( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
पुढील काही महीन्यात टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं? तुम्हाला लवकरच याबद्दल अपडेट मिळेलल....
क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. लॉकडाऊनमध्ये झालेली पगार कपात किंवा कमी उत्पन्न यामुळे त्यांना ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल इत्यादी वेळेवर भरता आलेले नाही. यामुळे काही बँका ग्राहकांवर वेगवेगळ्या कारवाई करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहे, यात क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्याच्या नावाखाली ग्राहकांसोबत गैरवर्तवणूक केली जात आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास वसुलीच्या नावाखाली एजंट कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतात किंवा तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल मर्यादेच्या आत भरण्यास सांगितले जाऊ शकते? याबाबतचे ग्राहकांचे नेमके अधिकार काय असतात, तसेच जर तुम्ही बिल भरण्यास सक्षम नसाल तर तुम्ही काय करु शकता, याची माहिती असणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत नसाल तर काय?
जर ग्राहक वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर बँक त्यांच्यावर बर्याच प्रकारे कारवाई करू शकते. तसेच बँक कायदेशीररित्या ग्राहकांविरूद्ध तक्रार दाखल करु शकते. त्यामुळे तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. जर एखादा ग्राहक क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर त्याला सर्वप्रथम डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर त्याचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले जाते.या नंतरही जर त्याने बिल भरले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येऊन बिलाची वसूली करतो. यामुळे तुमच्या सिबिल स्कोर वर परिणाम होतो.
ग्राहकांचे अधिकार काय?
💠जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल बाकी असल्यात तुम्ही सर्वप्रथम त्याची कमीत कमी रक्कम देऊ शकता. दर तुम्ही ते करण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही ग्राहक सेवा अधिकाऱ्याची मदत घ्या. यानंतर तुम्हाला काही पर्याय आणि वेळ मिळू शकतो. ज्याद्वारे तुम्ही सहज क्रेडिट कार्डचे बिल भरु शकता.
💠जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सक्षम नसाल, तर कोणताही बँक कर्मचारी तुम्हाला धमकी देऊ शकत नाही. तसेच तुमचे शारीरिक नुकसान करू शकत नाही. त्याशिवाय तुमच्यासोबत सामाजिक आणि सार्वजनिकरित्या गैरवर्तन करू शकत नाही.
💠कित्येदा क्रेडिट कार्डच्या बिलाच्या वसूलीसाठी काही तृतीयपंथीय लोकांना पाठवले जाते. मात्र ते देखील तुम्हाला केवळ कर्ज परत करण्याबाबतच सांगू शकतात. तसेच, हे लोक फक्त दिवसा तुमच्याकडे येऊ शकतात. रात्रीच्यावेळी तुमच्याकडे कोणीही व्यक्ती येत नाही. त्यांना त्यांच्या काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत.
💠जर तुम्ही क्रेडिट कार्डचा हप्ता भरण्यास सक्षम नसाल, तर प्रथम आपल्याला बँकेकडून काही नोटीसा दिल्या जातात. तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. तसेच रिकव्हरी एजंटही तुम्हाला काही दिवसांचा कालावधी देतो.
💠यानंतरही तुम्ही बिल न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. ज्यात तुमची संपत्ती गहाण ठेवणे, त्याचा लिलाव केला जातो. ज्याद्वारे बँक त्यांची थकबाकी वसूल करते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत करते.
क्रेडिट कार्डातील पैसे वापरण्याची लिमिट कशी वाढवाल? जाणून घ्या सर्व काही
नोकरी करणाऱ्या अनेकांकडे हमखास क्रेडीट कार्ड पाहायला मिळतात. मात्र बरेच जण त्यांच्या क्रेडीट कार्डच्या लिमिटवर नाखूष असतात. आपल्या क्रेडीट कार्डची मर्यादा जास्त असावी, असे अनेकांवा वाटत असते. या मर्यादेद्वारे संबंधित व्यक्तीला विविध सेवांसाठी पैसे उधार घेता येतात. याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड रिवार्ड, कॅशबेक, व्याजमुक्त वेळेवर लोन मिळते असे अनेक फायदे आहेत.
*Star Health Insurance*
मित्रानों आजार आणि अपघात कधी सांगून येत नाही ! आजकालचा माणूस आजारापेक्षा हॉस्पिटलच्या खर्चाला जास्त घाबरत आहे.
1) कोविडमुळे हॉस्पिटलच्या खर्चाची चिंता ?
2) इनकम टॅक्स मध्ये सूट हवी ?
3) माझा विमा आहे पण संपूर्ण कुटुंबाचा नाही, आता ?
4) अपघात परिस्थितीमध्ये पैसे कुठून येणार ?
प्रश्न अनेक पण उत्तर मात्र एक *"Medical Health Insurance"*
आपल्या परिवाराच्या आर्थिक व आरोग्य सुरक्षासाठी Star Health पॉलिसी साठी आजच मला संपर्क करा...🙏🏻
*आपला मित्र .. Star Health Insurance प्रतिनिधी...*
*श्री.सुनील आवारे , मुंबई*
*मो.नं. 73036 81406*
क्रेडिट कार्डावर मर्यादा असणे याचा अर्थ म्हणजे तुम्ही बँकेकडून निश्चित करण्यात आलेली ठराविक रक्कम खर्च करता येते. ही रक्कम तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकता. जर तुमच्याही क्रेडीट कार्य कमी असेल तर ती कशी वाढवता येऊ शकते, याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो? याचीही माहिती सांगणार आहे.तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो?
क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड म्हणजे एखाद्या ठराविक बँक किंवा वित्तीय संस्था जारी करण्यात आलेले प्लास्टिक किंवा मेटलचे कार्ड. या कार्डद्वारे तुम्हाला Pre-Approve लिमिटमधून काही ठराविक रक्कम उधार घेण्याची सुविधा दिली जाते. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ती बँकेला परत करावी लागते.
क्रेडीट कार्डची मर्यादा कशी निश्चित होते?
क्रेडीट कार्डचे लिमिट ही आपल्या बँकेवर आधारित असते. तसेच तुमच्या व्यवहाराच्या इतिहासाच्या आधारावर कार्डचे लिमिट अवलंबून आहे. बँकने जारी केलेल्या वेगळे-वेगळे कार्डवर लिमिट वेगळ्या असतात. यासाठी कोणतेही निश्चित मानक ठरवण्यात आलेले नाही. प्रत्येक बँक ही बर्याच गोष्टी लक्षात ठेवून क्रेडिट कार्डची मर्यादा ठरवते. कोणतीही बँक ही क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित करताना खर्च, मासिक कमाई आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची माहिती गोळा करते. यासाठी बँक स्टेटमेंट, पगाराची स्लिप, टॅक्सची कागदपत्रे आणि क्रेडीट अहवाल तपासला जातो. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर बँकेचा अधिकारी दर महिन्याची मिळकत ही 2 किंवा 3 ने गुणाकार करतो.
या प्रक्रियेमध्ये, बँक निश्चित खर्च वजा करते. त्यानंतर बँक आपल्या कर्जाची उत्पन्नाच्या प्रमाणाचा आलेख काढते. यांसह इतर काही गोष्टींचा अभ्यास केल्यानतंर तुमच्या क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित केली जाते.
इतर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही घरबसल्या बनवू शकता. आणि या करता तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. *संपर्क करा .. सृष्टी महा ई सुविधा *संतोष विठ्ठल साळवे..7900094419* https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf
क्रेडीट कार्डची मर्यादा कशी वाढवाल?
इतर लोकांप्रमाणे जर तुम्हीही तुमच्या क्रेडीट कार्डच्या मर्यादेवर खूश नसाल तर आपण ते वाढवू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडी प्रतिक्षा करावी लागेल. तुमच्या बँकेच्या अकाऊंटचा अभ्यास केल्यानतंर ही मर्यादा वाढवली जाते. जर तुम्ही नियमितपणे तुमचे क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि त्याचे बिल वेळेवर भरत असाल, तर काही बँक आपोआपच तुमच्या कार्डची क्रेडिट मर्यादा वाढवते.
या व्यतिरिक्त जो ग्राहक क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरतो त्याचा क्रेडीट स्कोर चांगला असतो. त्यामुळे बँक त्याच्या कार्डची मर्यादा वाढवते. अनेकदा बँक आपल्याला मर्यादा वाढवण्याची ऑफर देते. पण तुम्ही स्वत: त्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही नेटबँकिंगद्वारे किंवा बँक शाखेत भेट देऊन याबाबतची प्रक्रिया करु शकता. यानंतर, जर बँकेला योग्य वाटत असेल, तर बँक स्वत:हून क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवते.

आपण बँकेत खाते असल्यास नवीन डेबिट कार्ड घेत असल्यास आपण ग्रीन पिनबद्दल ऐकलेच असेल. मात्र ग्रीन पिन म्हणजे काय?
आपण बँकेत खाते उघडत असल्यास किंवा नवीन डेबिट कार्ड घेत असल्यास आपण ग्रीन पिनबद्दल ऐकलेच असेल. मात्र ग्रीन पिन म्हणजे काय याबाबत अद्याप अनेकांना माहित नाही. हा शब्द आता आपल्यासाठी नवीन असेल तर आपल्याला याबाबच माहित असणे आवश्यक आहे. कारण माहिती नसेल तर आपण आपल्या डेबिट कार्डवर कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. ज्यांनी नवीन डेबिट कार्ड बनविले आहे त्यांच्यासाठी प्रत्येक डेबिट कार्ड धारकाला हा पिन जनरेट करणे आवश्यक आहे.
ग्रीन पिन म्हणजे काय?
वास्तविक, ग्रीन पिन नावाने गोंधळ होण्याची आवश्यकता नाही. हा तुमच्या डेबिट कार्डचा पिन आहे, ज्याद्वारे आपण व्यवहार करता. तथापि, आजकाल याला ग्रीन पिन असेही नाव दिले जात आहे आणि डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याऐवजी ग्रीन पिन तयार करण्यास सांगितले जाते. पण प्रश्न असा आहे की जेव्हा तो डेबिट कार्ड पिन असतो तेव्हा त्याला ग्रीन पिन का म्हणतात आणि त्यामागील कारण काय आहे?
खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419
का म्हटले जाते ग्रीन पिन?
पूर्वी तुम्ही डेबिट कार्ड घेतल्यानंतर आधी डेबिट कार्ड तुमच्या घरी यायचे आणि त्यानंतर डेबिट कार्डचा पिनदेखील कार्डसोबत यायचा. तथापि, ही प्रक्रिया बंद झाली. आता डेबिट कार्ड आल्यानंतर आपण आपल्या डेबिट कार्डचा पिन टोल फ्री नंबरद्वारे किंवा एटीएमद्वारे ओटीपीद्वारे जनरेट करता. या संपूर्ण यंत्रणेत घरी पिन मिळण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. यामुळे वेळेसोबतच कागदाचीही बचत होत आहे. कागदाची बचत झाल्यामुळे त्याला ग्रीन पिन म्हटले जात आहे, कारण त्यात कुरिअर, कागद इत्यादींचा वापर केला जात नाही आणि डेबिट कार्डधारक काही मिनिटांतच कार्डचा पिन तयार करतात.
का आवश्यक आहे?
आपण डेबिट कार्ड घेतले असेल आणि त्याचा पिन जनरेट केला नसेल तर आपण कोणताही व्यवहार करु शकणार नाही. जोपर्यंत पिन जनरेट होत नाही, तोपर्यंत तुमचे कार्ड एटीएममध्ये अवैध दर्शविले जाईल, अशा परिस्थितीत कार्ड वापरणे आवश्यक आहे.
कसा जनरेट करायचा पिन?
आपण बँकांच्या टोल-फ्री आयव्हीआर प्रणालीद्वारे आपल्या डेबिट कार्डची ग्रीन पिन तयार करू शकता किंवा एटीएमला भेट देऊन ओटीपीद्वारे देखील तयार केले जाऊ शकते.
डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड वेगळे आहेत का?
एटीएम कार्डचे मुख्य कार्य म्हणजे फक्त एटीएम कार्डमधून पैसे काढणे. यात आपण एटीएम पिनद्वारे एटीएम कार्डमध्ये कार्ड घाला आणि पैसे काढून घ्या. हा आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला असतो. आपण यातून केवळ पैसेच काढू शकत नाही, त्याचबरोबर डेबिट कार्डद्वारे बर्याच गोष्टी केल्या जाऊ शकतात. याद्वारे तुम्ही पैसे काढू शकता, बिले भरू शकता, ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून व्यवहार करू शकता आणि एका बँकेतून दुसर्या बँकेत पैसे हस्तांतरीत करू शकता.
पुढील काही महीन्यात। टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं? तुम्हाला लवकरच याबद्दल अपडेट मिळेलल....
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा