( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
*ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठे बदल, जाणून घ्या नेमकं कसं असणार?*
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएममधून कॅश (ATM cash withdrawal) काढण्यासाठी काही नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे. ग्राहकांच्या खिशावरही याचा परिणाम होणार आहे. बँक ग्राहक फ्री ट्रान्झेक्शन मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा करत असेल, तर 1 जानेवारी 2022 पासून 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति ट्रान्झेक्शन शुल्क भरावं लागेल. बँकांच्या एटीएममधून ठरलेल्या फ्री मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यासाठी पुढील वर्षापासून अधिक शुल्क भरावं लागेल.
भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकांना पुढील वर्षापासून ATM द्वारे फ्री मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी शुल्क वाढवण्यास परवानगी दिली आहे. 1 जानेवारी 2022 पासून बँक ग्राहकांनी फ्रीमध्ये पैसे काढण्याच्या किंवा इतर सुविधांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यास त्यांना प्रति ट्रान्झेक्शनसाठी 21 रुपये द्यावे लागतील. जे सध्या 20 रुपये आहे. ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा फ्री ट्रान्झेक्शन करू शकतात. ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधूनही पैसे काढण्यास फ्री ट्रान्झेक्शनसाठी पात्र आहे.
*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे 7900094419*
RBI ने आणखी एक घोषणा केली आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 15 रुपयांवरुन 17 रुपये आणि सर्व केंद्रांवर गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरुन 6 रुपये इंटरचेंज शुल्क वाढवण्याची परवानगी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अशा फसवणूकीपासून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटरवर आपल्या लाखो ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार SBI ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
"आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणूक करणार्यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत. तुमचा कोणताही संवेदनशील डेटा ऑनलाईन शेअर करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करुन अॅप डाउनलोड करू नका, अशी सूचना केली आहे." एसबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही ग्राहकाने त्याची वैयक्तिक माहिती जसं की जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी यासारखी माहिती कोणसोबत शेअर करू नका. एसबीआय, आरबीआय, शासकीय कार्यालय, पोलीस, केवायसी प्राधिकरण अशा विविध नावाने फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. एसबीआय किंवा त्याचे कोणतेही प्रतिनिधी तुम्हाला कधीही ईमेल, एसएमएस पाठवत नाही.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा