हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २५ जून, २०२१

निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांसमोर आता पीकविमा योजनेचाच पर्याय,पिकविमा काढण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 


निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांसमोर आता पीकविमा योजनेचाच पर्याय,पिकविमा काढण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

PM Kisan च्या KYC 31 जुलैपर्यंत पूर्ण करा.
KYC करण्यासाठी संपर्क करा.
 संतोष साळवे.. 7900094419

पीक विमा म्हणजे काय? -

पीक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन जोखमींमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यास शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, उष्णता, नैसर्गिक आग, जलप्रलय,कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होते. तसेच नैसर्गिक आपत्ती झाली नसल्यास लाभ मिळत नाही हा दृष्टिकोन ही पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांनी ठेवणे आवश्‍यक आहे.


महाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात पीक विमा योजना राबविण्यात येत असून योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही.

असे असणार आहे योजनेचे स्वरुप

पीकविमा योजना ही केंद्राच्या माध्यमातून राबवली जात असली तरी यामध्ये खासगी विमा कंपन्यांची मक्तेदारी ही वाढली होती. त्यामुळे योजनेचे स्वरुप बदलावे अन्यथा राज्य सरकार हे स्वतंत्र योजना राबविणार असा इशारा महाविकास आघाडी सरकारने दिला होता. त्यामुळे आता खासगी कंपन्या नाही तर शासकीय विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी शेतकऱ्यांना दोन टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे तर उर्वरित हप्ता शासनाकडून भरला जाणार आहे. नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता भरावा लागणार आहे.

खरिपातील या पिकांचा आहे समावेश

पीकविमा योजनेत नेमक्या कोणत्या पिकांचा समावेश केला आहे हे देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असते. त्यावरच मिळणारी रक्कम आणि भरावा लागणारा विमा हप्ता रक्कम अवलंबून असते. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत यंदा खरिपातील ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आणि कापसाचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी उडीद आणि मूगाचा समावेश असतानाही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे 31 जुलैपूर्वीच शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे.

कोणत्या कारणामुळं नुकसान झाल्यास भरपाई मिळते

खरिप हंगामात पेरणी केल्यापासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , जमीन जलमय होणे, भुस्खलन होणं, पावसातील खंड, कीड,लरोग यामुळे उत्पादनात आलेली घटक, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यानं होणारं नुकसान याची जोखीम योजनेत घेतली जाते. खरिप हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं होणारं नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांच नुकसानं याची जोखीम पीक विमा योजनेत घेतली जाते.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 


योग्य नोंद ई-पीक पाहणीत करणे आवश्यक –

"स्वयंघोषणा पत्र देऊन पीकविमा योजनेत भाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीत आपल्या पिकाची नोंद करावयाची आहे. विम्यासाठी नोंद केलेले क्षेत्र आणि ई-पीक पाहणीतील क्षेत्रात तफावत आढळून आल्यास ई-पीक पाहणीतील क्षेत्र अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत ज्या पिकासाठी सहभाग घेतला आहे, त्याची योग्य नोंद ई-पीक पाहणीत करणे आवश्यक आहे.", असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हीदेखील अर्ज केला असेल तर आपल्या हातात दोन हजार रुपये मिळतील की नाही हे त्वरित तपासा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

पीक विमा भरताना घ्यावयाची काळजी

1) विमा भरताना 7/12 किंवा ८ अ अपलोड करणे अनिवार्य आहे 7/12 किंवा ८ अ हा महाभुलेख / डिजिटल/तलाठी कोणताही चालेल.

2) भाडेकरार वर जमीन घेतली असेल तर संमती पत्रासाठी 100 रु. चा बॉण्ड आवश्यक आहे

3) मयत शेतकऱ्याचा फॉर्म भरता येणार नाही

4) आधार कार्ड असेल तरच विमा भरता येईल

5) महसुल मंडल बरोबर आहे का एकदा चेक करावा

6) फ्रॉम भरताना शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टकावा CSC धारकाने आपला मोबाईल नंबर टाकू

7) Mix cropping हा ऑप्शन फक्त जे शेतकरी मिश्र पीक घेत असतील तर सिलेक्ट करा. मिक्स क्रॉप म्हणजेच ( उदाहरण – सोयाबीन मध्ये तुम्ही जर मूग, - चवळी, उडीद लावले तर याला म्हणायचं मिश्र पीक )

खालील Documents अपलोड करावे

• बँक पासबुक यावस्तीत प्रिंटिंग पाहिजे ( हाताने लिहिले अकाउंट नंबर व नाव असेल तर घेऊ नका ते चालत नाही)

• ७/१२ किंवा ८ अ

• संमती पत्र (सामाईक क्षेत्र असेल तर संमती प्रत्र अपलोड करा )

• भाडेकरार वर जमीन घेतली असेल तर संमती पत्र अपलोड करावे यासाठी 100 रु. चा बॉण्ड पेपर आवश्यक आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.  

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF, Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

---------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...