हा ब्लॉग शोधा

बुधवार, २३ जून, २०२१

तरुणांसाठी दुग्ध व्यवसाय आहे एक मोठी संधी | वाचा सविस्तर माहिती.

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                   वाचाल तर... वाचाल !!! 


तरुणांसाठी दुग्ध व्यवसाय आहे एक मोठी संधी वाचा सविस्तर माहिती.

ग्रामीण भागाचे चित्र बदलण्याची क्षमता दूध व्यवसायात आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या आहारात दुधाचे स्थान महत्त्वाचे असल्याने दुधाला सातत्याने मोठी मागणी असते. उच्च गुणवत्ता हा या क्षेत्राचा पाया आहे. हे लक्षात घेऊन काम करणाऱ्या तरुणांना दूध व्यवसायात अमाप संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन दूध उद्योजक तथा नाशिक डिस्ट्रिक्ट प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षांनी केले होते.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419* 

समाजाची आर्थिक स्थिती जशी जशी सुधारत जाते तशा त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत जातात. दूध, अंडी, मांस, भाज्या, फळे आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यांची मागणी वाढत जाते.

त्यातले दुधाची मागणी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्हींकडून वाढते. त्या प्रमाणात देशात दुग्धोत्पादन वाढले पाहिजे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समाजात डेअरी टेक्नालॉजी वाढली पाहिजे. भारतात ती वाढत आहे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही लागत आहे. ही गरज ओळखून अनेक विद्यापीठांनी डेअरी टेक्नालॉजीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

 *25 टक्क्यांपर्यंत सबसिडी घ्या अन् लगेच टाका डेअरी बिझनेस!* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


मात्र या क्षेत्राला किती महत्त्व येत आहे याची योग्य जाणीव समाजात वाढत नसल्याने या अभ्यासक्रमांकडे लोकांचा ओढा दिसत नाही. दुधाचे शास्त्र वेगळे आहे. मुळात लोकांना दूध लागते ते चहासाठी. फार तर काही लोक दूध पीत असतील. दुधाच्या अशा वापराला मर्यादा आहेत. पण दूध जादा तयार होत असेल तर ते या मर्यादांमुळे खपणे अवघड जाईल. तेच दूध ताक, दही, लस्सी, श्रीखंड, आइसस्क्रीम या सारख्या पदार्थांच्या रूपात त्यांना दिले तर ते खपेल. म्हणून डेअरी टेक्नालॉजीत तीन गोष्टींना महत्त्व असते. पहिले म्हणजे दुधाचे उत्पादन वाढवणे, दुसरे म्हणजे प्रक्रिया करणे आणि तिसरे म्हणजे विकणे. या तीन अंगांचा अभ्यास या अभ्यासक्रमांत असतो. बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांस प्रवेश घेता येईल. डेअरी टेक्नालॉजीचे पदविका अभ्यासक्रम तर आहेतच पण पदवी आणि पदव्युत्तर वर्गही आहेत.


आपल्या नजिकच्या कृषि विद्यापीठांशी संपर्क साधल्यास पशु वैद्यकीय महाविद्यालयांचे पत्ते मिळतील. काही विद्यापीठांत याच महाविद्यालयांत डेअरी टेक्नालॉजीचेही शिक्षण दिले जाते. 


काही विद्यापीठांत स्वतंत्रपणे शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी अनेक आहेत. दुग्ध व्यवसाय करणार्‍या संस्थांत तर रोजगार मिळतोच पण प्रक्रिया उद्योगात प्राधान्याने नोकरी मिळते. 

आइसस्क्रीमच्या कारखान्यांतही नोकरी उपलब्ध होऊ शकते. नोकर्‍यांना तोटा नाही. कारण संधी भरपूर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ कमी अशी स्थिती आहे.

संपर्कासाठी महाराष्ट्र ऍनिमल अँड फिशरी सायन्सेसयुनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील वरूड येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नालॉजी या महाविद्यालयाशी संपर्क साधावा.


प्रशिक्षण, मार्गदर्शनातून कमी करा दुग्ध व्यवसायातील जोखीम.

दुग्ध व्यवसाबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर माहिती सहज उपलब्ध होत असली तरी, प्रमाणित माहिती ही योग्य प्राशिक्षण, सल्ला आणि मार्गदर्शनातूनच मिळू शकेल. मोठ्या गोठ्यांवर आहार, प्रजनन किंवा आरोग्य व्यवस्थापनात झालेली छोटीशी चूक उत्पादनच नव्हे, तर जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते.
 
कुठल्याही व्यवसायात प्रशिक्षण, सल्ला आणि मार्गदर्शन महत्त्वाचे असते. आधुनिक दुग्ध व्यवसायात उत्पादनवाढीबरोबर जोखीमही वाढली आहे. पारंपरिक व आधुनिक दुग्ध व्यवसायात खाद्य व्यवस्थापनापासून दुधाच्या विक्रीच्या नियोजनात मोठा फरक आहे. वेळीच योग्य सल्ला मार्गदर्शन न मिळाल्यास दुग्ध व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागतो. योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन घेतले नसल्याने कसे नुकसान होते हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते.

"शेळीपालन"अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सतीश यांनी शहरातील नोकरी सोडून साठवलेली रक्कम गुंतवून गावात दुग्ध व्यवसाय करावयाचे ठरवले. गोठ्याची सोय करून हरियाना राज्यातून एकाचवेळेस २० मुऱ्हा म्हशी खरेदी केल्या. मोठ्या उत्साहात व्यवसाय सुरू केला. परंतु २० म्हशींना किती चारा लागेल याचा अंदाज नसल्याने दहा गुंठ्यांतच केलेला चारा कमी पडू लागला. त्यात १५ दिवस पाऊस सलग सुरू राहिला. म्हशी आजारी पडू लागल्या व पहिल्या महिन्यातच १२ म्हशी घटसर्प रोगाने मृत्युमुखी पडल्या. सतीश यांनी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कुठलेही प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन घेतले नव्हते. म्हशी घेताना त्यांना केलेल्या लसीकरणाची माहिती नसल्यामुळे, अयोग्य व्यवस्थापन, जनावरांचा विमा उतरविलेला नसल्यामुळे व तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून जनावरांना उपचार न केल्यामुळे व्यवसाय दोन महिन्यांत मोठा तोटा सहन करून बंद केला.


प्रशिक्षण

  • प्रशिक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या विषयाचे ज्ञान व कौशल्य वृद्धी करून त्याच्या व्यवसायाची क्षमता आणि उत्पादकता वाढविणे होय.
  • प्रशिक्षणाने दुधाळ जनावरांच्या नियोजनाचे ज्ञान, कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा दृष्टिकोन बदलून आरोग्य पूर्ण जनावरांचा सांभाळ करून प्रति जनावर दूध उत्पादन वाढविता येते.
  • नव्याने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांनी व्यवसायाची सुरवात करण्यापूर्वीच प्रशिक्षण घेणे फायद्याचे ठरते. व्यवसाय सुरू केल्यावर सुद्धा व्यवसाय वृद्धी करण्यासाठी किंवा प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.
  • *रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

    तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

    आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

    आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

प्रशिक्षण मिळण्याची ठिकाणे

  • दुग्ध व्यवसायाची प्रशिक्षणे अनेक संस्थांकडून आयोजित केली जातात. परंतु शक्यतो शासकीय किंवा नावाजलेल्या संस्थांमधूनच प्रशिक्षण घ्यावे.
  • प्रशिक्षणास तज्ज्ञ पशुवैद्यक किंवा तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असल्याची खात्री करून घ्यावी. खालील ठिकाणी प्रशिक्षण मिळू शकते.
  • पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजनेतून मागासवर्गीयांसाठी जिल्हास्तरावर मोफत प्रशिक्षण आयोजित केले जाते.
  • पशुपालकांची मागणी असल्यास वेळोवेळी सशुल्क प्रशिक्षनेही आयोजित केली जातात.
  • पशुवैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रे यांच्या मार्फतही संपूर्ण अथवा विविध विषयांवर प्रशिक्षणे आयोजित केली जातात.
  • महिला आर्थिक विकास महामंडळ, समाजकल्याण विभाग यांच्यामार्फत महिला, अपंग व मागास वर्गीय यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणे आयोजित केली जातात.
  • सहकारी तसेच खासगी दूध संस्था, विविध बिगर शासकीय संस्था (NGO), विविध गोशाळा, नावाजलेल्या संस्था दुग्ध व्यवसायावर प्रशिक्षणे आयोजित करत असतात.
  • अनेक यशस्वी पशुपालक किंवा खासगी तज्ज्ञ पशुवैद्यक उत्कृष्ट नियोजन केलेल्या गोठ्यावर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण आयोजित करतात.

  • पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
  आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही )

प्रशिक्षणाचे फायदे

  • परिपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमातून दुग्ध व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान एकाच वेळी मिळते, नियोजनातील बारकावे समजतात, त्यामुळे दुग्ध व्यवसाय फायद्याचा करता येतो.
  • व्यवसायातील धोके जोखीम अगोदरच समजल्याने खबरदारीच्या उपाययोजना करून नुकसान टाळता येते. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तज्ज्ञ व्यक्ती, पशुवैद्यक किंवा यशस्वी पशुपालक यांच्याबरोबर संवाद साधता येतो.
  • प्रशिक्षणातून मिळणाऱ्या वाचन साहित्यातून वेळोवेळी उपयोगी पडणारी तयार स्वरूपाची माहिती उपलब्ध होते.
  • व्यवसाय अगोदरच सुरू केला असल्यास उत्पादन व उत्पन्नवाढीसाठी ठराविक विषयाच्या नवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती मिळवता येते.

सल्ला व मार्गदर्शन

  • दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जसे प्रशिक्षण गरजेचे आहे तसे व्यवसाय सुरू असताना वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. पारंपरिक पशुपालनात असा सल्ला घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गावातील त्या विषयातील माहितगाराकडून मिळत असे. परंतु आधुनिक पशुपालनात उद्भविणाऱ्या नव नवीन समस्या, यांत्रिकीकरण, नवीन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यक किंवा तज्ज्ञ तांत्रिक व्यक्तीकडून सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे झाले आहे.
  • दुग्ध व्यवसायात सल्ला किंवा मार्गदर्शन हे दोन प्रकारे घेतले जाते. पहिला प्रकार हा ठराविक समस्येवर उपाययोजना करणे आणि दुसरा प्रकार म्हणजे व्यवसाय सुरू असताना वेळोवेळी माहिती घेऊन उत्पादकता वाढविण्यासाठी किंवा उद्दिष्टे ठरवून ते गाठण्यासाठी नियोजन करणे.

सल्ला, मार्गदर्शन कुठून मिळेल

  • नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून स्थानिक परिस्थितीनुसार योग्य सल्ला अाणि शासकीय योजनांची माहिती सहज मिळू शकते.
  • पशुवैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे यांच्या विस्तार विभागाकडूनही पशुपालकांना मार्गदर्शन केले जाते.
  • टोल फ्री दूरध्वनी क्रमांक – पशुपालकांना विविध विभागांच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर फोन करून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळू शकते.
  • वृत्तपत्र, मासिके यांच्यातून प्रकाशित होणाऱ्या तांत्रिक लेखांतून ठराविक समस्याबद्दल किंवा नवीन तंत्रज्ञानाबद्दल लेखकांबरोबर संपर्क साधून अधिक माहिती घेता येते.
  • सर्वांत सहज उपलब्ध असणारे सल्लागार म्हणजे मोबाईल, इंटरनेटद्वारे विविध संकेतस्थळे (website), गुगल, यू-ट्यूब, ब्लॉग्ज, विविध अॅपवरून माहिती तेथे प्रतिक्रिया नोंदवून मिळवता येते. (परंतु ही माहिती खात्रीशीर अाहे किंवा नाही याची खात्री करणे अावश्‍यक असते) शासनाच्या किंवा विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रमाणित शास्त्रीय माहिती उपलब्ध असते.
  • चर्चा सत्रे, परिसंवाद, कार्यशाळा येथून ठराविक विषयाची माहिती उपलब्ध होऊ शकते.
  • औषध कंपन्या, पशुखाद्य कंपन्या, दुग्ध व्यवसायातील विविध उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यासुद्धा त्यांच्या उत्पादनाशी संबंधित ठराविक सल्ला व मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देतात.
  • खासगी पशुवैद्यक किंवा तज्ज्ञ सल्लागार व्यक्तींकडूनही सल्ला व मार्गदर्शन मिळते.

सल्ला, मार्गदर्शनाचे फायदे

  • दुग्ध व्यवसायाचे ध्येय व उद्दिष्टे ठरवून, ते गाठण्यासाठी प्रयत्न करता येतात.
  • प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य आहार नियोजन, गोठ्यावरील दैनंदिन नियोजन इ. मध्ये सुधारणा करून खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतात.
  • व्यवसायात उद्भविणाऱ्या समस्यांची कारणे शोधून, योग्य नियोजनाद्वारे समस्यांचे निराकरण करता येते.
  • उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करून उत्पादकता व उत्पन्न वाढविणे शक्य होते.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।     https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...