध्ये नाव, जन्मतिथी, लिंग, पत्ता आणि भाषा सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन आधार अपडेट अर्जासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आधार ऑथेंटिंकेशनसाठी OTP येईल. यात कुटुंब प्रमुख, पालकांची माहिती, बायोमेट्रिकसारख्या इतर अपडेटसाठी आधार सेवा केंद्रात भेट द्यावी लागेल. यासाठी 50 रुपये फी द्यावी लागेल.

 PVC आधार कार्ड, आधारमध्ये  नाव अपडेट,पत्ता अपडेट,मोबाइल नंबर अपडेट ,जन्म तारीख, अपडेट करायचे आसेल नवीन आधार बनवायचे असेल तर घरबसल्या बुक करा अपाँईंटमेंट.संपर्क करा.. संतोष साळवे   7900094419

वेबसाईटवर करा तक्रार 

UIDAI च्या वेबसाईटवरही आधारसंबंधी तक्रार दाखल करता येऊ शकते.

- UIDAI च्या https://resident.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

- इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर जावं लागेल.

- इथे ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.

*Aadhar Card सुरक्षित कसे करावे? ‘या’ सोप्या पद्धतीने करा घरबसल्या लॉक*

Aadhaar Card चुकीच्या हातात गेले, तर खासगी माहिती लिक होण्याचा धोका वाढतो. ही समस्या दूर करण्यासाठी युआयडीएआयने एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आधारकार्ड (Aadhaar Card) आताच्या घडीला बंधनकारक झालं आहे. मोबाइलसाठी सीमकार्ड घ्यायचं असो किंवा बँकेतील एखादे काम असो, आधारकार्डाशिवाय कोणतेच काम पुढे जाऊ शकत नाही. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत वा संस्थेत आधारकार्डाशिवाय पान हलत नाही.

ओळखपत्र म्हणून Aadhaar Card चे महत्त्व नजीकच्या काळात अधिक वाढणार असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत आपले आधारकार्ड सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करून घेणे उपयुक्त मानले जाते.


डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्यापासून गुन्हेगारीचे स्वरुपही वाढायला लागले आहे. Aadhaar Card हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्यामुळे त्याचा दुसऱ्याकडून तर वापर केला जात नाही ना, याची पडताळणी करणे आवश्यक झाले आहे.

अशा परिस्थितीत Aadhaar Card चुकीच्या हातात गेले तर खासगी माहिती लिक होण्याचा धोका वाढतो. ही समस्या दूर करण्यासाठी युआयडीएआयने एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याद्वारे आपण आधार कार्ड लॉक करू शकता.

Aadhaar Card लॉक करण्यासाठी आपल्या फोनवरून GETOTP लिहून १९४७ वर मॅसेज पाठवा. आता आपल्याकडे ओटीपी असेल, LOCKUID आधार क्रमांक पाठवा आणि पुन्हा १९४७ वर पाठवा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला Aadhaar Card नंबर लॉक होईल. एकदा आधार कार्ड लॉक झाल्यावर आपल्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरू शकणर नाही. हॅकर्स देखील आधार पडताळणी करू शकणार नाहीत.

 युआयडीएआयच्या या सुविधेमुळे आपले Aadhaar Card संरक्षित केले जाईल. मात्र, लॉक केलेले आधार कार्ड अनलॉक करण्याची सुविधाही युआयडीएआयकडून उपलब्ध करण्यात आली आहे.

Aadhaar Card अनलॉक करण्यासाठी आपल्या फोनवरून १९४७ पर्यंत GETOTP आधार नंबर लिहा. ओटीपी आल्यानंतर त्या अनलॉकयूआडी आधार क्रमांकावर लिहा आणि ते पुन्हा १९४७ क्रमांकावर पाठवा.
आधार कार्ड:- PVC आधार कार्ड, आधारमध्ये  नाव अपडेट,पत्ता अपडेट,मोबाइल नंबर अपडेट ,जन्म तारीख, अपडेट करायचे आसेल नवीन आधार बनवायचे असेल तर घरबसल्या बुक करा अपाँईंटमेंट.संपर्क करा.. संतोष साळवे   7900094419

असे केल्याने आपले आधार कार्ड अनलॉक होईल. ही प्रक्रिया UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊनही ही प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते. यासाठी Aadhaar Card सेवा पर्यायांमधील लॉक/अनलॉक बायोमॅट्रिकवर क्लिक करावे.

 चेकबॉक्सला सिलेक्ट करावे. यानंतर १२ अंकी Aadhaar Card क्रमांक सादर करून कॅप्चा भरावा. यानंतर मोबाइलवर ओटीपी येण्यासाठी क्लिक करावे. यानंतर नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येईल. तो सादर केला की, Enable locking feature करावे. यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल.

लॉक झालेले Aadhaar Card अनलॉक करण्यासाठी हीच पद्धत फॉलो करावयाची आहे. केवळ disable locking feature हा पर्याय सिलेक्ट करावायचा आहे. यानंतर लॉक झालेले आधार कार्ड अनलॉक होऊ शकेल.

दरम्यान, आपण आपल्या मुलाचे Aadhaar Card बनवत असल्यास, नोंदणीमधील प्रत्येक माहिती योग्य असावी. आधार कार्ड जारी करणार्‍या यूआयडीएआय या संस्थेने ट्विट केले आहे. आपल्या मुलाचा आधार डेटा योग्य आहे, याची खात्री करुन घ्या.

इंग्रजीमध्ये नोंद झालेल्या तपशीलांचे शब्दलेखन काळजीपूर्वक तपासा. स्लिपमध्ये आपण ते पुन्हा तपासू शकता. पूर्ण समाधान झाल्यावरच स्वाक्षरी करा. यासह जन्म तारखेशी संबंधित माहिती Aadhaar Card मध्ये योग्यरित्या भरली जाते, फॉर्म सबमिट करण्यापूर्वीच तपासा.

 यूआयडीएआयचा हा सल्ला प्रौढ व्यक्तीस देखील लागू आहे. याचा अर्थ असा की, Aadhaar Card नोंदणीच्या वेळी ऑपरेटरने अचूक माहिती प्रविष्ट केली आहे हे सुनिश्चित करा.

सर्व खबरदारी घेतल्यानंतर, Aadhaar Card मधील प्रविष्ट केलेला तपशील चुकला, तर आपण घरी बसून बहुतेक तपशील दुरुस्त करू शकता...संपर्क करा...  संतोष साळवे 7900094419


*आधार कार्ड मोबाईल वर डाउनलोड करायचंय..? तर हि ट्रिक नक्की वापरा..!*

नमस्कार मित्रांनो आज पण जाणून घेऊया आपलं आधार कार्ड कशाप्रकारे आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकता.

सर्वात प्रथम तुम्ही गूगल ला जाऊन Download aadhar card असं लिहून सर्च करा. त्या नंतर तुम्हाला Uidai.gov.in ची लिंक दिसेल त्या वरती क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तिथे एक Get Aadhar Card असं ऑप्शन दिसेल त्या मध्ये Download aadhar card त्या वरती क्लिक करा.

*त्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज दिसू लागेल.*

तुमच्याकडे enrolment number असेल तर तो सिलेक्ट करा. आणि आधार असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करून तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे. तसेच खाली तुमचे पूर्ण नाव (जसे आधार कार्ड वर दिलं असेल तसेच ) नतंर तुम्हाला पिनकोड , सेक्युरीटी कोड टाकायचा आहे.

सर्व माहिती टाकून झाल्यावर Confirm वर क्लिक करा त्या नंतर आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वर तुम्हाला एक One Time Password मिळेल.

Passwrd इथे टाकल्या नंतर खाली तुम्हाला एक Survey दिसेल. कोणत्याही Options वर सिलेक्ट करून तुम्हाला खाली Download Aadhar वर क्लिक करून तुमचं आधार PDF फॉरमॅट मध्ये डाउनलोड होईल.

डाउनलोड केल्या नंतर तुम्ही ती डाउनलोड केलेली फाईल जेव्हा ओपन करायला जाल तेव्हा तुम्हाला एक paasword टाकण्यासाठी बोलले जाईल. तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले चार अक्षरे आणि तुमचं birth Year टाकायचं आहे.

उदा. (Sumit).SUMI1990      

नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आधार कार्ड दिसू लागेल.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाइल मध्ये अथवा कॉम्पुटर मध्ये सेव्ह करू शकता जेणेकरून अनेकवेळा आधार कार्ड नसताना जी अडचण येते ती तुम्हाला येणार नाही.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                                                                                                           -------------------------------------------------------------------------------------------------------------------------       साळवे इंटरप्राईजेस..सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे 7900094419






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...