वाचाल तर... वाचाल !!!

जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत
टेक्नॉलॉजी रोज बदलत असते. चार ते पाच महिन्यानंतर गॅजेट्सचा नवीन व्हर्जन बाजारात येतो. कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह नवीन फोन सतत लाँच करत असतात. अश्यावेळी आपण ट्रेंड पाहून नवीन गॅजेट्स विकत घेतो. त्यामुळे जुने फोन्स, गॅजेट्स तसेच पडून राहतात किंवा आपण घाई घाईत ते कमी किंमतीत विकून टाकतो. आज आम्ही तुम्हाला अश्या काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या जुन्या गॅजेट्सची चांगली किंमत देतील. म्हणजे तुमचा फोन रिसायकल देखील होईल आणि तुमची कमाई देखील होईल. या वेबसाईट्सवर फोन्स, टीव्ही, लॅपटॉप आणि इतर अनेक गॅजेट्स देखील विकता येतील. काही वेबसाइट्सवर तुम्ही जुन्या गॅजेट्सची खरेदी पण करू शकता.
जुना फोन विकण्याआधी किंवा Exchange करण्यापूर्वी ही महत्त्वाची 3 कामं कराच; अन्यथा येईल मोठी समस्या
अनेक जण नवा फोन (Smartphone) खरेदी करताना, आधीचा जुना फोन विकतात किंवा एखाद्याला वापरायला देतात. पण जुना फोन विकताना (Selling Phone) किंवा दुसऱ्याला वापरायला देताना किंवा Exchange करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. बँकेसंबंधी माहिती, प्रायव्हेट फोटो, पासवर्ड, सोशल मीडिया अकाउंट अशा अनेक गोष्टी सेव्ह असतात. त्यामुळे जुना फोन विकताना काळजी घेणं गरजेचं आहे.
Factory Reset -जुन्या फोनमध्ये तो विकण्यापूर्वी किंवा दुसऱ्याला देण्याआधी Factory Reset करणं अतिशय आवश्यक आहे.
डेटा बॅकअप -
स्मार्टफोन विकण्यापूर्वी Data Backup घेणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या फोनमधील डेटा लीक होण्याची तसंच डिलीट होण्याची भीती राहणार नाही. यासाठी सेटिंगमध्ये बॅकअप ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा डेटा आपोआप Google Drive वर सेव्ह होईल.
Google ID -
फोन विकण्याआधी Google ID डिलीट करणं गरजेचं आहे. यामुळे खासगी माहिती, पासवर्ड्स लीक होणार नाहीत. यासाठी सेटिंगमध्ये User and Accounts ऑप्शनमध्ये जावं लागेल. इथे Remove पर्यायावर क्लिक केल्यानंतर अकाउंट डिलीट होईल. नेहमी सोशल मीडियाचा वापर होत असल्याने अनेकदा आपल्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड सेव्ह असतात. Facebook, Instagram, Gmail सारखे अकाउंट्स फोनमध्ये ओपन असल्याने ते फोनमधून डिलीट करणं गरजेचं आहे. तसंच फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर्सचाही बॅकअप घेणं गरजेचं आहे.
या वेबसाइटवर तुम्ही फोन विकण्यासोबतच रिसायकल आणि रिपेअर पण करू शकता. इथे स्मार्टवॉच, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप, गेमिंग कन्सोल, डीएसएलआर एवढंच काय तर इयरबड्स विकण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. www.cashify.in या वेबसाइट्सवर वर जाऊन योग्य तो पर्याय निवडा.
बुडली (budli)
www.budli.in हि अजून एक वेबसाईट आहे जी जुने फोन विकत घेते. जर तुमचा मॉडेल तर तुम्हाला त्वरित त्याची किंमत सांगितली जाते. तुम्हाला ती किंमत मान्य असेल तर तुमचा डिवाइस तुमच्या दारात येऊन ताब्यात घेतला जातो आणि चौवीस तासांच्या आत तुमच्या बँक अकॉउंटमध्ये पैसे पाठवले जातात.
इन्स्टाकॅश (getinstacash)
www.getinstacash.in वर तुम्ही तुमचा कोणताही जुना गॅजेट सहज विकू शकता आणि चांगली किंमत मिळवू शकता. इथे तुम्ही बुकिंग केल्यावर कंपनीचा कर्मचारी स्वतःहून तुमच्या घरात येऊन फोन घेऊन जाईल आणि किंमत देईल.
यांत्रा (yaantra)
www.yaantra.com हि अजून एक वेबसाईट आहे जी तुमच्या जुन्या गॅजेट्सना चांगली किंमत मिळवून देते. कंपनी दावा करते कि या वेबसाइटवर फक्त 60 सेकंदात जुना फोन विकत घेतला जातो.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा