हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

*तुमच्या मोबाईलमध्ये सरकारची ही App असतील तर 'या' समस्यातून होईल तात्काळ सुटका, जाणून घ्या*




तुमच्या मोबाईलमध्ये सरकारची ही App असतील तर 'या' समस्यातून होईल तात्काळ सुटका, जाणून घ्या

सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात अनेक कामे झटपट होतात. फक्त एका टचमध्ये आपल्याला अनेक कामे करता येऊ शकतात. याचा फायदाही सरकारी कामांमध्येही होत असतो. मात्र, तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्याप्रकारचे अ‍ॅप्स असणे गरजेचे आहे. ते असल्यास तुमची होणारी अडचण टाळता येऊ शकते. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

डिजिलॉकर अ‍ॅप, मायगोव्ह अ‍ॅप, एम परिवहन अ‍ॅप यांसारख्या ऍपचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकेल. या ऍपबद्दल आपण जाणून घेणार आहोत…


आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419




डिजीलॉकर अ‍ॅप (Digilocker App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                                                                             
केंद्र सरकारने विशेष Digilocker App सुरु केले आहे. याचा फायदा वाढत्या डेटा लीक होणे आणि गोपनीयता प्रकरण टाळण्यासाठी होऊ शकतो.या अ‍ॅपमध्ये आपण आपल्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रत ठेवू शकतो.


आरोग्य सेतु (Arogya Setu) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                       
देशासह जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना व्हायरस संसर्गासंबंधी आरोग्य सेतु हे सर्वात फायद्याचे ठरत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरणासाठी अपॉइंटमेंट सहज मिळवू शकता. तसेच कोणत्याही शासकीय आवारात प्रवेश करण्यासाठी ते बंधनकारक आहे.


एम-परिवहन अ‍ॅप (mParivahan App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                                                                                                   mParivahan App या अ‍ॅपच्या मदतीने आपणास आपल्या कारची आणि बाईकची माहिती कळू शकेल. तसेच या अ‍ॅपमध्ये आपण आपली कार किंवा बाईकची आवश्यक कागदपत्रे ठेवू शकता. या ऍपला सरकारकडून मान्यता असल्याने हीच कागदपत्रे अधिकृत म्हणूनही ग्राह्य धरता येऊ शकतात.

बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..


नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419



मायगोव्ह अ‍ॅप (MyGov App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
                                                                          सरकारी योजना व धोरणांसंबंधी अपडेट राहण्यासाठी MyGov App उपयोगी येते. तसेच, एखाद्या मुद्यावर सरकारला सुचना देखील देऊ शकता. टेक्नोलॉजीच्या माध्यमातून नागरिक वसरकारमधील संवादासाठी हे अ‍ॅप उपयोगी आहे.


उमंग अ‍ॅप (Umang App) मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.                 

या अ‍ॅपमध्ये अर्थ, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माण यासंबंधित माहिती मिळू शकेल. याशिवाय आपल्याला पीएफशी संबंधित माहितीही येथे उपलब्ध आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहितीही उपलब्ध आहे. 


मेरा राशन App चे फायदे (Mera Rationमोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत लॉन्च केलेल्या मेरा रेशन ऑपचे खालील फायदे आहेत.

 मेरा रेशन मोबाईल App संपूर्ण भारतभरातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय फायदेशीर App आहे.

 या अनुप्रयोगाद्वारे आपण आपल्या मोबाईल फोनवर फक्त एका टॅपने जवळच्या रेशन डीलर्सची माहिती मिळवू शकता.

ऑनलाइन वापरकर्ते माझी राशन App द्वारे त्यांची पात्रता आणि अलीकडील व्यवहार तपशील देखील तपासू शकतात.

 आपण या अनुप्रयोगाद्वारे आपल्या सूचना आणि अभिप्राय देखील पाठवू शकता.

mPassport App मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 


पासपोर्ट सर्विसशी संबंधित माहितीसाठी या अ‍ॅपचा उपयोग करता येतो. या अ‍ॅपद्वारे पासपोर्ट सर्विस सेंटरची माहिती, अ‍ॅप्लिकेशन स्टेट्स ट्रॅक करण्याची सुविधा मिळते.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                                                                                                    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419 https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...