हा ब्लॉग शोधा

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

*गावकऱ्यांनो आता एक फोन करूनही बुक करता येणार कोरोना लस; सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी*

 संतोष साळवे...7900094419


*गावकऱ्यांनो आता एक फोन करूनही बुक करता येणार कोरोना लस; सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी*

 देशात लसीकरण मोहीम सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. याच दरम्यान लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) चे हेड आरएस शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 1075 कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. जिथे फोन करून कोरोना लसीसाठी अपॉईंटमेंट बूक करता येणार आहे. ग्रामीण भागात तंत्रज्ञान आणि इंटरनेट नसल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिक सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून  रेजिस्ट्रेशन करू शकतात आणि स्लॉटही बुक करू शकतात. त्यासाठी सरकारकडून '1075' टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. 

 45 वर्षांवरील नागरिक हे थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करुन लस घेता येईल. लसीचा पुरवठा कमी असल्याने 18 ते 45 वयोगटातील लोकांना लसीकरणासाठी काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

मात्र ही तात्पुरती समस्या आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे

*आरोग्य विमा

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे.

कोरोना काळात प्रत्येकजण आरोग्य विमा काढत आहे. हा एक समजदारीचा निर्णय आहे. परंतु आरोग्य विमा महागड्या खर्चाला वाचवण्यासोबतच तुमचा टॅक्सदेखील वाचवू शकतो. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहात तर आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्ही 25 हजारापर्यंत रक्कम वाचवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांचे प्रीमियम करू शकता. त्यामुळे सेक्शन 80 डी च्या माध्यमातून सूट मिळू शकते. यामध्ये आपण मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. जर तुमचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर तुम्हाला 50 हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो.आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419*

*Corona Vaccine Registration : 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कशी कराल नोंदणी?*

देशभरात एक मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. या शनिवारपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती 18 ते 44 वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे.

सरकारनं स्पष्ट केलं आहे की, या लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु ॲपचा वापर करु शकता. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिर्वाय असेल.

*लसीकरणाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं कराल?*

कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर रजिस्ट्रेशन करु शकतात.

www.cowin.gov.in या वेबसाईटवर लॉगइन करा.

Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा.

Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

जो मोबाईल क्रमांक रजिस्टर कराल त्या नंबरवर OTP येईल. तिथे टाका आणि Verify वर क्लिक करा.

Vaccine Registraction form दिसेल त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि Submit वर क्लिक करा.

तुम्ही vaccine साठी registraction केल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.

त्यानंतर schedule appointment वर क्लिक करा. आणि त्यामध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिन कोड टाका.

लसीकरणासाठी Session निवडा, सकाळचे किंवा दुपारचे.

Vaccin center आणि Date निवडा.

Appointment book करुन ती confirm करा.

Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

त्यामुळे vaccination center वर vaccine देणं सोपं होईल आणि गर्दीही होणार नाही.

याच पद्धतीनं तुम्ही आरोग्य सेतू अॅपवरही रजिस्ट्रेशन करु शकता.    

           


*लस घेताना यापुढे हा चार अंकी कोड दाखवणं गरजेचं! CoWIN पोर्टलवर महत्वपूर्ण अपडेट*

देशातील सर्व नागरिकांसाठी लसीकरणाच्या मोहीमेला वेग आला आहे. कोविन CoWIN कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येत आहेत.  अशातच काही लोकांना लसीची तारिख मिळतेय परंतु ते त्या तारखेला जाऊ शकत नाहीये. परंतु तरीही त्यांना लस घेतल्याचा मॅसेज येत आहे. संशोधनानंतर डेटा एंन्ट्रीमधील वॅक्सिनेटरकडून ही चूक झाल्याचं दिसून आलं आहे.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*CoWIN सिस्टिमकडून नवीन फीचरची घोषणा*

कोविन नोंदणी केल्यानंतर किंवा करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता. सिस्टिमने नवीन फीचर जारी केले आहे. यानुसार चार अंकी सुरक्षा कोड 8 मे पासून सुरू होणार आहे. यानुसार तुम्ही ठरलेल्या दिवशी लस घ्यायला गेलात की, तो 4 अंकी सुरक्षा कोड तुम्हाला विचारेल. त्यानंतर तो पोर्टलमध्ये अपडेट केला जाईल. कोड अपडेट केल्यानंतर तुम्ही लस घेतल्याची पुष्टी केली जाईल.

*या कागदपत्रांची गरज*

लसीकरणादरम्यान, अपॉइंटमेंट स्लिप दाखवणे गरजेचे असेल. त्यावर 4 अंकी सुरक्षा कोड देखील असेन. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर SMS येईल की, तुम्ही यशस्वीरित्या लस घेतली आहे. 

 *कोविन पोर्टल -*

 https://www.cowin.gov.in/home

कोविन पोर्टलवर नव्याने नोंदणी करण्यासाठी - https://selfregistration.cowin.gov.in/

आरोग्यसेतू अॅप - https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu 

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!  

 ----------------------------------------------------------------साळवे इंटरप्राईजेस.सृष्टी महा ई सुविधा 7900094419 https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV



सोमवार, २६ एप्रिल, २०२१

गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, फास्टॅग (Fastag) जाणून घ्या सर्व काही!!



गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, फास्टॅग (Fastag) जाणून घ्या सर्व काही!!

सर्व चारचाकी वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. होय, सरकारकडून FASTag शी संबंधित एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता सरकारने वाहनाच्या विंडशील्डवर FASTag चिकटविणे अनिवार्य केले आहे.

बरेच लोक FASTag विंडशील्डवर चिकटवण्याऐवजी कारच्या आत किंवा खिशात ठेवतात. ज्यामुळे टोल प्लाझावर विनाकारण विलंब होतो आणि इतर राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांची गैरसोय होते.

गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल

राष्ट्रीय महामार्गावरील वापरकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने वाहनाच्या आतील बाजूस विंडशील्डवर FASTag चिकटविणे अनिवार्य केले आहे. या नवीन नियमानुसार, FASTag विंडशील्डवर आढळला नाही, तर वापरकर्त्यांना दुप्पट टोल फी भरावी लागेल, असे सांगण्यात आले आहे. अधिकृत प्रकाशनातून असे समोर आले आहे की, NHAI ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत की, समोरच्या विंडशील्डवर FASTag आतून न आढळल्यास टोल लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या वापरकर्त्यांकडून दुप्पट शुल्क आकारले जाईल.


वारंवार 'असे' केल्यास तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महामार्गावर वाहन चालवताना फास्टॅगच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांकडून केवळ दुप्पट टोलच आकारला जाणार नाही. तर, CCTV मध्ये रेकॉर्ड केलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाद्वारे युजर्सना ब्लॅकलिस्टमध्ये देखील टाकले जाईल.

जर तुम्हाला फास्टट्रॅग रिचार्ज करायचा असेल तर संपर्क साधा  7900094419
                          



https://www.facebook.com/watch/?v=958467078018572

कार विकायची असेल तर फास्टॅगचे काय होईल? जाणून घ्या.

आपण कार विकल्यास काय होईल?

आपण आपली कार विकल्यास, आपल्याला आपला फास्टॅग बदलावा लागेल, कारण फास्टॅग आपल्या बँक खात्याशी संलग्न असेल. अशा परिस्थितीत आपल्याला आपला फास्टॅग बंद करावा लागेल. एक गोष्ट लक्षात असू द्या की आपला फास्टॅग हस्तांतरित अर्थात ट्रान्सफर केला जात नाही. तथापि, सध्या काही पेमेंट प्लॅटफॉर्मवर फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्याय दिला जात आहे. ज्या माध्यमातून वाहन हस्तांतरणासह फास्टॅगदेखील हस्तांतरीत होत आहे. या प्रक्रियेमुळे आपला फास्टॅग दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याशी जोडणे शक्य होत आहे.

फास्टॅग बंद किंवा हस्तांतरीत कसा करू शकतो?

आपला फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक किंवा वॉलेट कंपनीशी संपर्क साधावा लागेल. आपण ग्राहक सेवा केंद्राच्या नंबर्सवर कॉल करून आपण सहजपणे फास्टॅग बंद करू शकतो. आवश्यक असल्यास आपला नवीन टॅग बनवून घेता येईल. याशिवाय पेटीएममध्ये फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. त्याआधारे आपण आपला फास्टॅग इतर कोणत्याही फोन नंबरवर हस्तांतरीत करू शकतो. त्यानंतर फास्टॅग दुसऱ्या नंबरशी संलग्न केला जाईल. आपण पेटीएमच्या अ‍ॅपवरून हे कार्य करू शकतो. फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला ग्राहक सेवा केंद्राशी बोलून घेणे आवश्यक आहे.


काच किंवा टॅग फुटल्यास काय करावे?

जर तुमच्या कारची काच फुटली किंवा टॅग तुटला तर तुम्ही नवीन फास्टॅग मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल किंवा जेथे फास्टॅग उपलब्ध असेल तेथे तुम्हाला जावे लागेल. तेथे जाऊन तुम्ही नवीन फास्टॅग घेऊ शकता. फास्टॅगकडून हा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या गाडीची काच फुटली वा या ना त्या कारणामुळे फास्टॅग तुटला तर अशा परिस्थितीत आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा.

FASTag | आता व्हॉट्सॲपसह 'या' पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय

रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्‍टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. सरकारने 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सरकारकडून ही मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गाडीवर फास्टॅग लावलं नसेल, तर तुम्हाला टोल नाक्यावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (ICICI Bank FASTag Service)

जर तुम्हाला फास्टॅग काढायचा असेल, तर तो तुम्ही आता मोबाईल ॲप किंवा बँकद्वारेही काढू शकता. सध्या ICICI या बँकेकडूनही फास्टॅग दिला जात आहे. हा फास्टॅग तुम्ही पाच प्रकारे मिळवू शकता.विशेष म्हणजे तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक नसाल तरीही तुम्ही फास्टॅग बनवू शकता.

1).ICICI बँक फास्टॅग पोर्टल

ICICI बँकेच्या फास्टॅग पोर्टलवरुन फास्टॅग मिळवण्यासाठी www.icicibank.com/fastag या लिंकवर जा. यानंतर 'New Customer - Apply Now या ठिकाणी क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर थेट ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती आणि पैसे भरा. त्यानतंर तुमची फास्टॅगची ऑर्डर प्रोसेस केली जाईल. हा टॅग तुम्हाला तुमच्या पत्त्यावर मिळेल.

2).गुगल पे

गुगल पे द्वारे फास्टॅग घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी गुगल पे सुरु करा. यात Businesses या कॅटगरीत गेल्यानंतर त्याखाली 'ICICI Bank FASTag' या ठिकाणी क्लिक करा. यानंतर Buy new FASTag यावर क्लिक करा. यात तुमचा पॅन कार्ड, आरसी कॉपी, गाडीचा नंबर आणि पत्ता हा तपशील भरा. यानतंर तुमच्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून पैसे भरा. यानंतर तुमच्या फास्टॅगची प्रोसेस केली जाईल. हा फास्टॅग तुम्हाला तुमच्या घरी पाठवला जाईल.


3).iMobile Pay app

ICICI बँकद्वारे फास्टॅग बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन iMobile Pay app डाऊनलोड करावा लागेल. या ॲपवर लॉगिन केल्यानंतर तुम्ही Shop या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही FASTag हे क्लिक करा. यानंतर Buy New क्लिक करुन तुमच्या वाहनांसंबधीची माहिती भरा. यानंतर पेमेंट करुन फास्टॅगसाठीची ऑर्डर प्रोसेस करा.

4).ICICI बँक इंटरनेट बँकिंग

नेट बँकिंगद्वारे फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर बँकिंगवर खातं असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्ही 'Payments & Transfer' वर क्लिक करा. यापुढे जाऊन 'Buy/Recharge FASTag' वर क्लिक करा. यानतंर तुम्ही आवश्यक ती माहिती आणि पैसे भरुन फास्टॅग प्रोसेस करता येईल. यानंतर तुमचा फास्टॅग प्रोसेस होईल आणि तो थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.

5).व्हॉट्सॲप

व्हॉट्सॲपद्वारेही तुम्हाला फास्टॅगसाठी अप्लाय करता येईल. यासाठी तुम्हाला 8640086400 या मोबाईल क्रमांकावर Hi मॅसेज करावा लागेल. यानंतर 3 क्रमांकाचा 'ICICI Bank FASTag services' या पर्याय निवडा. यानंतर 'Apply for a new tag' यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक लिंक दिली जाईल. या लिंकवर केल्यानंतर तुम्ही ICICI फास्टॅग ॲप्लिकेशन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. यात महत्त्वाची माहिती भरल्यानंतर त्याचे पेमेंट केले. यानंतर तुमचा फास्टॅग प्रोसेस केला जाईल. (ICICI Bank FASTag Service.                                                                                      जर तुम्हाला फास्टट्रॅग रिचार्ज करायचा असेल तर खालील नंबर वर संपर्क साधा..  7900094419     



मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------   


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV

*Instagram अकाउंटवरून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या सोपा मार्ग*

 संतोष साळवे...7900094419

 
*Instagram अकाउंटवरून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या सोपा मार्ग* 
                                                            
आजकाल बहुतेक लोक Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडिया साइटवर उपलब्ध असतात. 2010 साली आलेलं इन्स्टाग्राम हे अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. जगातील कोट्यावधी लोक हे व्यासपीठ वापरत आहेत. आपण सर्वजण आपले फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत करतो. बरेच वापरकर्ते येथे नेहमीच ऑनलाइन असतात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? की आपण इन्स्टाग्रामवरुन पैसेदेखील कमवू शकतो?

क्रिकेटर विराट कोहलीपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी इन्स्टाग्रामवरून लाखो रुपये कमवले आहेत. इन्स्टाग्राम व्यवसाय खात्यासह बर्‍याच सेवा प्रदान करते. आज आम्ही सांगणार आहोत की आपण इन्स्टाग्रामवर business account कसे उघडायचे आणि त्यामधून आपण चांगली कमाई कशी करू शकता. 

                       


*Instagram बिजनेस प्रोफाइल काय आहे?*

इंस्टाग्राम एक पूर्णपणे विनामूल्य प्लॅटफॉर्म आहे. आपण येथे आपले business account तयार करुन इन्स्टाग्राम पेजवर जाहिरात करू शकता आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता. याव्यतिरिक्त आपले followers ऑनलाईन कधी असतात, त्यांचा देश आणि शहर कोणते, हे देखील समजते. आपली कोणती पोस्ट किती लोकांनी पाहिली आणि किती impression आले याबद्दल आपल्याला माहिती देखील मिळेल. यासह आपला व्यवसाय बराच सुधारू शकतो. आपण आपल्या इंस्टाग्राम व्यवसाय खात्यातून पैसे कमवू शकता.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*Instagram बिजनेस अकाउंट कसे उघडायचे?*

*सर्वात अगोदर Instagram open करा. तुमच्या समोर एक पेज येईल जिथे sign up करा किंवा log in करा असे लिहले असेल.

*येथे आपल्याला फोन नंबर आणि email मागितला जाईल. आपण डिटेल भरुन next वर click करा.

*आता आपल्याला नाव आणि password विचारला जाईल, त्यानंतर next वर click करा.

*आता आपल्याला पेज उघडल्यानंतर मित्रांची यादी दिलेल. एक तर त्यांना follow करा किंवा next वर click करा.

*आता आपल्याला Facebook सोबत connect करण्यास सांगितले जाईल. तुम्हाला करायचे असेल तर करा अथवा skip वर click करा.

*त्यानंतर फोटो add करण्याचा पर्याय येईल. तुम्ही फोटो add करा अथाव skip वर click करा.

*आता login info ला सेव करण्यासाठी सांगितले जाईल, सेव किंवा skip वर click करा.

*तुमचे Instagram account तयार झालेले असेल आता याला business account मध्ये बदलायचे आहे.

*आपल्या येथे तीन बिंदु दिसतील त्यावर click करा.

*त्यानंतर switch to business account वर click करा. त्यानंतर continue वर click करा.

*इथं आपल्या account ची category निवडा आणि next click करा.

*आपली माहिती पाहा आणि next वर click करा.

*आपले Facebook page निवडा किंवा skip वर click करा.

*आता go to profile वर click करा. आता आपले account बिजनेस अकाउंट झाले आहे.

इस्टाग्रामवर business account तयार केल्यानंतर, आपण त्यावर traffic वाढवा आणि आपल्या brand ची जाहिरात करा. याचा तुमच्या व्यवसायाला फायदा होईल. आपले अधिक फॉलोअर्स असल्यास, कंपनी त्यांच्या जाहिरातीसाठी तुम्हाला संपर्क करतील.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!               *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!     ----------------------------------------------------------------साळवे इंटरप्राईजेस ..सृष्टी महा ई सुविधा 7900094419* संतोष विठ्ठल साळवे                                                 https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV (Whatsapp Group Link)


*मायक्रोफायनान्स म्हणजे काय?*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 


*मायक्रोफायनान्स म्हणजे काय?*

मायक्रोफायनान्स म्हणजे सूक्ष्म वित्तपुरवठा किंवा लहान कर्ज देणे व त्याची परतफेड करून घेणे एवढा मर्यादित अर्थ लावला जातो. प्रत्यक्षात मात्र याचा अर्थ फक्त कर्ज पुरवठ्यापुरता मर्यादित नाही. आर्थिक समावेश किंवा वित्तीय समावेश या संकल्पनेशी मिळताजुळता त्याचा अर्थ आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक सुविधा (Financial Services) अल्प उत्पन्न असणाऱ्या गटाला किंवा गरिबांना उपलब्ध करून देणे असा त्यामागचा मूळ अर्थ आहे. या आर्थिक सुविधांमध्ये बचतीची सुविधा (Saving), छोट्या कर्जाची सुविधा (Credit/Loan), पैसे हस्तांतरण (Money Transfer), सूक्ष्म पेन्शन (Micro Pension) चा समावेश होतो. मात्र आज ही आपल्याकडे मायक्रोफायनान्स म्हटलं की कर्ज देणे आणि वसुली करणे येवढा मर्यादित अर्थ काढला जातो किंवा त्याच गोष्टींवर भर दिला जातो. भारतामध्ये या सुविधा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जातात. मुख्यत: खाजगी बँका, सहकारी बँका, स्मॉल फायनान्स बँका, व खाजगी मायक्रो फायनान्स संस्था (Private Microfinance Institutions/MFIs) सध्या मायक्रोफायनान्सच्या व्यवसायात आहेत.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

 *मायक्रोफायनान्सची गरज का?*

जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा या संकल्पनेचा जन्म हा ज्या गरीब लोकांपर्यंत पारंपारिक वित्तीय संस्था (बँका) पोहचू शकत नाहीत अशा लोकांसाठी आर्थिक सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने झाला आहे. 'Reaching to unbanked' हा प्रमुख उद्देश या पाठीमागे आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले बँकांचे जाळे हे तितके मजबूत नाही तसेच या बँका गरीब लोकांना विनातारण कर्ज देवू शकत नाहीत. कर्जासाठी लागणारे तारण किंवा कर्जाची हमी घेणाऱ्या लोकांची कमतरता असल्याने गरिबांना किंवा छोट्या व्यावसायिकांना बँकेकडून कर्ज मिळत नाही. तसेच बँकाकडून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे व लागणारा वेळ ही मोठी अडचण या वर्गाकडे असते. त्यामुळे मायाक्रोफायनान्स शिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही.

*मायक्रोफायनान्सची वैशिष्टे:*

• बचत

• छोट्या रकमेचे व छोट्या कालावधीचे कर्ज

• तारणाशिवाय कर्ज

• कर्जाच्या हमीची गरज नाही

• कमीत कमी कागदपत्रांच्या आधारावर कर्जाची सुविधा

• नियमित परतफेडीची सुविधा

• व्याज व मुद्दल अशी परतफेडीच्या हफ्त्याची सुविधा

• तुलनेने बँकांपेक्षा जास्त तर सावकारांपेक्षा कमी व्याजदर

• उतरते व्याज (शिल्लक मुदलावरती व्याज)

• घरपोच कर्जाची व परतफेडीची सुविधा

• कर्जाशिवाय इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्याची क्षमता

• नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्यांना जास्त रकमेच्या कर्जाची सुविधा

*मायक्रोफायनान्सच्या पद्धती*

१.) *ग्रामीण पद्धत* (Grameen Methodology): ग्रामीण पद्धत ही एक जुनी व बांगलादेशमध्ये ग्रामीण बँकेने अमलात आणलेली पद्धत असून या पद्धतीचाही वापर भारतातील मायक्रोफायनान्स संस्था करतात. या पद्धतीमध्ये गाव पातळीवरती पाच सदस्यांचा गट तयार केला जातो. अशा आठ गटांचे मिळून एक सेंटर तयार केले जाते. सेंटरच्या प्रत्येक आठवड्याला नियमित बैठका होतात. हे सेंटर नियमित ठराविक रकमेची बचत करतात. सेंटरचे नेतृत्व करणारे गटातील सदस्यांना कर्ज देण्यासाठी शिफारस करतात. त्यानंतर मायक्रो फायनान्स संस्थेकडून अशा सदस्यांना कर्ज पुरवठा केला जातो. या पद्धतीमध्ये कर्ज देणाऱ्या संस्थेचा खर्च व वेळ वाचतो.

२)*संयुक्त दायित्व गट* (Joint Liability Group): या पद्धतीमध्ये चार ते सहा लोक एकत्र येवून एक गट तयार करतात व कर्जाची मागणी करतात. या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे या गटातील सदस्य एकमेकांच्या कर्जाची जबाबदारी घेतात. १९५० साली या पद्धतीचा अवलंब स्टेट बँक ऑफ इंडियाने केला होता. पण त्यातून सकारत्मक परिणाम साधता आला नाही. थायलंडमधील Bank for Agriculture and Co-operation (BAAC) यांनी या पद्धतीचा वापर केला. भारतात पुन्हा BASIX या गरिबांचे जीवनमान उंचावणाऱ्या कंपनीने या पद्धतीचा वापर केला व त्यात यश संपादन केले.

३).*स्वयं सहायता गट* (Self-Help Group): स्वयं सहायता गट ही संकल्पना आपल्याकडे लोकप्रिय आहे. कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त वीस महिलांचा गट तयार करणे, नियमित बैठका घेणे, नियमित बचत करणे, बँकेमध्ये खाते काढणे, अंतर्गत कर्ज वाटप करणे व नंतर बँकेकडून किंवा मायक्रोफायनान्स संस्थेकडून कर्ज घेणे अशी कार्य पद्धती स्वयं सहायता गटाची असते. अशा गटांना मायक्रोफायनान्स संस्थेकडून कर्ज पुरवठा केला जातो. मुळात स्वयं सहायता गटांचा उद्देश हा फक्त आर्थिक उलाढाली पुरता मर्यादित नसून त्यामध्ये सामाजिक विकासाची अपेक्षा सुद्धा आहे. PRADAN , नाबार्ड, धान फौंडेशन, राष्ट्रीय, खाजगी तसेच सहकारी बँका या पद्धतीमध्ये कर्ज वाटप करतात

रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

४)*वैयक्तिक कर्ज*: ही पद्धत गटाशिवाय वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणारी आहे. यामध्ये कर्जदाराकडून तारण घेवून कर्ज दिले जाते, मात्र फार कमी मायक्रोफायनान्स संस्थाकडून या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये जोखीम जास्त असल्याने याचा वापर कमी होतो.

अशा पद्धतीने जगात व भारतात मायक्रोफायनान्सची संकल्पना कार्यरत आहे.

     तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

     ----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे - एक जनजागृती चळवळ 7900094419*                                                                        https://chat.whatsapp.com/CEujEQSOix79UmL41Vxa4h

*जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या*

 संतोष साळवे...7900094419

*जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या*

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. Online अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत? त्याची प्रक्रिया काय आहे याबाबत आोण आज जाणुन घेणार आहोत.

*वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक गोष्टी -*

●खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज देणे अपेक्षित असते.

●अर्जात मृत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.

त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे याची माहिती असते.

●अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला, त्याच्या नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे, सर्व वारसांचे पत्ते, वारसाचे मयत व्यक्तीबरोबर असलेले नाते व शपथेवरील प्रतिज्ञापत्र सादर केले पाहिजे.

●नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात. हिंदू व्यक्तीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

◆वारसाच्या नोंदीची प्रक्रिया -*

●सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा. मृत्यू नंतर ३ महिन्यांच्या आत सर्व वारसांची नावे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा.

●वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. नंतर वारसांना बोलावले जाते. गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते. नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते.

●किमान १५ दिवसांनंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररित्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते /रद्द केली जाते.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

★वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे -*

●विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टँप लावलेला अर्ज व शपथपत्र

●मृत्यू प्रमाणपत्र

●तलाठी अहवाल / मंडळ अहवाल.

●शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा.

●मृत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची प्रत.

●शिधापत्रिकेची (रेशन कार्ड) प्रत.

●ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.

●सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा.

●वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी (वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगळे असतात)

●बँक, विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते.

●विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्लेम रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही.

●वारस हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट, इ. बाबींसाठी महत्त्वाचे असते.

*जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज ही करता येतो.*जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?-*

१) हा अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

२) या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक '७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली', अशी सूचना दिसेल व त्याखाली एक लिंक दिलेली आहे.

https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

३) त्यानंतर तुमच्यासमोर 'पब्लिक डेटा एन्ट्री' नावानं एक पेज ओपन होईल. यावरील 'Proceed to login' या पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट तयार करायचं आहे. त्यासाठी 'Create new user' यावर क्लिक करायचं.

४) मग 'New User Sign Up' नावाचं नवीन पेज उघडेल.

इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check availability या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग Security Questions मध्ये एक प्रश्न निवडून त्याचं उत्तर द्यायचं आहे.

५) ही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे.

६) त्यानंतर Address Details मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.

७) सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी लिहायची आहे, आणि मग save बटन दाबायचं आहे.

८) त्यानंतर या पेजवर खाली 'Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.' असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला 'Back' या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन म्हणायचं आहे.

१०) त्यानंतर 'Details' नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथं तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातल्या '7/12 mutations' वर क्लिक करायचं आहे.

११) त्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर 'User is Citizen' आणि बँकेचे कर्मचारी असाल तर 'User is Bank' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

एकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर 'Process ' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

१२) त्यानंतर तुमच्यासमोर 'फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क' नावाचे पेज ओपन होईल.

इथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.

त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, 'तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,' असा मेसेज तुम्हाला दिसेल.

१३) आता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे आपण 'वारस नोंद' हा पर्याय निवडला आहे.

त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून 'पुढे जा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

१४) त्यानंतर स्क्रीनवर आपला अर्ज मसूदा जतन केला आहे असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील 'ओके' बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मयताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे, सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथं टाकणं अपेक्षित आहे.

१५) पुढे 'खातेदार शोधा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मयताचे नाव निवडायचं आहे. एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडायचा आहे. नंतर मृत्यू दिनांक टाकायचा आहे.

हेल्थ इन्शुरन्स...

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

त्यानंतर 'समाविष्ट करा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग निवडलेल्या खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल.

त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न तिथं विचारण्यात येईल. तुम्ही वारसांपैकी असाल तर होय, नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथं आता तुम्हाला वारस म्हणून जी नावं लावायची आहेत, त्यांची माहिती भरायची आहे. यात नाव, वडील किंवा पतीचं नाव, आडनाव लिहायचं आहे. पुढे धर्म निवडायचा आहे, तुमच्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियम पाळले जातात. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहायचं आहे आणि मग जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचं वय आपोआप तिथं येईल. पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल.

पुढे पोस्ट ऑफिस निवडायचं आहे. त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकायचं आहे. पुढे मयताशी असलेलं नातं निवडायचं आहे.

मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून - जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4 मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता.

ही सगळी माहिती भरून झाली की, साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचं नाव नोंदवायचं असेल तर तिथं असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

अशारितीनं सगळ्या वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहे.

