( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
संगणकाची माहिती - संगणकाचा परिचय
या युगा मध्ये असा कोणताच व्यक्ती नसेल कि, ज्याने संगणक पाहिलेला नसेल. जरी कोणाला संगणक वापरता येत नसेल परंतु संगणक मात्र पहिलाच असेल. गेल्या दशकापासून संगणक आपल्या रोजच्या जीवनाचा इतका अत्यावश्यक भाग झाला आहे. जणू काही संगणका शिवाय जीवन सुद्धा अपुरे वाटायला लागले आहे. त्याला कारण पण तसेच आहे संगणकाची काम करण्याची अचूकता एक मुख्य कारण आहे आणि वेग सुद्धा.
आज काल संगणकामुळे पैसे पाठविणे, बिल भरणे, शालेय फॉर्म भरणे, विविध योजनांचे फॉर्म भरणे, बँकेशी देवाण घेवाण चे व्यवहार करणे, इंटरनेट बँकिंग, इ-कॉमर्स , ऑनलाईन तिकीट बुक करणे, खरेदी करणे, जेवण मागविणे.... इत्यादी कामे आता घरबसल्या होत आहेत.
*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे 7900094419*
म्हणून तर आजचे युग हे संगणकीय युग आहे. संगणक हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य असा भाग बनला आहे असे चित्र आपल्याला सर्वत्र दिसत आहे. मानव संगणकाकडे कच्ची माहिती पुरवितो. त्या माहितीचे अर्थ विश्लेषण करून त्यावर प्रक्रिया करून संगणक आपल्याला आवश्यक ती माहिती पुरवितो. आज आपण जे मोबाईल वापरतो तो पण एक प्रकारचा छोटा संगणकच आहे. आज क्षेत्र कोणतेही असो जसे कि,
उदानार्थ :-
· कारखाने
. औद्योगिक क्षेत्र
· विमा
· व्यापारी उद्योग
· सरकारी व खाजगी बँका
· सरकारी तथा खाजगी कार्यालये
· विज्ञान आणि तंत्रज्ञान
· कृषी विभाग
· शिक्षण क्षेत्र
· वैद्यकीयशास्त्र
· अभियांत्रिकी क्षेत्र
इत्यादी क्षेत्रात संगणकाचा वापर फार प्रमाणात होत आहे.
वर्ल्ड वाईड वेब च्या माध्यमातून तर संपूर्ण जग जवळ आले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आता माऊस च्या एका क्लिक वर काही सेकंदात मिळू शकते.
संगणक ( Computer ) म्हणजे काय ?
संगणक हे एक मानवाने तयार केलेले इलेट्रॉनिक उपकरण आहे. संगणकाला इंग्रजी मध्ये "Computer" असे म्हटले जाते. Computer हा शब्द इंग्लिश मधील "Compute" या इंग्रजी क्रियापदा पासून बनलेला आहे. Compute या शब्दाचा अर्थ गणन असा होतो. जेव्हा संगणकाची निर्मिती झाली तेव्हा संगणक या उपकरणाचा वापर मुख्यतः आकडे मोड करण्यासाठी केला जात होता. म्हणून तार्किकदृष्ट्या कोणत्याही गणन उपकरणास संगणक म्हणता येईल. जे कोणतेही उपकरण गणन कार्य करण्यास मदत करते, त्या उपकरणाला संगणक असे समजण्यास काही अयोग्य ठरणार नाही. म्हणून जे इलेट्रॉनिक उपकरण गणन किंवा आकडेमोड कार्यास मदत करते ते उपकरण म्हणजेच संगणक होय. सुरुवातीचा काळात संगणकाचा हा अर्थ योग्य होता. परंतु आता दिवसेंदिवस संगणक या उपकरणामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या आणि आता संगकाचा वापर अनेक कामासाठी होत आहे. संगणक कच्चा स्वरूपात मा…
सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419
संगणकाचा फुल फॉर्म
Commonly Operated Machine Particularly Used in Technical and Educational Researc
C - Commonly
O - Operated
M - Machine
P - Particularly
U - Used
T - Technical
E - Educational
R - Research
संगणकाची व्याख्या :- ( Computer Definition in Marathi )
" A Computer is an electronic machine which accept the data as Input process it is according to given instructions o gives our desired result. "
" संगणक हे माहिती स्वीकारणारे, दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. "
"संगणक हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे माहिती स्वीकारते, त्यावर प्रक्रिया करते आणि निष्कर्ष सादर करते."
" माहिती साठवणारे, त्यावर प्रक्रिया करणारे, माहितीचे वहन करणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे संगणक होय "
" संगणक हे मानवनिर्मित विद्द्युत यंत्र असून ते माहिती घेते, माहितीवर प्रक्रिया करते, पाहिजे त्या पद्धतीने जलद आणि अचूक उत्तरे देते आणि माहिती साठवून ठेवतो तसेच पाहिजे तेव्हा ती माहिती परत संप्रेरित करते "
https://www.digitalmahiti.in/parts-of-computer-in-marathi/
संगणकाचे भाग व माहिती-
संगणक हे एक उपकरण नसून अनेक उपकरणांना एकत्रित जोडण्यात आलेले आहे, हे तुम्हाला सर्वांना माहितच असेल. संगणकाच्या या पार्ट चे दोन मुख्य प्रकार आहेत, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. संगणकाच्या ज्या भागांना आपण स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर असे म्हणतात Parts of Computer in Marathi आणि आपण ज्यांना स्पर्श करू शकत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर असे म्हणतात.
संगणकाच्या प्रत्येक पार्टचे कार्य वेगळे असते. जसे संगणकाला इनपुट देणे, यूजरला आउटपुट दर्शवणे, स्टोरेज डिव्हाइस मध्ये माहिती साठवणे आणि माहितीवर प्रक्रिया करणे. संगणकाच्या प्रत्येक भागात या पैकी एक कार्य करण्याची क्षमता असते.
संगणकाचे सर्व पार्टस ऑपरेटिंग सिस्टिम द्वारे एकमेकांना जोडलेले असतात आणि ऑपरेटिंग सिस्टिम द्वारेच नियंत्रित केले जातात.
संगणकाचे भाग व माहिती- Parts of Computer in Marathi
अ) इनपुट डिवाईस –
1) माउस –
2) कीबोर्ड –
3) टच स्क्रीन –
4) मायक्रो फोन –
5) वेब कॅमेरा –
ब) आउटपुट डिवाईस –
1) मॉनिटर –
2) प्रिंटर –
3) प्रोजेक्टर –
4) स्पीकर –
5) प्लॉटर –
क) स्टोरेज डिवाईस –
1) हार्ड डिस्क –
2) फ्लोपी डिस्क –
3) मेमरी कार्ड –
4) CD आणि DVD –
ड) प्रोसेसिंग डिवाईस –
1) मदरबोर्ड –
2) मायक्रो प्रोसेसर –
3) रॅम –
4) ग्राफिक्स कार्ड –
5) साउंड कार्ड –
संगणकाच्या प्रत्येक भागाचे कार्य वेगळे असते, त्या कार्यानुसार संगणकाच्या भागाचे विभाजन केले गेले आहे.
अ) इनपुट डिवाईस
ब) आउटपुट डिवाईस
क) स्टोरेज डिवाईस
ड) प्रोसेसिंग डिवाईस
संगणक कोणतेही असो, डेस्कटॉप, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ई. वरील चार संगणकाचे प्रकार प्रत्येकी एक पार्ट तरी त्यात असतातच. तर चला आता संगणकाच्या भागांची विस्तारित माहिती घेऊयात.
अ) इनपुट डिवाईस –
आपण संगणकाची माहिती या पोस्टमध्ये पाहिले की संगणक यूजर ने दिलेल्या इनपुट च्या आधारावर कार्य करते. संगणकाला इनपुट देण्यासाठी काही साधने असतात त्यांना इनपुट डिवाइस किंवा इनपुट साधने म्हणतात.
ज्याप्रमाणे आपण माउसचा उपयोग करून कोणतेही डेस्कटॉप संगणक चालवू शकतो म्हणजे माउस संगणकाला इनपुट देते, माउस हे इनपुट डिवाइस आहे.
इनपुट डिवाइसला इंस्टॉल करण्यासाठी संगणकामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात. प्रत्येक इनपुट डिवाइससाठी वेगळे सॉफ्टवेअर असते. तर आता आपण संगणकातील महत्वाच्या इनपुट डिवाइसची Parts of Computer in Marathi माहिती घेऊयात.
1) माउस –
डेस्कटॉप संगणकाच्या स्क्रीनमध्ये एक तिरका बाण असतो त्याला कर्सर असे म्हणतात. या कर्सर ची हालचाल माउसच्या साहाय्याने होते. जसे आपण माउस फिरवतो तसे स्क्रीन वरील कर्सर फिरतो. साहाय्याने आपण फोल्डर Open, Delete, Copy-Paste करू शकतो. माउसला दोन बटन असतात-
1) Right Click
2) Left Click
आणि दोन्ही बटन च्या मध्ये एक फिरकी असते. यांचा वापर करून माउस द्वारे संगणक चालवले जाते.
2) कीबोर्ड –
कीबोर्डचा वापर संगणकावर लिखाण काम करण्यासाठी केला जातो. डेस्कटॉप संगणक व लॅपटॉप च्या एका भागात खूप बटणे असतात, त्याला कीबोर्ड असे म्हणतात.
कीबोर्डला १०० पेक्षा जास्त बटन असतात. त्यांना Keyboard Keys असे म्हणतात. कीबोर्ड मध्ये Function Keys, Typing Keys, Control Keys, Navigation Keys आणि Numeric Keys असतात.
कीबोर्डवरील F1 ते F12 हे बटणं काय काम करतात? त्यांचा उपयोग काय? लगेच माहित करुन घ्या
आपल्यापैकी अनेक लोकं दररोज कंप्यूटर वापरतात. परंतु आपल्याला रोज वापरत असलेल्या या कंप्यूटरच्या कीबोर्डमधील काही Short Cuts आपल्याला माहित नसतात किंवा कीबोर्डमधील काही Key कशासाठी असतात? त्यांचा वापर कशासाठी होतो? हे देखील काहीजणांना माहित नसते. त्यामुळे हे Key कशासाठी वापरतात आणि कसे वापरतात? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
F1: कंप्यूटर चालू करताना जर तुम्ही F1 दाबालात तर तुम्ही कंप्यूटर सेटअपव पोहोचाल. तुम्हा येथून तुम्ही तुमच्या कंप्यूटरच्या सेटिंग्ज तपासू आणि बदलू शकता.
F2: F2 ही Key विंडोज ऑपरेटिंग सिस्टममधील फाइलचे नाव बदलण्यासाठी वापरली जाते.इतकेच नाही तर मायक्रोसॉफ्ट वर्डमधील F2 Key दाबून तुम्ही एखाद्या फाईलचे प्रिंट प्रिव्ह्यू देखील पाहू शकता.
F3: विंडोजमधील F3 Key वापरून सर्च बॉक्स उघडता येते. F3 Key दाबल्यानंतर, आपण कोणतीही फाईल किंवा फोल्डर शोधू शकता. दुसरीकडे, MS-DOS मध्ये F3 दाबून पूर्वी टाइप केलेली कमांड पुन्हा टाईप केली जाईल.
F4: मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर या Key ला दाबले, तर मागील काम पुन्हा सुरू होते. म्हणजेच, आपण यापूर्वी टाइप केलेला शब्द पुन्हा टाइप केला जाईल किंवा अशा कोणत्याही कामाला तुम्हा रीपीट करु शकता.
F5: कंप्यूटर रीफ्रेश करण्यासाठी सामान्यतः F5 चा वापर केला जात असला तरीही, हे बटण दाबून पॉवरपॉईंटचा स्लाइड शो देखील सुरू होतो.
F6: कीबोर्डवरील की दाबून, विंडोजमधील खुल्या फोल्डर्समधील कंटेन्ट दिसू लागते. या व्यतिरिक्त, MS Word मधील अनेक कागदपत्रे पाहण्यासाठी Control+Shift+F6 दाबून केले जाते.
F7: आपण MS Word मध्ये F7 दाबल्यानंतर तुम्ही जे काही टाइप कराल त्याचे स्पेलिंग चेक होते.
F8: MS Word मधील मजकूर निवडण्यासाठी F8 वापरला जातो.
F9: Microsoft Outlook मध्ये ई-मेल पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी F9 वापरला जातो. त्याच वेळी, बर्याच नवीन सिस्टम्समध्ये या Key च्या मदतीने स्क्रीनचा ब्राइटनेसला देखील नियंत्रित केले जाऊ शकते.
F10: तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना ही Key दाबलीत तर मेनू उघडेल. या व्यतिरिक्त, Shift+F10 दाबले तर, ते माउसच्या राईट क्लिकसारखे काम करते.
F11: F11 चा वापर इंटरनेट ब्राउझरमध्ये पूर्ण स्क्रीन पाहण्यासाठी केला जातो.
F12: MS Word मध्ये दाबून Savs As चा पर्याय उघडेल. Shift+F12 दाबल्याने मायक्रोसॉफ्ट फाईल सेव्ह होते.
3) टच स्क्रीन –
स्मार्टफोन आणि टॅबलेट मध्ये टच स्क्रीन चा वापर केला जातो. आपल्या बोटाने स्क्रीनवर क्लिक करून यांना नियंत्रित केले जाते.
माउस व कीबोर्ड दोन्हींचे कार्य टच स्क्रीन करते. स्मार्टफोन आणि टॅबलेट सोबतच आता काही लॅपटॉप मध्येही टच स्क्रीन चा वापर केला गेला आहे. टच स्क्रीन वापरल्याने कार्य लवकर पूर्ण होतात हा एक मोठा फायदा आहे.
4) मायक्रो फोन –
संगणकाला ऑडिओ च्या स्वरूपात इनपुट देण्यासाठी मायक्रो फोन चा वापर केला जातो. मायक्रो फोन च्या मदतीने आपण Voice Chat, Voice Calling द्वारे मित्रांशी बोलू शकतो. तसेच गाणे रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रो फोन वापरला जातो.
स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉप मध्ये मायक्रो फोन आधीच कंपनी द्वारे दिलेले असतात. डेस्कटॉप संगणकासाठी मायक्रो फोन वेगळे विकत घ्यावे लागतात.
5) वेब कॅमेरा –
वेब कॅमेराचा उपयोग विडिओ बनवण्यासाठी केला जातो. डेस्कटॉप संगणकाला वेब कॅमेरा विकत घ्यावा लागतो. लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबलेट ला In-Built कॅमेरा असतो, याला सेल्फी कॅमेरा या नावाने सुद्धा ओळखले जाते. वेब कॅमेरा एक वायर द्वारे संगणकाला जोडलेला असते.
Video Calling, Video Recording आणि फोटो काढण्यासाठी वेब कॅमेरा चा वापर केला जातो. डेस्कटॉप संगणकाचा वेब कॅमेरा आकाराने मोठा असतो. आपल्या आवश्यकतेनुसार आपण क्वालिटी निवडू शकतो
ब) आउटपुट डिवाईस –
संगणकाने प्रक्रिया केलेल्या डेटाला यूजर पर्यंत पोहोचवण्याचे कार्य Output Devices चे असते. संगणकाला इनपुट डिवाईस द्वारे डेटा मिळतो आणि तो डेटा प्रक्रियेनंतर यूजरला आउटपुट उपकरण द्वारे दर्शवला जातो. डेस्कटॉप संगणकात मॉनिटर हे एक आउटपुट उपकरण आहे.
आपण जी प्रक्रिया करतो ती सर्व आपल्याला स्क्रीनवर दिसते, त्यामुळे मॉनिटर हे डेस्कटॉप संगणकाचे एक महत्त्वाचे आउटपुट उपकरण आहे. आता आपण काही महत्वाच्या आउटपुट Parts ची माहिती घेऊयात.
1) मॉनिटर –
डेस्कटॉप संगणकाला TV सारखी स्क्रीन असते, त्या उपकरणाला मॉनिटर असे म्हणतात. संगणकावर करत असलेले सर्व कार्ये यावर दर्शवले जातात…
मॉनिटरला Visual Display Unit असे म्हटले जाते. मॉनिटर हा डेस्कटॉप संगणकाचे सर्वात महत्वाचे आउटपुट उपकरण आहे. हे आउटपुट ला Soft Copy च्या स्वरूपात दर्शवते.
2) प्रिंटर –
संगणक द्वारे मिळालेल्या आउटपुट डेटाचे Hard Copy च्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी प्रिंटर वापरले जाते. प्रिंटर वापरून आपण कोणतेही Document, Photo ना कागदावर प्रिंट करू शकतो. प्रिंटर चे बरेच प्रकार सुद्धा असतात.
प्रिंटर वापरून कोणत्याही आकाराच्या कागदावर प्रिंटिंग करता येते, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर वापरले जातात. काही प्रिंटरमध्ये शाही वापरली जाते तर काही मध्ये लेजर द्वारे प्रिंट रेखाटले जाते. आता तर नवीन 3D प्रिंटर आले आहेत, याद्वारे तर हुबेहूब पूर्ण त्रिमितीय वस्तू प्रिंट करता येते.
3) प्रोजेक्टर –
विडिओ ला मोठ्या पडद्यावर दर्शवण्याचे कार्य प्रोजेक्टर चे असते. थिएटर मध्ये जसे वस्तू द्वारे लाईट पडद्यावर सोडली जाते आणि मग तुम्ही सिनेमा पाहता. त्या लाईट सोडण्याच्या यंत्राला प्रोजेक्टर म्हटले जाते.
प्रोजेक्टरचा उपयोग नुसता थेटर मधेच नाही तर, शाळा, कॉलेज मध्येही केला जातोय. ऑफिस मध्ये प्रेझेन्टेशन दाखवण्यासाठी प्रोजेक्टर वापरले जाते. प्रोजेक्टर ची किंमत जरा जास्त असते पण मोठी स्क्रीन वापरल्याऐवजी प्रोजेक्टर परवडतात.
4) स्पीकर –
संगणक द्वारे ऑडिओ आउट पुट मिळवण्यासाठी स्पीकर वापरले जातात. आपण वापरणाऱ्या स्मार्टफोन मध्ये ज्या ठिकानातून आवाज बाहेर येतो तेथे स्पीकर बसवलेले असतात.
स्पीकर वापरून आपण गाणे ऐकू शकतो, कोणत्याही प्रकारचा ऑडिओ ऐकू शकतो. डेस्कटॉप संगणकाला स्पीकर स्वतंत्रपणे विकत घ्यावे लागतात. स्मार्टफोन, टॅबलेट, आणि लॅपटॉपच्या आतमध्ये कंपनीने कडून स्पीकर बसवलेले असतात.
5) प्लॉटर –
संगणकात बनवलेल्या मोठ्या आकाराच्या आकृत्या किंवा डिजाईन कागदावर हुबेहूब रेखाटण्यासाठी प्लॉटर वापरले जातात. प्लॉटर यांना बनवण्यासाठी पेनाचा वापर करते किंवा लेदर कापण्यासाठी कात्रीचा वापर करतात. लेदरच्या कापडाला कापून आकार देणाऱ्या प्लॉटर ला Cutting Plotter म्हटले जाते.
पूर्वी प्लॉटरचा वापर संगणकीय आकृत्या काढण्यासाठीच केला जायचा, कारण साध्या प्रिंटर पेक्षा प्लॉटर चा वेग जास्त असतो आणि प्रिंटर लहान होते. परंतु, आता प्लॉटर ची जागा प्रिंटरने घेतली आहे. तरीही काही कंपन्यांमध्ये आजही प्लॉटर वापरले जाते.
ड) प्रोसेसिंग डिवाईस –
प्रोसेसिंग डिवाईस हा संगणकाचा एक भाग आहे, ज्याचा वापर करून संगणक यूजर ने दिलेल्या इनपुट नुसार प्रक्रिया करते. सर्व प्रोसेसिंग डिवाईस हे हार्डवेअर Parts of Computer असतात.
प्रोसेसिंग डिवाईस चे कार्य असते की, यूजर संगणकाला जो इनपुट देतो त्यानुसारप्रक्रिया करणे. सर्व प्रकारचे Processor, Graphics Card, Sound Card, Mother Board, ई प्रोसेसिंग डिवाईस आहेत. तर आता याबद्दल थोडी माहिती घेऊ.
1) मदरबोर्ड –
मदरबोर्ड हे प्रिंट केलेले डिजिटल सर्किट बोर्ड आहे. याला संगणकाचा पाया म्हटले जाते कारण संगणकाचे सर्व पार्ट मदरबोर्ड द्वारे एकमेकांना जोडलेले असतात. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर पार्ट्स मदरबोर्ड द्वारे एकमेकांना जोडलेले असतात.
संगणकात अनेक लहान- मोठी सर्किट बोर्ड असतात, त्यात हे सर्वात मोठे असते. संगणकाचे मुख्य पार्ट जसे Memory, Transistor, Monitor, Mouse हे मदरबोर्डला जोडलेले असतात.
2) मायक्रो प्रोसेसर –
मायक्रो प्रोसेसर हे एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. मायक्रो प्रोसेसर मध्ये लाखो Transistor एकमेकांना जोडलेले असतात. हा संगणकाचा गाभा असतो. संगणकाची सर्व कार्य मायक्रोप्रोसेसर नियंत्रित करते.
संगणक दिलेले कार्य करण्यास किती वेळ लावते, हे त्याच्या मायक्रो प्रोसेसरच्या रचनेवर आधारित असते. जगातील सर्वात शक्तिशाली असलेले महासंगणक मध्ये लाखोंच्या संख्येत मायक्रो प्रोसेसर असतात.
3) रॅम –
RAM म्हणजे Random Access Memory ही एक प्रकारची मेमरी आहे. रॅमची प्रोसेसिंग प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते. संगणक प्रक्रिया करत असलेला डेटा रॅममध्ये साठविला जातो आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो डेटा यूजर ला आउटपुट च्या स्वरूपात दिला जातो.
पुढे डेटा जर युजरला साठवून ठेवायचं असेल तर तो डेटा ROM मध्ये साठवला जातो. येथे रॅम चे कार्य संपते. संगणकाची रॅम जास्त, म्हणजे संगणकाचा कार्य करण्याचा वेग जास्त.
4) ग्राफिक्स कार्ड –
हा संगणकाचा एक पार्ट आहे, जो मॉनिटर स्क्रीन वर दृश्य तयार करतो. ग्राफिक्स कार्ड ची गुणवत्ता चांगली तरच स्क्रीन वरील दृश्य चांगली येतात. संगणकावर गेम खेळण्यासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी Graphics Card ची गरज असते.
ग्राफिक्स कार्ड ने स्क्रीनची गुणवत्ता सुधारते. मोबाईल आणि टॅबलेट मध्ये Graphics Card टाकायची गरज नसते, यात System मध्ये ग्राफिक्स इंस्टॉल केलेले असतात.
5) साउंड कार्ड –
साउंड कार्ड हे ऑडिओ इनपुट डिवाइस आहे. संगणकामध्ये आवाज तयार करण्यासाठी साउंड कार्ड वापरले जातात आणि हा आवाज आपल्याला स्पीकर व हेडफोन द्वारे ऐकू येतो.
ग्राफिक कार्डप्रमाणे हे कार्ड संगणकाला स्वतंत्र जोडायचे नसते. संगणक घेतल्यावर ते मदर बोर्ड मध्ये आधीच दिलेले असते.
संगणकाचे प्रकार – Types of Computer in Marathi
संगणक म्हणजे मॉनिटर, त्याशेजारी ठेवलेले कॅबिनेट, माउस, कीबोर्ड, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहेत. संगणक म्हणजे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस जे यूजरने दिलेल्या आदेशानुसार आउटपुट प्रदान करते. यात कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाइस येते. आपण खाली काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस ची माहिती घेऊयात.
१) डेस्कटॉप संगणक –
डेस्कटॉप कॉम्पुटर हे टेबल वर ठेवले जाणारे संगणक आहे. मॉनिटर, माउस, कीबोर्ड हे डेस्कटॉप संगणकाचे पार्ट आहेत.
Desktop कॉम्पुटर चालवण्यासाठी माउस व कीबोर्डचा वापर केला जातो आणि आउटपुट आपल्याला मॉनिटर स्क्रीन वर दर्शवले जाते. डेस्कटॉप संगणक मुख्य Power Supply वर चालते, यात बॅटरी नसते.
२) लॅपटॉप –
Laptop Computer जवळपास Desktop Computer सारखेच असते. डेस्कटॉप कॉम्पुटर प्रमाणे लॅपटॉप ला माउस व कीबोर्ड ची गरज नसते. कीबोर्ड आणि टच पॅड In-Built दिलेले असतात.
डेस्कटॉप च्या तुलनेत लॅपटॉप लहान व हलके असतात. लॅपटॉप बॅटरी वर चालतात. एकदा चार्जिंग केल्यावर काही तासासाठी हे वापरता येतात.
३) टॅबलेट –
टॅबलेट हे लॅपटॉप पेक्षा छोटे आणि स्मार्टफोन पेक्षा मोठे असतात. टॅबलेट मध्ये टच स्क्रीन दिलेली असते. यात टच पॅड ला इनपुट देण्यासाठी बोटाने टच करावे लागते किंवा Stylus चा वापर केला जातो.
लॅपटॉप प्रमाणे टॅबलेट बॅटरीवर चालतात. टॅबलेट चा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे सहजपणे कोठेही नेता येतात.
४) सर्व्हर –
सर्व्हर हे एक प्रकारचे संगणक आहे. याचा वापर संगणकांना इंटरनेट द्वारे माहिती, संसाधन आणि सेवा सुविधा, ई प्रदान करण्यासाठी केला जातो.
याचे विविध प्रकार असतात. जसे वेब सर्व्हर, मेल सर्व्हर, फाईल सर्व्हर, एप्लिकेशन सर्व्हर.
संगणकाचा (computer) शोध कोणी लावला?
संगणकाचा शोध लावण्याचे क्षेय कोणा एका व्यक्तीला देता येणार नाही. यात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. संगणकाच्या शोधात महत्वाचे योगदान देणाऱ्या चार्ल्स बॅबेज यांना “संगणकाचे जनक” म्हटले जाते. यांनी जगातील सर्वात पहिले Analytical इंजिन १८३७ मध्ये बनवले होते.
चार्ल्स बॅबेज यांनी बनवलेल्या इंजिनमध्ये बेसिक फ्लो कंट्रोल आणि Integrated Memory चा सिद्धांत वापरला होता, आणि आजही याच सिद्धांत वर संगणक बनवले जातात. याच कारणामुळे चार्ल्स बॅबेज यांचे योगदान सर्वात मोलाचे मानले जाते.जाणून घ्या कम्प्युटरसंबंधी 50 महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
या पोस्टच्या माध्यमातून आपण कम्प्यूटरच्या (computer) 50 महत्वाच्या प्रश्नांबाबत माहिती घेणार आहोत. जे परीक्षेच्या दृष्टीने आणि कम्प्युटरच्या (computer) माहितीच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षेत नेहमी विचारले जातात.
तुमच्या आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वरील चुका दुरुस्त करून घ्या
अनेक जणांच्या आधार कार्ड केव्हा पॅन कार्डवर नावाच्या व जन्माची तारखेची चुका असतात. अर्ज करतांना काही कारणास्तव बिघाड झाल्याने स्पेलिंग व जन्म तारखेची ची गडबड झाल्याचा अनुभव अनेकांना आला असेल.त्यामुळे इतर व्यवहारात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सहज पद्धतीने आपल्या नावाची व जन्म तारखेची दुरुस्ती करू शकता. संपर्क करा... संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
1) भारतात सर्वप्रथम कम्प्युटर (computer) कुठे स्थापन करण्यात आला होता?
उत्तर- भारतीय सांख्यिकी संस्था, कलकत्ता.
2) कम्प्यूटर साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर – 2 डिसेंबर.
3) जगात कोणता देश सर्वाधिक कम्प्यूटरवाला मानला जातो?
उत्तर – संयुक्त राष्ट्र अमेरिका.
4) जगात सर्वप्रथम कम्युटर निर्मिती कुणी केली?
उत्तर- सी-डॅक ने केली होती.
5) कम्प्युटरचे जनक कुणाला म्हटले जाते?
उत्तर – कम्प्यूटरचा जनक चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते. चार्ल्स बॅबेज यांनी 1822 मध्ये कम्प्युटरचा शोध लावला. चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या शोध लावलेल्या कम्युटरचे (computer) नाव डिफ्रेन्शियल इंजिन आहे.
6) कम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात?
उत्तर- सीपीयू.
7) कम्प्यूटरमध्ये जाणार्या डाटाला काय म्हणतात?
उत्तर- डाटा इनपुट.
8) BIOS चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर – बायोसचे पूर्ण नाव बेसिक इंटर्नल आऊटपुट सिस्टम आहे. हा शब्द प्रत्यक्षात बेसिक इनपुट /आऊटपुट सिस्टमचे संक्षिप्त रूप आहे. हे बिल्ड इन सॉफ्टवेयर असते, जे डिस्कशी विना प्रोग्राम अॅक्सेस करते, हे ठरवते की कम्प्युटर काय करू शकतो. बायोसचे मुख्य काम पीसीवर ऑपरेटिंग सिस्टम बूट करणे असते.
9) WWW चा शोध कुणी लावला?
उत्तर- Tim Berners Lee आणि Robert Cailliau. या दोघांनी मिळून 1989 मध्ये WWW (वर्ल्ड वाईड वेब) चा शोध लावला होता.
10) दोन प्रचलित आऊटपुट डिव्हाईस कोण-कोणते आहेत.
उत्तर- दोन प्रचलित आऊटपुट डिव्हाईस मॉनिटर आणि प्रिंटर आहेत. तसेच इतर मध्ये Plotter, Projector, Speaker चा समावेश होतो.
11) कम्प्युटरची सर्व प्रकारची माहिती किंवा आऊटपुट पाहण्यासाठी कोणत्या डिव्हाईसचा वापर केला जातो?
उत्तर- मॉनिटर.
12) आऊटपुटचे माध्यम कोणते आहे?
उत्तर- प्रिंटर.
13) सीडी रॅमचे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर- कॉम्पॅक्ट डिस्क रिड ओन्ली मेमरी. कॉम्पॅक्ट डिस्क रिड ओनली मेमरी ही द्वितीयक मेमेरीचे उदाहरण आहे.
14) कम्प्युटरमध्ये रॅमचे तात्पर्य काय आहे?
उत्तर – कम्प्युटरमध्ये रॅमचे तात्पर्य रँडम अॅक्सेस मेमरी आहे. ही कम्प्युटरची एक प्रकारची मेमरी असते. ज्यास रॅन्डमली अॅक्सेस केले जाते. याचा अर्थ कम्प्युटरमध्ये केले जात असलेले काम तात्पुरत्या प्रकारे स्टोअर करते.
15) कम्प्युटर (computer) हार्डवेयर जे डाटाचा मोठ्या प्रमाणात साठा करू शकते त्यास काय म्हणतात?
उत्तर- हार्ड डिस्क.
16) कम्प्युटरमध्ये कशाला मेमरीच्या प्रकारात मोजले जात नाही?
उत्तर – सर्व्हरला कम्प्युटरच्या मेमरीच्या प्रकारात धरले जात नाही.
17) पेन ड्राईव्ह काय आहे?
उत्तर – पेन ड्राईव्ह एक इलेक्ट्रॉनिक मेमरी आहे. पेन ड्राईव्ह एक पोर्टेबल युनिव्हर्सल सीरियल बस (युएसबी) फ्लॅश मेमोरी डिव्हाईस आहे. ज्याद्वारे कम्प्यूटरने ऑडियो, व्हिडिओ आणि डेटा फाईल्स संग्रहित आणि स्थानांतरित केल्या जातात.
18) कॅश मेमरीचा वापर का केला जातो?
उत्तर – कम्प्युटरमध्ये कॅश मेमरीचा वापर मेमरी आणि प्रोसेसरमध्ये गती व्यत्यय दूर करण्यासाठी केला जातो.
19) कम्प्युटरची बिल्ट इन मेमरी कोणती असते?
उत्तर- कम्प्युटरची बिल्ट इन मेमरी रॅम असते.
20) एखादी फाईल सेव्ह करून कम्प्युटर बंद केल्यानंतर डाटा यथावत कोणत्या ठिकाणी असतो?
उत्तर- सेकेंडरी स्टोरेजमध्ये असतो.
21) Www चा फुल फॉर्म काय आहे?
उत्तर- Word Wide Web.
22) कम्प्यूटरमध्ये शब्दाच्या लांबीला कशात मोजले जाते?
उत्तर – बाईट.
23) कम्प्युटर सिस्टमचा भाग ज्यामध्ये प्रोग्राम किंवा सूचना असतात त्यास काय म्हणतात?
उत्तर- सॉफ्टवेयर.
24) जेव्हा एका कम्प्युटरमध्ये दोन प्रोसेसर लावले जातात तेव्हा त्यास काय म्हणतात?
उत्तर- जेव्हा एक कम्प्युटरमध्ये दोन प्रोसेसर लावले जातात त्यास पॅरलल प्रोसेसिंग म्हणतात.
25) इंटरनेटवर वापरली जाणारी कम्प्युटर लँग्वेज कोणती?
उत्तर- जावा.
26) सर्वात वेगवान कोणत्या कम्युटरला मानले जाते?
उत्तर- सुपर कम्प्युटर.
27) डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू चे संशोधक तसेच प्रवर्तक कोण आहेत?
उत्तर- टिम बर्नर्स ली.
28) युआरएल (URL) http://www मध्ये http काय आहे?
उत्तर- युआरएलमध्ये एचटीटीपी एक प्रोटोकॉल आहे. त्याचा फुल फॉर्म आहे Hypertext Transfer Protocol.
29) ब्राउजर काय आहे?
उत्तर- ब्राउजर इंटरनेटवर वेबपेज सर्च करणारे एक सॉफ्टवेयर आहे. ते इंटरनेटवर उपलब्ध साहित्य जसे की ब्लॉग बेवसाइटवर उपलब्ध लेख, इमेज, व्हिडिओ आणि ऑडियो आणि गेम्स इत्यादी पाहणे आणि वापरण्यास मदत करते. काही खास पॉप्युलर ब्राउजर आहेत Google Chrome, Safari, Mozilla Firefox, Opera इत्यादी.
30) कम्प्युटर व्हायरस काय आहे?
उत्तर- कम्प्युटर व्हायरस एक सॉफ्टवेयर प्रोग्राम असतो जो खास करून कम्प्यूटर नष्ट करण्यासाठी बनवलेला असतो. VIRUS चे पूर्ण नाव Vital Information Resources Under Siege आहे. व्हायरस कम्प्युटरमध्ये छोटे-छोटे प्रोग्राम असतात जे auto execute program असतात. जे कम्प्युटरमध्ये प्रवेश करून कम्प्युटरची कार्यप्रणाली प्रभावित करतात.
31) ईमेलचा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर- इलेक्ट्रॉनिक मेल. Raymond Tomlinson यांना ईमेलचे जनक म्हटले जाते. ई-मेलद्वारे एका मेसेजला डिजिटल फॉर्ममध्ये एका व्यक्तीकडून दुसर्या किंवा जास्त व्यक्तींकडे पोहचवले जाते. हे इंटरनेट द्वारे संचालित होते.
32) ईमेलचे जनक कोण आहेत?
उत्तर- टॉमलिन्सन.
33) HTML चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर- Hyper Text Markup Language.
34) Httpsचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर- HyperText Transfer Protocol. एचटीटीपीएस प्रोटोकॉल OSI मॉडलच्या ट्रान्सपोर्ट लेयरवर काम करते. जी लेयर सिक्युरिटीसाठी ओळखली जाते.
35) जगातील पहिला सुपर कम्प्युटर कधी बनवला.
उत्तर- 1976.
36) E.D.P काय आहे?
उत्तर- इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग आहे.
37) LCD चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर- Liquid Crystal Display. ही एक flat panel display technology असते जी सामान्यपणे TVs आणि Computer monitors मध्ये वापरली जाते.
38) OCR चे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर- Optical Charater Recognition. ओसीआर एक अशी टेक्नॉलॉजी असते जिच्याद्वारे आपण वेगवेगळ्या Document like Image PDF File किंवा हाताने लिहिलेले डॉक्युमेंट इत्यादी प्रकार डाटामध्ये बदलते, ज्यास कम्प्युटर समजू शकतो.
39) सर्वप्रथम कम्प्युटर माऊस कुणी बनवला होता?
उत्तर- डग्लस एंजलबर्ट यांनी 1960 च्या दशकात बनवला.
40) सध्या सर्वात जास्त वापरला जाणारा इनपुट डिव्हाईस कोणता आहे?
उत्तर- किबोर्ड.
41) व्हर्च्युअल मेमरीचा आकार कशावर अवलंबून असतो?
उत्तर- डिस्क स्पेसवर अवलंबू असतो.
42) कम्प्युटरच्या संदर्भात एएलयूचे तात्पर्य काय आहे?
उत्तर- अर्थोमेटिक लॉजिक युनिट.
43) जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर कोणता?
उत्तर- जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर एनिएक (ENIAC) आहे. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इन्टीग्रेटर अँड कम्प्युटरचे संक्षिप्त रूप आहे.
44) आयबीएम काय आहे?
उत्तर- आयबीएम एक अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीची सुरूवात 1911 मध्ये कम्प्युटिंग-टॅबुलॅटिंग-रेकॉर्डिंग कंपनीच्या नावाने झाली होती. आयबीएमचा फुल फॉर्म International Business Machines Corporation आहे.
45) भारतीय सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे?
उत्तर- PARAM. तो C-DAC ने बनवला आहे.
46) जगातील पहिले गणक यंत्र कोणते आहे?
उत्तर- अबेकस.
47) Ctrl, shift आणि alt काय म्हणतात?
उत्तर- मॉडीफायर की म्हणतात.
48) बिट काय आहे?
उत्तर – बिट कम्प्युटर मेमरीचे सर्वात छोटे एकक आहे.
49) कम्प्युटर आकड्यातील त्रुटींना काय म्हणतात?
उत्तर – कम्प्युटर आकड्यातील त्रुटींना बग म्हणतात. जेव्हा डेव्हलपर एखादा कम्प्युटर प्रोग्राम बनवतो, तेव्हा त्यामध्ये काही त्रुटी राहतात. यास टेक्निकल भाषेत सॉफ्टवेयर बग म्हणतात.
50) मायक्रोप्रोसेसरचा शोध कुणी लावला?
उत्तर – मायक्रोप्रोसेसरचा शोध इंटेलने लावला होता. जगात प्रामुख्याने दोन मायक्रोप्रोसेसर उत्पादक कंपन्या आहेत – इंटेल आणि ए.एम.डी.
*ब्लॉग (Blog) मधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशीत केली गेली आहे.*
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVp
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा