हा ब्लॉग शोधा

रविवार, १३ जून, २०२१

श्यामच्या आई' पलिकडचे 'हे' साने गुरुजी तुम्हाला माहिती आहेत का?*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 



*'श्यामच्या आई' पलिकडचे 'हे' साने गुरुजी तुम्हाला माहिती आहेत का?*

 साने गुरुजी यांच जीवन

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. 

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.

‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
                                      बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
                                       राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।

या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी नागरिकांवर प्रभाव वाढला होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्या काव्यपंक्ती देखील जप्त केल्या होत्या.

साने गुरुजींचे प्रकाशित साहित्य –

  • अमोल गोष्टी
  • कर्तव्याची हाक
  • कला म्हणजे काय
  • आपण सारे भाऊ भाऊ
  • आस्तिक
  • इस्लामी संस्कृती
  • कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
  • क्रांती
  • गुरुजींच्या गोष्टी
  • गीताहृदय
  • कला आणि इतर निबंध
  • ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
  • गोड गोष्टी
  • गोड शेवट
  • गोष्टीरूप विनोबाजी
  • श्यामची आई (Shyamchi Aai)
  • श्यामची पत्रे
  • सोनसाखळी व इतर कथा
  • स्वप्न आणि सत्य
  • स्वर्गातील माळ
  • सुंदर पत्रे
  • हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
  • साधना – साप्ताहिक
  • सोन्या मारुती
  • रामाचा शेला
  • सती
  • संध्या
  • मानवजातीचा इतिहास
  • ते आपले घर
  • त्रिवेणी
  • धडपडणारी मुले
  • नामदार गोखले- चरित्र
  • विनोबाजी भावे
  • विश्राम
साने गुरुजीकृत काव्यपंक्ती

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-


खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे 
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडविली.

साने गुरुजी यांची मराठी साहित्य

गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.

 महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांचा 11 जूनला स्मृतीदिन आहे. साने गुरुजी यांनी लिहीलेल्या "शामची आई" या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. संस्कारगाथा अस या पुस्तकाच वर्णन करता येईल. कोवळ्या वयातील मुली-मुलांच्या मनात पालकांच्याबद्दल आदरभाव बाळगण्याचे, जातीआधारित अहंकार सोडून देण्याचे, श्रमाची प्रतिष्ठा राखण्याचे, निसर्गाविषयी कृतज्ञभाव जपण्याचे आवश्यक संस्कार या पुस्तकाने रुजवले आहे. एकुणातच समंजस आणि उदारमतवादी नागरिकत्व घडण्यास हे पुस्तक उपयोगी ठरलेले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या पुस्तकामुळेच साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा ठसठशीत बनली. 

आंतरभारतीचे स्वप्न उपस्थितांना समजावून सांगताना साने गुरुजी एकदा म्हणाले होते, माणसाच्या पायात काटा टोचल्यानंतर त्याची वेदना मेंदुमधे जाणवते, डोळ्यातील अश्रुवाटे ती वेदना व्यक्त होते आणि पायातील काटा काढण्यासाठी हात पुढे सरसावतात. पाय, हात, डोळे, मेंदू हे अवयव वेगवेगळे असले तरी वेदनेच्या प्रसंगात ते सर्वजण एकत्र येऊन वेदना सुसह्य करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी एकोप्याने कृती करतात. त्याचप्रमाणे आपण सर्व भारतीय वेगवेगळी भाषा बोलणारे असूत किंवा वेगवेगळी श्रद्धा बाळगणारे असूत आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. एकमेकाच्या अडीअडचणीला उभे राहिले पाहिजे. साने गुरुजींच्या अशा भावनाशील बोलण्याने, लिखाणाने आणि कृतीने साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आणखी ठसठशीत बनली. साने गुरुजींच्या मृत्युनंतर आपण त्यांची हीच मातृह्रदयी प्रतिमा सतत प्रसारित केली. अस म्हणतात की कोणत्याही महान व्यक्तीमत्वाचे अनुयायी त्या महान व्यक्तीच्या जीवन कार्यातील आपल्याला झेपेल आणि रुचेल तेवढाच भाग स्विकारतात आणि तेवढाच भाग सतत सांगत रहातात. साने गुरुजींच्याबद्दलही काहीस असच झाल आहे का? सामाजिक सलोखा आणि परस्पर आदरभाव रुजवण्यासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य महान आहेच पण साने गुरुजींचं जिवितकार्य एवढ्यापुरतच मर्यादित नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला शिकवणं हा सुद्धा एक आवश्यक संस्कार असतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढवय्या वृत्ती साने गुरुजींच्यामधे होती की नव्हती? असेल तर ती पुढे का येत नाही? आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याला पचतील, रुचतील तेवढेच साने गुरुजी स्विकारल्यामुळे असं झालं असेल का?