इथं तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे. ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याहेतूनं रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारेही तुम्ही जोडू शकता.

तसंच एका कागदावर एक शपथपत्रं लिहून ते इथं जोडणं अपेक्षित असतं. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावं, त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचं असतं.

कागदपत्रे जोडल्यानंतर तिथं फाईल अपलोड झाली असा मेसेज येतो.                                                                     

त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणापत्र दिसेल.

सगळ्यात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे/Agree या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात जमा केला जाईल.

त्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नावं नोंदवली जातात.. 

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!      ----------------------------------------------------------------*संतोष विठ्ठल साळवे -एक जनजागृती चळवळ 7900094419*                                                                       https://chat.whatsapp.com/CUJuewT9TUt9dvoODZQqWz

रविवार, २५ एप्रिल, २०२१

*लाखो-करोडो सिलेंडरपेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही 6 झाडं*

 संतोष साळवे...7900094419


 *लाखो-करोडो सिलेंडरपेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही 6 झाडं*

कडुलिंब - कडुलिंबांचं झाडं अनेक औषधी गुणांनीयुक्त आहे. हे झाडं पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. हे एकप्रकारे नॅचरल प्यूरिफायरच आहे. वातावरणातील अशुद्धी साफ करुन हवेत ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम हे झाड करतं. कडुलिंबांचं झाड लावल्याने आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

हेल्थ इन्शुरन्स...

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

जांभूळ - जांभळाचं झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुद्ध करतं. जांभळाच्या बियाही अतिशय फायदेशीर आहेत. हे झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही रिलीज करतं.

वड - वडाच्या झाडाला नॅशनल ट्री म्हटलं जातं. वडाच्या झाडाची महत्त्वाची बाब म्हणजे, हे झाडं किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं, हे त्याच्या सावलीवर अवलंबून असतं. म्हणजेच वडाचं झाडं जितकं मोठं असेल, तितका जास्त ऑक्सिजन मिळतो

अशोक - अशोकाचं झाडंही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करुन पर्यावरणात सोडतं. हे झाडं केवळ ऑक्सिजनचं प्रमाण वाढवत नाही, तर अशोकाचं झाड दुषित गॅसही शुद्ध करण्याचं काम करतं.

अर्जुन - अर्जुन वृक्षाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. यामुळे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो, तसंच पर्यावरणातील अशुद्ध वायूही शुद्ध करण्याचं काम हे झाड करतं.

पिंपळ - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाचं झाड इतर कोणत्याही झाडाच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करतं. हे झाड 60 ते 80 फुटांपर्यंत लांब असू शकतं. हे झाडं त्याच्या आयुष्यात इतका ऑक्सिजन तयार करतं, की एखादी फॅक्टरीही करू शकत नाही. 

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 ---------------------------------------------------------------साळवे इंटरप्राईजेस- सृष्टी महा ई सुविधा -संतोष विठ्ठल साळवे 7900094419                                             https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

*शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?*

( BLOGGER )  संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 



 *शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?*

राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार *"शरद पवार ग्रामसमृद्धी' योजना* आणली आहे. नुकतीच ही योजना राबविण्यास मान्यताही मिळाली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये 

1) गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे,

2) शेळी पालनासाठी शेड बांधणे,

3) कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे,

4) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान दिले जाणार आहे.

*असे मिळणार अनुदान*

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम : यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.

शेळीपालन शेड बांधकाम : 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

*ग्रामपंचायत सरपंच, उप-सरपंचाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य:* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

कुक्कुटपालन शेड बांधकाम : 100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग : शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना पात्रता निकष

-लाभार्थी मार्गदर्शकतत्त्वे
-अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
-अर्जदार ग्रामीण भागाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
-अर्जदाराने या योजनेंतर्गत शेतकरी असणे बंधनकारक आहे.

*असा करा अर्ज*

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार...

सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.

त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.

त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका.

आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.*

तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा.

लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास "हो' म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.

रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.

अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.

*शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.*

यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.

यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.

त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल.

एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!!     ------------------------------------------------

 आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419


भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...