हा ब्लॉग शोधा

रविवार, ४ जुलै, २०२१

आपण सायबर फसवणूक, ऑनलाईन फसवणूक किंवा एटीएम फसवणुकीचे शिकार असाल तर घाबरू नका; तक्रार करा!!!


आपण सायबर फसवणूक, ऑनलाईन फसवणूक किंवा एटीएम फसवणुकीचे शिकार असाल तर काय करावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

आरबीआयच्या संकेतस्थळावर शेअर केलेल्या माहितीनुसार, खात्यातून काही चुकीचे व्यवहार होत असल्यास लवकरात लवकर बँकेला सांगा. विशिष्ट माहितीसाठी आपण 14440 वर कॉल करू शकता. बँकेकडे तक्रारीच्या तारखेपासून हे प्रकरण 90 दिवसांच्या आत सोडवावे लागेल.

ग्राहकांच्या चुकीसाठी बँक जबाबदार नाही

रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर ग्राहकांच्या चुकीमुळे ग्राहकांच्या खात्यावर फसवणूक केली गेली असेल, म्हणजेच त्याने एटीएम पिन, क्रेडिट कार्ड पिन, ओटीपी यासारख्या गोपनीय माहिती शेअर केल्या असतील तर अशा नुकसानीची भरपाई त्याला करावी लागेल. एकदा बँकेला याबाबत माहिती दिल्यानंतरही, जर कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला, तर ती बँकेची जबाबदारी असेल. त्याचवेळी, जर बँकेच्या चुकीमुळे बँकेतून डेटा चोरीला गेला तर बँक त्याची भरपाई करेल.


आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे

तीन दिवसांच्या आत तक्रार केल्यास कोणतेही नुकसान होणार नाही

जर बँक किंवा ग्राहक वगळता इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या चुकीमुळे ही फसवणूक झाली असेल, तर तीन दिवसांच्या आत तक्रार केल्यास ग्राहक एक रुपयाही गमावणार नाही. 7 दिवसांच्या आत तक्रार झाल्यास, प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 10 हजार किंवा व्यवहाराच्या रकमेमध्ये जे कमी असेल ते ग्राहकाचे नुकसान होईल.

10 दिवसाच्या आत पैसे मिळतील

आरबीआयने म्हटले आहे की ग्राहकांच्या खात्यातून फसवणूक करून काढलेली रक्कम ठरलेल्या वेळेत बँकेला माहिती दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यावर परत केली जाईल. आपण इच्छित असल्यास, आपण सायबर फसवणूक टाळण्यासाठी स्वतःचा विमा देखील घेऊ शकता. बजाज अलायन्स आणि एचडीएफसी अर्गो सारख्या कंपन्या या प्रकारचा विमा देतात. या विम्याअंतर्गत तुमच्या खात्यात सायबर फसवणूक झाल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. 

तुम्हाला Online Fraudला बळी पडायचं नसेल, तर Internet वापरताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

विनामूल्य वाय-फाय वापरणे टाळा

तुम्ही मुक्त Wifi वापरणे टाळले पाहिजे. तसेच ऑनलाइन पेमेंट किंवा बँकिंगसाठी तरी विनामूल्य वाय-फाय वापरू नका असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

URL वर लक्ष द्या

कोणतीही वेबसाइट उघडताना काळजी घ्या. त्याच्या URL वर विशेष लक्ष द्या.
जर URL https सह प्रारंभ होत नसेल, तर मग समजून जा की, ही वेबसाइट सुरक्षित नाही. या प्रकारच्या वेबसाइटला भेट देऊ नका, ती आपली वैयक्तिक माहिती चोरून घेऊ शकते.

प्रत्येक अकाउंटसाठी स्वतंत्र पासवर्ड ठेवा

बर्‍याचदा लोकं त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्यांचे पासवर्ड एकच ठेवतात.
कारण वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवणे अवघड आहे, परंतु तसे करणे ही तुमची मोठी चूक ठरु शकते.
जर हॅकर्सना एखाद्या प्रकारे तुमचा एखादा जरी पासवर्ड माहित पडला, तर त्यांना तुमते सर्व संकेतशब्द माहित असतील. म्हणूनच भिन्न खात्यांसाठी भिन्न संकेतशब्द ठेवणे फार महत्वाचे आहे.


आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  

संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419

सर्व फायलीचे बॅकअप असल्याचे सुनिश्चित करा

बर्‍याचदा लोक लॅपटॉप, फोन किंवा कंप्यूटरवर फाईल्सचा बॅकअप घेत नाहीत. तुम्ही हे करत नसल्यास हे जाणून घ्या की, असे केल्याने ही फाईल हटविली किंवा नष्ट होऊ शकते.

म्हणून, वेळोवेळी आपल्या महत्वाच्या फायलीचे बाह्य ड्राइव्हमध्ये बॅकअप घ्या. असे केल्याने तुमच्या फाईल्सवर Ransomware चा हल्ला टाळण्यास सक्षम असाल.

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; तक्रार करा!!!

तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी (Cyber theft) हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात.


अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 155260 हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.

Online fraud झाल्यास तक्रार करा.




इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ॲप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.


सात ते आठ मिनिटांत रक्कम होल्ड

सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित 155260 या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.


यंत्रणा काम कशी करते..?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.


एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि 155260 हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------- 


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा

 https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

सोमवार, २८ जून, २०२१

होम लोनच्या ओझ्यामुळे चिंताग्रस्त आहात? या टिप्स अवलंबा, लवकर व्हाल चिंतामुक्त !!

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
 
  वाचाल तर... वाचाल !!! 
होम लोनच्या ओझ्यामुळे चिंताग्रस्त आहात? या टिप्स अवलंबा, लवकर व्हाल चिंतामुक्त !!

स्वत:चे घर हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. सर्वसाधारण भारतीय नागरिकाचा आयुष्यातील सर्वात मोठा खर्च घरावर होत असतो. घर विकत घेणे हे अनेकांच्या आवाक्याबाहेरचे असते, तर अनेकजण जे घर विकत घेतात, ते गृहकर्जाचा पर्याय अंमलात आणतात. मात्र गृहकर्जाचे हफ्ते नियमित भरणे हेसुद्धा एक चिंतेची बाब असते. त्यातच दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे तर दर महिन्याचे बजेट आणि खर्च यांची तोंडमिळवणी करणे आणखीच कठीण झाले आहे. गृहकर्जासाठी कालावधी अनेकवेळा १५ ते २० वर्षांसाठीचा असतो. अशावेळी कधी एकदा पटकन हे गृहकर्जाचे ओझे आटोपते असे अनेकांना वाटत असते. एवढ्या मोठ्या कालावधीत नियमितपणे ईएमआय भरणे ही खरोखरच कठीण प्रक्रिया असते. मात्र होम लोन घेणारे काही टिप्समुळे किंवा काही उपायांमुळे आर्थिक ताण कमी करू शकतात. गृहकर्जाचे आर्थिक संकट सोपे करतील अशा टिप्स समजून घेऊया. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 


आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केली जाते. PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*


गृहकर्जाचा कालावधी कमी करा.


गृहकर्जाच्या क्षेत्रातील जाणकार सांगतात की गृहकर्जाची वेगाने परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधीऐवजी छोट्या कालावधीसाठी कर्ज घेणे योग्य ठरते. अर्थात यासाठी तुम्हाला गृहकर्जाच्या ईएमआयबरोबरच अतिरिक्त रक्कम बॅंकेत जमा करावी लागेल. आधीच ईएमआयमुळे आर्थिक ताण पडत असताना अतिरिक्त रकमेची जुळवाजुळव कशी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मात्र तुम्हाला बोनसरुपाने किंवा इतर काही कारणांमुळे अधूनमधून जी रक्कम हाती येते ती घरातील वस्तूंच्या खरेदी किंवा पर्यटनावर खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर गृहकर्ज फेडण्याकडे वळवली तर तुम्ही गृहकर्जाचा कालावधी कमी करू शकाल आणि याचा तुम्हाला दीर्घ काळात फायदा होईल. कारण असे केल्यामुळे तुम्हाला एकूण कमी व्याज भरावे लागेल. कारण तुमची कर्जाची मूळ रक्कम तितक्या लवकर कमी होईल आणि परिणामी एकूण कर्जासाठी तुमच्यावर आकारले जाणारे व्याजदेखील कमी असेल.


कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटूंबियांनी उर्वरित कर्ज भरावे का? जाणून घ्या महत्वाची माहिती. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.




बॅंकेबरोबर व्याजदरासंदर्भात बोलणी करा.

अनेकवेळा गृहकर्ज घेताना जे व्याजदर असतात त्यात नंतरच्या काळात रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामुळे बदल झालेले असतात. त्यामुळे तुम्ही व्याजदर कमी करण्यासाठी बॅंकेशी चर्चा केल्यास काही फायदा होऊ शकतो. अर्थात हे सर्वस्वी तुमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि बॅंकेचे धोरण यावर अवलंबून असते. तुम्ही बॅंकेला रिफायन्सिंगचीही विनंती करू शकता आणि याद्वारे व्याजदर कमी करून घेऊ शकता. अर्थात हा फायदा बॅंक देईल याची कोणतीही शाश्वती नसते. यासाठी ग्राहकांनी इतर बॅंका आकारत असलेल्या व्याजदरांवर लक्ष ठेवा. जर इतर बॅंका कमी व्याजदरात गृहकर्ज देत असतील तर तुम्ही तुमचे गृहकर्ज त्या बॅंकेकडे हस्तांतरित करू शकता. मात्र असे करताना तुम्हाला सध्याच्या बॅंकेला पेनल्टी रुपाने आणि नव्या बॅंकेला प्रोसेसिंग शुल्क यासाठी काही रक्कम भरावी लागेल. त्यामुळे हा बदल करण्यापूर्वी तुम्ही हा खर्च आणि तुमचा होणारा फायदा याचे व्यवस्थित गणित करून घ्या. नाहीतर थोडे पैसे वाचवण्याच्या नादात मोठे नुकसान होऊ शकते. दुसऱ्या बॅंकेकडून कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध झाल्यास तुम्ही ईएमआयची रक्कम वाढवून कर्जाचा कालावधी कमी शकता.


उदाहरण -


एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया. समजा २० वर्षांसाठी तुम्ही ७० लाख रुपयांचे गृहकर्ज ८.५ टक्के व्याजदराने घेतले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या दरमहिन्याच्या ईएमआयची रक्कम ६०,७४८ रुपये इतकी आहे आणि तुम्हाला एकूण १,४५,७९,५२० रुपयांची परतफेड करावी लागेल. समजा चार वर्षांनंतर तुमच्या बॅंकेने व्याजदर घटवून ७.५ टक्क्यांवर आणले तर तुमचा ईएमआय ५६,३९२ रुपये इतका होईल. म्हणजेच तुमची दरमहा ४,३५६ रुपयांची बचत होईल. या पद्धतीने तुम्ही एकूण जवळपास १० लाख रुपयांची बचत करू शकाल. मात्र जर तुम्ही ६८,९३२ इतका ईएमआय दर महिन्याला भरू शकणार असाल तर तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होऊन १२ वर्षांवर येऊ शकतो. असे केल्याने तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल मात्र दीर्घ कालावधीत तुमची एकूण २२ लाख रुपयांची बचत होईल.

लोनचे प्री-पेमेंट 

गृह कर्जाची रक्कम वाचवणे आणि कर्जावरील व्याज रक्कम कमी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे होम लोनची प्रीपेमेन्ट करणे. जर एखाद्याला गृह कर्जाची प्रीपेमेंट करायची असेल तर त्याने आर्थिकदृष्ट्या योग्य असावे.

परंतु लक्षात घ्या की आपल्याला कर्जाची प्रीपेमेंट करायची असेल तर गृह-कर्जावरील व्याज दर एडजस्टेबल (फ्लोटिंग) असतील तर कोणतेही प्री-क्लोजर शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, निश्चित दर असल्यास, काही दंड किंवा फी भरावी लागेल.


कर्ज कमी कसे करावे ? 

आपण रेगुलर बेसिस वर निश्चित रकमेची प्रीपेमेंट करू शकता आणि थकित कर्ज प्रभावीपणे कमी करू शकता. कमी शिल्लक म्हणजे कमी व्याज दर. गृह कर्जाच्या रकमेची प्रीपेमेन्ट कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत केली पाहिजे शेवटी नाही. कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत ईएमआयमधील व्याजाचा भाग जास्त असल्याने यामुळे अधिक बचत होण्यास मदत होईल.

कमी व्याजदराच्या स्कीमचा ऑप्शन निवडा 

गृह कर्ज अर्जदार कमी व्याजदराची स्कीम निवडून व्याजावर पैसे वाचवू शकतो. आपण बर्‍याच बँकांशी कर्जासाठी बोलणी करावी आणि कर्ज निवडण्यापूर्वी त्यांचे व्याज दर तपासावेत. आपण एखाद्या विशिष्ट बँकेचे जुने आणि लॉयल ग्राहक असल्यास, बँक आपल्याला कमी व्याज दराने कर्ज योजना देऊ शकते.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

होम लोन बॅलन्स करा ट्रांसफर 

होम लोन बॅलन्स आपण एका बँकेतून दुसर्‍या बँकेत ट्रांसफर करू शकता. अशा वेळी काहीवेळा नवीन बँक कमी व्याजदराने कर्जाची ऑफर देऊ शकते. हे आपल्याला खूप पैसा वाचविण्यात मदत करते. व्याज बचत करण्याच्या उद्देशाने होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करणे सोपे आणि प्रभावी आहे.

एसआयपीची मदत घ्या (SIP investment)


गृहकर्जाचे व्याजदर आणि मूळ रक्कम लक्षात घेता ही खूप मोठी रक्कम होते. अनेकवेळा मुद्दलपेक्षा आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम अधिक असते. वर दिलेल्या उदाहरणात तुम्ही पाहू शकता की ग्राहकाला एकूण १,४५,७९,५२० रुपयांची परतफेड करावी लागते आहे. यात ७६ लाख रुपये व्याजरुपानेच भरावे लागणार आहेत. अर्थात यापासून तुम्ही सुटका करून घेऊ शकता. तुम्हाला याची कल्पना आहे का की तुम्ही एसआयपीच्या मदतीने गृहकर्जाची परतफेड वेळेआधीच करू शकता. एसआयपी ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. दर महिन्याला तुम्ही एका विशिष्ट म्युच्युअल फंड योजनेत एक निश्चित रकमेची गुंतवणूक करता. एसआयपीमध्ये अगदी ५०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. मात्र याद्वारे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता आणि दीर्घकालावधीत चांगला परतावा आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ यामुळे तुम्ही मोठी रक्कम उभी करता.


वर उल्लेख केल्याप्रमाणे तुमची कर्जाची रक्कम ७० लाख रुपये आहे. त्याच्या ०.१० टक्के इतकी रक्कम तुम्ही दरमहा एसआयपीद्वारे गुंतवा. म्हणजेच तुम्हाला दरमहा ७,००० रुपये एसआयपीद्वारे गुंतवावे लागतील. तुमचे गृहकर्ज २० वर्षांसाठी आहे, त्यामुळे २० वर्षात तुम्ही एकूण १६.८० लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल. त्यानंतर अंदाजे १२ ते १४ टक्के परतावा गृहीत धरल्यास तुमच्याकडे १.०४ कोटी रुपयांची रक्कम २० वर्षांनी जमा झालेली असेल. यातून तुम्ही गुंतवलेली मूळ १६.८० रक्कम बाजूला काढली तरी तुम्ही ८८ लाख रुपये कमावलेले असतील ते तुम्ही गृहकर्जावर भरत असलेल्या व्याजाच्या रकमेपेक्षा अधिक असतील. कारण व्याजरुपाने तुम्ही एकूण ७६ लाख रुपये भरणार आहात. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त रकमेचा वापर करून तुम्ही अधिक प्रमाणात डाऊन पेमेंट केल्यास कर्जाची रक्कम कमी करू शकता.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419  

उत्पन्न वाढेल तसे ईएमआयची रक्कम वाढवा. 


हा गृहकर्जातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसाधारणपणे गृहकर्जाचा कालावधी १५ ते २० वर्षांचा असतो. एवढ्या मोठ्या कालावधीत तुमचे उत्पन्नदेखील वाढत जाते. नोकरदारांचे वेतन दरवर्षी वाढत असते. मात्र अनेक नागरिक उत्पन्न वाढले की खर्च वाढवतात, राहणीमानाचा खर्च वाढवतात. ही मोठी चूक आहे. अशा वेळी दरमहा वाढलेल्या वेतनाचा वाढीव हिस्सा ईएमआयकडे वळवला पाहिजे. यामुळे तुमची कर्जाची मुद्दल कमी होऊन परिणामी तुमच्यावर आकारण्यात येणारे एकूण व्याज कमी होईल. ईएमआयमध्ये थोडीशी केलेली वाढ तुमच्या कर्जाचा लवकर निपटारा करण्यास उपयुक्त असते. कर्ज परतफेडीचा हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf


रविवार, २७ जून, २०२१

मोठा, व्यवसाय करायचाय? मग जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया.

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                      वाचाल तर... वाचाल !!! 


मोठा, व्यवसाय करायचाय? मग जाणून घ्या 'ही' बिझनेस आयडिया.

तुम्हाला कमी भांडवलात ग्रामीण भागामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर फ्लाई ऐश ब्रिक्स म्हणजेच सिमेंट वीट बनविणारी युनिट बसवून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे भांडवल नसल्यास आपण कर्ज घेऊन देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

वास्तविक, आता चिकणमातीची वीटसह , सिमेंट किंवा राख वीट देखील घर आणि इमारतीच्या बांधकामांमध्ये वापरली जात आहे. यामुळे, सिमेंटच्या विटांना मोठी मागणी आहे. तर मग जाणून घेऊया फ्लाई ऐश ब्रिक्स अर्थात सिमेंट विटांचा व्यवसाय कसा सुरू करावा-

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.


आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

फ्लाई ऐश विटा कशा तयार केल्या जातात?

गेल्या काही वर्षांत ग्रामीण व शहरी भागात नवीन घरे व इमारतींचे बांधकाम वेगाने वाढू लागले आहे. हेच कारण आहे की लहान आणि मोठे बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार घरे आणि इमारतींच्या बांधकामात फ्लाय ऐश विटा वापरत आहेत. या विटा सिमेंट, स्टोन डस्ट आणि वीज यंत्रांचा वापर करून बनवलेल्या आहेत.


यासाठी तुम्हाला 100 यार्ड जमीन आणि दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. मॅन्युअल मशीनद्वारे फ्लाई ऐश विटा सहज तयार करता येतात. या कामात 6 ते 7 लोक आवश्यक असतात. या भांडवलात दररोज 3,000 विटा तयार केल्या जाऊ शकतात.

ऑटोमैटिक मशीनने दर तासाला 1 हजार विटा तयार करा.

मॅन्युअल ऐवजी ऑटोमैटिक मशीनद्वारे विटा तयार करायच्या असतील तर तुम्हाला 10 ते 12 लाख रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करावी लागेल. या स्वयंचलित मशीनद्वारे कच्चा माल बनवण्यापासून वीट निर्मितीपर्यंत सहज काम करता येईल. या मशीनद्वारे आपण एका तासात सहजपणे 1 हजार विटा तयार करू शकता. त्याच वेळी, एका महिन्यात 3 ते 4 लाख विटा बनविल्या जाऊ शकतात.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

सिमेंट विटाचे फायदे

  1. लाल विटांच्या तुलनेत सिमेंट विटांनी बांधलेली घरे आणि इमारतींमध्ये भूकंप आणि आगीचा परिणाम कमी आहे.
  2. ते तयार करताना कोणत्याही भट्टीची आवश्यकता नाही, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
  3. सामान्य वीटच्या तुलनेत हे हलके आणि आकारात मोठे आहे.
  4. सिमेंट विटा वापरल्याने बांधकाम खर्च 40 ते 50 टक्क्यांनी कमी होतो.
  5. विटा वापरुन, प्लास्टरदरम्यान कमी सामग्री वापरली जाते.

कर्ज कसे घ्यावे ? :- आपल्याकडे या व्यवसायासाठी पैसे नसल्यास आपण प्रधानमंत्री रोजगार योजना आणि मुद्रा कर्ज योजनेद्वारे कर्ज घेऊन हा व्यवसाय करू शकता.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर जाणून घ्या महत्वाची माहिती*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                     वाचाल तर... वाचाल !!! 


*तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्या उत्पनाचे प्रमाण किती हवे ? जाणून घ्या महत्वाची माहिती*

जेव्हा आम्ही एखाद्या बँकेत कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा कर्ज देण्यापूर्वी बँक बर्‍याच गोष्टींचा विचार करते. मुख्य गोष्ट म्हणजे उत्पन्नाचे प्रमाण निश्चित करणे (एफओआयआर). हे दर्शविते की आपण दरमहा कर्जाची किती रक्कम देऊ शकता.

उच्च FOIR ची अडचण म्हणजे फिक्स ऑब्लिगेशन टू इनकम रेश्यो (FOIR) दर्शवितो की तुमची आधीच कट होणारी ईएमआय, घरभाडे, विमा पॉलिसी आणि इतर देयके सध्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहेत.

जर कर्जदात्याने आपल्या पगाराच्या 50% पर्यंत हा सर्व खर्च उचलला असेल तर त्याच्या कर्जाचा अर्ज नाकारला जाऊ शकेल. म्हणून, हे लक्षात ठेवा की कर्जाची रक्कम यापेक्षा अधिक नसावी.

घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419  


वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. 7900094419*

उदाहरणार्थ समजून घ्या - 

गृहित धरा की आपण आधीच 10 हजार रु.

महिन्यांचा गृह कर्जाचा हप्ता भरत आहे. जर आपण असे गृहीत धरले की त्याचा पगार 30 हजार आहे, त्यानुसार एकूण मासिक देयकाचे 33% आहे. यानंतर जर एखादी बँक कर्ज देते तर काळजी घ्या की आपली एकूण FOIR 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल.

म्हणजेच, आपणास तेवढेच कर्ज दिले जाईल जेवढे उर्वरित 17 टक्के पेमेंटच्या तुलनेत बसेल. बँकांचा असा विश्वास आहे की कोणतीही व्यक्ती त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त ईएमआय देऊ शकत नाही.

आपण आता 10 हजार रु. महिन्यांचा हप्ता भरत आहात, जो तुमच्या 30 हजार पगाराच्या 33 टक्के आहे. अशा परिस्थितीत, बँक येईल की आपण 15 हजार हप्त्या भरू शकता, कारण आपला खर्च भागविण्यासाठी आपल्या पगाराच्या निम्म्या भागाची आवश्यकता असेल.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला 10 लाखांचे कर्ज 10 वर्षांसाठी 10% दराने घ्यायचे असेल तर बँक ते रिजेक्ट करेल. कारण त्याचा मासिक हप्ता 6,608 रुपये असेल. यासह, आपले एकूण मासिक डे 16,608 रुपये (10000 + 6608) होईल, जे 15 हजार किंवा पगाराच्या 50 टक्के अधिक असेल. FOIR 55.36 पर्यंत पोहोचेल. यामुळे कर्ज नाकारले जाऊ शकते.

बँकेकडुन कर्ज घेतलय? आणि ते कर्ज फेडल सुध्दा,तर मग बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या.

बँकेकडुन कर्ज घेणे हे आता बऱ्याच जणांना गरजेचे झालेल आहे, कर्ज मिळविण्याची प्रक्रिया हि सर्वांनाच माहित असते व कर्जाची परतफेड सुध्दा, मात्र घेतलेले बँकेकडील कर्ज संपुर्ण परतफेड केल्यानंतर सुध्दा बँकेकडुन आपल्याला काहि कागदपत्रे मिळणे गरजेचे असते, बँकेने त्या कागदपत्रांची पुर्तता करायलाच हवी, बँकेचे ग्राहक म्हणुन तो तुमचा अधिकार आहे.

आपल्याला बँकेकडुन घर घ्यायचे असेल, गाडी घ्यायची असेल, किंवा व्ययक्तिक कारणासाठी आपण कर्ज घेतो तसेच शेतकरी असाल तर शेतीसाठी पीक कर्ज घेत असतो व बँकेच्या नियमानुसार ते बँकेला परतफेड सुध्दा करतो. मात्र बँकेच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर आपली आता मुक्तता झाली आहे असा बऱ्याच जणांना गैरसमज होतो,

कर्जाची रक्कम पुर्ण फेडुनही आपली जबाबदारी संपली असे नाहि, फेडलेल्या कर्जाबाबतीत बँकेकडुन “No Dues Certificate” म्हणजेच ना देय प्रमाणपत्र घेणे खुप आवश्यक आहे, बँकेकडुन No Dues Certificate” आपण न घेतल्यास परत आपल्याला त्याच बँकेकडुन अथवा दुसऱ्या बँकेकडुन कर्ज घ्यावयाचे असल्यास आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते,

बऱ्याच वेळा तात्काळ कर्जाची आवश्यकता असल्यास अश्या वेळेस आपल्याला परत मागच्या कर्जाचे नो ड्युज प्रमाणपत्रकाढण्यात वेळ खर्च करावा लागु शकतो त्या शिवाय नविण कर्ज आपल्याला मिळणार नाही.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate): 

संपुर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतर “No Dues Certificate” बँकेकडुन संबधीत ग्राहकाला दिले जाते, तसेच बँकेव्यतिरीक्त खाजगी नोंदणीकृत सावकाराकडुन जरी कर्ज घेतलेले असेल व त्या कर्जाची संपुर्ण परतफेड केली असेल तर अश्या नोंदणीकृत सावकाराकडुन सुध्दा “No Dues Certificate” घेणे खुप गरजेचे आहे.

No Dues Certificate ला मराठीत “ना देय प्रमाणपत्र” असे म्हणतात, त्याचा शॉर्ट फॉर्म NDC प्रमाणपत्र असा सुध्दा आहे. NDC प्रमाणपत्रालाच Closure Letter सुध्दा म्हणतात. प्रक्रियेनुसार व नियमाच्या अनुषंगाने आपण एकरकमी, नगदी अथवा हप्त्याने अथवा चेकने कर्जांची पुर्ण परतफेड केत्यानंतर बँक कर्जदाराला एक पत्र पाठवुन कर्ज घेत्यावेळी

ग्राहकाने सादर केलेली मुळ प्रमाणत्रे व कागदपत्रे बँकेकडुन घेवुन जाण्यास सुचवते, मात्र बऱ्याच वेळा ग्राहकाला संपुर्ण कर्जाची रंक्कम परतफेड करूनही बँकेकडुन असले पत्र येत नाहि त्यावेळेस ग्राहकाने स्वत: हुन बँकेशी संपर्क करून सादर केलेली मुळ प्रमाणपत्रे व

“No Dues Certificate” मिळवीण्यासाठी बँकेकडे लेखी अर्ज करावा, खाजगी नोंदणीकृत सावकाराकडुन कर्ज घेतांना सादर केलेली कागदपत्रे परत मिळवीण्यासाठी व त्याच्याकडुन “No Dues Certificate” प्राप्त करण्यासाठी सुध्दा त्याच्याकडे लेखी अर्ज सादर करता येतो.


तारण कर्ज (Mortgage Loan): 

Mortgage कर्ज प्रकारामंध्ये कर्ज घेत्यावेळी ग्राहक आपली संपत्ती कर्जाच्या बदल्यात बँकेला अथवा खाजगी नोंदणीकृत सावकाराला लिहुन देतो त्याला आपण तारण असे सुध्दा म्हणतो, लिहुन दिलेल्या मालमंत्तेची मालकी कर्ज घेतल्यानंतर जरी कर्ज घेतलेल्या ग्राहकाची असली

तरी कर्जाच्या अटि व शर्ती नुसार कर्ज परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ झाल्यास Mortgage असलेल्या मालमंत्तेला जप्त करण्याचा अधिकार बँकेकडे असतो, अशी तारण ठेवुन घेतलेल्या कर्जांची संपुर्ण परतफेड केल्यानंतर बँकेचे “No Dues Certificate” असल्याशिवाय तारण मालमंत्ता विकता अथवा हस्तांतरीत करता येत नाहि.

वाहन कर्ज (Vehicle Loan):

 वाहन कर्ज घेतलेले असल्यास संबंधित वाहनाचे RC Certificate म्हणजेच प्रादेशीक परिवहन कार्यालय (R.T.O.) कार्यालयातील वाहनाचे नोदणी प्रमाणपत्र बँकेच्या नावे असते, वाहन कर्जांची संपुर्ण परतफेड केल्यानंतर बॅकेकडुन “No Dues Certificate” घेवुन ते R.T.O. कार्यालयात सादर करून ग्राहक वाहन आपल्या नावावर करून घेवु शकतो.

विमा पॉलिसी तारण कर्ज: 

विमा पॉलिसी तारण ठेवुन सुध्दा बँकेकडुन कर्ज मिळते अश्या वेळी बँक संबधित ग्राहकाची विमा पॉलिसी Assign करून घेते, ग्राहकाने बँकेकडुन घेतलेल्या कर्जाची संपुर्ण परतफेड केल्यानंतर ती विमा पॉलिसी बँकेकडुन “No Dues Certificate” घेवुन संबंधित विमा कंपणीकडुन Re Assign करून घ्यायला हवी.

संपुर्ण कर्जाची परतफेड केल्या नंतर संबंधित बँकेडुन ग्राहकाला Cibil Score तिस दिवसानंतर मिळवता येवु शकतो Cibil Score ची आवश्यकता क्रेडिट कार्ड मिळविण्यापासुन ते इतर कर्ज मिळवीण्यासाठी आवश्यक असते.

CIBIL स्कोअर चांगला ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटूंबियांनी उर्वरित कर्ज भरावे का? जाणून घ्या महत्वाची माहिती

आपण आपल्या परिवाराच्या आनंदासाठी काय नाही करत. होम लोन घेऊन घर खरेदी करतो. ऑटो लोन घेऊन कार किंवा इतर वाहनं घेतो. छोटे मोठे लोन घेऊन आपण परिवाराच्या सुखासाठी सर्व प्रयत्न करतो. कोरोना काळात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. परंतु अशा लोकांवर कर्ज असतील तर ते नंतर वसूल कोणाकडून होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी पुढे वाचा

तुम्हाला माहिती आहे का? फ्री मध्ये मिळतायेत हे 5 विमा कव्हर. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

कर्जदाराच्या मृत्यू नंतर कर्ज कोणी भरावे ?

कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज कोणी भरावे याचे उत्तर जाणून घेण्याआधी हे समजने गरजेचे आहे की, कर्ज एका प्रकारचे नसते. कर्जाला सेक्युरटी आणि अनसेक्युरटी अशा कॅटेगिरीमध्ये ठेवले जाते.

सेक्युअर्ड लोन म्हणजेच होम लोन, ऑटो लोन आणि अनसेक्युअर्ड लोन म्हणजेच पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड वगैरे

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा. 

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केली जाते. PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*


होम लोन

जर संयुक्त होम लोन काढण्यात आले आहे. आणि प्रायमरी अर्जदाराचा मृत्यू झाला असेल तर, उर्वरित लोन भरण्याची जबाबदारी दुसऱ्या अर्जदाराची असते. जर दुसरा अर्जदारही लोन भरू न शकल्यास. बँकांना दिवाणी न्यायालय, डेट रिकवरी ट्रीब्युनलनुसार वसूली करण्याचा अधिकार असतो. अशात बँका मृताच्या कुटूंबियांना लोन भरण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देऊ शकतात. मृत व्यक्तीने कोणतीही टर्म पॉलिसी घेतली असेल तर, त्या पैशातून लोनची रक्कम भरता येऊ शकते.

होम लोनच्या ओझ्यामुळे चिंताग्रस्त आहात? या टिप्स अवलंबा, लवकर व्हाल चिंतामुक्त !! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


ऑटो लोन

एखादी कार किंवा वाहनावर लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याचे उर्वरित लोन भरण्याची जबाबदारी कुटूंबाची असते. बँक कुटूंबातील सदस्यांना उर्वरित लोन भरण्यास सांगू शकते. जर परिवारातील कोणताही सदस्य लोन भरण्यास तयार नसेल तर बँक संबधित वाहन जप्त करू शकते. संबधित वाहनाच्या लिलावातून बँक कर्ज वसूल करते.


पर्सनल लोन , क्रेडिट कार्ड

पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचे बिल हे सर्व अनसेक्युअर्ड लोन असतात. जर कोणत्याही अशा कर्जदार व्यक्तीचा मृ्त्यू झाला. तर बँक मृतकाच्या कुटूंबाला लोन भरण्याचे सांगू शकत नाही. कारण हे अनसेक्युअर्ड लोन असते. या लोनला तारणही काहीही नसते त्यामुळे कसलीही संपत्ती जप्त करता येत नाही. बँक या कर्जाला राइट ऑफ करते म्हणजेच NPA मध्ये वर्ग करते.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...