हा ब्लॉग शोधा

रविवार, १८ एप्रिल, २०२१

रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार कशी करायची व आपले हक्क काय आहेत. इतरही फायदे जाणून घ्या!!


( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
 

रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार कशी करायची व आपले हक्क काय आहेत. इतरही फायदे जाणून घ्या!!

तुमच्याकडेही रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मोफत धान्याशिवाय इतरही फायदे मिळतात.

रेशन कार्डचे फायदे...

रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही.

याशिवाय याच्या अनेक सुविधा मिळतात. एक ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्ड उपयुक्त आहे. मतदार ओळखपत्र काढायचे असेल, तर रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तरी रेशन कार्डची आवश्यकता असते. बँकेशी संबंधित काही काम असेल, तरीही त्यातील बहुतांश कामांसाठी रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. मोफत आरोग्य विम्यासाठी रेशन कार्डचा उपयोग होतो.

कोण करू शकतं अर्ज?

तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली असाल, म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न 27 हजारांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही बीपीएल (Below Poverty Line) रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यापेक्षा जास्त असेल तर एपीएलसाठी अर्ज करता येतो. राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शासनाने दिलेली कोणतीही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड बनविण्यासाठी आयडी पुरावा म्हणून देता येईल. या व्यतिरिक्त, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रेसुद्धा पत्त्याच्या पुरावा म्हणून आवश्यक असतील.


रेशनिंगचे नियम, माहिती आणि आपले हक्क:

1) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य हे आपल्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते.

2) स्वस्त धान्य दुकानामध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा काही नियम नाही.

3) स्वस्त धान्य दुकानामध्ये घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे.कारण पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

4) दुकानदाराला रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही.

5) स्वस्त धान्य दुकानामध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक असले पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद,रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन,रेशनकार्ड संख्या, भव व देय प्रमाण उपलब्ध असलेला कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
6) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य जर आपण मागील महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.स्वस्त धान्य दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास चालू असलेच पाहिजे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी चालू असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे तारीख व  वेळेसहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. तसेच त्याची सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

7) प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.

8) स्वस्त धान्य दुकानामध्ये आपल्याला ज्या व जेवढ्या वस्तू हव्या असतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्टी घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही.

9) स्वस्त धान्य दुकानामध्ये रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. त्याचा हप्ता बुडत नाही.

10) जर वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धमकी दाखवत, तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्हा म्हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्या, की स्वस्त धान्य दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

11) स्वस्त धान्य दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती नेमलेली असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर नजर ठेऊ शकते तसेच दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्य सचिव असतो.

12) आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन जे रेशन घेतो त्याची रेशन दुकानदार कधीकधी पावती मात्र देत नाही. म्हणुन महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

13) आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. तसेच या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

14) रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.


15) रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे. 




रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी कसे करावे?

रेशनदुकानदारा याबाबत तक्रार असल्यास खालील वेबसाईट, हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.
 

वरील सर्व वेबसाईट ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करता येईल.व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

मित्रांनो,

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो.  परंतु  रेशन दुकानदार आपल्याला पावती माञ देत नाही. म्हणुन

महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे.  आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करुन शकतो.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp


रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे.  जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे. 


*रेशनकार्ड धारकानो तुम्हाला माहीती आहे का ? आता घर बसल्या मिळणार माहीती, हे सरकारी अ‍ॅप येणार कामी*

मेरा राशन मोबाईल ॲप्लिकेशन ची लिंक 
मेरा राशन एप्लीकेशन डाउनलोड डाऊनलोड करा.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजना चालविली जाते. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते.सरकारने मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सुरू केलंय. याद्वारे आता आपण घरी बसून माहीती मिळवू शकता.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

*मेरा रेशन अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग*

हे अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहेयाद्वारे आपण घरी बसून रेशन बुक करू शकता. एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान (Fair Price Shop) किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अॅपचे उद्दिष्ट आहे.

*नोंदणीनंतर आपण घेऊ शकता लाभ*

माय रेशन अॅपचा लाभ घेण्यासाठी प्रथम ते Google Play Store वरून ते डाऊनलोड करा. इंस्टालेशननंतर अ‍ॅप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्डचा तपशील भरा. असे केल्यावर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण अ‍ॅपवरून रेशन मागवू शकता.

*अ‍ॅपचे फायदे*

>> या अ‍ॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, कारण एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना त्यांना अनेकदा रेशन सेंटरबद्दल माहिती नसते. परंतु या अॅपद्वारे या समस्येवर मात करता येईल.

>> या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशन कार्डधारक या अ‍ॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.

>> रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते कार्डधारक या अ‍ॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील.

>> रेशन कार्डधारकांना या अ‍ॅपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल ते पाहण्यासही ते सक्षम असतील.

*14 भाषांमध्ये अ‍ॅप उपलब्ध होईल*

मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच अन्य 14 भाषांमध्येही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारण बहुतेक स्थलांतरित इतर राज्यांमधून आलेत, त्यामुळे त्यांना भाषेची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच त्यांची सोय लक्षात घेऊन त्यामध्ये प्रमुख प्रादेशिक भाषा जोडल्या जातील. जेणेकरून अ‍ॅप वापरण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419 

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

*स्वतःच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी हे गॅजेट तुमच्याकडे असायलाच हवेत*

संतोष साळवे...7900094419


हेल्थ इन्शुरन्स...

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक 
ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

*स्वतःच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी हे गॅजेट तुमच्याकडे असायलाच हवेत*

सध्या करोना १९. हा संसर्गजन्य रोग जगभरातल्या सगळ्या देशात पसरला आहे.भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास अजूनही करोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे,या वाढत्या रुग्णांनामुळे विविध आरोग्य यंत्रणेवर ताणही वाढत आहे.करोना कधी संपणार आहे याचीही माहिती नसल्यामुळे आता प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात आपण तंत्रज्ञानाचा (Health Gadgets) वापर करून स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकता.
तुमच्या आरोग्यावर देखरेख ठेवणाऱ्या काही गडेट्सबद्दल.

*कॉन्टॅक्टलेस थर्मल स्कॅनर (thermometer)*

कोणत्याही आजाराची सुरवात बहुधा तापावरून होते. सध्याचं बोलायचं झाल्यास करोनाचे मुख्य लक्षण म्हणजे तापच. हा संसर्गजन्य आजार असल्याने आपल्याला सोशल डिस्टन्सचे भान राखून वापर केला पाहिजे. कॉन्टॅक्टलेस थर्मल स्कॅनरचा वापर केल्याने त्याची पूर्तता होते. हे Health Gadget इन्फ्रारेड किरणांनाच्या मदतीने व्यक्तीचे तापमान मोजते. सध्या सरकारी आणि मोठ्या खाजगी कार्यालयात दिसणारे हे स्कॅनर भविष्यात प्रत्येकाच्या घरी हवेच.

*प्लस ऑक्सिमीटर (pulse oximeter)*


'6 मिनिट वॉक टेस्ट' काय आहे? त्याने फुप्फुसांचं आरोग्य कसं तपासायचं?   खालील लिंक वर क्लिक करा                                                        https://fb.watch/5nhX5feyxr

रक्तातील ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी प्रामुख्याने प्लस ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. रक्तातील ऑक्सिजन एका ठराविक पातळीच्या खाली गेल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, आणि हे करोनाचे मुख्य लक्षण आहे.त्यामुळे सध्या तरी स्वतःच्या शरीरातील ऑक्सिजन नियमित तपासणे गरजेचे आहे. Health Gadget प्लस ऑक्सिमीटर वापरला अगदी सोपे आहे, यामध्ये हाताचे बोट ठेवल्यास अगदी काही सेकंदात तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळेल. काही प्लस ऑक्सिमीटर साधने तुमचा Heart Rate सुद्ध सांगतात.आपल्याला अस्वस्थता जाणवत आहे तर सर्वप्रथम स्वतःकडे लक्ष द्या आणि बघा की गेल्या 5 दिवसांपासून आपले आरोग्य स्थिर आहे की अस्वस्थता अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत पल्‍स ऑक्सिमीटरची गरज असते.ते वापरावे.

 *रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा ..साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)


पल्‍स ऑक्सिमीटर कसे वापरावे ?

* ऑक्सिमीटर दररोज वापरा.
* नेलपेंट काढून घ्या.
* एकाच बोटात लावून तपासण्या ऐवजी हातातील
   इतर बोटांमध्ये देखील लावून बघा.
* ऑक्सिमीटर लावल्यावर थोड्यावेळ तसेच राहू द्या.
* दोन तीन वेळा तपासल्यावर जी सर्वात जास्त रिडींग येईल त्यालाच बरोबर मानावे.
   हा उपाय प्रभावी आहे-
* किमान सहा मिनिटे वॉक करा. नंतर ऑक्सिमीटरचा वापर करून ऑक्सिजनची पातळी तपासा.
* वॉक केल्यावर देखील ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी 4 टक्क्याने खाली येते तर आपल्याला पुढील चाचणीची गरज आहे.
* वॉक केल्यावर देखील ऑक्सिजनची पातळी 94 च्या वर येत आहे तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. आपण बरे आहात.

संसर्गाला कसे ओळखावे-

* आपल्या लक्षणांकडे लक्ष द्या.
* आराम करा.
* चांगले आहार घ्या.
* काळजी करू नका.
* या नंतर देखील अस्वस्थता जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावे.                                     

*ब्लड प्रेशर मॉनिटर  (blood pressure monitor)*


ताण तणाव आणि ब्लड प्रेशर यांचं अनोखे नाते आहे. धावपळीच्या या जीवनात अनेकांना त्यांचा ताण कसा सांभाळायचा हे माहीतच नाही परिणामी ब्लड प्रेशर या विकाराने ग्रासले जाते. करोनाच्या या काळात तर याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे रक्तदाब मोजण्यासाठी प्रत्येकवेळी दवाखान्यात जाण्यापेक्षा Blood Pressure Monitor ने घरीच मोजता येईल.

*ग्लुकोमीटर (glucometer)*




कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्यामध्ये मधुमेहाची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांनाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यावेळी मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे फारच आवश्यक आहे. रुग्णांनी त्यांच्या रक्तात असलेल्या साखरेच्या प्रमाणावर लक्ष देने गरजेचे आहे पण यासाठी सतत दवाखान्यात जाणेही धोक्याचे आहे. Health Gadget ग्लुकोमीटरचा वापर करून तुम्ही साखर घरच्या घरी तपासू शकता आणि स्वतःला सुरक्षितही ठेवू शकता. यासाठी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो निर्णय घ्यावा.

*पोर्टेबल ECG मीटर (portable ecg monitor)*




ही तरी बदल झालाच आहे आणि हा बदल प्रत्येकाला नैराश्य, चिंता आणि चिडचिडेपणा देत आहे. अर्थातच तो बदल कश्या स्वरूपाचा आहे यावर अवलंबून आहे पण बहुतेक बदल नकारात्मक असल्याने लोकांच्या हृदयावर परिणाम जाणवू लागला आहे. ECG म्हणजे तुमच्या हृदयाचे कामकाज योग्य चालले आहे की नाही हे तपासण्याचे माप. प्रत्येकाच्या घरी हा पोर्टेबल Health Gadget ECG मीटर असणे आवश्यक ज्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊ शकता. आता हे पोर्टेबल ECG मीटर वापरण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्या, Google वरून कोणतीही माहिती वाचून घाबरून जाऊ नका. 

    

                                                                                                                                                                       महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद!!
 ----------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे:- 7900094419.


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना व पीएम कुसुम योजना अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती



मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना व पीएम कुसुम योजना अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती

आपल्याकडे शेती असल्यास किंवा आपण शेती करीत असाल तर ही माहिती आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकेल. आपल्या शेतात विजेची मोठी समस्या असेल्यामुळे आपण आपल्या शेतात सौर पंप स्थापित करण्याचा विचार करीत असाल तर, ही माहिती आपल्याला दिशादर्शक ठरू शकते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकर्‍यांसाठी बऱ्यांच योजना आयोजित केल्या आहेत. मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना हि सुद्धा एक महत्वकांक्षी योजना आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी देण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना सुरू केली आहे.
शेतातील विजेची समस्या असलेल्या कोणत्याही शेतकऱ्यासाठी आणि विजेमुळे जे शेतकरी शेताला पाणी देऊ शकत नाही अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंपमार्फत आपल्या शेतातील पाण्याच्या समस्येपासून आपण मुक्त होऊ शकता.

सौरकृषीपंपाचे फायदे

1) दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
2) दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
3) वीज बिलापासून मुक्तता
4) डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
5) पर्यावरण पुरक परिचलन
6) शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
7) औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? पीएम कुसुम योजना

या वेबसाइटला भेट द्या 

तिथे आपल्याला ए - 1 फॉर्म मिळेल, त्या फॉर्मवर आपल्याला सर्व माहिती योग्य मार्गाने भरावी लागेल.

ए -1 फॉर्मसह आपल्याला आपली काही कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.

सीएम सौर कृषी पंपसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

  • 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत.
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
  • पासपोर्ट आकाराचा फोटो,
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल.
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (3 व 5 अश्वशक्ती) 

1) शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.
2) पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.
3) 5 एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 अश्वशक्ती सौर कृषीपंप व 5 Absolutely जास्त शेतजमीन धारकास 5 अश्वशक्ती व 7.5 अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.
यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.
4) अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.
5) वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
6) “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
7) महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष 7.5 अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता:

1) विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
2) अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
3) अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.
4) खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.2 च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये 60 मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

      वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा:






  पीएम कुसुम योजना: 90 %  अनुदानावर लावा सोलर पॅनेल; लाखोंची कमाई करत मिळवा 'हे' जबरदस्त फायदे

  तुम्हाला सौरऊर्जेशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारच्या पंतप्रधान कुसुम योजनेत तुम्ही  सामील होऊ शकता. केंद्र सरकारचे 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम कुसुम. पीएम कुसुम योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, त्यानंतर अर्थमंत्र्यांनी या योजनेचा विस्तार 2020 च्या अर्थसंकल्पात केला आहे.

या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना अनुदानावर सोलर पॅनेल्स मिळतात, ज्यामधून वीज मिळू शकेल. आवश्यकतेनुसार विजेचा वापर करून, उर्वरित विक्री करुन ते अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.या योजनेद्वारे इलेक्ट्रिक किंवा डिझेलवर चालणारे सिंचन पंप सौर ऊर्जेवर चालणार्‍या पंपमध्ये रुपांतरित केले जातील. त्यांच्या सिंचन कामात सौर पॅनल्समधून निर्माण होणारी वीज प्रथम वापरली जाईल. त्याशिवाय जादा सोडली जाणारी वीज विद्युत वितरण कंपनीला (DISCOM) विक्री करुन 25 वर्षे पैसे मिळू शकतात.

याचा आणखी एक फायदा म्हणजे सौरऊर्जेमुळे डिझेल आणि विजेवरील खर्चही कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. सौर पॅनेल 25 वर्षे चालेल आणि त्याची देखभाल देखील सोपी आहे.या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या जागेत सौर पॅनेल बसविण्यासाठी केवळ 10% रक्कम द्यावी लागेल. केंद्र व राज्य सरकारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 60 टक्के अनुदान देतात. केंद्र व राज्यांकडून समान योगदानाची तरतूद आहे. त्याचबरोबर बँकेकडून 30 टक्के कर्जाची तरतूद आहे. शेतकरी आपल्या कमाईद्वारे हे कर्ज सहज भरू शकतात.

पीएम कुसुम योजनेंतर्गत अर्जासाठी अधिकृत वेबसाइट 

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

वर भेट देऊन नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार कार्ड, मालमत्तेची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. सौर प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उर्जा उपकेंद्राच्या पाच किमीच्या परिघात असावी. शेतकरी स्वतःला किंवा डेवलपरला सौरऊर्जा भाड्याने देऊ शकतात.

पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकर्‍यांना सर्वात मोठा फायदा म्हणजे सिंचनासाठी त्यांना विनामूल्य वीज मिळेल. या योजनेमुळे डिझेल आणि केरोसीन तेलावरील शेतकर्‍यांचे अवलंबन कमी होईल. आणखी एक फायदा म्हणजे ते त्याद्वारे तयार केलेली अतिरिक्त वीज कंपनीला विकू शकतील. ज्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!     

 ------------------------------------------------------------------------ 


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वाचा बाबासाहेबांचं जीवन चरित्र



डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वाचा बाबासाहेबांचं जीवन चरित्र

बहुआयामी विद्वान

आधुनिक भारताचे निर्माते

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

पहिले कायदेमंत्री, व मानवी हक्कांचे कैवारी

भारतरत्न

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर १९५६), हे भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात..


राज्यसभेचे सदस्य

भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री

कार्यकाळ:- १५ ऑगस्ट १९४७ – ६ ऑक्टोबर १९५१

संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष

कार्यकाळ:- २९ ऑगस्ट १९४७ – २४ जानेवारी १९५०

भारतीय संविधान सभेचे सदस्य

कार्यकाळ:- ९ डिसेंबर १९४६ – २४ जानेवारी १९५०

मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाममंत्री, व्हाईसरॉयचे कार्यकारी मंडळ

कार्यकाळ:- २० जुलै १९४२ – २० ऑक्टोबर १९४६

 मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते

 .कार्यकाळ:- स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधानसभेचे सदस्य

कार्यकाळइ:-.स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधिमंडळाचे सदस्य

कार्यकाळडि:- सेंबर इ.स. १९२६ – इ.स. १९३७

जन्म

१४ एप्रिल, इ.स. १८९१ महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत (सध्या भीम जन्मभूमी, मध्य प्रदेश)

मृत्यू

६ डिसेंबर, १९५६ (वय ६५) नवी दिल्ली, दिल्ली, भारत (सध्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली)

राष्ट्रीयत्व

भारतीय

राजकीय पक्ष

• स्वतंत्र मजूर पक्ष

 • शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन

 • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

मागील इतर राजकीय पक्ष सामाजिक संस्था :

 • बहिष्कृत हितकारिणी सभा

 • समता सैनिक दल

शैक्षणिक संस्था 

 • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी

 • द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट

 • पिपल्स एज्युकेशन सोसायटी

धार्मिक संस्था 

भारतीय बौद्ध महासभा

आई

भीमाबाई सकपाळ

वडील

रामजी सकपाळ

पत्नी

 • रमाबाई आंबेडकर:-(विवाह १९०६ - निधन १९३५)

 • सविता आंबेडकर:-(विवाह १९४८ - निधन २००३)

आंबेडकर कुटुंब पहा

आपत्य

यशवंत आंबेडकर

निवास

राजगृह मुंबई

धर्म

बौद्ध धर्म

सही


 बाबासाहेबांविषयीच्या खास दहा गोष्टी…यातल्या तुम्हाला किती माहितीये?


प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या :                                                               

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या घेतल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ                                                                     

Caste in Hindu (1916), 

The problem of Rupee (1923), 

Annhilation of Caste (1935), 

Federation Versus Freedom (1939)

Ranade, Gandhi and Ginnah (1943)

Communal Deadlock and a Way to solve it (1945)

What congress and Gandhi have done to the untouchables? (1945) 

Pakistan or Partition of India (1945)

State and Minorities (1947)

Maharashtra as a Linguistic state (1948)

The untouchable (1948), Who were shudra (1945)

Buddha and his Dhammas (1957).


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे :                                                     

मूकनायक (१९२०)

बहिष्कृत भारत (१९२७)

समता (१९२८)

जनता (१९३०)

प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).


महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने :                   

महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७) 

मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७) 

शेतकऱ्यांची चळवळ (१९२८)

पर्वती देवालय प्रवेश (१९२९)

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१)

पुणे करार (१९३२)

येवला परिषद (१९३५)

बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.


बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :                                                                

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४)

समता सैनिक दल (१९२७)

स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६)

शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२)

पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५)

भारतीय बौद्ध महासभा (१९५५).


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा :                                                            

‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’. ‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’ ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ ‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’ ‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’


बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान :

१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.


बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :

चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती. पत्रकार :‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते. राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते. अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.


बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी :                                                        

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., 'दामोदर नदी खोरे' आणि 'सोने नदी खोरे' प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या 'हिराकुड धरण' प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. 'जय भीम' या घोषणेनंतर देशात 'जय हिंद' ही घोषणा सुरु झाली.


बाबासाहेबांचे लेखन :

भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

 ----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..एक जनजागृती चळवळ 7900094419*    https://chat.whatsapp.com/CEujEQSOix79UmL41Vxa4h


मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

*पेट्रोल पंपावर 'या' सुविधा असणे बंधनकारक; मोफत हवा मारुन मिळाली नाही तर 'अशी' करा तक्रार*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

वाचाल तर... वाचाल!!!


*पेट्रोल पंपावर 'या' सुविधा असणे बंधनकारक; मोफत हवा मारुन मिळाली नाही  तर'अशी' करा तक्रार* 

इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमसोबतच सर्व तेल कंपन्यांनी या सुविधांसंदर्भात एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पेट्रोल पंपावर तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला या सुविधा पेट्रोल पंपावर मिळाल्या नाहीत तर तुम्ही त्याची तक्रारही करु शकता.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

*१) मोफत हवा:*

अनिवार्य सुविधांचा विचार केला तर यामध्ये सर्वप्रथम येते हवा.ज्या वेळी तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही गाडीत मोफत हवा भरु शकता. पेट्रोल पंप चालकांना अशी सुविधा पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांसाठी करायची असते.

*२) पाण्याची व्यवस्था:*

प्रत्येक पेट्रोल पंपावर पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रवासा दरम्यान तुम्ही पेट्रोल पंपावर पाणी घेऊ शकता.

*३) तक्रार पुस्तिका:*

पेट्रोल पंपावर तक्रार पुस्तिका असणं गरजेचं आहे. जर पेट्रोल पंपावर एखाद्या कर्मचाऱ्यासंदर्भात किंवा सुविधेसंदर्भात तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही त्या नोंदवहीत करु शकता.

*४) काम करण्याची वेळ:*

पेट्रोल पंपावर किती तास काम केलं जातं याची माहितीही प्रमुख रुपात डिस्प्ले करणं आवश्यक आहे. त्यासोबतच कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन नंबरही असणं आवश्यक आहे. म्हणजेच गरज पडल्यास ग्राहक त्या क्रमांकावर संपर्क करु शकतील.

*५) आपत्कालीन फोन* *(Emergency Phone Call):*

दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना अगदी अनपेक्षितपणे घडत असतात. जर कधी तुमचा अपघात झाला आणि तुम्हाला कोणाला निरोप द्यायचा असेल आणि जवळपास कोणी नसेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन आपत्कालीन फोन अगदी हक्काने करू शकता तोही अगदी मोफत.

अपघातच नाही तर प्रवास करताना तुमच्या मोबाईलची बॅटरी कधी संपली किंवा तुम्हाला इतर अगदी महत्वाचा निरोप पोहोचवायचा आहे अशा प्रसंगी तुम्ही एक ग्राहक म्हणून पेट्रोल पंपावर जाऊन अगदी मोफत आणि हक्काने हा फोन करू शकता.


*६) फर्स्ट एड बॉक्स:

तुम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या फर्स्ट एड बॉक्सच्या मदतीने प्रथमोपचार करु शकता.

*७) शौचालय आणि सुरक्षा:

पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा असणं आवश्यक आहे. इतकेच नाही तर, एखाद्या संकटाच्या काळात परिस्थिती हाताळता यावी यासाठी पेट्रोल पंपावर सुरक्षेची सुविधा देखील आवश्यक असावी.

*८) पेट्रोल पंपा विरुद्ध तक्रार कोठे करावी:*

वरीलपैकी कोणत्याही सुविधा पेट्रोल पंपांवर विनाशुल्क दिल्या जात नसतील किंवा त्यासाठी पैसे आकारले जात असतील तर आपण पेट्रोल पंप मालकाविरूद्ध तक्रार करू शकता. ही तक्रार पेट्रोल पंप ज्या पेट्रोलियम कंपनीचा असेल त्या कंपनीकडे तक्रार करू शकता. यासाठी संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या संकेतस्थळावर ईमेल आयडी व संपर्क क्रमांक मिळू शकेल. 

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!      

 ---------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..एक जनजागृती चळवळ 7900094419*    https://chat.whatsapp.com/CEujEQSOix79UmL41Vxa4h

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...