( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
*शिक्षणाचा अधिकार कायदा' ( RTE ) अंतर्गत मोफत शाळा प्रवेशास सुरुवात*
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९' मधील कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली आहे.
त्यानुसार सन २०२१-२२ या वर्षाकरीता दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी 'लॉटरी' काढण्यात आली.
'लॉटरी' द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ११ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांची 'लॉटरी' द्वारे निवड झाली असेल, त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश ३० जून २०२१ पूर्वी निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.
आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे का? तसे नसेल तर पॅनला तातडीने आधार कार्डशी लिंक करा कारण आता तारीख वाढविण्यात येणार नाही आणि तुम्हाला दंड भरावा लागेल. हे लक्षात घेता आता बँक आपल्या ग्राहकांना सतर्कतेचा मेसेज पाठवत आहे जेणेकरुन ग्राहक 30 जूनपूर्वी पॅनबरोबर आधार लिंक करू शकतील. वास्तविक, आयकर विभागाने पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख म्हणून 30 जून 2021 निश्चित केले आहे. 30 जूनपर्यंत आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यासाठी संपर्क करा ...संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
4) पालकांनी प्रवेशाकरीता घेऊन जाण्याची कागदपत्रेः
- प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
- 'आर. टी. ई.' पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर 'click' करुन 'हमीपत्र' आणि 'ऍलोटमेंट लेटर' (Allotment Letter) ची प्रिन्ट काढून शाळेत घेऊन जावे.
5) फक्त निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांनीच 'Allotment Letter' ची प्रिन्ट काढावी.
6) निवड यादीतील बालकांच्या पालकांना 'लॉकडाऊन' मुळे / बाहेरगांवी असल्याने / किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि 'whatsapp / email' किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करुन आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
7) विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधीत पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
8) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे, त्याच पत्त्यावर 'Google location' मध्ये 'red' बलून दर्शविणे आवश्यक आहे. 'Location' आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
9) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरुन (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
10) निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादी (Waiting List) मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर सूचना 'आर. टी. ई.' पोर्टलवर दिल्या जातील.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा