हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २० मे, २०२१

जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

 


जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी

करदात्यांना आता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. या उद्देशाने कर विभागाने ७ जून रोजी ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. या नवीन वेबसाइटमध्ये, आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेत नवे बदल केले आहेत.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आयकर विभाग ७ जून रोजी www.incometax.gov.in  या ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात केली आहे. यामुळे करदात्यांना अधिक सोयीचा आणि आधुनिक अनुभव मिळेल. असे त्यांनी म्हटले आहे. या नव्या वेबसाईटमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे करदात्यांना सोयीचे होणार आहे.


सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, ...संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

आयकरच्या नव्या वेबसाईट बाबत या 'दहा' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

१) ७ जून पासून नवी ई-फाईलिंग लिंक - www.incometax.gov.in आताची असणारी लिंक www.incometaxindiaefiling.gov.in या लिंकच्या जागेवर असेल.

२) नवा आयकर ई- फायलिंग पोर्टल आयकर रिटन्सच्या प्रक्रियेवर आयकर दात्यांना परतावा मिळवण्यासाठी काम करते.

३) आयकर दात्यांना पाठपुरावा तसेच अपलोड प्रक्रिया, संवाद एकाच डॅशबोर्डवर करता येणार आहे.

४) आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर फ्रीमध्ये असणार आहे. यासह परस्पर प्रश्नही विचारु शकता.

५) आयटीआर १, ४ (ऑनलाइन, ऑफलाइन) आणि आयटीआर २ (ऑफलाइन) करदात्यांसाठी विनामूल्य आयटीआर सॉफ्टवेअर उपलब्ध असेल.

६) आयटीआर ३,५,६,७ च्या तयारीसाठी सॉफ्टवेअर लवकरच उपलब्ध करुन दिले जाईल.

७) करदाते आपले प्रोफाईल अपडेट करु शकतात. यासाठी त्यांना आपली सॅलरी, घर मालमत्ता, व्यवसाय याचा उल्लेख करावा लागेल, जो आयटीआरच्या प्रीफिलिंगमध्ये वापरला जाऊ शकतो.

८) नव्या वेबसाईटसोबत आता कॉल सेंटरचा समावेश केला आहे. यामुळे करदात्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

९) ई-फायलिंग सोबत मोबाईल ॲप १८ जून रोजी सुरु होणार आहे.

१०) TDS आणि SFT स्टेटमेंट, सॅलरी इनकम, व्याज, डिविडंट आणि भांडवली नफा, प्री-फायलिंग ३० जून २०२१ पर्यंत उपलब्ध असणार आहे.

तुमच्या या उत्पन्नावर एक रुपयाचाही लागत नाही कर, जाणून घ्या त्यासंबंधित सर्व बाबी

प्राप्तिकर कायद्यात विविध प्रकारच्या उत्पन्नावरील करात सूट मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेपासून ते भेटवस्तू इत्यादींचा समावेश आहे. 


भारतात एका आर्थिक वर्षात अडीच लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळविणार्‍या लोकांना कर भरावा लागतो. आयकर केवळ नोकरीच नव्हे तर इतर अनेक स्रोतांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरही भरावा लागतो. यामध्ये व्याजातून मिळणारे उत्पन्न, साईड व्यवसाय, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक इत्यादींचा समावेश आहे. परंतु हे सर्व असूनही प्राप्तिकर कायद्यात अशा काही तरतुदी आहेत ज्या अंतर्गत सामान्य लोकांना कोणताही कर भरावा लागत नाही. म्हणजेच अशी काही स्त्रोत देखील आहेत जिथून आपल्याला उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*


शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. कर कायद्यांतर्गत कृषी उत्पन्नास सूट देण्यात आली आहे. त्याच बरोबर, याखेरीज, जर तुम्ही एखाद्या फर्ममध्ये भागीदार असाल आणि तुम्हाला त्याच्या नफ्याचा वाटा मिळाला असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. वास्तविक, फर्मकडून आधीच त्यावर कर भरलेला असतो. हेच कारण आहे की भागीदारीत मिळविलेल्या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नाही.

भेटवस्तूंवरील कर

प्राप्तिकर कायद्याच्या कलम (56 (2) (x) नुसार अनेक प्रकारच्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर तुम्हाला लग्नात 50 हजार किंवा त्याहून कमी किमतीची भेट मिळाली असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, त्याच्यासाठी एक अट आहे की ही भेट केवळ लग्नाच्या दिवशी किंवा आसपासच्या तारखेलाच मिळाली पाहिजे. यामध्ये एखाद्या नातेवाईकाकडून मिळालेली भेट, वारसा किंवा मृत्यूपत्रानुसार मिळालेले गिफ्ट कर माफीच्या कक्षेत येते.

याशिवाय पंचायत / नगरपालिका, नगरपालिका समिती व जिल्हा मंडळ, छावणी मंडळ किंवा कोणतीही पायाभूत संस्था, विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था इत्यादींकडून मिळालेल्या भेटवस्तूसुद्धा कर माफीच्या कक्षेत येतात. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 12 ए आणि 12 एए अंतर्गत नोंदणीकृत चॅरिटेबल किंवा धार्मिक ट्रस्टकडून प्राप्त भेट देखील कर सूटच्या कक्षेत येते.

ग्रॅच्युइटीची रक्कमवरील कर

जर एखाद्या संस्थेने 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल तर नोकरी सोडल्यावर मिळालेल्या ग्रॅच्युइटीची रक्कम देखील कर सूटच्या कक्षेत येते. तथापि, सरकारी कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त 20 लाख रुपयांच्या ग्रॅच्युइटीवरच कर सवलत मिळते. खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीतून काढलेले पैसेदेखील कर माफीच्या कक्षेत येतात. तथापि, ही सूट 5 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केल्यावरच उपलब्ध आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील कर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणे देखील कर सूटच्या कक्षेत येते. पीपीएफमध्ये गुंतविलेल्या रकमेवर, व्याज आणि त्याच्या मॅच्युरिटीच्या कालावधीत प्राप्त झालेल्या रकमेवर कोणताही कर लागू नाही. ते ईईई प्रकारात येते.

शिष्यवृत्तीवर किंवा अनुदानावरील कर 

प्राप्तिकर अधिनियमान्वये एखाद्या व्यक्तीस अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठी सरकारी किंवा खासगी संस्थांकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीवर किंवा अनुदानावर कर भरावा लागत नाही. शाळा, महाविद्यालय किंवा परदेशात शिक्षण घेत असताना मिळालेल्या शिष्यवृत्तीदेखील कर माफीच्या कक्षेत येतात.

कौटुंबिक वारसाने मिळणाऱ्या दागिने किंवा रोख रक्कमेवरील कर

एखाद्या व्यक्तीला त्याचे आई-वडिल किंवा कौटुंबिक वारसाने मिळणाऱ्या दागिने किंवा रोख रक्कमेवर कर भरावा लागत नाही. मृत्यूपत्राद्वारे मिळणाऱ्या मालमत्तेवरही कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, अशा व्यवहारांवर आयकर विभागाद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकते.

ITR दाखल झाला की नाही? 'या' मार्गाने जाणून घ्या

कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख पुन्हा वाढविली आहे. आपल्यातील अनेक जणांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेच पाहिजे. परंतु असे असूनही बरीच लोकं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबाबत संशयी आहेत. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हा प्रत्येकाला जमतेच असे नाही. जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरता तेव्हा आपल्याला एका फॉर्ममध्येच बरेच फॉर्म भरावे लागतात. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा चूक होण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे आपला रिटर्न भरला जात नाही. आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेवटी त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.

त्याचे व्हेरिफिकेशन कसे करावे याविषयी सांगणार आहोत. ज्याद्वारे आपल्याला सहजपणे कळेल की आपला रिटर्न भरला आहे कि नाही.

आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन  

इन्कम टॅक्स रिटर्नच्या व्हेरीफिकेशनचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी रिटर्न भरताना तुम्हाला आधार OTP व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडावा लागेल. जेव्हा आपण हा पर्याय निवडल्यानंतर प्रक्रिया कराल, तेव्हा आपल्यास आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल. जो व्हेरीफिकेशनसाठी एंटर केला जावा. हे पूर्ण होताच आपल्या आयटीआरचे व्हेरीफिकेशन केले जाईल.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

नेटबँकिंगद्वारे EVC जनरेट करणे 

यासाठी तुम्हाला नेटबँकिंगद्वारे EVC जनरेट करुन ITR दाखल करण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर, आपली बँक निवडल्यानंतर, त्यात लॉगिन करा आणि टॅक्स टॅबवर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला पुन्हा इन्कम टॅक्स वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल. तेथे My Account टॅबमध्ये, Generate EVC चा पर्याय निवडा. यानंतर, आपल्या मोबाईलवर आणि ईमेलवर 10-अंकी अल्फा न्यूमेरिक कोड पाठविला जाईल, जो 72 तासांसाठी वैध असेल. येथून, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर My Account टॅब अंतर्गत ई-व्हेरिफिकेशन पर्यायावर जा आणि I have EVC already हा पर्याय निवडून आपल्या मोबाइल नंबरच्या मदतीने आपला ITR व्हेरिफाय करा.

EVC जनरेट करून बँक खात्याद्वारे

पहिले आपण आपल्या ई-फाइल खात्याच्या प्रोफाइल सेटिंग वर जा आणि तेथे आपले बँक खाते प्री-व्हॅलिडेट करावे लागेल. जेव्हा पॅन आणि आपले नाव बँक खात्याशी जुळते तेव्हाच प्री-व्हॅलिडेट होईल. एकदा प्री-व्हॅलिडेट झाल्यानंतर आपण EVC जनरेट करू शकता आणि नंतर मोबाइल नंबरवर OTP च्या मदतीने तुमचा ITR व्हेरिफाय करू शकता.

ITR-V च्या कॉपीद्वारे व्हेरिफिकेशन 

जर तुमचा ITR वरीलपैकी कोणत्याही पद्धतींनी व्हेरिफाय केला जात नसेल. तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आपण आपल्या ITR-V च्या कॉपीद्वारे देखील व्हेरिफाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ITR-V कॉपीवर निळ्या पेनसह सिग्नेचर करावी लागेल आणि नंतर ती कॉपी CPC, Post Box No - 1, Electronic City Post Office, Bangalore - 560100, Karnataka, India येथे स्पीड पोस्टद्वारे पाठवावी लागेल. सर्व्हिस ऑफ इंडिया पोस्ट पाठवावी लागेल तिथे आपली कॉपी मिळताच आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेलवर एक नोटिफिकेशन येईल आणि त्याच प्रकारे आपल्या ITR चे व्हेरिफिकेशन केले जाईल.

*अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी*
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. 

जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील 3 वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या 10 पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे. 
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील 3 वर्षांची वार्षिक मिळकत आय : 4 लाख, 5 लाख, 6 लाख असा असेल.
तर त्या 3 ही वर्षांचे सरासरी होणार 5 लाख रूपये आणि त्याच्या 10 पट म्हणजेच 50 लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही.

पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग 3 वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर 3 वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील 10 वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या 10 पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही. 

अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे. 

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. 

Source - *Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.

*Income TAX: पत्नीदेखील तुम्हाला आयकरात सूट मिळवून देऊ शकते; जाणून घ्या तीन पर्याय....*

लग्नानंतर माणसाचे आयुष्य एकदम बदलून जाते. नव्या जबाबदाऱ्यांसह वेगवेगळी आव्हाने वाढू लागतात. आयुष्यात बदलांबरोबरच ही आव्हाने पेलण्यासाठी तुम्हाला जीवनसाथीदेखील ममचा इन्कम टॅक्स देखील वाचवू शकतो. चला जाणून घेऊया कसे....

तुमची पत्नी नोकरी किंवा कमावती नसली तरी देखील ती तुम्हाला पैसे वाचविण्यात नक्कीच मदत करते. घरातील वस्तू, भाजीपाला घासाघीस करून कमी भावाने कसे आणायचे, हे एक महत्वाचे कामही करते.

*पहिला प्रकार... जॉईंट होम लोन अकाऊंट*

जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर तुम्हाला जॉईंट होम लोन कर वाचविण्यासाठी मदतीचे आहे. या प्रकारे तुम्ही दोघेही होम लोनवर करात सूट मिळवू शकता. 80 सी अनुसार पती आणि पत्नी दोघांनाही 15.-1.5 लाखांची सूट मिळू शकते. तर सेक्शन 24 (बी) नुसार दोघांनाही 2-2 लाखांची सूट मिळू शकते. म्हणजे दुप्पट फायदा मिळू शकतो.

*दुसरा..... हेल्थ इन्शुरन्स...*

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सर्वांसाठी वेगवेगळा प्लॅन घेऊ शकता. मात्र, फॅमिली फ्लोटर प्लॅन चांगला. यामुळे कमी खर्चात अधिक फायदा मिळतो.
जर तुम्ही एकट्यासाठी इन्शुरन्स घेतला असाल तर कमी पैशांवर तुम्हाला करात सूट मिळणार आहे. जर पत्नी आणि मुलांसाठी देखील एकच स्कीम असेल तर तुम्ही अधिकचा फायदा मिळवू शकणार आहात. सेक्शन 80डी अनुसार तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळवू शकणार आहात.

*तिसरा...जीवन विमा*

लग्नाच्या वेळी प्रत्येकजण आपल्या पत्नीच्या संरक्षणाचे वचन देतो. तुम्ही हे वचन जीवन विमा पॉलिसीच्या मदतीने आणखी मजबूत बनवू शकता. जर तुम्ही जॉईंट विमा पॉलिसी घेतली तर पत्नीला काही झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संकटाला सामोरे जावे लागणार नाही. जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

जॉईंट विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी प्रिमिअममध्ये अधिक फायदा मिळतो. 80सी नुसार आयकरात सूट देखील मिळते.

*...अन्यथा Income Tax खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा; 'या' ६ गोष्टी लक्षात ठेवा* 

वर्षभरात तुमच्याकडून अजाणतेपणी वा अन्य कोणत्याही कारणांमुळे रोखीचे व्यवहार झाले तर प्राप्तिकर विभागाकडून तुम्हाला नोटीस येण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा प्राप्तिकर खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा...

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे.

1) १० लाखांहून अधिक रकमेची एफडी 

एका वर्षात गुंतवणूकदाराने १० लाख रुपये वा त्याहून अधिक रोख रकमेची एफडी केली तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस दिली जाऊ शकते. या पैशांच्या स्रोताची माहिती देण्याची मागणी प्राप्तिकर विभाग नोटिशीद्वारे करू शकतो. त्यामुळे एफडी करतेवेळी शक्यतो चेकद्वारेच पैसे जमा करावेत

2) बँक खात्यात रोख रक्कम जमा करू नका

एखाद्याने कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक वा सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भरली तर त्यासंदर्भातील माहिती संबंधित बँक वा सहकारी बँकेला प्राप्तिकर विभागाला द्यावी लागेल. एका आर्थिक वर्षात एखाद्याने एक वा अधिक बँक खात्यांत १० लाख रुपये वा त्याहून अधिक रक्कम रोखीत जमा केली तर प्राप्तिकर विभाग संबंधिताला नोटीस पाठवून पैशाच्या स्रोताची मागणी करू शकेल

3) क्रेडिट कार्डाचे बिल रोखीने भरू नका

तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल एक लाखांहून अधिक आले आणि तुम्ही बिल एकरकमी भरले तर प्राप्तिकर खाते तुम्हाला नोटीस पाठवू शकते तसेच आर्थिक वर्षात १० लाखांहून अधिक रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिल रोखीत केले तर तुमच्याकडे विचारणा होऊ शकते असे व्यवहार केले असल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात भरणे गरजेचे आहे.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

4) मालमत्ता खरेदी रोखीत केल्यास

मालमत्ता खरेदी करताना रोख रकमेचा वापर केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाऊ शकते. ३० लाख वा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता तुम्ही रोखीत खरेदी करत असाल वा विकत असाल तर प्रॉपर्टी रजिस्ट्राद्वारा त्यासंदर्भातील माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते. स्रोतांविषयी प्राप्तिकर खाते चौकशी करू शकते

5) शेअर्स, म्युच्युअल फंड्स गुंतवणूक

शेअर्स, म्युच्युअल फंड्स वा बाँड्स या सर्व व्यवहारांत तुम्ही रोख रकमेचा वापर करत असाल तर तुम्ही  अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचाच रोख व्यवहार करता येऊ शकतो. त्याहून अधिक रकमेचे व्यवहार केल्यास प्राप्तिकर विभागाची तुमच्यावर नजर पडू शकते.

6) २ लाखांहून अधिक किमतीचे गिफ्ट 

प्राप्तिकर कायद्याच्या २६९एसटी या सेक्शननुसार कोणतीही व्यक्ती २ लाख वा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेत असेल तर त्या व्यक्तीला दंड ठोठावला जातो. त्यामुळे तुम्ही २ लाख रुपये रोखीत न स्वीकारता अकाऊंट पेयी, चेक, बँक ड्राफ्ट किंवा ईसीएस यांच्या माध्यमातून स्वीकारावे.

आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज; जाणून घ्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?

अनेक लोक इनकम टॅक्स रिटर्न (आयकर विवरण) भरतात. ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे, ते सध्या रिफंडची वाट बघताहेत. अनेक लोकांना या रिफंडबरोबरच त्यावर व्याज किती मिळणार आहे याची उत्सुकता लागली आहे. या लोकांना वाटते की रिफंडवर व्याज मिळेल व आपण त्या माध्यमातून कुठल्यातरी गरजेची पूर्तता करू. जर तुम्हीही रिफंडवर व्याजाची प्रतिक्षा करणाऱ्या मंडळींपैकी एक असाल, तर चिंता करू नका.रिफंडवर व्याज मिळणार आहे की नाही, यासाठी तुम्ही हक्कदार आहात की नाही, ते तुम्ही आधी तपासून घ्या. नियमानुसार प्रत्येक करदात्याला आयकर परताव्याच्या रिफंडवर व्याज मिळत नाही, हेही तुमच्या लक्षात असू द्या.

हे लोक ठरतात व्याजाचे हक्कदार

ज्या लोकांनी टीडीएस, टीसीएस, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ अ‍ॅसेस टेस्टमार्फत कर भरला आहे आणि कर भरल्याची रक्कम ही कराच्या देय रक्कमेपेक्षा अधिक आहे, अशाच लोकांना रिफंडवर व्याज मिळू शकेल. जर तुम्हाला 80 हजार रुपयांचा कर भरावा लागत असेल आणि तुम्ही 1 लाख रुपयांची रक्कम भरली आहे तर त्या रिफंडवर तुम्हाला व्याज मिळेल. अशा प्रकारचे व्याज मिळवण्यासाठी काही विशेष नियम आहेत. त्यानुसार ठराविक कालावधीच्या आत आयटीआर फाईल केला तर व्याजाचा लाभ मिळू शकेल.

किती प्रमाणात मिळते व्याज

जर रिफंडची रक्कम ही कराच्या मर्यादेपुढे जात असेल तर त्या रिफंडवर व्याज देण्यात येते. तसेच रिफंड टीडीएस, टीसीएस किंवा अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या रुपात येत असेल तर दरमहा 0.5 टक्क्यांच्या हिशोबाने व्याजाची भर पडू शकेल. प्रत्येक वर्षी एप्रिलमध्ये व्याजदराची गणना सुरू होते. जर कोणता करदाता निर्धारीत तारखेच्या आधी किंवा त्या दिवसापर्यंत आयटीआर भरत असेल तर त्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून व्याजाची रक्कम जोडली जाते. रिफंडची रक्कम दिली जाईपर्यंत हे व्याज दिले जाते. निर्धारीत तारखेनंतर आयटीआर फाईल केला असेल तर आयटीआर फाईल केल्याच्या तारखेपासून रिफंड जारी केला जाईपर्यंत व्याज मिळते.

अशा प्रकारे रिफंड तपासू शकता     

 सामान्य नियमांनुसार जर तुम्ही आपला आयटीआर भरला असेल तर तुम्हाला रिफंड देखील येणार. रिफंडबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. तेथे तुम्ही my account-my returns/forms सेक्शनमध्ये जाऊ शकता. तुमचा आयटीआर प्रोसेस झाला आहे का? आयकर विभाग आता आपल्याला रिफंड देणार आहे का किंवा त्यावर किती व्याज देणार आहे, अशा विविध प्रश्नांबाबत तुम्हाला सद्यस्थिती कळू शकेल. 

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                         

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.         https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

*सामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग*


( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

*सामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग*

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे दररोज सरासरी पन्नास तक्रारी येतात. या तक्रारींचे प्रमाण दररोज वाढत आहे. पण अनेकांना या तक्रारी कशा करायच्या याची कल्पना नसते. त्यामुळे तक्रारी दाखलही होत नाही. आयोगाकडे कोणत्या तक्रारींची दखल घेते आणि कोणत्या तक्रारींची दखल घेत नाही याचीही सर्वसामान्यांना माहिती नसते. पण तक्रार दाखल केल्यावर त्याची तत्काळ दखल घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळतो, ही दिलासा देणारी बाब आहे.

समाजामध्ये बालकांचे, स्त्रियांचे तसेच वृद्धांचे मानवाधिकार हनन आजही मोठय़ा प्रमाणात होत आहे. आपल्या हक्कांबाबत जागृत होऊन याविरुद्ध आयोगाकडे दाद मागण्यास पुढाकार घ्यायला हवा. ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी जागरूक असले पाहिजे

आयोगाची स्थापना

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना ही मानवी हक्कांचे संरक्षण आणि प्रसार करण्याच्या हेतूने ६ मार्च २००१ रोजी आंतरराष्ट्रीय करार आणि मानवी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

आयोगाची रचना

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगात एकूण तीन सदस्य असतात.

- आयोगाचे अध्यक्षपद निवृत्त मुख्य न्यायमूर्तींकडे

आयोगाचे कार्य

1) - लोकसेवकांकडून होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर नजर ठेवणे आणि त्या संदर्भात चौकशी करणे

2) - कोणत्याही कारागृहात स्थानबद्ध कैद्यांचे संरक्षण, उपचार, त्यांच्या राहणीमानाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी भेट देणे व शिफारशी करणे

3) -  मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी सुरक्षात्मक उपायांचा व तरतुदींचा आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणा करणे.

4) - मानवी हक्कांसंबंधीचे करार व आंतरराष्ट्रीय करारांचा अभ्यास करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे

तक्रारी कशा कराव्यात

महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे कार्यालय हे मुंबई येथे असून मानवाधिकार उल्लंघनाबाबत तेथे तक्रार करता येते. ही तक्रार लेखी स्वरूपात व्यक्तिश: अथवा टपालाने सुद्धा पाठविण्यात येऊ शकते. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी व ई-गव्हर्नन्सचा भाग म्हणून आता राज्य मानवाधिकार आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदविली जाऊ शकते. राज्य मानवाधिकार आयोगाची विस्तृत माहिती तसेच तक्रारीसाठी  मानवाधिकार आयोगासाठी nhrc.nic.in हे संकेतस्थळ आहे.


ही तक्रार लोकसेवकाच्या विरुद्ध असावी लागते.

(लोकसेवक म्हणजे कोण-राज्य सरकाराच्या सार्वजनिक कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश होतो. सरकारी नोकर अथवा सरकारचा पगार घेणारा किंवा सरकारचे कोणतेही काम करण्याबद्दल ज्याला फी अथ‌वा कमिशन मिळते अशी व्यक्ती. या लोकसेवकाच्या व्याख्येत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगर पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो.)

तक्रारीत कोणता तपशील नमूद करणे गरजेचे ?

1) - तक्रारदाराचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, घटनेची तारीख व ठिकाण, घटनेची वेळ, मानवी हक्काच्या उल्लंघनाबाबत सविस्तर तपशील

2) - तक्रार कोणत्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात

3) - एखाद्या न्यायालयात किंवा कायदेशीर मंचासमोर संबंधित प्रकरण प्रलंबित असल्यास त्याची माहिती

कोणत्या तक्रारी विचारात घेत नाहीत.

1) - मोघम स्वरूपाची, निनावी, वाचण्यास अवघड, किंवा अशक्य

2) - एखाद्या आयोगासमोरील प्रलंबित प्रकरण

3) - मानवी हक्काच्या भंगाच्या घटनेच्या एका वर्षानंतरची तक्रार

4) - मालमत्तेतील अधिकार, कौटुंबिक-वैवाहिक वाद

5) - नोकरी-कामगार- औद्योगिक वाद

6) - न्यायालयात झालेला निर्णय किंवा एखाद्या राज्य आयोगाने पूर्वी दिलेला निकाल

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

आयोग कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रीत करतो

1) - सामाजिक दृष्टिकोन

2) - बेकायदा स्थानबद्धता

3) - महिला व मुले

4) - शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे हक्क

5) - कायदा शिकणारे विद्यार्थी

6) - स्वास्थ्य व पर्यावरण

7) - निवारा मिळण्याचा हक्क

8) - ज्येष्ठ नागरिक

9) - राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी

आयोगात तक्रारीचे फायदे

1) - आयोगाची स्वायत्तता व आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री

2) - तक्रार दाखल करण्याची अतिशय सोपी पद्धत

3) - कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

4) - जलद न्याय

5) - वकिलाच्या मदतीची गरज नाही

6) - तक्रारदार स्वत:च आयोगासमोर युक्तिवाद करू शकतो.

आयोगाचे अधिकार

1) - खटला चालवताना साक्षीदाराला आयोगा समोर हजर राहाण्याचे आदेश देणे

2) - खटला चालवण्यासाठी आवश्यक दस्तावेज शोधून सादर करणे

3) - प्रतिज्ञापत्रावर आधारित पुरावा स्वीकारणे

4) - कोणत्याही न्यायालयाकडून, कार्यालयातून कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक अथ‌ा सरकारी कागदपत्रे, दस्तावेजांची मागणी करणे

आयोगाची शाखा नाही

राज्य मानवी हक्क आयोगाची कोणतीही शाखा नाही किंवा आयोगाने कोणाची नियुक्तीही केलेली नाही. आयोगाचे मुंबईत फक्त एकमेव कार्यालय आहे.

आयोगाचा पत्ता व संपर्क क्रमांक

सचिव, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, ०९, हजारीमल सोमाणी मार्ग, सीएसएमटी समोर, मुंबई १

सचिव - २२०७६४०८

अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक - २२०९२८५७

फॅक्स - २२०९२८०४ किंवा २२०७८९६२

ईमेल - mshrc2000@yahoo.in

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.  https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

मंगळवार, १८ मे, २०२१

(जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ) महिलांनो जागरुक व्हा! हे महिला कल्याणासाठीचे कायदे माहित आहेत का?*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुपर वुमनला हार्दिक शुभेच्छा

8 मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला महिलांच्या योगदानाची, तपश्चर्याची आणि त्यागाची आठवण करून देतोच पण महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एका खास थीमवर साजरा केला जातो.

*ती आहे म्हणून हे विश्व आहे.*
*ती आहे म्हणून घराला घरपण आहे.*
*ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.*
*तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.*
*जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा*

 महिलांनो जागरुक व्हा! हे महिला कल्याणासाठीचे कायदे माहित आहेत का?

महिलांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती महीलांना नसते. त्यामुळे कधी वेळ आलीच तर, त्यांना कायद्यांचा वापरही करता येत नाही.

काळानुसार बदलत महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. घरातल्या जबाबदाऱ्या असोत की, नोकरी  सगळ्याच आघाड्यांवर महिला पुढे आहेत. मात्र, कितीतरी महिला स्वत:बद्दल जागरुक व्हा. महिलांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती त्यांना नसते. त्यामुळे कधी वेळ आलीच तर, त्यांना कायद्यांचा वापरही करता येत नाही.

‘पुण्यश्लोक’ अहिल्याबाई होळकर  अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/05/blog-post_30.html.

खरंतर, भारतीय राज्यघटनेने आपल्या आदर्श नियमावलीत महिला विषयक नियमांना महत्वपूर्ण स्थान देऊन महिला उन्नतीसाठी अनेक कायद्यांची निर्मिती केली आहे. या सर्व कायद्यांची ओळख महिलांना असायला हवी. तरच, महिलांचं जीवन सुखी आणि संपन्न होण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला स्थैर्य येउ शकतं. कायद्या संदर्भातील ज्ञान महिलांना सक्षम बनवतं .

महिलांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर अधिकार आहेत. ज्याबद्दल त्यांना माहिती असायलाच हवी. जेव्हा कामासाठी महिला घराबाहेर पडतात तेव्हा ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर चुकीच्या घटना घडल्या, तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत. तर, कौटूंबिक हिंसेविरोधात लढण्यासाठीही काही कायदे आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी 181 क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन

संकटग्रस्त, पीडित महिलांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी यासाठी 181 या क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन राज्य शासनाने सुरू केली आहे. ही हेल्पलाइन टोल फ्री असून त्याद्वारे केवळ संरक्षणासाठीच नव्हे तर महिलांच्या सबलीकरणासाठीही फायदेशीर ठरणार आहे. 181 ही स्वतंत्र हेल्पलाइन चोवीस तास सुरू राहणार आहे.

181-डायल केल्यास ही मदत मिळणार

1) - पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका

2) - शासकीय योजना, सुविधांबद्दल माहिती

3) - हुंडा व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱयांशी थेट संपर्क

4) - समुपदेशन, कायदेशीर मदत

महिलांसाठी रेल्वेकडून इतर सुविधा

यासोबतच महिलांना ट्रेनमध्ये विविध सोई देखील पुराव्याला जातात. देशातील एक्सप्रेस रेल्वेमध्ये अनारक्षित क्षेणीतील महिलांसाठी स्वतंत्र डबा राखीव असतो. या व्यतिरिक्त 150 किमी पर्यंतचे कमी अंतर पार करणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी वेगळे डबे किंवा कोच हे राखीव असतात.

तसेच भारतीय रेल्वेकडून महिलांसाठी खास विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जातात. जर तुम्ही गरोदर असाल आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला मधला किंवा वरचा बर्थ देण्यात आला असेल तर, तुम्ही बर्थ एक्सचेंज करू शकता. रेल्वेतील बर्थ एक्ससचेंज करण्याचा महिलांना अधिकार आहे.

PF काऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार*ईपीएफओद्वारे अनेक खातेदारांना व्याजाच्या चांगल्या रक्कमेसह बरीच सुविधा मिळते. पण कधीकधी तुमच्या चुकांमुळे तुम्हाला काही त्रासही सहन करावा लागू शकतो. *(Link PAN Card with EPF account)* पॅनकार्ड लिंक नसेल तर काय?*:- जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड यूएएनशी लिंक केले नाही तर तुम्हाला पीएफचे पैसे काढताना  अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जे लोक पॅन कार्ड लिंक करत नाहीत आणि पीएफ काढण्यासाठी अर्ज करतात त्यांचा जास्तीत जास्त टीडीएस (TDS) कापला जातो. त्या उलट जे खातेधारक पॅनकार्ड लिंक करता त्यांना दिलासा मिळतो. 

*तुमच्या PF अकाउंट ला पॅन कार्ड जोडण्यासाठी  संपर्क करा.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा..  संतोष साळवे... 7900094419* 

            ESI व EPFO चे सर्व काम केले जातात

      
  
  *महिला कल्याणासाठीचे कायदे*

1) हुंडा प्रतिबंधक कायदा : 

१९६१'च्या या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हे आहेत. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमधे ३०४ (ख) आणि ४९८ (क) ही नवीन कलमे अंतर्भूत आहेत. 

2) महिला संरक्षण कायदा : 

कौटुंबिक छळ (महिला संरक्षण) प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आथिर्क व शारीरिक संरक्षण देतो. हा कायदा फक्त पुरुषांविरुद्धच लागू होतो. यात अंतरिम आदेश देणे, नुकसान भरपाई देणे, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, भागीदारीच्या घरात राहण्याचा अधिकार, कायदेशीर व वैद्यकीय मदत देण्याची तरतूदही आहे.

3) अश्लीलताविरोधी कायदा : 

भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तकं, चित्र आदी माध्यमांतून महिलांची विटंबना करणाऱ्या चित्र किंवा लेखनातून 'अश्लीलता सादर करणाऱ्याविरोधी कायदा १९८७'नुसार वॉरण्टशिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे. 

4) बालविवाह प्रतिबंधक कायदा : 

बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम (शारदा अॅक्ट)' १९८७ मध्ये सुधारणा झाल्या आहेत. लग्नाच्या वेळी मुलींचे वय किमान १८ आणि मुलाचे वय २१ वर्षाहून कमी असल्यास शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा सर्व जातिधर्माच्या लोकांना सारखाच लागू आहे. 


*ती आहे म्हणून हे विश्व आहे.*
*ती आहे म्हणून घराला घरपण आहे.*
*ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.*
*तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.*
*जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा*


5) कौटुंबिक न्यायालय कायदा : 

दाम्पत्य व कौटुंबिक कलहाची प्रकरणे एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी कौटुंबिक अधिनियम १९८४ लागू करण्यात आला आहे. कुटुंब न्यायालय नसल्यास तिथल्या जिल्हा कोर्टांना कुटुंब न्यायालयाचा दर्जा देण्यात आला आहे. 

6) छेडछाड करणे गुन्हा : 

स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता ३५४ खाली शिक्षेची तरतूद आहे. तसेच, छेडछाड केल्याबदल भारतीय दंड संहिता कलम ५०९ अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल करता येते.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

 7) मुलावर हक्क : 

एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाल्यास तिच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना ती स्वत:जवळ ठेवू शकते. मात्र पाच वर्षांहून अधिक वयाच्या मुलांच्या बाबतीत कोर्टाचा निर्णयच बांधील असतो. 

8) समान वेतन कायदा : 

समान वेतन कायद्यानुसार एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे. विशिष्ट कार्यक्षेत्रातील नोकऱ्या सोडता अन्य ठिकाणी स्त्रियांना रात्र पाळीला कामाला बोलावता येत नाही. 

9) लैंगिक गुन्हे : 

लैंगिक गुन्ह्यासंबंधात भारतीय दंडसंहिता कलम ३७५ व ३७३ अनुसार कडक शिक्षा देण्यात येतात. लैंगिक प्रकरणाची सुनावणी कोर्टाच्या बंद खोलीत होते. 

10) हिंदू उत्तराधिकार : 

१९५६मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना संपत्तीमध्ये व्यापक अधिकार देण्यात आले असून स्त्रीधनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अनिर्बंध अधिकार स्त्रीला मिळाला आहे. हिंदू स्त्रीला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीतसुद्धा वाटणी मागता येते. स्त्री धन मिळावे म्हणून स्त्री कोर्टात खटला दाखल करू शकते. स्त्रीला मुलाप्रमाणेच वडिलोपाजिर्त संपत्तीमध्येही समान हक्क दिला गेलाय. 

11) हिंदू विवाह कायदा : 

भारतीय दंड संहिता कलम १२५ अनुसार स्त्रीला पोटगीची मागणी करण्याचा हक्क आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ कलम २५ नुसार अर्ज दाखल केल्यानंतर कोर्ट पोटगीची रक्कम देण्याचे आदेश देते. पती-पत्नीच्या वादामधे निकाल लागेपर्यंतच्या मधल्या काळातसुद्धा पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी अंतरिम पोटगी रक्कम देण्याची तरतूद कायद्यात आहे. 

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   

12) प्रसूती सुविधा कायदा : 

नोकरीपेशातील स्त्रियांसाठी बाळंतपणाची आणि नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी रजेची तरतूद असून त्या काळात स्त्रीला विशिष्ट दिवसाची भर पगारी रजा मिळते. मात्र कायद्यानुसार ती रजा व इतर फायदे फक्त दोन बाळंतपणासाठी असतात. गर्भपात झाल्यावरही स्त्रीला भर पगारी रजा मिळण्याची तरतूद कायद्यात आहे. 

13) विशेष विवाह अधिनियम : 

विशेष विवाह अधिनियम १९५४च्या तरतुदीनुसार मानसिकदृष्ट्या सक्षम आणि १८ वषेर् पूर्ण झालेली स्त्री प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह स्वत:च्या इच्छेनुसार करू शकते. या विवाहाची नोंदणी करणे आवश्यक असून पुरुषाचे वय २१ वर्षापेक्षा अधिक असावे. 

14) गर्भलिंग चाचणी : 

स्त्री भूण हत्या रोखणे व गर्भांचे लिंग जाणून घेण्याच्या तंत्राचा दुरुपयोग करणे यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनिमय व दुरुपयोग निवारण अधिनियम १९९४ आहे.

15) जिल्हा महिला सहायता समिती :

महिलाचे शोषण व छळ होऊ नये म्हणून हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला सहाय्यता समिती स्थापन झाली आहे. होणारे शोषण किंवा छळ याबद्दलची तक्रार या समितीकडे महिला लेखी स्वरूपात देऊ शकते. तसेच, न्याय मिळण्यासाठी कायदेशीर सल्लागार व स्वयंसेवी संस्थांची व्यवस्था समितीतफेर् केली जाते.

16) लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्त्व :

नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. खासगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थामध्येसुद्धा ती लागू आहेत. लैंगिक चाळे आणि तक्रारी थांबवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच, तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

17) महिलांच्या अटकेसंबंधी :

महिलांना फक्त महिला पोलिस सूयोर्दयानंतर आणि सूर्यास्तापूवीर् अटक करू शकतात. कुटुंबाच्या सदस्याच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच स्त्रीला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावता येते. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते.

*गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी* अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/07/blog-post_17.html


18) महिला आयोग :

महिलांना संवैधानिक व न्यायिक सुरक्षा आणि अधिकार देण्यासाठी ३१ जानेवारी १९९२ रोजी महिला आयोगाची स्थापना झाली. प्रत्येक राज्यातही महिला आयोग स्थापन झाला आहे. महिला कोणतीही तक्रार थेट महिला आयोगाकडे करू शकतात. आयोगाला सिव्हिल कोर्टाप्रमाणे चौकशी आणि तपासाचे अधिकार आहेत. हा आयोग वेळोवेळी सरकारला महिला कल्याणाच्या योजनाही सादर करतो.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.          https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

रविवार, १६ मे, २०२१

*OTT म्हणजे काय? भारतातील OTT चे लोकप्रिय प्रकार आणि प्लॅटफॉर्म कोणते? जाणून घ्या सर्वकाही*

 संतोष साळवे...7900094419


 *OTT म्हणजे काय? भारतातील OTT चे लोकप्रिय प्रकार आणि प्लॅटफॉर्म कोणते? जाणून घ्या सर्वकाही*

OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होऊ लागले आहेत.

इंटरनेटमुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले. आता प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट चा वापर केला जातो. इंटरनेट तसेच नवीन टेक्नॉलॉजीमुळे आपल्या काम करण्याचा पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. अशाच प्रकारे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने सुद्धा मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले. आजच्या काळात OTT Platforms खूप लोकप्रिय होत आहेत. आजची युवा पिढी OTT Platforms ना खूप जास्त महत्त्व देत आहेत. 

OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित (Release) होऊ लागले आहेत. गेल्या 13-14 महिन्यांपासून जगभरात कोरोना या रोगाने थैमान घातले आहेत. गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक देशांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केली. कधी लॉकडाऊन तर कधी अनलॉक असा खेळ जगभर सुरु आहे. अशा परिस्थिती चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे जगभरात मोठ्या हजारो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले.

मनोरंजन क्षेत्र सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे. या ओटीटीबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला या बातमीत मिळतील. OTT काय आहे? याबद्दल बहुतांश लोकांना माहिती नाही आहे. तर आज आम्ही तुम्हाला OTT काय आहे आणि OTT Apps म्हणजे काय याबद्दल माहिती देणार आहोत.

OTT म्हणजे काय? | OTT Meaning

OTT चा फुल फॉर्म Over-The-Top (ओव्हर-द-टॉप) असा आहे. OTT वर तुम्हाला नवीन प्रदर्शित चित्रपट, वेब सीरिज किंवा अन्य मीडिया कंटेंट पाहायला मिळतो. थोडक्यात सांगायचे झाले तर OTT ही Video Streaming Service आहे. अमेरिकेत पूर्वी याला खूप मागणी होती. परंतु आता जगभरात याला डिमांड आहे. भारतात तर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय या ओटीटीच्या माध्यमातून होत आहे.

 *सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*



 ओटीटी अ‍ॅप काय आहे? | What is OTT Apps

आपण OTT Apps वर वेब सीरिज, चित्रपट, मालिका इत्यादी पाहू शकतो. हे OTT Apps मोबाईल वर किंवा स्मार्ट टीव्ही वर सुद्धा डाऊनलोड करून वापरता येतात. OTT Apps वर टेलिव्हिजन कंटेंटदेखील उपलब्ध केला जातो. प्रेक्षक त्यांच्या आवडीनुसार हवे तेव्हा इंटरनेटच्या साहाय्याने आवडीचे कार्यक्रम, मालिका आणि टीव्ही शोज पाहू शकतात. अनेक ओटीटी अ‍ॅप हे त्यांच्या वेब सीरिज मुळे लोकप्रिय झाले आहेत.

OTT चे फायदे

Over-The-Top (OTT) चे अनेक फायदे आहेत. आपल्याला आपल्या आवडीचे कार्यक्रम किंवा चित्रपट टीव्हीवर पाहण्यासाठी केबल किंवा D2h कनेक्शन ची गरज लागते. पण ओटीटी कंटेंट व शोज पाहण्यासाठी केवळ इंटरनेटची आणि एका स्मार्टफोनची आवश्यकता असते. ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा ओटीटी अॅपवर आपण ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज, नवीन चित्रपट तसेच जुने चित्रपट, डॉक्युमेंट्री इत्यादी पाहू शकतो. हा कंटेंट इतरत्र कुठेही सहज उपलब्ध नसतो.

गेल्या काही वर्षांपासून अनेक ओटीटी सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की, Amazon Prime, Netflix त्यांचा स्वतःचा ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज तसेच चित्रपट बनवत आहेत. हा कंटेट इतरत्र कुठेही मिळत नाही, केवळ त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कंटेट उपलब्ध असतो. Over-The-Top (OTT) सर्व्हिस प्रेक्षकांसाठी खूप सोयीची आहे. लोक त्यांच्या सोयीनुसार हवं तेव्हा, हवं त्या ठिकाणी ओटीटी अ‍ॅपचा वापर करू शकतात. ओटीटी अ‍ॅप जसे की स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, स्मार्टफोन, इत्यादींवर चित्रपट आणि ओरिजनल कंटेंट बघितले जाऊ शकतात.

स्मार्टफोन, टॅबलेट मध्ये ओटीटी उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅप स्टोर वरून डाउनलोड करता येतात. आजकाल बाजारात मिळणाऱ्या स्मार्ट टीव्हींवर मध्ये सुद्धा OTT App चा सपोर्ट असतो. लॅपटॉप तसेच कॉम्पुटरवर सुद्धा OTT App सर्व्हिस उपलब्ध आहे. तसेच Streaming Device च्या साहाय्याने सुद्धा ओटीटी कंटेंट पाहता येतो. बाजारात मिळणाऱ्या Amazon Fire Tv Stick, Apple Tv, Chromecast इत्यादींच्या साहाय्याने OTT कंटेंट पाहता येतो.

ओटीटी सर्व्हिसचे प्रकार | Types Of OTT Services

1) Transactional Video On Demand (TVOD)

या प्रकारच्या ओटीटी सर्व्हिस मध्ये कोणताही चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो फक्त एकदा बघण्यासाठी रेंट (भाडे) वर दिला जातो किंवा विकत घेण्यासाठी उपलब्ध असतो. Apple iTunes याचे एक उदाहरण आहे.

2) Subscription Video On Demand (SVOD)

या सर्व्हिस मध्ये व्हिडिओ स्ट्रिमिंग कंटेंट पाहण्यासाठी पैसे देऊन त्या अ‍ॅप चे मासिक किंवा वर्षाचे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स हे ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन सुविधा पुरविते. हे प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन च्या आधारावर त्यांचे ओरिजनल कंटेंट आणि वेब सीरिज ग्राहकांना उपलब्ध करून देतात.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

3) Advertising Video On Demand (AVOD)

या ओटीटी सर्व्हिस मध्ये युजरला जाहिरात (Advertise) पाहावी लागते. या ओटीटी सुविधेमध्ये युजरला कंटेंट मोफत उपलब्ध करून दिला जातो. पण त्यासोबत युजरला Ads पाहाव्या लागतात. या Ads व्हिडिओ स्वरूपात पाहाव्या लागतात.

भारतातील लोकप्रिय OTT Platforms

1) Netflix

2) Disney+ Hotstar

3) SonyLIV

4) Voot

5) Amazon Prime Video

6) Zee5

7) ALTBalaji

8) JioCinema



*आता नेटफ्लिक्सवर पहा विनामूल्य शो आणि चित्रपट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया*

नेटफ्लिक्स काय आहे?

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि हॉटेल स्टारसारखे व्हिडिओ स्ट्रिमिंग फिचर आहे. ही अमेरिकन कंपनी आहे. यूजर्स इंटरनेटकडून कनेक्ट केलेल्या डिव्हाईसवर टीव्ही शोज, मुव्हिज, डॉक्युमेंट्रीज इत्यादी पाहू शकतात. ही पेड स्ट्रिमिंग प्रेम आहे. भारतीय ग्राहकांना कंपनीचे तीन प्लान उपलब्ध आहेत. भारतमध्ये फिल नेटवर्क नेटफ्लिक्सचे एक लाखो युजर्स आहेत

 .असे पहा नेटफ्लिक्सवर फ्री शो

आपण नेटफ्लिक्स शो विनामूल्य पाहू इच्छित असाल तर netflix.com/watch-free वर क्लिक करून पाहू शकता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण आपला आवडता चित्रपट आणि मालिका निवडू शकता आणि ते विनामूल्य पाहू शकता. जेव्हा आपण आपला आवडता शो पाहण्यासाठी सिलेक्ट कराल आपल्याला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल आणि तेथे आपण कोणत्याही जाहिरातीशिवाय विनामूल्य कंटेंटचा आनंद घेऊ शकता.

गेल्या वर्षापर्यंत लोक ट्रायल म्हणून 30 दिवस नेटफ्लिक्सवर विनामूल्य कंटेंट पाहू शकत होते. पण अलीकडेच नेटफ्लिक्सने काही कारणामुळे विनामूल्य कंटेंट भारतातासाठी बंद केले. मात्र हे जाणून आपणास आनंद होईल की नेटफ्लिक्स पुन्हा नॉन-सब्सक्रायबर्सला काही लोकप्रिय कार्यक्रम आणि चित्रपट विनामूल्य पाहण्याची संधी देत ​​आहे. जाणून घ्या की आपण 30 दिवसांच्या या फ्री ट्रायलचा कसा आनंद घेऊ शकता. 

हे शो पाहू शकता विनामूल्य
प्रेक्षक नेटफ्लिक्सवर काही निवडक कार्यक्रम आणि चित्रपट विनामूल्य पाहू शकतात. या यादीमध्ये Stranger Things, Elite, Boss Baby, When They See Us, Love is Blind, Our Planet, Grace और Frankie या शोचा समावेश आहे. हे शो नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय शो आहेत आणि ते पाहण्यासाठी आपल्याला नेटफ्लिक्स खाते तयार करावे लागेल. तसेच आपण हे खाते पाहिजे तेव्हा रद्द करू शकता.

199 रुपयाय घेऊ शकता नेटफ्लिक्सच्या प्रत्येक कंटेंटची मजा

नेटफ्लिक्सच्या प्लानची सुरुवात 199 रुपयांपासून होते, ज्यामध्ये आपण फोनवरही सर्व कंटेंट एक्सेस करू शकता. तर 499 रुपयांच्या प्लानमध्ये आपण फोन, टॅबलेट, संगणक किंवा टीव्हीवर 480p वर सामग्रीचा आनंद घेऊ शकता. याशिवाय 649 रुपयांच्या योजनेमध्ये तुम्ही फोन, टॅबलेट, संगणक आणि टीव्हीवर फुल एचडी (1080p) क्वालिटीमध्ये कंटेंट पाहू शकता. याशिवाय शेवटचा प्लान 799 रुपयांचा आहे, ज्यामध्ये आपण फोन, टॅबलेट, संगणक आणि टीव्हीवर अल्ट्रा एचडी (4K) आणि एचडीआर क्वालिटीमध्ये चित्रपट आणि मालिका पाहू शकता.

*नेटफ्लिक्सचे नवीन फिचर, आता आपोआप डाऊनलोड होतील चित्रपट आणि शोज*

नेटफ्लिक्सने सोमवारी एक नविन फिचरची घोषणा केली असून ‘Downloads for You’असे या फिचरचे नाव आहे. हे फिचर स्मार्ट डाऊनलोड फिचरला रिप्लेस करेल. हे फिचर आता जगभरातील अँड्रॉईड युजरसाठी उपलब्ध झाले असून नंतर आयओएसला उपलब्ध केले जाईल. वापरकर्त्यांना सहजपणे नवीन कंटेन्ट शोधण्यासाठी आणि लवकर पाहता यावा यासाठी नेटफ्लिक्सचा हा प्रयत्न आहे.

डेटा लिमिट निवडू शकता 

स्मार्ट डाउनलोड्स फिचरमध्ये तुम्ही पाहिलेला एपिसोड आधी जिलिट करावा लागतो त्यानंतरच पुढील एपिसोड डाऊनलोड होतो. म्हणजेच यामध्ये चित्रपट डाऊनलोड होऊ शकत नाही. नवीन फिचरमध्ये यात अपडेट केले असून नवा कंटेन्ट डाऊनलोड करु शकता, तसेच चित्रपटही डाऊनलोड करु शकता. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार युजरच्या पसंतीनुसार कंटेन्ट आपोआप डाऊनलोड होईल. नेटफ्लिक्सच्या मदतीने, डाउनलोड्स फॉर यू फिचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार डेटा मर्यादा निवडू शकतात. फिचर इनेबल करताना 1GB, 3GB किंवा 5GB पर्यंत डाऊनलोड करण्याचे पर्याय असतील. या फिचरच्या माध्यमातून युजर्स जे डाऊनलोड करतील ते विना इंटरनेटही युजर्स पाहू शकतात. ही दोन स्टेप्सची प्रक्रिया असल्याचे नेटफ्लिक्सने सांगितले.

कसे कराल फिचर डाऊनलोड?

1. प्रथम डाऊनलोड टॅबवर जा आणि Downloads for You वर क्लिक करा.
2. यानंतर आपल्याला जी अमाऊंट डिव्हाईसवर डाऊनलोड करायची आहे ती निवडा. (1GB, 3GB किंवा 5GB)
3. शेवटी टर्न ऑनवर क्लिक करा.

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                          ---------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.          https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc            


भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...