( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 वाचाल तर... वाचाल !!! होम लोनच्या ओझ्यामुळे चिंताग्रस्त आहात? या टिप्स अवलंबा, लवकर व्हाल चिंतामुक्त !!
स्वत:चे घर हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. सर्वसाधारण भारतीय नागरिकाचा आयुष्यातील सर्वात मोठा खर्च घरावर होत असतो. घर विकत घेणे हे अनेकांच्या आवाक्याबाहेरचे असते, तर अनेकजण जे घर विकत घेतात, ते गृहकर्जाचा पर्याय अंमलात आणतात. मात्र गृहकर्जाचे हफ्ते नियमित भरणे हेसुद्धा एक चिंतेची बाब असते. त्यातच दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे तर दर महिन्याचे बजेट आणि खर्च यांची तोंडमिळवणी करणे आणखीच कठीण झाले आहे. गृहकर्जासाठी कालावधी अनेकवेळा १५ ते २० वर्षांसाठीचा असतो. अशावेळी कधी एकदा पटकन हे गृहकर्जाचे ओझे आटोपते असे अनेकांना वाटत असते. एवढ्या मोठ्या कालावधीत नियमितपणे ईएमआय भरणे ही खरोखरच कठीण प्रक्रिया असते. मात्र होम लोन घेणारे काही टिप्समुळे किंवा काही उपायांमुळे आर्थिक ताण कमी करू शकतात. गृहकर्जाचे आर्थिक संकट सोपे करतील अशा टिप्स समजून घेऊया.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केली जाते. PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे*
गृहकर्जाचा कालावधी कमी करा.
गृहकर्जाच्या क्षेत्रातील जाणकार सांगतात की गृहकर्जाची वेगाने परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधीऐवजी छोट्या कालावधीसाठी कर्ज घेणे योग्य ठरते. अर्थात यासाठी तुम्हाला गृहकर्जाच्या ईएमआयबरोबरच अतिरिक्त रक्कम बॅंकेत जमा करावी लागेल. आधीच ईएमआयमुळे आर्थिक ताण पडत असताना अतिरिक्त रकमेची जुळवाजुळव कशी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मात्र तुम्हाला बोनसरुपाने किंवा इतर काही कारणांमुळे अधूनमधून जी रक्कम हाती येते ती घरातील वस्तूंच्या खरेदी किंवा पर्यटनावर खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर गृहकर्ज फेडण्याकडे वळवली तर तुम्ही गृहकर्जाचा कालावधी कमी करू शकाल आणि याचा तुम्हाला दीर्घ काळात फायदा होईल. कारण असे केल्यामुळे तुम्हाला एकूण कमी व्याज भरावे लागेल. कारण तुमची कर्जाची मूळ रक्कम तितक्या लवकर कमी होईल आणि परिणामी एकूण कर्जासाठी तुमच्यावर आकारले जाणारे व्याजदेखील कमी असेल.
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटूंबियांनी उर्वरित कर्ज भरावे का? जाणून घ्या महत्वाची माहिती. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
बॅंकेबरोबर व्याजदरासंदर्भात बोलणी करा.
अनेकवेळा गृहकर्ज घेताना जे व्याजदर असतात त्यात नंतरच्या काळात रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामुळे बदल झालेले असतात. त्यामुळे तुम्ही व्याजदर कमी करण्यासाठी बॅंकेशी चर्चा केल्यास काही फायदा होऊ शकतो. अर्थात हे सर्वस्वी तुमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि बॅंकेचे धोरण यावर अवलंबून असते. तुम्ही बॅंकेला रिफायन्सिंगचीही विनंती करू शकता आणि याद्वारे व्याजदर कमी करून घेऊ शकता. अर्थात हा फायदा बॅंक देईल याची कोणतीही शाश्वती नसते. यासाठी ग्राहकांनी इतर बॅंका आकारत असलेल्या व्याजदरांवर लक्ष ठेवा. जर इतर बॅंका कमी व्याजदरात गृहकर्ज देत असतील तर तुम्ही तुमचे गृहकर्ज त्या बॅंकेकडे हस्तांतरित करू शकता. मात्र असे करताना तुम्हाला सध्याच्या बॅंकेला पेनल्टी रुपाने आणि नव्या बॅंकेला प्रोसेसिंग शुल्क यासाठी काही रक्कम भरावी लागेल. त्यामुळे हा बदल करण्यापूर्वी तुम्ही हा खर्च आणि तुमचा होणारा फायदा याचे व्यवस्थित गणित करून घ्या. नाहीतर थोडे पैसे वाचवण्याच्या नादात मोठे नुकसान होऊ शकते. दुसऱ्या बॅंकेकडून कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध झाल्यास तुम्ही ईएमआयची रक्कम वाढवून कर्जाचा कालावधी कमी शकता.
उदाहरण -
एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया. समजा २० वर्षांसाठी तुम्ही ७० लाख रुपयांचे गृहकर्ज ८.५ टक्के व्याजदराने घेतले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या दरमहिन्याच्या ईएमआयची रक्कम ६०,७४८ रुपये इतकी आहे आणि तुम्हाला एकूण १,४५,७९,५२० रुपयांची परतफेड करावी लागेल. समजा चार वर्षांनंतर तुमच्या बॅंकेने व्याजदर घटवून ७.५ टक्क्यांवर आणले तर तुमचा ईएमआय ५६,३९२ रुपये इतका होईल. म्हणजेच तुमची दरमहा ४,३५६ रुपयांची बचत होईल. या पद्धतीने तुम्ही एकूण जवळपास १० लाख रुपयांची बचत करू शकाल. मात्र जर तुम्ही ६८,९३२ इतका ईएमआय दर महिन्याला भरू शकणार असाल तर तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होऊन १२ वर्षांवर येऊ शकतो. असे केल्याने तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल मात्र दीर्घ कालावधीत तुमची एकूण २२ लाख रुपयांची बचत होईल.
लोनचे प्री-पेमेंट
गृह कर्जाची रक्कम वाचवणे आणि कर्जावरील व्याज रक्कम कमी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे होम लोनची प्रीपेमेन्ट करणे. जर एखाद्याला गृह कर्जाची प्रीपेमेंट करायची असेल तर त्याने आर्थिकदृष्ट्या योग्य असावे.
परंतु लक्षात घ्या की आपल्याला कर्जाची प्रीपेमेंट करायची असेल तर गृह-कर्जावरील व्याज दर एडजस्टेबल (फ्लोटिंग) असतील तर कोणतेही प्री-क्लोजर शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, निश्चित दर असल्यास, काही दंड किंवा फी भरावी लागेल.
कर्ज कमी कसे करावे ?
आपण रेगुलर बेसिस वर निश्चित रकमेची प्रीपेमेंट करू शकता आणि थकित कर्ज प्रभावीपणे कमी करू शकता. कमी शिल्लक म्हणजे कमी व्याज दर. गृह कर्जाच्या रकमेची प्रीपेमेन्ट कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत केली पाहिजे शेवटी नाही. कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत ईएमआयमधील व्याजाचा भाग जास्त असल्याने यामुळे अधिक बचत होण्यास मदत होईल.
कमी व्याजदराच्या स्कीमचा ऑप्शन निवडा
गृह कर्ज अर्जदार कमी व्याजदराची स्कीम निवडून व्याजावर पैसे वाचवू शकतो. आपण बर्याच बँकांशी कर्जासाठी बोलणी करावी आणि कर्ज निवडण्यापूर्वी त्यांचे व्याज दर तपासावेत. आपण एखाद्या विशिष्ट बँकेचे जुने आणि लॉयल ग्राहक असल्यास, बँक आपल्याला कमी व्याज दराने कर्ज योजना देऊ शकते.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
होम लोन बॅलन्स करा ट्रांसफर
होम लोन बॅलन्स आपण एका बँकेतून दुसर्या बँकेत ट्रांसफर करू शकता. अशा वेळी काहीवेळा नवीन बँक कमी व्याजदराने कर्जाची ऑफर देऊ शकते. हे आपल्याला खूप पैसा वाचविण्यात मदत करते. व्याज बचत करण्याच्या उद्देशाने होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करणे सोपे आणि प्रभावी आहे.
