( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६
बालकामगार म्हणजे काय ? ज्या कामगाराचे वय १४ वर्षाच्या आत असते अशा बालकास बालकामगार असे म्हटले जाते. सुधारित कायद्यानुसार नाजुक आणि शरीरास धोका असणारा व्यवसाय किंवा कारखान्यात १८ वर्षाखालील काम करणाऱ्या कामगारांनाही बाल कामगार कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे.
बालकामगार प्रतिबंध कायदा १९८६
१४ वर्षांच्या आतील बालकांना हा कायदा लागू आहे .
कुटुंबातील लहान मुला-मुलींना घरातील ,शेतातील , वीट भट्टीवर माती कालवणे ,कारखान्यांवर मोळी वाहने ,पाणी भरणे ,स्वयंपाक करणे अशी कामे लावणे आणि त्यांना शिक्षनाप्सून वंचित ठेवणे हा बाल कामगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा आहे .१४ वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे अगर त्यांचेकडून घरातील आणि शेतातील कठीण कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे .अशा सर्व प्रकारच्या कामना हा कायदा लागू आहे .
वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे . विशेषतः, १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो. दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या, किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. मात्र, या अधिनियमाच्या कक्षेमधून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे. नियमभंग करणा-याना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत रु.१०,००० ते रु.२०,०००/- दंड होऊ शकतो. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी "राष्ट्रीय बालकामगार योजना" राबवण्यात आलेली आहे.
बालकामगार मुक्ती अभियान
चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल, कपडे यांसारख्या वस्तूंची दुकाने आदी ठिकाणी आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करावयास लावणे ही खरे तर अत्यंत अनिष्ठ प्रथा आहे. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच पण शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात.
बालकामगाराची प्रथा हा समाजाला लागलेला कलंक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. हा कलंक दूर करुन बालकामगारांचे शिक्षण करणे ही सामाजिक गरज बनली आहे. गरीबीमुळे शाळा न शिकणारी मुले, मुली कामधंदा करुन अर्थार्जन करतात. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग, व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारिरीक व मानसिक वाढ होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.
बालकामगार निर्माण होण्यास आईवडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आदी पारंपारीक व्यवसाय करतात.
गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा/भंगार वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. काही मुले कारखान्यात काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सामान्यत: बालकामगार मुली या नाईलाजास्तव काम करतात.
शिक्षणासाठी येणारा खर्च पालकांना परवडणारा नसतो. जो थोडा बहुत पैसा मिळतो तो घरखर्चावर तसेच व्यसनावर खर्च होतो. अनेक मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निरनिराळ्या वस्तू पुनप्रक्रियेसाठी गोळा करतात. सतत घाणीत काम करुन त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. रोजगाराच्या समस्येमुळे सेवाक्षेत्रासह कारखानदारीतही बालकामगार आढळतात.
कारखान्याचे मालक व पालकांची बेपर्वाई यामुळे अजूनही विडी उद्योग व वस्त्रोद्योगामध्ये बालकामगार काम करीत आहेत. हॉटेल, बूटपॉलिश, गाडया पुसणे इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले आजही आढळतात. आपण विविध कामानिमित्त बाहेर जात असतो, अशा बऱ्याच ठिकाणी बालकामगार सर्रास काम करीत असल्याचे निदर्शनास येते. राहण्याची अपुरी जागा, मोठे कुटुंब, व्यसनी पालक या समस्येमुळे मुले धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करतात.
समाजामध्ये बालमजूर हा अत्यंत उपेक्षित घटक आहे. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे त्या वयात या मुलामुलींना धोकादायक उद्योगात ढकलले जाते. गरीबी, निरक्षरता, अंधश्रध्दा इत्यादी कारणे आहेत. पण यामुळे लाखो मुलांचे जीवन कोमेजून जात आहे. ज्या उद्योग, व्यवसायामध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करुन त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.
बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे. त्यांची पिळवणूक थांबली पाहिजे. त्यांचे हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. केवळ चरितार्थ चालत नाही म्हणून बालवयात कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
बालकामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगार विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे. त्यांना शासनाकडून शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्न भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांनी एका ठिकाणी बसावे, अंकांची, अक्षरांची ओळख व्हावी यासाठी आनंददायी वातावरण निर्मिती विशेष शाळेतील कर्मचारी करतात. मुलांच्या कलाने शिकवितात. गाणी, गोष्टी, देशभक्तीपर गीते, परिसरातील माहिती दिली जाते. विविध सण व दिनविशेष शाळेत साजरे केले जातात. त्यांचे हरविलेले बालपण मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांना या विशेष शाळेत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शासनामार्फत बालकामगारांचेसर्वेक्षण करण्यात येते. बालकामगार शिक्षणापासून वंचित असतात. त्यांच्या घरी व परिसरामध्ये शिक्षणाचे, स्वच्छतेचे वातावरण नसते. त्यामुळे त्यांच्यावर याबाबतीतील संस्कार करुन, शिकण्याची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहे. उज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तरच भारत देश महासत्ता बनू शकतो.
बालमजूरीची कारणे
युनिसेफ (UNICEF) च्या मते, मुलांचे शोषण करणे सोपे असते म्हणून त्यांना कामावर ठेवण्यात येते. लहान मुले त्यांच्या वयाला अयोग्य अशा ठिकाणी व अशा प्रकारची कामे का करत असतात यासाठी सामान्यतः त्यांची गरीबी हे पहिले कारण दिले जाते. परंतु यामागे लोकसंख्येचा भडका, स्वस्त मजूर, उपलब्ध असणार्या कायद्यांची अंमलबजावणी न होणे, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणे (पालक अनेकदा मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी कामावर पाठवितात जेणेकरून कुटुंबाचे उत्पन्न वाढेल) व ग्रामीण क्षेत्रांतील प्रचंड गरीबी अशी इतर ही कारणे आहेत. आणि जेथे बाल श्रम हेच कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन असेल तेथे कोण काय करू शकते?
ऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण
आपली तक्रारी / समस्या नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा. https://mahakamgar.maharashtra.gov.in
कृपया आपण नोंदविलेल्या तक्रारी / समस्याचा क्रमांक पाठविण्याकरिता आपला मोबाईल नंबर / ई-मेल आयडी द्यावा.
नोंद : तक्रारी / समस्यादेना-यांनी आपला नोंदणी क्रमांक, नाव, संपर्क क्रमांक भरावा. सूचना / अभिप्रायांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत होईल.
तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्या
क्लिक करा https://mahakamgar.maharashtra.gov.in
आपल्या तक्रारीची तक्रारी / समस्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला तक्रारी / समस्या क्रमांक येथे भर व त्याची सद्यस्थिती जाणून घ्या.
तक्रारी प्रक्रिया
सर्व तक्रारी / समस्या नेमून दिलेले मुख्य विभागाचे अधिकारी पाहतील.
त्या नंतर विभाग प्रमुख आपल्या अधिका-यांशी चर्चा करतील.
तक्रारी / समस्या योग्य आसेल तर त्याचा विचार केला जाईल.
जर ई-मेल / पत्र व्यवारासाठी पत्ता / संपर्क क्र. दिला आसेल तर, ज्या व्यक्तीने तक्रारी / समस्या दिली आहे त्यांना प्रतिउत्तर दिले जाईल.
बाल कामगारांना मदत
बालकामगार विषयक तक्रारींकरिता येथे संपर्क साधावा
दूरध्वनी : 022 - 26572929
ई-मेल : childlabourcellmaharashtra@yahoo.com
बालकामगारांकरिता "प्रथम" हेल्पलाईन.
दूरध्वनी : 022 - 65134884
भ्रमणध्वनी : 09869467157
ई-मेल : kishorbhamre1@rediffmail.com
पोलीस स्थानक
आपण नजीकच्या कोणत्याही पोलीस स्थानकावर बालकामगार विषयक तक्रारी नोंदवू शकता भारतातील सर्व पोलीस स्थानकांचा तपशील पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
वेबसाइट : येथे क्लिक करा. www.karmayog.org
राज्याचे कामगार आयुक्त
महाराष्ट्र राज्य शासनाचा कामगार विभाग
वेबसाइट : येथे क्लिक करा. www.childlabourcellmaharashtra.com
मुंबई व उर्वरित महाराष्ट्राकरिता "रेस्क्यू" हेल्पलाईन
वेबसाइट : येथे क्लिक करा.
ई-मेल : childlabourcellmaharashtra@yahoo.com
संकटग्रस्त मुलांकरिता देशातील ७२ शहरांमध्ये दूरध्वनी क्रमांक १०९८ ही सेवा दिवसातील २४ तास विनामुल्य उपलब्ध आहे.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा