हा ब्लॉग शोधा

शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

10 लाख कमावल्यावरही 1 रुपये कर ( Income Tax) भरावा लागणार नाही,*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


10 लाख कमावल्यावरही 1 रुपये कर ( Income Tax) भरावा लागणार नाही,*

आयकर बचत: कंपन्यांनी फॉर्म-16 जारी केला आहे.जर तुम्ही १० लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात.

 जर तुमचे सॅलरी पॅकेज 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही तुमच्या कमाईचा मोठा हिस्सा टॅक्सच्या रूपात देत असाल तर काळजी घ्या. कदाचित तुम्हाला असे वाटेल की कर वाचवण्याचा कोणताही मार्ग नाही, अशा परिस्थितीत कर भरणे योग्य असेल तर तुम्ही चुकीचे आहात. एवढेच नाही तर तुमचे सॅलरी पॅकेज 10.5 लाख रुपये असले तरी तुम्हाला 1 रुपया टॅक्स भरावा लागणार नाही. चला संपूर्ण गणिते जाणून घेऊया...

10.5 लाखांच्या पगारावर तुम्ही 30 टक्के कराच्या स्लॅबमध्ये येतो. कारण 10 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के आयकर भरावा लागतो.
 हे पूर्ण गणित आहे

1) जर तुमचा पगार 10.5 लाख रुपये असेल तर सर्वप्रथम सरकारने मानक वजावट म्हणून दिलेले 50 हजार वजा करा. अशा प्रकारे तुमचे करपात्र उत्पन्न आता १० लाख रुपये झाले आहे.

2) आता तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा दावा करू शकता. यामध्ये तुम्ही मुलांची शिकवणी फी, पीपीएफ, एलआयसी, ईपीएफ, म्युच्युअल फंड (ईएलएसएस), गृहकर्जाचे मुद्दल इत्यादींचा दावा करू शकता. अशा प्रकारे, तुमचे करपात्र उत्पन्न येथे 8.5 लाख रुपये झाले आहे.

3) तुम्हाला 10.5 लाखांच्या पगारावर कर शून्य (0) करण्यासाठी 80CCD(1B) अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत 50 हजारांची गुंतवणूक करावी लागेल. अशा प्रकारे तुमचा करपात्र पगार 8 लाख रुपयांवर आला आहे.

4) आता आयकराच्या कलम 24B अंतर्गत, तुम्ही 2 लाख रुपयांच्या गृहकर्जाच्या व्याजावर कर सूट मागू शकता. अशा प्रकारे, आता तुमचे करपात्र उत्पन्न 6 लाख रुपयांवर आले आहे.

5) आयकराच्या कलम 80D अंतर्गत, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी (पत्नी आणि मुलांसाठी) 25 हजार रुपयांच्या वैद्यकीय आरोग्य विम्याचा दावा करू शकता. याशिवाय ज्येष्ठ नागरिक पालकांसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी ५० हजारांचा दावा करू शकतात. एकूण 75 हजारांचा आरोग्य विमा प्रीमियम क्लेम केल्यानंतर तुमचे करपात्र उत्पन्न 5.25 लाखांवर आले आहे.

6) आयकराच्या कलम 80D अंतर्गत, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी (पत्नी आणि मुलांसाठी) 25 हजार रुपयांच्या वैद्यकीय आरोग्य विम्याचा दावा करू शकता. याशिवाय ज्येष्ठ नागरिक पालकांसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी ५० हजारांचा दावा करू शकतात. एकूण 75 हजारांचा आरोग्य विमा प्रीमियम क्लेम केल्यानंतर तुमचे करपात्र उत्पन्न 5.25 लाखांवर आले आहे.

7) आता तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला 25 हजार रुपये कोणत्याही संस्थेला किंवा ट्रस्टला दान करावे लागतील. तुम्ही त्यावर आयकर कलम 80G अंतर्गत दावा करू शकता. 25 हजार दान केल्यावर तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाखांवर आले.

तुम्हाला शून्य कर भरावा लागेल

आता तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये झाले आहे. 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने तुमचा कर 12,500 रुपये होतो. मात्र यावर सरकारकडून सूट आहे. या प्रकरणात तुमची कर दायित्व शून्य होते.

इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल, तर...? पाहा आता काय करता येईल

आपले इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही आयकर विभागाकडे दाखल केलेय ना? - त्याची अखेरची मुदत ३१ जुलै २०२२ होती.

काय म्हणता? अजूनही तुम्ही आयकर रिटर्न भरलेले नाही? - ठीक आहे, त्यामुळे फार गांगरुन जाण्याची गरज नाही, पण लक्षात ठेवा, एक जागरूक नागरिक म्हणून आयकर रिटर्न वेळेत भरणं ही आपली जबाबदारी आणि कर्तव्यही आहे. त्यात कोणतीही हयगय करू नये.

पण, मग आता काय करता येईल?

काही कारणानं तुमचं आयकर रिटर्न भरणं राहिलं असेल, तर ठराविक दंड भरून तुम्हाला तुमचे आयकर रिटर्न भरता येऊ शकेल. पण रिटर्न भरायला तुम्ही उशीर केल्यामुळे कदाचित आणखीही थोडा भुर्दंड तुम्हाला बसू शकेल.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

दंडासहित आयकर रिटर्न भरण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. मात्र त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याची गरज नाही. शक्यतो जेवढ्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर रिटर्न भरणे कधीही चांगले. अन्यथा आपल्या खिशातून जाणाऱ्या रकमेत वाढ होऊ शकते.

*आयटीआर भरल्यानंतर ई व्हेरिफाय करणे आवश्यक, रिटर्न फाइल केल्यानंतर 30 दिवसांत करा ई व्हेरिफाय*

जर तुम्ही आयटीआर भरला असेल तर आता त्याचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्याशिवाय फॉर्म अपूर्ण मानला जातो. ITR फाइल करण्याची शेवटची स्टेप म्हणजे फॉर्म सबमिशन नाही तर व्हेरिफिकेशन आहे. तुम्ही ही ऑनलाइन व्हेरिफिकेशन करा. 30 दिवसांच्या आत व्हेरिफाय आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन न करता आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. व्हेरिफिकेशन नंतरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची आयटीआरवर प्रक्रिया करतो. याशिवाय जर आयटीआरचे व्हेरिफिकेशन नाही तर तुमचा रिफंड अडकेल.जर तुम्ही व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचा आयटीआर फाइल म्हणून गणला जाणार नाही. (online verification) ई फिकेशन करण्यासाठी संपर्क करा.

साळवे इंटरप्राईजेस...  सृष्टी महा-ई-सुविधा..  संतोष विठ्ठल साळवे. 7900094419

ज्या पद्धतीनं आपण आपला नेहमीचा रिटर्न दाखल करतो, त्याच पद्धतीनं आताही तुम्हाला तुमचा रिटर्न दाखल करता येईल. फरक फक्त इतकाच की, 'पार्ट ए' मध्ये 'जनरल इन्फर्मेशन'च्या ऐवजी कलम १३९(४) अंतर्गत 'बिलेटेड रिटर्न' हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. रिटर्न भरण्याच्या तपशीलात बाकी फारसा काही फरक नाही, पण उशिरा रिटर्न भरत असल्यामुळे तुमच्या खिशाला थोडी चाट मात्र नक्कीच बसेल.

जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1) जेवढा कर बाकी आहे, त्यानुसार कलम २३४ ए अंतर्गत दरमहा एक टक्का व्याज भरावे लागेल.

2) रिटर्न उशिरा भरत असल्यामुळे कलम २३४ एफ अंतर्गत आयकर विभाग तुमच्याकडून पाच हजार रुपये दंड आकारू शकतो. तथापि, तुमचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे. विलंबित रिटर्न भरण्यापूर्वी दंडाची ही रक्कम भरणे आवश्यक आहे.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

3) तुम्ही जर कर परताव्यासाठी पात्र असाल तर, कर विभाग कलम २४४ ए अंतर्गत व्याज देते, ज्याचा काही भाग विवरणपत्र उशिरा दाखल केल्यामुळे तुम्हाला गमवावा लागेल.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ.. 7900094419*

https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...