एसआयपीची मदत घ्या (SIP investment)
गृहकर्जाचे व्याजदर आणि मूळ रक्कम लक्षात घेता ही खूप मोठी रक्कम होते. अनेकवेळा मुद्दलपेक्षा आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम अधिक असते. वर दिलेल्या उदाहरणात तुम्ही पाहू शकता की ग्राहकाला एकूण १,४५,७९,५२० रुपयांची परतफेड करावी लागते आहे. यात ७६ लाख रुपये व्याजरुपानेच भरावे लागणार आहेत. अर्थात यापासून तुम्ही सुटका करून घेऊ शकता. तुम्हाला याची कल्पना आहे का की तुम्ही एसआयपीच्या मदतीने गृहकर्जाची परतफेड वेळेआधीच करू शकता. एसआयपी ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. दर महिन्याला तुम्ही एका विशिष्ट म्युच्युअल फंड योजनेत एक निश्चित रकमेची गुंतवणूक करता. एसआयपीमध्ये अगदी ५०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. मात्र याद्वारे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता आणि दीर्घकालावधीत चांगला परतावा आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ यामुळे तुम्ही मोठी रक्कम उभी करता.
वर उल्लेख केल्याप्रमाणे तुमची कर्जाची रक्कम ७० लाख रुपये आहे. त्याच्या ०.१० टक्के इतकी रक्कम तुम्ही दरमहा एसआयपीद्वारे गुंतवा. म्हणजेच तुम्हाला दरमहा ७,००० रुपये एसआयपीद्वारे गुंतवावे लागतील. तुमचे गृहकर्ज २० वर्षांसाठी आहे, त्यामुळे २० वर्षात तुम्ही एकूण १६.८० लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल. त्यानंतर अंदाजे १२ ते १४ टक्के परतावा गृहीत धरल्यास तुमच्याकडे १.०४ कोटी रुपयांची रक्कम २० वर्षांनी जमा झालेली असेल. यातून तुम्ही गुंतवलेली मूळ १६.८० रक्कम बाजूला काढली तरी तुम्ही ८८ लाख रुपये कमावलेले असतील ते तुम्ही गृहकर्जावर भरत असलेल्या व्याजाच्या रकमेपेक्षा अधिक असतील. कारण व्याजरुपाने तुम्ही एकूण ७६ लाख रुपये भरणार आहात. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त रकमेचा वापर करून तुम्ही अधिक प्रमाणात डाऊन पेमेंट केल्यास कर्जाची रक्कम कमी करू शकता.
*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे 7900094419
उत्पन्न वाढेल तसे ईएमआयची रक्कम वाढवा.
हा गृहकर्जातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसाधारणपणे गृहकर्जाचा कालावधी १५ ते २० वर्षांचा असतो. एवढ्या मोठ्या कालावधीत तुमचे उत्पन्नदेखील वाढत जाते. नोकरदारांचे वेतन दरवर्षी वाढत असते. मात्र अनेक नागरिक उत्पन्न वाढले की खर्च वाढवतात, राहणीमानाचा खर्च वाढवतात. ही मोठी चूक आहे. अशा वेळी दरमहा वाढलेल्या वेतनाचा वाढीव हिस्सा ईएमआयकडे वळवला पाहिजे. यामुळे तुमची कर्जाची मुद्दल कमी होऊन परिणामी तुमच्यावर आकारण्यात येणारे एकूण व्याज कमी होईल. ईएमआयमध्ये थोडीशी केलेली वाढ तुमच्या कर्जाचा लवकर निपटारा करण्यास उपयुक्त असते. कर्ज परतफेडीचा हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा