हा ब्लॉग शोधा

बुधवार, २३ जून, २०२१

उद्योग कर्ज योजना ९० टक्के कर्ज मिळणार | असा करा ऑनलाईन अर्ज.

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 



उद्योग कर्ज योजना ९० टक्के कर्ज मिळणार | असा करा ऑनलाईन अर्ज.

जाणून घेवूयात उद्योग कर्ज योजना संदर्भात. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य शासनाला १५ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. 

ज्या व्यक्ती शेळी पालन किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या व्यवसायाबरोबर दुध आणि प्रक्रिया उद्योग, सलग्न पशुखाद्य, मास निर्मिती, मुरघास उद्योग देखील सुरु करावा असा या योजनेचा उद्देश आहे. ९० टक्के कर्ज आणि 3 टक्के व्याज सवलतीची योजना नुकतीच पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे उद्योग कर्ज योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. कारण अर्ज स्वीकारणं देखील सुरु झालंय.

 *शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.   

बेरोजगार तरुणांसाठी उद्योग कर्ज योजना लाभदायी:

शेतकरी बंधुंनो,पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास या नवीन योजनेस केंद्र शासनाने २०२०-२१ मध्ये मान्यता दिली होती.

परंतु या योजनेसाठी लागणारा जो निधी आहे १५ हजार कोटी तो निधी या वर्षी म्हणजेच २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाला देण्यात आलेला आहे.

  • *रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

    तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

    आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

    आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 


पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास या योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया उद्योग, (जसे कि आईसक्रिम, चीजनिर्मिती, दुध पाश्च्यरायझेशन, दुध पावडर) मास निर्मिती व प्रक्रिया, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, पशुखाद्य, मूरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचपरमेण व्याज दारामध्ये 3 टक्के सूट देण्यात येणार आहे.


उद्योग कर्ज योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि पात्र व्यक्ती:

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेसाठी अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. या साकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक कंपनी, खाजगी संस्थाहे सर्व या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ऑनलाईन अर्ज नमुना खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा. 

https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Online-Application.pdf)

कोणती कागदपत्रं आवश्यक ,खालील लिंक वर क्लिक करा आणि वाचा.

https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Documents-Require.pdf )

ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर अर्ज वाचून घ्या:

मित्रांनो पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेसाठी ऑनलाईन करण्या अगोदर या अर्जामध्ये तुम्हाला कोणकोणती माहिती भरायची आहे त्या संदर्भातील ऑनलाईन अर्ज नमूना pdf मध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. हि pdf फाईल तुम्ही Department of animal husbandry and dairying 

 *वेबसाईटवरून देखील डाउनलोड करू शकता. त्या वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा*

https://ahidf.udyamimitra.in/

योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत:

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते जाणून घ्या.

* तपशील प्रकल्प अहवाल (डीपीआर) *

 * मालकी दस्तऐवज *

 * प्रस्तावित युनिटसाठी नवीनतम प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती / मान्यता

 * अर्जदार / प्रवर्तक संबंधित कागदपत्रे:

 * अर्जदाराचे पॅनकार्ड 

 * उद्योग आधार मेमोरँडम (यूएएम) / उद्यमी नोंदणी क्रमांक (यूआरएन)  (एमएसएमईच्या बाबतीत)

 * कंपनीचे प्रमाणपत्र * (कंपनीच्या बाबतीत)

 * अर्जदाराचा पत्ता पुरावा *

 * मागील तीन वर्षांत ऑडिट केलेल्या वार्षिक वित्तीय स्टेटमेन्ट्स (लेखा परीक्षकांचा अहवाल / संचालकांचा अहवाल / वेळापत्रक / खात्यांमधील नोट्स) * अर्जदाराचे (विद्यमान घटकांसाठी)

 * अर्जदाराचे मागील तीन वर्षांचे आयकर विवरण (विद्यमान संस्थांसाठी)

 * मागील सहा महिन्यांपासून बँक स्टेटमेंट

 * मुख्य प्रमोटरची पॅन / आधार कार्ड *

 * मुख्य प्रमोटरचा सीव्ही

 * मुख्य प्रवर्तकांचे छायाचित्र *

 * शैक्षणिक प्रमाणपत्र

  * प्रशिक्षण प्रमाणपत्रे

असा करा ऑनलाईन अर्ज:

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकला टच करा किंवा तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप करा

 https://ahidf.udyamimitra.in/

Animal husbandry and dairying ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर दिसत असलेल्या Apply for Loan असे निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

तुमचा मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीत टाका I am not robot या समोरील चौकटीत टिक करा. Requist otp क्लिक करा.

मोबाईलवर आलेला OTP चौकटीमध्ये टाका आणि Verify OTP या बटनावर क्लिक करा.

जसे हि Verify OTP या बटनावर क्लिक कराल त्यानंतर एक अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल तो अर्ज अगदी व्यवस्थित भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.

या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा ( योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते या लेखाच्या सुरुवातीला दिलेली आहेत)

Submit your application to your preferred lender या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हवी असलेली बँक निवडा

बँकेचे नाव व बँकेचा ब्रँच कोड टाका

टर्म आणि कंडीशन या पर्यायाला टिक करा आणि अर्ज सबमिट म्हणजेच सादर करा.

अर्ज सादर केल्यानंतर एक Application Number मिळेल तो पुढील कार्यवाहीसाठी जतन करून ठेवा.

View Application या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या सादर केलेल्या अर्जाचे स्टेट्स सुद्धा तपासू शकता.

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा. 

https://ahidf.udyamimitra.in/Login )

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...