हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३ जून, २०२१

*MPSC उमेदवारांनो लक्ष द्या! वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



*MPSC उमेदवारांनो लक्ष द्या! वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट*

तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का!, किंवा परीक्षेच्या तयारीला लागणार आहात का! आणि तुम्ही एमपीएससीच्या संकेतस्थळावर तुमचे 'प्रोफाईल' यापुर्वी केले आहे का! अहो, मग आता तुम्हाला संकेतस्थळावरील तुमचे प्रोफाईल अद्यायावत करावे लागणार आहे. अद्यायावत करण्याची सुविधा शुक्रवारी (ता.२८) सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी संबंधित विभागांच्या मागणीनुसार आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी उमेदवारांकडून येणाऱ्या अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था आयोगाने २०१०मध्ये कार्यन्वित केली.प्रणालीच्या विकसन, सुधारणा आणि देखाभालीच्या कामासाठी मेसर्स महाऑनलाइन लिमिटेड या सेवा पुरवठादार संस्थेची २०१३मध्ये नियुक्ती केली होती. आता या कामासाठी अन्य संस्थेची नियुक्ती केली आहे.

नव्याने विकसित केलेल्या प्रणालीत अद्यायावत तंत्रज्ञानाच्या आधारे उमेदवारांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ही नवी प्रणाली कार्यन्वित करताना उमेदवारांनी यापुर्वीच्या प्रणालीतील त्यांच्या प्रोफाइलमधील माहिती आणि त्यांच्या खात्याचे पासवर्ड अद्यायावत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील प्रोफाईल उमेदवारांना वापरता येणार नाही, असे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान सहसचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. प्रोफाईल अद्यायावत करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. परंतु एखाद्या भरतीच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पासवर्ड रिसेट करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

आयोगाच्या संकेतस्थळावर असे करा प्रोफाइल अद्यायावत :

- आयोगाच्या'https://mpsconline.gov.in' या संकेतस्थळावर 'नोंदणी' वर जाऊन 'फरगॉट/रिसेट पासवर्ड' बटणवर .

- यूजर नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. निवडलेल्या पर्यायानुसार आयोगाच्या नोंदणीकृत वैध युजन नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करावा.

- तुम्ही दिलेल्या वैध युजन नेम, ई-मेल किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

- मिळालेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.

- त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी आयोगाकडे नोंदणीकृत असलेली जन्मदिनांक टाका आणि सबमिट करा.

- सबमिट बटणावर क्लिक केल्यावर पासवर्ड रिसेट करा अशी स्क्रिन दिसेल. याद्वारे आपल्या पसंतीचा नवीन पासवर्ड तयार करावा.

- पासवर्ड रिसेट झाल्यावर नवीन ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे नोंदणीकृती ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तसेच नवीन पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल.

तांत्रिक अडचण आल्यास येथे करा संपर्क

आयोगाच्या नव्या प्रणालीवर प्रोफाईल अद्यायावत करताना तांत्रिक अडचण आल्यास '१८००२६७३८८९' किंवा '१८००१२३४२७५' टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा.

- तसेच 'support-online@mpsc.gov.in' ई-मेलवर संपर्क करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...