( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
BH Series Number Plate : गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल तुम्हाला माहीती आहे का? कोण करु शकतं अर्ज
नोकरीनिमित्त सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागतं. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या.
*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
भारत सरकारने अखेर ही समस्या सोडवली आहे. आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
BH नंबर प्लेट कोणत्या लोकांसाठी प्राधान्य?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही मालिका अशा लोकांसाठी सुरू केली आहे, ज्यांची नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदली होते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विशेषत: संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिले गेलं आहे.
आजच्या काळात कामामुळे लोकांना अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागते. अशा परिस्थितीत, नवीन राज्यात पोहोचल्यावर, आपल्या वाहनाची नवीन नोंदणी करणे खूप डोकेदुखी आहे. आता या त्रासातून लोकांना दिलासा मिळाला आहे.
BH नंबर प्लेट साठी किती अतिरिक्त शुल्क भरावं लागणार?
या नवीन सीरिजमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 8 टक्के शुल्क भरून बीएच सीरिजचा क्रमांक मिळवता येईल. जर वाहनाची किंमत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असेल तर या सीरिजवरवर 10 टक्के दराने शुल्क आकारलं जाईल. बीएच सीरीजसाठी, वाहनाची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 12 टक्के शुल्क भरावे लागेल.
एक भारत, एक टॅक्स, एक नंबर प्लेट
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे कर्मचारीही या BH-Series चा लाभ घेऊ शकतील. 4 किंवा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात. या मालिकेचा फॉरमॅट अशा प्रकारे असेल, नंबर प्लेटवर पहिले वर्ष लिहिलं जाईल. यानंतर भारत म्हणून BH लिहिलं असेल आणि त्यानंतर वाहन क्रमांक असेल.
BH सीरिजची खास गोष्ट म्हणजे या सीरिजचं वाहन भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणत्या अडथळ्याशिवाय जाऊ शकतं. नवीन ठिकाणी बदली करताना किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नवीन नोंदणी किंवा एनओसी आवश्यक नाही. सध्याच्या नंबर प्लेटनुसार वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जायचं असल्यास एनओसी घेऊन नवीन नोंदणी करावी लागते.
BH नंबर प्लेट बद्दल समजून घ्या
BH नंबर प्लेट नेहमीच्या नंबर प्लेट सारखीच आहे. पांढऱ्या पट्टीवर काळी अक्षरं आहेत, पण आताच्या नंबर प्लेटच्या नेमकी उलट ही नंबर प्लेट आहे. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही वाहन घ्याल ते वर्ष (उदा. आताचं वर्ष 22), त्यानंतर 'BH' म्हणजे भारत, त्यानतंर वाहन क्रमांक आणि 'A' म्हणजे वाहन श्रेणी. उदा. 22 BH 0756 A (वर्ष, भारत, वाहन क्रमांक, श्रेणी)
BH नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा?
बीएच नंबर प्लेट मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. नवीन वाहन खरेदी करताना, ग्राहक डीलर वाहन पोर्टलद्वारे BH नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतो.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा