पीएफ खातेधारकांच्या कुटुंबियांना ईएसआयसी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. यात काही अतिरिक्त लाभ दिले जाणार आहेत.
ईएसआयसीअंतर्गत मिळणारे लाभ
सध्या ईएसआयसीअंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूनंतर कंपनीतील मृत्यू किंवा काम करत असताना जखमी झाल्यास) त्याच्या रोजच्या वेतनाच्या ९० टक्के इतकी रक्कम पेन्शन रुपात त्याच्या पत्नी, किंवा आईला आयुष्यभर दिली जाते. तर विमाधारकाच्या मुलांना त्यांचे वय २५ वर्षे पूर्ण होईपर्यत हे पेन्शन दिले जाते. जर विमाधारकाला मुलगी असेल तर पेन्शनची सुविधा तिचे लग्न होईपर्यत दिली जाते. ईएसआयसी योजनेअंतर्गत जखमी झाल्यास किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना जो लाभ मिळतो यापुढे ज्या कर्मचाऱ्यांची नोंदणी ईएसआयसीच्या पोर्टल कोरोना होण्यापूर्वी झाली आहे आणि ज्यांचा मृत्यू नंतर कोरोनामुळे झाला आहे अशांच्या कुटुंबियांना ईएसआयसी योजनेच्या विमाधारकांना मिळणारे सर्व लाभ मिळणार आहेत. त्यासाठी असणाऱ्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.
1) ज्या विमाधारकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे त्या विमाधारकाची नोंदणी ईएसआयसीच्या ऑनलाईन पोर्टल त्याला कोविड होण्याच्या तीन महिने अगोदर झाली असली पाहिजे.
2) विमाधारकाला कोविड होण्याआधी त्याची नोकरी किंवा काम किमान ७८ दिवस झालेले असले पाहिजे. म्हणजेच त्या कर्मचाऱ्याला कोरोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी किमान ७८ दिवसांचे वेतन मिळालेले असले पाहिजे.
दोन वर्षांसाठी मिळणार लाभ
ईएसआयसीचे जे विमाधारक वरील अटींची पूर्तता करतील आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मासिक वेतनाच्या ९० टक्के इतकी रक्कम पेन्शन रुपाने दिली जाणार आहे. ही योजना २४ मार्च २०२० पासून दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.
या सुविधांमुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत होईल आणि कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणींमधून त्यांची सुटका होईल, असे मत सरकारने व्यक्त केले आहे.
Missed Call देऊन तपासा PF बॅलन्स
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता
आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे
*१ जून पासून तुमच्या PF खात्याबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.*
जर ईपीएफ ग्राहक अकाली मरण पावला तर, त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विमा कवचा दावा करु शकतात. हक्क सांगणार्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचा / तिचा पालक त्यांच्या वतीने दावा करु शकतात. यासाठी विमा कंपनीने अल्पवयीन नॉमिनीच्या वतीने पालकांनी केलेल्या दाव्यावर कर्मचार्यांचा मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, पालकत्व प्रमाणपत्र आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे.
जर पीएफ खात्यावर कोणी नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस यावर दावा करु शकतात.तस करताना कुटुंबांत वाद निर्माण होऊ शकतात तर
कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad, Death claim व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419. संतोष विठ्ठल साळवे
ESI आणि EPFO ची सर्व कामे केली जाते
ईपीएफओद्वारे अनेक खातेदारांना व्याजाच्या चांगल्या रक्कमेसह बरीच सुविधा मिळते. पण कधीकधी तुमच्या चुकांमुळे तुम्हाला काही त्रासही सहन करावा लागू शकतो. (Link PAN Card with EPF account)
*नियम काय?*
ईपीएफओने काही दिवसांपूर्वी एक अलर्ट जारी केला होता. त्यात त्यांनी अकाऊंट धारकांना पॅन कार्ड पीएफ खात्याशी जोडावे, अशी सूचना केली होती. जर पीएफ खातेधारकाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते, असेही ईपीएफओने सांगितले होते.
त्यामुळे जर तुमचे पीएफ खाते असेल तर तुमचे पॅनकार्ड ईपीएफओशी लवकरात लवकर लिंक करा. यासाठी ईपीएफओने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक संदेशही जारी केला होता. त्यात त्यांनी पॅनकार्ड ईपीएफओशी लिंक करणे गरजेचे आहे असे म्हटले होते.
*पॅनकार्ड लिंक नसेल तर काय?*
जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड यूएएनशी लिंक केले नाही तर तुम्हाला पीएफचे पैसे काढताना आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जे लोक पॅन कार्ड लिंक करत नाहीत आणि पीएफ काढण्यासाठी अर्ज करतात त्यांचा जास्तीत जास्त टीडीएस (TDS) कापला जातो. त्या उलट जे खातेधारक पॅनकार्ड लिंक करता त्यांना दिलासा मिळतो.
दरम्यान जर तुमचे पीएफ खाते पाच वर्षांपेक्षा जुने असल्यास आणि खात्यात जमा केलेली रक्कम 50 हजारांपेक्षा जास्त असल्यात पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर वजा केला जातो.
तुमच्या PF अकाउंट ला पॅन कार्ड लिंक करायच असल्यास .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे
*PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे करावी लागते नोकरी? काय आहेत नियम व अटी? जाणून घ्या*
सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार लोकांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हे अनिवार्य केले आहे. PFमुळे आपली नियमिक गुंतवणूक त्याचप्रमाणे कर बचत आणि भविष्यातील सुरक्षितता मिळते. PF खात्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला भविष्यात पेन्शनचा अधिकार आहे. भविष्यात जर PF खात्यात पैसे गुंतवले तर PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे नोकरी करावी लागते? त्यासाठी नियम काय आहेत? कोणत्या अटी आहेत? जाणून घ्या.
*पेन्शनसाठी नियम*
EPFO सदस्यांना निवृत्ती वेतनाचा हक्क मिळवण्यासाठी सलग १५ वर्षे EPF खात्यात पैसे जमा करावे लागतात.
ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचे EPF खाते उघडले जाते त्याचवेळेस EPS खातेही उघडले जाते.
खात्यात बेसिक वेतनाच्या १२ टक्के रक्कम भरावी लागते.
१२ टक्क्यांमधील ८.३३ टक्के पैसे EPS खात्यात जमा होतात तर ३.६७टक्के पैसे EPFखात्यात जमा केले जातात.
दरमहिन्याला EPS खात्यात १ हजारांहून अधिक रक्कम जमा केली जाऊ शकते.*
EPFO पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी : जर तुमचा PPO क्रमांक हरवला तर ‘या’ पध्दतीनं परत मिळवा*
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लाखो पेन्शनधारकांना (EPFO pensioners) मोठा दिलासा दिला आहे. आता जर तुमचा पीपीओ क्रमांक हरवला तर तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही. आपण ते सहजपणे परत मिळवू शकता. आपल्याला हा क्रमांक पुन्हा मिळविण्यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण ते रिकव्हर करू शकता. कर्मचार्याच्या सेवानिवृत्तीनंतर, पीपीओ (PPO) क्रमांक ईपीएफओद्वारे जारी केला जातो.
*पीपीओ क्रमांक म्हणजे काय?*
पीपीओ हा एक युनिक क्रमांक आहे. पीपीओ क्रमांकाच्या साह्याने निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना पेन्शन मिळते. भविष्य निर्वाह निधीच्या मदतीने आपण ते पुन्हा मिळवू शकता.
*पीपीओ नंबरसाठी काय करावे? पीपीओ क्रमांक कसा मिळवायचा*
>> आपल्याला ईपीएफओ https://www.epfindia.gov.in/site_en/index.php च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता डाव्या बाजूला असलेल्या ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ विभागात ‘पेन्शनर्स पोर्टल’ या पर्यायावर क्लिक करा.
>> क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.
>> पेजच्या डाव्या बाजूला दिलेला ‘Know Your PPO No. पर्यायावर क्लिक करा.
>> आपल्याला आपल्या पेन्शन फंडाशी जोडलेला आपला बँक खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
>> याशिवाय तुम्ही तुमचा पीएफ नंबर (मेंबर आयडी) टाकून सर्च करू शकता.
>> एकदा तपशील सबमिट झाल्यावर पीपीओ नंबर स्क्रीनवर दिसून येईल.
येथून जीवन प्रमाणपत्राचे स्टेटस मिळवा
पेन्शनधारकांना ही लिंक https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ओपन करावी लागेल. जीवन प्रमाणपत्र, पेमेंट आणि आपले पेन्शन स्टेटस याविषयी माहिती या पोर्टलवर मिळू शकते.
PPO क्रमांक महत्त्वाचा का आहे?
पीपीओ क्रमांक 12 डिजिटचा महत्त्वपूर्ण क्रमांक आहे. हा एक रेफ्रन्स क्रमांक आहे जो सेंट्रल पेन्शन लेखा कार्यालयात कोणत्याही कम्युनिकेशनसाठी असतो. पेन्शनधारकाच्या पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसर्या शाखेत हस्तांतरित करण्यासाठी पीपीओ क्रमांक आवश्यक आहे.
या नंबरचा मदतीने आपण तक्रार करू शकता
याव्यतिरिक्त आपण जर आपल्या पेन्शनधारकाशी संबंधित तक्रार ईपीएफओमध्ये दाखल केली असेल, तर येथे पीपीओ क्रमांक देणेदेखील बंधनकारक आहे. ऑनलाइन पेन्शनची स्थिती जाणून घेण्यासाठी पीपीओ नंबरदेखील आवश्यक आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करतांना दरवर्षी पी पी ओ क्रमांकदेखील सादर करणे आवश्यक आहे.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ *साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा .संतोष विठ्ठल साळवे 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8e
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा