हा ब्लॉग शोधा

रविवार, १४ जुलै, २०२४

पावसाचा रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

पावसाचा रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

पावसाळा सुरू झाला की, हवामान विभागाकडून 'या प्रदेशात ऑरेंज अलर्ट', 'आज या भागात रेड अलर्ट आहे'… 'प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा सांगितला आहे. ही वाक्य तुमच्या कानावर पडली असेलच

देशाच्या बहुतांश भागात मान्सून पाऊस जोरात सुरु आहे. काही राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी यलो अलर्ट सांगितला आहे. 

अलर्ट सांगितला आहे पण नेमका कमी, अधिक, रिमझिम, जोरदार, मुसळधार, अतिमुसळधार, की ढगफूटी नेमका कसा, हे कसं कळणार. यासाठी पावसाच्या स्थितीनुसार भारतीय हवामान विभाग लोकांना सतर्क करत असते. जेणेकरून नागरिक सतर्क राहतील आणि संभाव्य धोके कमी होतील.जीवीत आणि वित्त हानी होणार नाही.

रेड अलर्ट (Red Alert )

रेड अलर्टचा साधा सरळ अर्थ म्हणजे धोका. हवामानाच्या दृष्टीने अतिधोकादायक परिस्थिती ओढावण्याची शक्यता असते तेव्हा हवामान विभाग रेड अलर्ट देत असतो. ढगफुटी, अतिवृष्टी, पूर, अतिजोरदार पाऊस, भुस्खलन आदी मोठ्या नैसर्गिक संकटाची शक्यता असल्यास त्या भागाला रेड अलर्ट दिला जातो. रेड अलर्ट दिल्यानंतर नागरिकांनी शक्यतो घरीच बसावे. या अलर्टमध्ये नागरिकांना स्थलांतर देखील करावे लागू शकते. थोडक्यात रेड अलर्टमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. 

रेड अलर्ट दिल्यानंतर आपात्कालीन विभाग, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, NDRF, SDRF मदत आणि पुनर्वसन विभाग, विद्युत विभाग, फायर ब्रिगेड, समुद्रकिनारी असमारे तटरक्षक दल आदी प्रमुख विभाग सतर्क राहत असतात. या अलर्टमध्ये यंत्रणा तातडीने काम करण्याची गरज असते. कोणतीही जीवीत व वित्त हानी होऊ नये याची सर्वतोपरी काळजी या यंत्रणा घेत असतात.

ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो. ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते. ऑरेंज अलर्टचा अर्थ म्हणजे त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस पडू शकतो. अशा वेळी नागरिकांनी आवश्यक तेव्हाचं योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडावे.

यलो अलर्ट (Yellow Alert)

यलो अलर्ट ही पावसाच्या खतऱ्याची पहिली घंटा असते. थोडक्यात सावधगिरीचा इशारा नागरिकांना देण्यासाठी ज्या भागात काही वेळाने आपत्ती येण्याची शक्यता असेल तर हवामान विभाग यलो अलर्ट (Yellow Alert) देते.

ग्रीन अलर्ट (Green Alert)

ग्नीन अलर्टमध्ये असलेली ठिकाणे ही नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित असतात. या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात असतो. या भागासाठी निर्बंध लावले जात नाहीत.

राज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड तसेच कोकण किनारपट्टीला आज (दि.14) पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. आयएमडीच्या फोरकास्टनुसार, शनिवारी कोकण किनारपट्टीसह रायगडला रेड अलर्ट, मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट होता. रविवारपासून (दि.14) पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

--------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक स्कॉलरशिप

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक स्कॉलरशिप

सुभद्राबाई शिक्षण निधी मुलुंड, मुंबई यांच्या विद्यमाने आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खराब असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक वर्ष 2024 - 2025 साठी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

ही शिष्यवृत्ती केवळ रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असून दहावी उत्तीर्ण होऊन सरकार मान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मिळू शकते.

स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण भरलेली फी पावती, 
  • मागील वर्षाची गुणपत्रिका, 
  • कुटुंबाची शिधा पत्रिका, 
  • उत्पन्नाचा दाखला
  • शाळेच्या 2 शिक्षकांची प्रमाणपत्रे
  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्ये तयार असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024

अर्जांची छाननी झाल्यावर प्राथमिक निवड झालेल्यांना मुलाखतीसाठी ई-मेल द्वारा बोलाविले जाईल. मुलाखतीनंतर अंतिम निवड करून शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलने तसे कळविले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती / मदत जमा केली जाईल

जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी कोकण संस्थेच्या माणगाव ऑफिस येथे संपूर्ण कागदपत्रांसह भेट द्यावी

सुभद्राबाई शिक्षण निधी मुलुंड, मुंबई च्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 12 ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल 6 ते 10 हजार रुपये प्रती महिना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 12 ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल 6 ते 10 हजार रुपये प्रती महिना

शिक्षण पूर्ण करून रोजगार, नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरूण-तरूणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही.

बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे.

पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व ॲप्रेंटिस बंधनकारक असून त्या तरूणांनाही या योजनेतून विद्यावेतनाचा लाभ दिला जाणार आहे.

एका महिन्यात तो दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास, त्यांना विद्यावेतन मिळणार नाही. 

'लाडका भाऊ' 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक शासकीय कार्यालयात 'इंटर्नशीप'ची संधी मिळणार

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना 'इंटर्नशीप'-प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने मंजूर पदाच्या कमीतकमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल, यासाठी नियोजन करा,'असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, दि.25 जुलै 2024 रोजी दिले

यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे, म्हणून उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन

  • इयत्ता बारावी उत्तीर्ण : प्रतिमहा 6000
  • आयटीआय, पदविका : दरमहा 8000
  • पदवीधर-पदव्युत्तर : दरमहा 10.000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता

  1. अर्जदाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
  2. अर्जदाराची किमान किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती इय्यता 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावी.
  3. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  4. उमेदवाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  5. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावा.
  6. उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

जीआर (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये !!अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/07/blog-post.html

---------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मंगळवार, ९ जुलै, २०२४

जेष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये !!

 जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये !!

समाजकल्याण विभागा मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने ' मुख्यमंत्री वयश्री योजना' सुरु केली असून 31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

काय आहे ही योजना?

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता 3 हजार त्यांना मिळणार आहे.

पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट,

सर्व्हयकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ 
नागररकाांना त्याांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी राज्यात “मुख्यमांत्री वयोश्री योजना” राबरवण्यास मान्यता देिेल्याबाबतचा शासन निर्णयसाठी(GR) येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री वयोश्री  योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करुन घेण्याकरिता येथे क्लिक करावे.

अर्ज डाऊनलोड करुन सर्व सहपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह पोस्टाने/कुरीयर ने सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर / मुंबई उपनगर यांचे कार्यालयाकरीता खालील पत्यावर पाठविण्यात यावा.

नवीन प्रशासकीय इमारत, 4 था मजला, आर.सी.चेंबुरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400071.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधारकार्ड / मतदान कार्ड

2. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स

3. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

4. स्वयं-घोषणापत्र

5. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे

6. लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत असावे. याबाबत लाभार्थीने स्वयंघोषणापत्र सादर करावे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना सदर योजनेची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ,उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत "माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान" अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते त्या सर्वेक्षणाबरोबरच या योजनेचा लाभार्थींची तपासणी करण्यात येत आहे.

महानगरपालिकास्तरावर आयुक्त महानगरपालिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण /जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची समिती मार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी वरील सर्व संबंधित कार्यालयात संपर्क साधावा.

समाजकल्याण विभागा मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.-

----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, २९ जून, २०२४

कल्याण स्टेशनवर उतरल्यावर 'या' सुविधांचा लाभ अवश्य घ्या

कल्याण स्टेशनवर उतरल्यावर 'या' सुविधांचा लाभ अवश्य घ्या

कल्याण जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्यवर्ती मार्गावर असलेले एक महत्त्वाचे जंक्शन आहे. हे स्टेशन मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पूर्व मार्गांच्या जंक्शनवर स्थित आहे.

हे स्टेशन मुंबईच्या ईशान्येकडे 54 किमी (34 मैल) आहे. महत्वाचे म्हणजे भारतातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशनमध्ये या स्टेशनचा क्रमांक टॉप 10 मध्ये येतो.

सर्व प्रमुख गाड्यांसाठी हा महत्त्वाचा थांबा आहे. लक्षात असू द्या, नागपूर दुरांतो आणि डेक्कन क्वीन या दोन गाड्या कल्याणला थांबत नाहीत. यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत कल्याण जंक्शनला 6 नवीन प्लॅटफॉर्म मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी रेल्वे गुड्स यार्डच्या पूर्व भागात जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशनवर तुम्हाला विविध प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई-ठाणे-नवी मुंबईच्या रेल्वे सेवांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे दिवसभरात अनेक ट्रेन्स धावतात, तरी देखील त्यांची सेवा उत्तम असते.

कल्याण स्टेशनवर मिळणार्‍या सुविधा :

वेटिंग रूम :

इथे प्रवाशांसाठी आरामदायी वेटिंग रुम आणि क्षेत्र आहे.

प्रथमोपचार कक्ष :

वैद्यकीय मदतीसाठी प्रथमोपचार कक्ष नेहमीच तैनात असते.

जेवणाची खोली :

निवांतपणे जेवण किंवा नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी डायनिंग रुम्सची व्यवस्था केली आहे.

वायफाय (इंटरनेट कनेक्टिव्हिटी) :

वायफायद्वारे तुम्ही नेहमीच जगाशी जोडलेले राहू शकता.

स्तनपान कक्ष :

लहान मुलं आणि महिलांची इथे विशेष काळजी घेतली जाते. महिलांना स्तनपान करण्यासाठी स्तनपान कक्ष उभारण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना आणि बालकांना चांगली सुविधा प्राप्त होते.

प्रसाधनगृहे :

इथली प्रसाधनगृहे चांगल्या दर्जाची आणि स्वच्छ आहेत.

उपासनेच्या सुविधा/प्रार्थना कक्ष :

प्रत्येक व्यक्तिला आपापल्या पद्धतीने उपासना करण्याचा हक्क आहे. हे लक्षात घेऊन इथे पार्थना कक्ष तयार करण्यात आले आहे.

-----------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मंगळवार, ७ मे, २०२४

मतदार यादीत नाव शोधायचे आहे का? मतदान कार्ड,नसेल तरीही करता येईल मतदान; मोबाईलवर घरबसल्या मिळेल बूथ मतदार स्लीप मतदान केंद्रापासून ते मतदार स्लिपपर्यंतची माहिती होईल उपलब्ध

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

मतदार यादीत नाव शोधायचे आहे का? मतदान कार्ड,नसेल तरीही करता येईल मतदान; मोबाईलवर घरबसल्या मिळेल बूथ मतदार स्लीप मतदान केंद्रापासून ते मतदार स्लिपपर्यंतची माहिती होईल उपलब्ध

निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या मतदार स्लिप सहज कशा मिळवू शकता हे सांगणार आहोत. यासोबतच तुम्हाला मतदार ओळखपत्राचा तपशील जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.

नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी...

जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ : https://electoralsearch.eci.gov.in/

राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://ceoelection.maharashtra.gov.in/search/

केंद्रीय निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://voters.eci.gov.in

हेल्पलाइन ॲप : voter helpline app

हेल्पलाइन क्रमांक : 1950

मतदान बूथ स्लीपसाठी एसएमएस सुविधा

ECI (तुमचा मतदार आयडी नंबर) 1950 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर आपल्याला केवळ 15 सेकंदात मतदार म्हणून नोंद असलेली बूथ स्लीप मिळेल. मतदानाला जाताना आपल्याजवळ ही स्लीप असावी, जेणेकरून आपल्याला सहजपणे मतदान करता येईल. पुन्हा केंद्रावर जाऊन आपल्याला मतदान बूथ स्लीप घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आता शिक्षक तथा बीएलओंच्या माध्यमातून स्लीप वाटप सुरू आहे, पण अनेकांना त्या मिळालेल्या नाहीत. त्यांच्यासाठी हा एसएमएसचा पर्याय उत्तम आहे.

जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल आणि तुमचे वय १८ वर्षे असेल तर तुम्ही अगदी सहज मतदान करू शकता. तुम्हाला खालील कागदपत्रे मतदान केंद्रावर न्यावी लागतील. सर्व मतदारांना कोणताही त्रास न होता मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मतदान कार्ड नसल्यास 'हे' पुरावे ग्राह्य

  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • राज्य व केंद्र सरकार
  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
  • पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले फोटो ओळखपत्र
  • बँक/पोस्ट ऑफिसमार्फत दिलेले स्मार्टकार्ड
  • पॅनकार्ड
  • आरजीआय/एनपीआरमार्फत दिलेले स्मार्टकार्ड
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा जॉबकार्ड)
  • कामगार मंत्रालय अंतर्गत स्वास्थ्य विमा स्मार्टकार्ड
  • फोटोयुक्त पेंशन दस्ताऐवज खासदार, आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले कार्यालयीन ओळखपत्र
  • आधारकार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यास मतदान करता येणार आहे.
-------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, १ मे, २०२४

कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे.

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे.

कंपनीच्या या कबुली जबाबामुळे ही लस घेणाऱ्यांचे टेशन वाढले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात अ‍ॅस्ट्राझेनेकाने या प्रकारची कबुली पहिल्यांदाच दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या या कबुली जबाबाची जगभरात चर्चा सुरू आहे. ही लस भारतात अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून तयारी केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील अनेक नागरिकांना देण्यात आली होती.

अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. मात्र हे दुष्पपरिणाम क्वचितच आढळू शकतात. नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीबे स्पष्ट केले आहे.

जगभरातील अनेकांनी घेतली लस

भारतासह जगातील अनेकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविशील्ड ही लस घेतली आहे. कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कबूल केले आहे की त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS)हे दुर्मिळ दुष्परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात. यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासोबत प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जेव्हा असे होते तेव्हा व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

घाबरण्याचे कारण नाही

कोविशील्ड आणि Vaxzevria मुळे रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने देखील हे मान्य केले आहे. न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास कुमार यांनी ट्विटरवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये या बातमीमुळे त्रासलेल्यांना दिलासा मिळू शकतो. डॉ.विकास यांनी या बातमीचे विश्लेषण करून काय काळजी घ्यावी या बाबत माहिती दिली आहे.

घाबरू नका हे उपाय करा

डॉ.विकास यांनी या बाबत काळजी करण्याबाबत माहिती दिली आहे. नागरिकांनी या बातमीवरून घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. लसीकरण झाल्यावर अटॅक येण्याची शक्यता ही जास्त असते. मात्र, काही दिवसानंतर मात्र, हा धोका कमी होतो, असे डॉ.विकास यांनी स्पष्ट केले आहे. या लसीमूळे फार क्वचित दुष्परिणाम होतात.

डॉक्टर विकास यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिलेल्या टिप्स

1) फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. प्रक्रिया केलेल्या आणि ट्रान्स फॅट्सपासून दूर राहणे फायदेशीर आहे.

2) मिठाचा वापर कमी करा.

3) जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. निरोगी वजन राखणे गरजेचे आहे.

4) दररोज व्यायाम करा (दिवसातून 30-40 मिनिटे)

5) धूम्रपान टाळा.

6) तणाव व्यवस्थापित करा.

7) नियमित तपासणी करा (उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल)

तुम्ही कोणती वॅक्सिन घेतली होती तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या... खाली लिंक वर क्लिक करा.

https://selfregistration.cowin.gov.in/

--------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...