हा ब्लॉग शोधा

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

*Road Accident: तुमच्याकडून अपघात झाल्यास खरंच भरपाई द्यायची असते का?*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 
    
 वाचाल तर...  वाचाल!!!


 *Road Accident: तुमच्याकडून अपघात झाल्यास खरंच भरपाई द्यायची असते का?*

गाडी चालवताना बऱ्याचदा अपघाताच्या (Road Accident) घटना घडतात. आपल्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्याने त्या गाडीचे नुकसान होऊ शकते किंवा त्यात एखादी व्यक्ती जखमी होऊ शकते. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशावेळी समोरचा गाडी चालक पैशांची मागणी करतो. नुकसान भरपाईच्या नावाखाली जास्त पैसे मागतो. तुमच्याबाबतीत असं घडलं तर समोरच्या गाडी चालकाला पैसे देण्याची गरज नाही.अशा परिस्थितीत घाबरुन जाऊ नका. आपल्या गाडीचा विमा असेल तर घटनास्थळावर तडजोड करु नका. अशावेळी काही निश्चित कार्यपद्धती पाळल्या पाहिजे किंवा दुसऱ्या पार्टीला पोलिसांकडे (Police) जाण्यास सांगितले पाहिजे. जर आपल्या गाडीचा विमा असेल तर नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनीची असते. तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर नेमकं काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत...

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*घटनास्थळावर करार करु नका *

तुमच्या गाडीमुळे अपघात झाल्यास घटनास्थळी कोणत्याही प्रकारच्या करारावर सही करु नका. आपल्या गाडीचा विमा असेल तर त्याची सर्व जबाबदारी विमा कंपनीची आहे. तसंच समोरच्या गाडीचं नुकसान झालं असेल तर त्या गाडीचा मालक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करु शकतो. बऱ्याचदा असं होतं, की नुकसान झालेल्या गाडीचा मालक तुमच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करतो आणि परत आपल्या विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करतो. अशापद्धतीने तो दोन्हीकडून फायदा घेतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसांकडे जाणे आणि आपल्या विमा कंपनीला माहिती देणे योग्य असते.

*पोलिसांना माहिती का द्यावी?* 

तुमच्या गाडीनं अपघात झाला असेल तर सर्वात आधी पोलिसांना कळवा आणि आपल्या गाडीच्या कागदपत्रांची फोटो कॉपी त्यांना द्या. अशा परिस्थितीत तुम्ही पोलीस किंवा कोणत्याही एजन्सीला सहकार्य केलं पाहिजे.

*विमा कंपनी घेईल सर्व जबाबदारी*-

अपघाताबद्दल विमा कंपनीला सर्व माहिती द्या. त्यासोबत पॉलिसी नंबरची सर्व माहिती द्या. अपघातात जर कोणी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर यासाठी तुमची कोणतीही जबाबदारी असणार नाही. सर्व जबाबदारी विमा कंपनीची असेल आणि ते आपला खटला कोर्टात लढवतील.


वाहन विमा : लाखमोलाचे सुरक्षा कवच

*विम्याच्या माध्यमातून किती नुकसान भरपाई मिळते* -

कलम 2-1(आय) अधिनियमात असे म्हटले आहे की, जर आपल्या गाडीच्या धडकेत कोणी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर जास्तीत जास्त रक्कम दिली जाते. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 2-1 नुसार नुकसानीसाठी थर्ड पार्टीला 7.5 लाख रुपयांपर्यंत कव्हर करावे लागते.

रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणे आवश्‍यक आहे. हा वाहन विमा काढण्यात पळवाटाही आहेत. पोलिसी कारवाई टाळण्यासाठी किंवा प्रीमीयम कमी असतो म्हणून कमी किमतीचा विमा काढतात. परंतु हा 'शॉर्टकट' आर्थिक फटका देणारा ठरू शकतो.

वाहन विमा आपल्या वाहनाला होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो.

काही गोष्टी ध्यानात ठेवा...

१) वाहनाचा विमा वेळेत काढणे आवश्‍यक आहेच. परंतु, विमा वैध असला म्हणजे झाले, असे नसते. वाहन चालवताना वैध वाहन परवाना, वाहनाची आवश्‍यक कागदपत्रे अशा अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. अपघात झाल्यानंतर क्लेम करताना या गोष्टी तपासल्या जातातच, त्याशिवाय विमा कंपनी दावा मंजूर करत नाही.

२) भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांसाठी वाहन विम्यावर एक क्युआर कोड प्रिंट करणे बंधनकारक केले होते. याद्वारे ग्राहकाला आपल्या विम्याचे पूर्ण तपशील मिळतात. भारतात डिसेंबर २०१५नंतर विम्यावर क्युआर कोड दिला जातो.

३) वाहनांचा विमा नवीन अथवा अनोळखी कंपनीकडून खरेदी करू नका. विमा काढल्यानंतर त्या कंपनीच्या विम्यावर, व्यवहारांवर संशय असल्यास 'आयआरडीए'च्या संकेतस्थळावर परवानाधारक कंपन्यांच्या यादीत कंपनीचे नाव तपासता येते.

४) विमा ओळखीच्या व्यक्तीकडूनच खरेदी करावा. ऑनलाइन विमा संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच खरेदी करा. विमा खरेदी करताना केवळ धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहार करावेत, तसेच धनादेश देताना केवळ कंपनीच्या नावाने द्या. कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चेक देऊ नका. फसवणूक होण्याची शक्यता असते.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

नैसर्गिक आपत्ती वेळी...

१) नैसर्गिक आपत्तीत वाहनावर झाड किंवा अन्य कुठली वस्तू पडून नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आता विमा कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर फोन करावा. घटनेची व वाहनाची संपूर्ण माहिती द्यावी.

२) वाहनावर पडलेले झाड किंवा वस्तू काढायचा प्रयत्न करू नका. आहे त्या परिस्थितीत वाहनांची माहिती देणे सोयीचे होते. वाहनावर पडलेल्या वस्तू हटवल्यास भरपाई मिळणे कठीण होते.

३) ऑनलाइन किंवा मोबाईलद्वारे विम्याचा क्लेम करण्याची परवानगी विमा कंपन्यांना देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जासाठी वाहनाचा बाहेरून, आतून फोटो काढून तो विमा कंपनीला पाठवता येतो.

दावा का फेटाळला जातो?

१) वाहन चालवताना वाहनचालकाचा परवाना अवैध असणे.

२) विम्याचा दावा करताना नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र नसणे.

३) अपघाताच्या वेळी चालकाने मद्यप्राशन केलेले असल्यास दावा फेटाळला जातो.

४) वैयक्तिक खासगी वापराचे वाहन व्यावसायिक कामासाठी वापरल्यास.

बोगस कंपन्यांचाही सुळसुळाट

देशात प्रसिद्ध कंपन्यांखेरीज बोगस विमा कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. ट्रकचालक आणि दुचाकीस्वार यांची यात फसवणूक होते. वैध विम्याची किंमत साधारण १० हजारांच्या घरात असते. परंतु, बोगस विमा चार ते सहा हजारांपर्यंत मिळतो. यात फसवणूक होण्याची शक्यता असते. पोलिस तपासणीत उपयोगी पडणार असल्याने बहुतांश ग्राहक खोटा विमा खरेदी करतात, असे 'आयआरडीए'च्या आकडेवारीतून समोर आले आहे. हा शॉर्टकट महागात पडू शकते.

*कोर्टात योग्य माहिती द्या* -

जर तुम्हाला कोर्टाकडून समन्स मिळालं असेल तर तुम्ही कोर्टात हजर राहा आणि अपघाताबाबत योग्य माहिती द्या. अपघात कसा झाला याचा नकाशा तयार करुन तुम्ही कोर्टाला देऊ शकता. तुम्ही अचूक माहिती दिली तर खटल्याचा निकाल लवकर लागेल.

*ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रं आवश्यक* 

जर तुमच्या गाडीने अपघात झाला असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी विमा कंपनी घेईल. त्यासाठी गाडी चालवणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. जर असं नसेल तर विमा कंपनी दावा स्वीकारणार नाही आणि सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल.

*मद्यपान केले असेल तर अवघड होईल*-

मद्यपान केल्यानंतर जर तुमच्या गाडीचा अपघात झाला आणि अपघातात कोणी जखमी किंवा त्याचा मृत्यू झाला तर तुम्ही नक्कीच अडचणीत येऊ शकता. अशा परिस्थितीत विमा कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदारी तुम्हाला उचलावी लागेल आणि तुम्हालाच कोर्टात खटला लढवावा लागेल.

*निष्काळजीपणा पडेल महागात* -

गाडी चालवताना निष्काळजीपणा करु नका. जर पोलीस तपासात तुम्ही निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचं कळालं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. नवीन मोटर कायद्यात तीन वर्षांपर्यंत तुरुंगावासाची शिक्षा नमूद करण्यात आली आहे. तसंच, मोटारवाहन कायद्याच्या कोणत्याही तरतूदीचे उल्लंघन केल्यास तुमच्या अडचणी वाढतील.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                                -------------------------------------------------------------

---

साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.

*माहिती अधिकार अर्ज दाखल करा, तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा |*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 
    
 वाचाल तर...  वाचाल!!!

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


 *माहिती अधिकार कायदा (RTI) कोणासाठी व कशासाठी? माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती*

माहिती अधिकार कायदा हा ज्या शासकीय कार्यालयांना शासनाचा निधी प्राप्त होतो त्यांनाच या कायद्याचा संबंध राहील. संपूर्ण भारता मध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे या कायद्याचे क्षेत्र राहील. तसेच शासकीय संस्थांवर शासनाचे नियंत्रण असते, तसेच शासनाच्या निधीवरच ज्यांचे कार्य चालते अशा सर्व संस्थांमध्ये या कायद्याचा संबंध राहील. शासनाच्या निधीचा वापर जेथे जेथे झाला असेल त्या सर्व क्षेत्रांतील सर्व प्रकारच्या संस्थांशी या कायद्याचा अंतर्भाव राहील.

*माहिती अधिकार कक्षेत न येणाऱ्या संस्था:*

या माहिती अधिकार कायद्यामध्ये खासगी संस्था येत नाहीत कारण या संस्थाना शासन निधी पुरवत नाही. पण माहिती अधिकारातील नेमणूक झालेल्या केंद्रशासित माहितीचे अधिकार असणाऱ्या कमिशनने जाहीर केले, की ज्या खाजगी संस्थेने सार्वजनिक मालमत्तेचा वापर केला असेल किंवा करीत असेल किंवा एखाद्या कंपनीने सार्वजनिक मालमत्तेचा वापर केला असेल आणि करीत असेल, तर त्या खासगी संस्था आणि कंपन्या या माहिती अधिकार कायद्यामध्ये समाविष्ट असतील.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )

*खालील बाबतीतील माहिती माहितीच्या अधिकारात देता येते:*

1) सरकारी कागदपत्रांच्या नकला मिळविणे.

2) सरकारी कागदपत्रांच्या नकलांची तपासणी आणि पडताळणीच्या कामासाठी उपयोग करणे.

3) सरकारी कामाचे नमुने घेणे आणि ते मिळविणे.

४) नियम करण्याचे अधिकार - केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना याबाबतचे नियम बनविण्याचा अधिकार राहील, तसेच ते नियम या कायद्यास अधीन राहून केलेले असतील.

५) अपूर्ण माहिती - माहिती अधिकार कायद्यानुसार जर रेकॉर्डमधील काही भाग राखून ठेवून माहिती द्यावयाची असल्यास त्याबाबत तशी पूर्वसूचना असण्याची गरज असेल आणि त्यास तशी पूर्वपरवानगी घेऊनच अर्धवट माहिती देणे शक्य होईल. मात्र अशा प्रकारच्या प्रकारांना हा कायदा पूर्णतः संरक्षण देत नाही. त्यामुळे मागितलेली सर्व माहिती मिळणे या कायद्यास धरून बंधनकारक असेल. सार्वजनिक हित लक्षात घेऊनच याबाबतीत निर्णय घेणे गरजेचे असेल. ज्या माहितीमुळे देशाचे हितसंबंध बिघडतील किंवा सार्वजनिक जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होईल अशा काही कागदपत्रांबाबतच असे विचार करणे सोईचे ठरते.

*खालील बाबतीतील माहिती माहितीच्या अधिकारात देता येणार नाही:*

1) देशाची शांतता धोक्यात येईल अशी माहिती : या माहिती अधिकार कायद्यामध्ये ज्या माहितीमुळे देशाची एकात्मिकता धोक्यात येईल. देशाच्या संरक्षणाला बाधा येईल, शास्त्रीय किंवा आर्थिक बाबतीत राज्यावर परिणाम होतील, परदेशी राज्यांबरोबर असलेल्या हितसंबंधांना बाधा येईल किंवा त्या माहितीमुळे मोठ्या घटना म्हणजे दंगली, वाद, शत्रुत्व निर्माण होऊन देशातील शांतता भंग पावेल अशी माहिती देता येणार नाही.

२) न्यायालयीन प्रक्रियेनुसार न देता येणारी माहिती : ज्या माहितीमुळे कोर्टाचा अवमान होईल अशी माहिती किंवा न्यायालयाने तसे आदेश दिलेले असल्यास त्याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात देता येणार नाही.

3) लोकसभेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिकारातील माहिती: ज्या माहितीमुळे लोकसभेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिकारातील माहिती देताना ती देण्याने कायदेभंग होणार असेल तर तशी माहिती देता येणार नाही.

 4) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने असणारी माहिती: ज्या माहितीमुळे बुद्धिमत्ता हक्क, व्यापारी आत्मविश्वाला तडा जाणारी घटना,एखाद्या व्यवसायातील गोपनीयता किंवा कार्यक्षम अधिकाऱ्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ती माहिती देण्यास प्रतिबंध केला असेल अशी माहिती देता येणार नाही.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.


५)
सार्वजनिक हितसंबंधांना बाधा निर्माण होणारी माहिती: ज्या माहितीमुळे सार्वजनिक हितसंबंधांना बाधा निर्माण होईल अशी माहिती या कायद्याद्वारे देता येणार नाही.

6) परदेशातील सरकारची गोपनीय माहिती: जी माहिती परदेशी सरकारकडून गोपनीय स्वरूपात प्राप्त झाली असेल तर ती माहिती या कायद्यानुसार देता येणार नाही. 

7) सुरक्षिततेच्या बाबतीत मिळालेली माहिती: जी माहिती लोकांच्या किंवा जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची आहे अशी माहिती या कायद्यानुसार देता येणार नाही. 

 8) एखाद्या व्यक्तीच्या चौकशीबाबतची माहिती: जी माहिती एखाद्या व्यक्तीच्या चौकशीबाबत अडचण निर्माण करणारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीची चौकशी सुरू असेल अशी माहिती या कायद्यानुसार देता येणार नाही. 

9) कागदपत्रांविषयी माहिती: या कायद्यानुसार कॅबिनेटची कागदपत्रे, मंत्र्यांनी दिलेली माहिती किंवा सादर केलेली कॅबिनेट बैठकीसमोरील कागदपत्रे, तसेच कॅबिनेटला सादर केलेली सचिव पातळीवरील अगर अधिकारी वर्गाने कॅबिनेटला सादर केलेली कागदपत्रे यांची माहिती देता येणार नाही.

10) खासगी माहिती: या कायद्यानुसार जी माहिती खासगी माहिती की जी सार्वजनिक हितसंबंध बिघडविणार नाही अशी माहिती देता येणार नाही. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनाशी संबंध असेल अशी माहिती देता येणार नाही.

 11) विनाकारण नुकसान होणार नाही अशी माहिती: या कायद्यानुसार लोकांची इच्छा लक्षात घेऊन वरीलप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या व्यापारात आणि ट्रेड सिक्रेट्स यामुळे विनाकारण नुकसान होणार नाही अशा प्रकारची माहिती दिली जाणार नाही. 

 *माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या सविस्तर*

आपण माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोणत्याही सार्वजनिक आस्थापनांकडून (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदानप्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता. यासाठी लागणारा अर्ज हस्तलिखित असू शकतो किंवा टाईप केलेला असू शकतो. अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत असावा.

 *रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा ..साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)

*माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये, ग्रामपंचायतकडून लेखा परीक्षण अहवाल(ऑडिट रिपोर्ट) प्राप्त करण्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना... नागरिक व जनहितार्थ जारी ( माहितीचा कालावधी आवश्यकतेनुसार बदलावा)*



*तुमच्या अर्जात खालील माहिती पुरवा:*

1) सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी (पीआयओ) यांचे नाव व पत्ता
2) विषय: माहितीचा अधिकार अधिनियम २००५, सेक्शन ६ (१) अन्वये माहिती मिळविण्यासाठी अर्ज
3) तुम्हाला त्या संस्थेकडून/प्राधिकरणाकडून हवी असलेली विशिष्‍ट माहिती
4) अर्जदाराचे नांव
5) वडिलांचे/पतीचे नांव
6) वर्ग: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्गीय, इ.
7) अर्ज फी
8) तुम्ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापैकी आहात का? हो/नाही
9) पत्रव्यवहाराचा पत्ता (मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी आवश्‍यक नाहीत)
10) तारीख आणि स्थळ
11 )अर्जदाराची सही
12) सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी

*माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत नमुना अर्ज:*     

अर्ज करण्यापूर्वी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी यांचे नाव व पत्ता, उल्‍लेख केलेली फी व फी देण्याची पद्धत पुन्हा एकदा तपासून पहा. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्यासाठी फी आकारण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र अनुसूचित जाती/जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींकडून फी आकारण्यात येत नाही. ज्यांना फीमाफी हवी असेल त्यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती/जमाती/दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 

अर्ज स्वतः जाऊन/पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे दाखल करता येतो. जर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवत असाल तर नेहमी रजिस्टर पोस्टाचाच वापर करा. खाजगी कोरियर सेवा वापरणे सदैव टाळा. तुमच्या संदर्भासाठी अर्जाच्या (मुख्य अर्ज, फी भरल्याचा पुरावा, सोबत जोडलेली कागदपत्रे, पोस्टाने अर्ज पाठवल्याचा पुरावा, इ.) दोन (2) छायांकित प्रती तयार करा व सुरक्षितपणे ठेवा. 

जर तुम्ही अर्ज स्वहस्ते दाखल करणार असाल, तर एक पोचपावती तयार करा व त्यावर संबंधित कार्यालयाचा तारखेनिशी सही-शिक्का घ्या. जर अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवणार असाल तर ही पोचपावती अर्जासोबत जोडा आणि पोस्टाची अर्ज पाठवल्याची पावती व्यवस्थित जपून ठेवा. लोकमाहिती अधिकार्‍याला अर्ज मिळाल्यापासूनच्या दिवसापासून अर्जावर कार्यवाही करून माहिती पुरवण्याची मुदत मोजतात.

*मोबाईलवरुन माहिती अधिकार अर्ज दाखल करा, तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा |*

माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये लागू करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याद्वारे नागरिक त्यांना हवी असलेल्या विभागांसंदर्भातील प्रश्नांची माहिती मागवू शकतात. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवायाची असेल तर काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन माहिती मिळवणं आता सोपं झालं आहे. नागरिक त्यांना हवी असलेली माहिती ऑनलाईन पद्धतीनं मागवू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारनं यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केल्या आहेत.

माहिती अधिकारासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वेबसाईट

केंद्र सरकारच्या विभागासंदर्भातील माहिती मागवायची असेल तर तुम्हाला https://rtionline.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विभागांसर्दभातील माहिती मागवायची असल्यास तुम्हाला https://rtionline.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार वेबसाईट द्वारे तुम्ही 200 विभागांची माहिती ऑनलाईन पद्धतीनं मागवू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल. 

*ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी घ्यायची दक्षता*

माहितीच्या अधिकारांतर्गत ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज तसेच प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी पोर्टलचा वापर करता येईल. यासाठी लागणारे विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरता येईल. तुम्ही मागवलेली माहिती अधिक असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये जे रकाने देण्यात आले आहेत त्यामध्ये तुम्ही 15 शब्दांमध्ये तुमची माहिती लिहू शकता. त्यापेक्षा जास्त मजकूर असल्यास पीडीएफ फाईल अपलोड करावी लागेल.

*अर्जाचं शुल्क*

ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन माहिती मागवण्यासाठी 20 रुपये शुल्क भरावे लागले. तर, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यांना माहिती मागवण्यासाठी शुल्क भरावं लागणार नाही. अर्जाचं शुल्क भरण्यासाठी 1) इंटरनेट बँकींग 2) एटीएम-कम-डेबिट कार्ड 3) क्रेडिट कार्ड (मास्टर्स/व्हीसा) याचा वापर करता येईल.

*ऑनलाईन अर्ज कसा करणार?*

महाराष्ट्र शासनाच्या माहिती अधिकार कायदा ऑनलाईन अर्ज पोर्टला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टल वापरण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या वाचून समजून घ्या त्यानंतर मार्गदर्शक सूचना वाचल्याचं मान्य करुन अर्ज दाखल करण्याच्या बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कोणत्या विभागाची माहिती हवी आहे तो निवडावा लागेल. अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता, अर्ज दाखल करण्याचं कारण, अर्जदार दारिद्रय रेषेखालील आहे का ते निवडल्यानंतर हवी असलेल्या माहितीसंबंधी तपशील माहिती अधिकार विनंती अर्ज मजकूर नमुन्यात लिहावा. त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करता येईल. त्यानंतर विहीत शुल्क भरुन तुम्ही हवी असलेली माहिती मिळवू शकता.

*महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर कोणत्या विभागांची माहिती*

मंत्रालयातील विविध विभाग, पोलीस आयुक्त कार्यालयं, महापालिका, जिल्हा परिषद, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा पोलीस कार्यालय, तहसील कार्यालय आदी विभागांकडून माहिती मागवता येईल.सरन्यायाधीशांचे कार्यालय आता ‘आरटीआय’ अंतर्गत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय.                                             

*माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील करण्यासाठी काही सुचना*

1) तुमचा अर्ज लोकमाहिती अधिकार्‍याने फेटाळला असेल तर.

2) ३० दिवस किंवा ४८ तासांच्या आत माहिती पुरवण्यास असमर्थ असेल तर.

3) जर सार्वजनिक आस्थापनाने माहितीचे अर्ज स्वीकारण्यासाठी किंवा माहिती पुरवण्यासाठी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी नियुक्त केला नसेल तर.

4) सहाय्यक लोकमाहिती अधिकार्‍याने अर्ज स्वीकारण्यस किंवा लोकमाहिती अधिकार्‍याकडे पाठविण्यास नकार दिला तर.

5) जर लोकमाहिती अधिकार्‍याने दिलेला निकाल समाधानकारक नसेल तर.

दिलेली माहिती अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर.

6) जर सरकारी अधिकार्‍याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देतांना घेतलेली फी अवाजवी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*पहिल्या अपीलासाठीची मुदत:*

राज्य/ केंद्रीय लोकमाहिती अधिकार्‍याने केलेला शेवटचा पत्रव्यवहार (निकाल किंवा विनंती नाकारल्याचे पत्र) मिळाल्याच्या तारखेपासून किंवा ठरवून दिलेली तारीख उलटल्यावर ९० दिवसांच्या आत. 

अपीलकर्त्याला माहिती न देण्याचे कारण प्रथम अपीलीय अधिकार्‍यास मान्य असल्यास ९० दिवसांनंतर ही अपील करता येते.

*पहिल्या अपीलासाठी अर्ज लिहिणे:*

एका पांढर्‍या कागदावर तुमचा अर्ज लिहा

अर्ज हस्‍तलिखित किंवा टंकलिखित ही असू शकतो.

अर्ज इंग्रजी किंवा हिंदीत (केंद्रीय माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) किंवा त्या विशिष्‍ट राज्याच्या (राज्य माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) अधिकृत भाषेत असावा.

हवी असलेली माहिती अर्जात विहित नमुन्यात स्पष्टपणे नमूद करावी.

विनंतीअर्ज, फी दिल्याचा पुरावा, लोकमाहिती अधिकार्‍याने दिलेली पोचपावती, अर्जावर दिलेला निकाल, इ. कागदपत्रांची स्वसाक्षांकित छायाप्रत अर्जासोबत जोडा.

प्रत्येक कागदपत्राच्या छायाप्रती तयार करा आणि त्या स्वतःच्या संदर्भासाठी जपून ठेवा.

*पहिला अपील अर्ज कोठे पाठवावा:*

अर्ज त्याच आस्थापनाच्या प्रथम अपीलीय अधिकार्‍याकडे दाखल करावा.

श्रेणीमध्ये प्रथम अपीलीय अधिकारी लोकमाहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असतो जो आवश्यक ती माहिती पुरवितो किंवा अर्ज नाकारू शकतो.

पहिला अपीलीय अर्ज दाखाल करताना त्यावरील प्रथम अपीलीय अधिकार्‍याचे नाव, फी, फी देण्याची पद्धत तपासून पहा. (काही राज्यांमध्ये पहिले अपील मोफत असते तर काही राज्यांत त्यासाठी फी आकारण्‍यात येते.)

*पहिला अपील अर्ज कसा पाठवावा:*

अर्ज केवळ रजिस्टर पोस्टाद्वारेच किंवा स्वहस्तेच पाठवावा.

कोरियर सेवा वापरणे टाळा.

तसेच अर्जासोबत पोचपावती देखील जोडा

माहिती पुरविण्यासाठी कालमर्यादा:

सर्वसामान्य प्रकरणांच्याबाबतीत निर्णय साधारणतः ३० दिवसांत दिला जातो. अपवादात्मक स्थितीत ही मर्यादा ४५ दिवसांपर्यंत जाऊ शकते.

प्रथम अपीलीय अधिकार्‍याकडे अर्ज पोहोचल्याच्या दिवसापासून निर्णयासाठी कालमर्यादा मोजली जाते.

*माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील करण्यासाठी काही सुचना*

1) माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील कधी दाखल करावे:

2) प्रथम अपीलीय अधिकार्‍याचा निकाल असमाधानकारक असेल तर. 

3) अपीलीय अधिकार्‍याने दिलेली माहिती अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर.

प्रथम अपीलीय अधिकारी यांनी तुमचा RTI अर्ज नाकारला असेल तर. 

4) प्रथम अपीलीय अधिकार्‍याने दिलेल्या मुदतीमध्ये अर्जावर काही ही निर्णय दिलेला नसेल तर.

5) जर सहाय्यक लोकमाहिती अधिकार्‍याने राज्य/केंद्रीय लोकमाहिती अधिकार्‍याकडे किंवा राज्य/ केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पाठवण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिलेला असेल तर.

6) जर सरकारी अधिकार्‍याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देतांना घेतलेली फी अवाजवी आहे असे तुम्हांला वाटत असेल तर.

*अपील कोठे दाखल करावे?*

1) राज्य माहिती आयोगाकडे (जर प्रकरण राज्याच्या सरकारी अधिकार्‍यांशी संबंधित असेल तर).

2) केंद्रीय माहिती आयोगाकडे (जर प्रकरण केंद्राच्या सरकारी अधिकार्‍यांशी संबंधित असेल तर).

*अपीलासाठी मुदत:*

प्रथम अपीलीय अधिकार्‍याने केलेला शेवटचा पत्रव्यवहार (निकाल किंवा विनंती नाकारल्याचे पत्र) मिळाल्याच्या तारखेपासून किंवा ठरवून दिलेली तारीख उलटल्यावर ९० दिवसांच्या आत.

अपीलकर्त्याला माहिती न देण्याचे कारण राज्य/केंद्रीय माहिती आयोगास मान्य असल्यास ९० दिवसांनंतर ही अपील करता येते.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.


अपीलासाठी अर्ज लिहिणे:

एका पांढर्‍या कागदावर तुमचा अर्ज लिहा किंवा इंडिया डेव्हलपमेंट गेटवे पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करा.

अर्ज हस्‍तलिखित किंवा टंकलिखित असू शकतो.

अर्ज इंग्रजी किंवा हिंदीत (केंद्रीय माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) किंवा त्या विशिष्‍ट राज्याच्या (राज्य माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) अधिकृत भाषेत असावा.

अर्जाच्‍या फॉर्मची तयारी करणे:

हवी असलेली माहिती अर्जात विहित नमुन्यात स्पष्टपणे नमूद करावी.

एका पानावर अनुक्रमणिका तयार करा आणि त्यामध्ये अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची पृष्ठक्रमांकासह नावे लिहा.

प्रत्येक कागदपत्राच्या ५ प्रती तयार करा (2र्‍या अपीलाचा अर्ज, माहितीची विनंती, 1ल्‍या अपीलाचा अर्ज, लोकमाहिती अधिकार्‍याला फी दिल्याचा पुरावा, इ.) आणि त्या स्वसाक्षांकित करा. तुम्ही स्वतःसाठी आणखी एक प्रत तयार करू शकता.

अर्ज कसा पाठवावा?

अर्ज ५ प्रतींसह केवळ रजिस्टर पोस्टाद्वारेच पाठवावा.

तसेच अर्जासोबत पोचपावती देखील जोडा.

केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज ऑनलाईन ही पाठवाता येतो. त्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती पुरविण्यासाठी कालमर्यादा:

सर्वसामान्य प्रकरणांच्याबाबतीत निर्णय साधारणतः ३० दिवसांत देण्‍यात येतो. अपवादात्मक स्थितीत ही मर्यादा ४५ दिवसांपर्यंत जाऊ शकते.

राज्य/केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पोहोचल्याच्या दिवसापासून निर्णयासाठीची कालमर्यादा मोजली जाते.

राज्य/केंद्रीय माहिती आयोगानेदिलेला निर्णय दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. मात्र असंतुष्ट लोक अधिकारी राज्य/केंद्रीय माहिती आयोगाविरूध्‍द विरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------   

 

संतोष विठ्ठल साळवे ....एक जनजागृतीची चळवळ 7900094419.    https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7

रविवार, १८ एप्रिल, २०२१

*तुम्हाला माहिती आहे का? फ्री मध्ये मिळतायेत हे 5 विमा कव्हर*

संतोष साळवे...7900094419

*तुम्हाला माहिती आहे का? फ्री मध्ये मिळतायेत हे 5 विमा कव्हर*

जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम वेळेवर भरावा लागतो परंतु तरीही काही गोष्टी किंवा सेवा अशा असतात ज्यावर जीवन किंवा आरोग्य विमा विनामूल्य उपलब्ध आहे.

आजच्या युगात जीवन विमा असो की आरोग्य विमा असो, विम्याची गरज वाढत आहे. अपघाती मृत्यू किंवा आजारपण झाल्यास विमा संरक्षण व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य होते.


*गॅस सिलेंडरवर ग्राहकांना मिळू शकतो 50 लाखाचा फायदा, जाणून घ्या कसा घ्यायचा 'लाभ'*

घरगुती गॅस सिलेंडर वापरताना अनेक दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या परिस्थितीत गॅस लिकेज होऊन स्फोट झाला तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या विमा योजनेसाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांसोबत भागीदारी असते. सध्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल यांसारख्या कंपन्यांचा विमा ICICI लोम्बार्डच्या माध्यमातून विमा देत आहेत. गॅस सिलेंडरवर 50 लाखांचा क्लेम मिळू शकतो.

महात्मा फुले आरोग्य योजना.अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

*जाणून घ्या महत्वाचे मुद्दे -*

जर कोणतीही व्यक्ती LPG कनेक्शन घेते आणि त्याने घेतलेल्या त्या सिलेंडरमधून कोणतीही दुर्घटना होते तेव्हा त्याला 50 लाख रुपयांच्या विम्याचा दावा करता येऊ शकतो.

 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. LPG सिलेंडरच्या विमा कव्हर मिळवण्यासाठी याबाबतची माहिती पोलिस ठाणे आणि एलपीजी वितरकाला द्यायला हवी.

ही पॉलिसी कोणत्याही एकाच्या नावाने नसते. तर प्रत्येक ग्राहक या पॉलिसीमध्ये कव्हर होतो. त्यासाठी कोणताही प्रीमियमही द्यावा लागत नाही. फक्त FIR कॉपी, जखमी झालेल्या रुग्णाचा खर्च आणि मेडिकल किंवा पोस्टमोर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सांभाळून ठेवा.

जर कोणतीही दुर्घटना झाली तर वितरकाच्या माध्यमातून नुकसान भरपाईचा दावा केला जातो. त्यानंतर दाव्याची रक्कम विमा कंपनी संबंधित वितरकाजवळ जमा करते आणि ही रक्कम ग्राहकाला मिळू शकते.

                       
*जन धन खात्यावर विमा*

जन धन योजनेंतर्गत, ओपन बँक खात्यासह मिळणाऱ्या रूपे डेबिट कार्ड वर 30 हजार रुपये जीवन विमा आहे आणि वैयक्तिक अपघात विमा 2 लाख रुपये आहे. खातेधारकाच्या मृत्यूनंतर जीवन विमा रक्कम दिली जाते.

जर रूपे कार्डधारकाने कोणत्याही बँकेच्या शाखेत, बँक मित्र, एटीएम, पीओएस, ई-कॉम, इत्यादी एकतर स्वत: च्या बँकेद्वारे (समान आवश्यक असेल तर) किमान एक यशस्वी आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार केला असेल तरच अपघात विमा हक्क उपलब्ध असतो.

बँक चॅनेलद्वारे (रुपे कार्डधारक / रुपे कार्डधारक) आणि / किंवा कोणतीही इतर बँक (बँक ग्राहक / रुपे कार्ड धारक दुसर्‍या बँकेच्या वाहिनीवर व्यवहार करतात) अपघाताच्या तारखेपूर्वी ९० दिवसांच्या आत केले गेले पाहिजे .

*पीएफवरील विमा*

एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) देखील आपल्या ग्राहकांना / सदस्य कर्मचार्‍यांना जीवन विमा सुविधा प्रदान करते. ईपीएफओचे सर्व ग्राहक एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड विमा योजना 1976 (ईडीएलआय) अंतर्गत येतात.

विम्याच्या संरक्षणाची रक्कम आता जास्तीत जास्त 7 लाख रुपयांवर पोहोचली आहे. कर्मचार्‍याचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू यामुळे सदस्य कर्मचार्‍याच्या नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने ईडीएलआय योजनेचा दावा केला जाऊ शकतो. यात एकरकमी पेमेंट होते.

ईडीएलआय मध्ये, नियोक्ताला कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही, प्रीमियम नियोक्ताद्वारे भरला जातो. आता मृत्यूच्या तत्पूर्वी 12 महिन्यांत एकापेक्षा जास्त आस्थापनांमध्ये काम केलेल्या कर्मचार्‍यांच्या पीडित कुटुंबास ईडीएलआय देखील लाभ देईल.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

*मोबाइल रिचार्ज वर विमा*

एअरटेल दोन प्रीपेड रिचार्जसह विनामूल्य मुदतीचा जीवन विमा देते. या योजनांचे 279 रुपये रिचार्ज आणि 179 रुपये रिचार्ज आहेत. इतर लाभासह 279 रुपयांच्या योजनेवर 4 लाख रुपयांचा मुदतीचा जीवन विमा उपलब्ध आहे.

त्याचबरोबर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा जीवन विमा आहे. फायदा घेण्यासाठी रिचार्ज केल्यानंतर ग्राहकास एसएमएस, एअरटेल थँक्स अॅप किंवा एअरटेलच्या अधिकृत किरकोळ स्टोअरद्वारे नोंदणी करावी लागेल.

*क्रेडिट-डेबिट कार्डवरील विमा*

बर्‍याच बँकांचे डेबिट कार्डवर विमा संरक्षण असते. विमा संरक्षण विविध प्रकारच्या वैयक्तिक अपघात कव्हर, खरेदी संरक्षण कव्हर आणि कायम अपंगत्व कव्हर इ. हे कव्हर 10 लाख रुपयांपर्यंत आहे.

तसेच, वेगवेगळ्या प्रकारावर अवलंबून, क्रेडिट कार्डाची मर्यादा आणि सेवा प्रदात्याच्या ऑफर लक्षात घेऊन क्रेडिट कार्डवर विमा संरक्षण उपलब्ध आहे. सामान्यत: भारतातील क्रेडिट कार्ड कंपन्या 50 लाखांपर्यंत पूरक विमा देतात. परंतु यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे गरजेचे आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!     -------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419*   https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7



रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार कशी करायची व आपले हक्क काय आहेत. इतरही फायदे जाणून घ्या!!


( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
 

रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार कशी करायची व आपले हक्क काय आहेत. इतरही फायदे जाणून घ्या!!

तुमच्याकडेही रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मोफत धान्याशिवाय इतरही फायदे मिळतात.

रेशन कार्डचे फायदे...

रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही.

याशिवाय याच्या अनेक सुविधा मिळतात. एक ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्ड उपयुक्त आहे. मतदार ओळखपत्र काढायचे असेल, तर रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तरी रेशन कार्डची आवश्यकता असते. बँकेशी संबंधित काही काम असेल, तरीही त्यातील बहुतांश कामांसाठी रेशन कार्डचा उपयोग होऊ शकतो. ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. मोफत आरोग्य विम्यासाठी रेशन कार्डचा उपयोग होतो.

कोण करू शकतं अर्ज?

तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली असाल, म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न 27 हजारांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही बीपीएल (Below Poverty Line) रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यापेक्षा जास्त असेल तर एपीएलसाठी अर्ज करता येतो. राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शासनाने दिलेली कोणतीही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड बनविण्यासाठी आयडी पुरावा म्हणून देता येईल. या व्यतिरिक्त, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रेसुद्धा पत्त्याच्या पुरावा म्हणून आवश्यक असतील.


रेशनिंगचे नियम, माहिती आणि आपले हक्क:

1) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य हे आपल्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते.

2) स्वस्त धान्य दुकानामध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा काही नियम नाही.

3) स्वस्त धान्य दुकानामध्ये घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे.कारण पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

4) दुकानदाराला रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही.

5) स्वस्त धान्य दुकानामध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक असले पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद,रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन,रेशनकार्ड संख्या, भव व देय प्रमाण उपलब्ध असलेला कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.
6) बीपीएल् व अंत्योदयचे धान्य जर आपण मागील महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते.स्वस्त धान्य दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास चालू असलेच पाहिजे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी चालू असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे तारीख व  वेळेसहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. तसेच त्याची सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

7) प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये बीपीएल, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.

8) स्वस्त धान्य दुकानामध्ये आपल्याला ज्या व जेवढ्या वस्तू हव्या असतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्टी घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही.

9) स्वस्त धान्य दुकानामध्ये रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. त्याचा हप्ता बुडत नाही.

10) जर वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धमकी दाखवत, तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्यात आपली तक्रार लिहून त्याखाली नाव, पत्ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्हा म्हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्या, की स्वस्त धान्य दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

11) स्वस्त धान्य दुकानावर देखरेख करण्यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती नेमलेली असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर नजर ठेऊ शकते तसेच दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्य सचिव असतो.

12) आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन जे रेशन घेतो त्याची रेशन दुकानदार कधीकधी पावती मात्र देत नाही. म्हणुन महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

13) आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. तसेच या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.

14) रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.


15) रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे. 




रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी कसे करावे?

रेशनदुकानदारा याबाबत तक्रार असल्यास खालील वेबसाईट, हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.
 

वरील सर्व वेबसाईट ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करता येईल.व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

मित्रांनो,

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो.  परंतु  रेशन दुकानदार आपल्याला पावती माञ देत नाही. म्हणुन

महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे.  आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करुन शकतो.

https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.

https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp


रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे

https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.

http://mahafood.gov.in/pggrams/

वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे.  जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे. 


*रेशनकार्ड धारकानो तुम्हाला माहीती आहे का ? आता घर बसल्या मिळणार माहीती, हे सरकारी अ‍ॅप येणार कामी*

मेरा राशन मोबाईल ॲप्लिकेशन ची लिंक 
मेरा राशन एप्लीकेशन डाउनलोड डाऊनलोड करा.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजना चालविली जाते. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते.सरकारने मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सुरू केलंय. याद्वारे आता आपण घरी बसून माहीती मिळवू शकता.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

*मेरा रेशन अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग*

हे अ‍ॅप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहेयाद्वारे आपण घरी बसून रेशन बुक करू शकता. एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान (Fair Price Shop) किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अॅपचे उद्दिष्ट आहे.

*नोंदणीनंतर आपण घेऊ शकता लाभ*

माय रेशन अॅपचा लाभ घेण्यासाठी प्रथम ते Google Play Store वरून ते डाऊनलोड करा. इंस्टालेशननंतर अ‍ॅप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्डचा तपशील भरा. असे केल्यावर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण अ‍ॅपवरून रेशन मागवू शकता.

*अ‍ॅपचे फायदे*

>> या अ‍ॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, कारण एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना त्यांना अनेकदा रेशन सेंटरबद्दल माहिती नसते. परंतु या अॅपद्वारे या समस्येवर मात करता येईल.

>> या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशन कार्डधारक या अ‍ॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.

>> रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते कार्डधारक या अ‍ॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील.

>> रेशन कार्डधारकांना या अ‍ॅपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल ते पाहण्यासही ते सक्षम असतील.

*14 भाषांमध्ये अ‍ॅप उपलब्ध होईल*

मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच अन्य 14 भाषांमध्येही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारण बहुतेक स्थलांतरित इतर राज्यांमधून आलेत, त्यामुळे त्यांना भाषेची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच त्यांची सोय लक्षात घेऊन त्यामध्ये प्रमुख प्रादेशिक भाषा जोडल्या जातील. जेणेकरून अ‍ॅप वापरण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419 

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...