हा ब्लॉग शोधा

सोमवार, २२ मार्च, २०२१

जाणून घ्या तुमच्या PF अकाउंट बद्दल माहिती *EPFO च्या ग्राहकांसाठी भारत सरकारचा मोठा निर्णय, आता मृत्यूनंतर मिळणार 7 लाखांच्या विम्याचा फायदा*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



 *
आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यांवर पीएफचा पैसा येतो कामी; जाणून घ्या कधी अन् किती मिळतो*

नोकरदार वर्ग आपल्या पगारातील एक हिस्सा पीफ च्या रुपात जमा करतात. पीएफ खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा परत काढू शकतो. विशेष म्हणजे या पैशांवर व्याजदर चांगले मिळत असते. पीएफ परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमच्या  पीएफच्या खात्यातील पूर्ण पैसा तुम्ही काही परिस्थितीमध्येच काढू शकतात. आपल्या आयुष्यात अनेक टप्पे येत असतात, या महत्त्वाच्या टप्प्यांवर आपल्याला पैशांची गरज लागत असते. अशाच वेळी तुम्हाला पीएफमधून पैसे मिळत असतात.. चला तर जाणून घेऊ कोणत्या परिस्थितीत आपल्याला पूर्ण पैसा मिळतो

 *कोविड -19 च्या आजारात उपचारासाठी* 
 सध्या कोविड -19 या संसर्गजन्य आजारामुळे तुम्ही आजारी असाल तर किंवा या आजारामुळे तुम्हाला तुमचा पगार मिळत नसेल तर तुम्ही हा पीएफ चा 75 टक्के पैसा काढू शकतात. ते ही 3_दिवसात
 
*गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी -*

जर तुम्ही आपल्या परिवारातील सदस्यांचा उपचार करायचा असेल आणि यासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकतात.

*लग्न किंवा शिक्षणासाठी मिळेल पैसा*

तुमच्या कुटुंबातील कोणाच्या लग्नासाठी पैसा लागत असेल तर तुम्ही त्यातून पैसा काढू शकतात.जर शिक्षणासाठी तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या एम्पलायरकडून फॉर्म-३१च्या अंतर्गत अर्ज करावा लागेल. या स्थितीत तुम्ही फक्त ५० टक्के पैसे काढू शकतात.
 
*प्लॉट करता येईल खरेदी*
  
जर तुम्ही प्लॉट खरेदी करण्याची योजना करत असाल तर तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून पैसा काढू शकतात.

*घराचे स्वप्न होईल पूर्ण* 

तुम्ही जर घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जर घराचे नूतनीकरण करायचे असेल तर तुम्ही पीएफमधून पैसा काढू शकतात,
 
*निवृत्तीच्या वेळेस मिळेल पैसा*

तुमचे वय जेव्हा ५४ वर्ष होईल, तेव्हा तुम्ही (EPF) ईपीएफच्या शिल्लक रक्कमेतून ९० टक्के पैसा काढू शकतात.

 *ईपीएफओमध्ये केवायसी करणे का महत्वाचे आहे आणि त्यापासून आपल्याला काय फायदा होतो, हे जाणून घेऊया*

बँक खात्यापासून भविष्य निर्वाह निधी खात्यापर्यंत कोणताही केवायसी करणे फार महत्वाचे आहे. ज्यांचे केवायसी पूर्ण झाले नाही, त्यांना ईपीएफओच्या ऑनलाईन सेवेचा लाभ मिळत नाही. पीएफ खात्यांमधून केवायसीशिवाय पैसे काढता येणार नाहीत. केवायसी नसेल तर ई-सेवा पोर्टलच्या बर्‍याच ऑनलाईन सेवांचा लाभ ईपीएफओ सदस्यांना घेता येणार नाही. यात पैसे क्लेम करणे, खाते हस्तांतरण, नॉमिनेशन यासारख्या सेवांचा समावेश आहे.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

ज्या खात्यात केवायसी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना पैसे हस्तांतरण किंवा पैसे काढताना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आपल्या पीएफ खात्यात, बँक खात्याची माहिती अद्यतनित न केल्यास, तुमचा क्लेमदेखील नाकारला जाऊ शकतो. जर आपण केवायसीची कागदपत्रे सबमिट केली नसतील, तर ईपीएफ सदस्यांना मिळणाऱ्या सूचना तुम्हाला एसएमएसद्वारे प्राप्त होणार नाही. केवायसीसाठी ईपीएफओ पोर्टलवर ‘ही’ कागदपत्रे अपलोड करा

यासाठी खातेधारकाला बँक खाते, पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स-निवडणूक कार्ड- रेशन कार्ड- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (यापैकी एक) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. जर आपले केवायसी पूर्ण झाले असेल, तर ईपीएफओ केवळ तीन दिवसात आपल्या पीएफ पैसे काढण्याच्या क्लेमवर प्रक्रिया करेल. यानंतर पीएफचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील.              

*EPFO च्या ग्राहकांसाठी भारत मोठा निर्णय, आता मृत्यूनंतर मिळणार 7 लाखांच्या विम्याचा फायदा*

ज्या कामगारांच PF Account  आहे.त्या कामगारांना  मिळणार विम्याचा लाभ किमान विमा  अडीच लाख रुपये आणि कमाल 7 लाख रूपये कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसानां  मिळणार आहेत कोरोना साथीच्या काळात कामगार मंत्रालयाने ईपीएफओ ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा दिलाय.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419       

----------------------------------------------------------------

सृष्टी महा ई सुविधा.संतोष विठ्ठल साळवे..7900094419    https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.     

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

गरिबांचा होणार फायदा! हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार; जाणुन घ्या कसं महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पात्रता अटीत मोठा बदल, पहा किती रुपयांपर्यंत मोफत उपचाराची मर्यादा?



गरिबांचा होणार फायदा! हॉस्पिटलमध्ये मिळणार मोफत उपचार; जाणुन घ्या कसं 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पात्रता अटीत मोठा बदल, पहा किती रुपयांपर्यंत मोफत उपचाराची मर्यादा?

सन 2012 साली राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे. आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्याचा निर्णय नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

या योजनेमध्ये रुग्णाच्या आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्याची मर्यादा होती. आता ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

मूत्रपिंड या आजारावरील शस्त्रक्रियेसाठी मोफत उपचाराची मर्यादा अडीच लाखावर रुपयांवरुन साडेचार लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील शासकीय व बिगर शासकीय 1000 रुग्णालयांचा सहभाग असणार आहे. तसेच उपचार करण्यात येणाऱ्या आजारांची संख्या 996 वरुन 1356 इतकी करण्यात आली आहे.




महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एकत्रित)

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. योजनेंतर्गत निवडक आजारांवर शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांच्या जाळयामार्फत पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थी गटांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. ही योजना पूर्वी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने ओळखली जात होती


दि. 14 डिसेंबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेच्या नावात ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अशी अंशत: बदल करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. 

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून दि.23 सप्टेंबर,2018 पासून राज्यात लागू करण्यात आली. सदर योजना राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरु करण्यात आली. ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांपैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना,2011 च्या यादीतील  83.63 लक्ष कुटुंबे या योजनेची लाभार्थी आहेत.

सन 2012 साली राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाची माहीती खालील प्रमाणे



"महात्मा फुले जन आरोग्य योजना" तुम्हाला माहिती आहे का ?

  ही नागरिकांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, यासाठी राज्य सरकारने केसरी, पिवळे रेशन कार्डबरोबरच आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेमध्ये सुमारे 971 आजारांवर निदान केले जात आहे. विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू आहे. नागरिकांनी आजाराच्या निदानासाठी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा.

राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी दीड लाख रुपयांचे पॅकेजची तरतूद केली आहे.

 आयुष्मान भारत योजना'' काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

या रकमेपुढील निदानासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा निधी आयुष्यमान भारत योजनेमध्ये तरतूद केली आहे. तरी नागरिकांनी आपल्या आजाराला घाबरुन न जाता या योजनेची सविस्तर माहिती घेऊन विविध हॉस्पिटशी संपर्क साधून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी मी जनजागृती करणार आहेत.अनेक कुटुंबांना या योजनेपासून माहिती नसल्यामुळे लाभ मिळत नाही. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.....      

 

                                      

 सार्वजनिक आरोग्य विभाग:

 शासन निर्णय क्र.रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/ भाग १/ आरोग्य -६, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि.१ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

                 हा विडीयो पहा. 👇👇

                        


या योजनेच तपशील खालीलप्रमाणे:

1) महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणाला?*

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

2) विमा संरक्षण:  

 या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये १.५० लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष २.५० लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीना वरील योजनेचा लाभ घेता येतो.  

3) योजनेत समाविष्ट उपचार*:

 योजनेंतर्गत ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष सेवांतर्गत उपचार/ सेवा देण्यात येत आहेत.

1) सर्वसाधारण शस्त्रक्रिया

2) काम, नाक घसा शस्त्रक्रिया

3) नेत्ररोग शस्त्रक्रिया

4) स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र

5) अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया

6) पोठ व जठार शस्त्रक्रिया  

7) कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी

8) बालरोग शस्त्रक्रिया

9) प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया

10) मज्जातंतूविकृती शास्त्र

11) कर्करोग शस्त्रक्रिया

12) वैद्यकीय कर्करोग उपचार

13) रेडीओथेरपी कर्करोग

14) त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया

15) जळीत

16) पॉलिट्रामा

17) प्रोस्थेसिस

18) जोखिमी देखभाल

19) जनरल मेडिसिन

20) संसर्गजन्य रोग 

21) बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

22) हृदयरोग

23) नेफ्रोलोजी

24) न्युरोलोजी

25) पल्मोनोलोजी

26) चर्मरोग चिकित्सा

27) रोमेटोलोजी

28) इंडोक्रायनोलोजी

29) मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी

30) इंटरवेन्शनल रेडीओलोजी

4) विम्याचा हप्ता*- 

 या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमाच्या हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस अदा करण्यात येतो

5) योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये*

या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रूग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो.

6) नि:शुल्क (Cashless Medical Services)*:

सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांचेकडील शुभ्र शिधापत्रिका व ७/१२  उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंतच्या सेवा पँकेज मध्ये समाविष्ट आहेत.

7) आरोग्य मित्र*:-

अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णाची नोंदणी, उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहेत.

8) आरोग्य शिबीर*:

योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरांत रुग्णांची तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारापैकी उपचारांस सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार केले जातात.

9) राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक परिषद*:                                                                

योजनेच्या दैनंदिन कामकाजाचे सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात तसेच यावर नियंत्रक म्हणून मा. मुख्य मंत्री. राज्य यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषद कार्यरत आहे.

10) विमा कंपनी आणि व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या*:

 योजनेची राज्यात अमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्सुरंस कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्याची (TPAs) निवड केलेली असून त्यांचा मार्फत अंगीकृत रुग्णालयांची निवड, उपचारांच्या पूर्व परवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्राची तसेच राज्य व जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ह्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतात.

11) मदतीसाठी संपर्क* :-

 क्रमांक:-  155388/ 1800232200

रुग्णालय- आरोग्य मित्र

पोस्ट बॉक्स – पो.बॉक्स क्र. 16565, वरळी पोस्ट ऑफिस, वरळी मुंबई – 400018

संकेतस्थळ- www.jeevandayee.gov.. 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                              --------------------------------------------------------------------------------------------------------- 

संपर्क करा *संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ..7900094419*   https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

विविध योजना -आॕनलाईन अर्ज

संतोष साळवे...7900094419

मित्रांनो यात तुम्हाला जनजागृती चळवळ अंतर्गत  केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या लोककल्याणकारी योजनाची तसेच शिक्षण, नोकरी, शेती, व्यापार, उद्योग, आरोग्य, व इतर सर्व माहीती तुम्हाला मिळेल.  सृष्टी महा ई सुविधा अंतर्गत तुम्हाला तुमच्या घरी बसल्या   online document  बनवून मिळेल

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...