'चले जाव' आंदोलनातील साने गुरुजी :ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनाच्या ठरावात ब्रिटीशांना "छोडो भारत" असे बजावण्यात आले होते तर हे घडवून आणण्यासाठी भारतीयांसाठी "करा अथवा मरा" चा आदेश होता. साने गुरुजींनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. भूमिगत राहून ब्रिटीशांच्या विरोधात रान उठवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. आपल्या ओजस्वी वाणीने ब्रिटीश राजवटीविरोधात युवती-युवकांच्या मनात अंगार फुलविण्याचे काम साने गुरुजी करत होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवती- युवकांनी चले जाव आंदोलनात स्वतःला झोकून दिले. या आंदोलनादरम्यान साने गुरुजींनी "क्रांतीच्या वाटेवर" ही पुस्तिका लिहीली. बरेच दिवस ही पुस्तिका अप्रकाशित होती. काही वर्षांपुर्वी साधना प्रकाशनाने विशेषांक स्वरुपात ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंसा-अहिंसा याबद्दलचे आपल्या मनातील विचार साने गुरुजींनी या पुस्तिकेत शब्दबध्द केले आहेत. ब्रिटीश राजवटीविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन तरुणी-तरुणांना करताना या पुस्तिकेत साने गुरुजींनी जे लिहीलय त्याचा थोडक्यात आशय असा आहे. काँग्रेस वर्कींग कमीटीच्या ८ आॕगस्ट १९४२ च्या ठरावाद्वारे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आहे. प्रत्येक भारतीयाने उद्यापासून स्वतःला स्वतंत्र नागरिक मानावे व तसा व्यवहार करावा असे मार्गदर्शन म. गांधीजींनी केले आहे. या ठरावानुसार आज भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय भुमीवरील ब्रिटीश राजवट ही परकीय राजवट ठरते. परकीय राजवटीला भारतीय भूमीवरुन घालवून देण्यासाठी आपण जे करत आहोत ते एक प्रकारचे युद्धच ठरते. मानवी जीवन अनमोल आहे. या लढ्यात होता होईल तो जिवीतहानी टाळण्याचाच आपला प्रयत्न असायला हवा आणि तो राहीलच पण परकीय सत्तेविरुद्धच्या युद्धात हिंसा-अहिंसेची चर्चा अप्रस्तुत ठरते. साने गुरुजींच्या या भुमिकेबद्दल चर्चा होऊ शकते. पण बेचाळीसच्या चले जाव आंदोलनातील सहभागातून साने गुरुजींच्यामधील जो लढाऊ देशभक्त आपल्यासमोर येतो तो आपण समजून घेत आहोत का? इतरांना समजावून सांगतो का, हा खरा प्रश्न आहे. पुढे चले जाव आंदोलनात साने गुरुजींना अटक झाली. धुळे आणि नाशिक येथील कारागृहात त्यांना ठेवले होते. आंदोलनात सहभागी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगावीत म्हणून ब्रिटीश पोलीसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. हा मार सहन करण्याची प्रेरणा शामच्या आईच्या आठवणीतूनच साने गुरुजींना मिळाली असणार. त्यांनी मारहाण सहन केली मात्र आपल्या एकाही सहकाऱ्याचे नाव त्यांनी स्वतःच्या तोंडातून बाहेर पडू दिले नाही. मातृह्रदयी साने गुरुजींचा अशा प्रसंगातला निर्धारही तितकाच कणखर होता.

 शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण :साने गुरुजींच्यामधील संघटन कौशल्य खऱ्या अर्थाने नजरेत भरले ते काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाच्या वेळी. ग्रामीण भागात होत असलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी साने गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक दल उभारले होते. यातूनच राष्ट्र सेवा दलाची संकल्पना पुढे आली. ग्रामीण भागात होत असलेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भारताचे विविध प्रश्न काँग्रेसच्या अजेंड्यावर आणण्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. शेतकरी व कामकरी समुहांनी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे याकरिता गुरुजींनी खानदेश आणि लगतचा नाशिकपर्यंतचा भाग पिंजून काढला

आता उठवू सारे रान,आता पेटवू सारे रान,शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,कामकऱ्यांच्या राज्यासाठी,लावू पणाला प्राण!

हे गाणं गुरुजींनी याच काळात आणि याच कारणासाठी लिहीलेलं आहे. भारतातला शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतीउद्योग प्रचंड जोखमीचा बनलाय. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करत हजारो शेतकरी ऊन, पाऊस, थंडीत दिल्लीच्या सिमेवर तळ ठोकून आवाज उठवत आहेत. सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असुनही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही. सरकारची ही असंवेदनशीला निष्क्रीयता निषेधार्ह आहे. अशावेळी साने गुरुजींच्या या गाण्याने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुली-मुलांनी प्रेरणा घ्यायला हवी. शासनाची शेती आणि शेतकरीविरोधी धोरणे बदलवण्यासाठी गुरुजींचे हे गाणे पुन्हा एकदा या देशातील तरुणी आणि तरुणांच्या ओठावर यायला हवे.प्रताप मिलच्या कामगारांचा लढा :अंमळनेर येथील प्रताप मिलच्या कामगारांचा संप साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म. गांधीजींचे शिष्य असणारे साने गुरुजी गांधीजींच्याच भाषेत म्हणाले, कारखानदारांनी, विश्वस्तवृत्तीने वागले पाहिजे. उत्पादनात कामगारांच्या घामाचाही हिस्सा असतोच. कामगाराला आणि कामगारांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. संपकरी कामगारांसमोर बोलताना साने गुरुजींनी कामगारांच्या घामाची चोरी आणि कारखाना मालकाची लोभी वृत्ती याबाबत टिकास्त्र सोडले होते. हा संप यशस्वी झाला आणि प्रताप मिलच्या कामगारांना न्याय मिळाला. 

आज कामगार कायदे कमकुवत केले जात आहेत. काॕन्ट्रॕक्ट लेबर नावाच्या राक्षसानं कामगारांच्या न्याय्य अधिकारांना सुरुंग लावलाय. इथेही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने कामगार कायद्यात घातक बदल करुन कामगारांनी लढून मिळवलेले अधिकार हिरावून घेण्याचं काम चालवलय. कोरोनाच्या निमित्ताने आलेल्या लॉकडाऊनमुळे कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. व्यवस्था म्हणून आपल्याला सर्वांनाच आपली लाज वाटावी इतकी मजूरशक्तीची झालेली परवड जगाने पाहिली. तळात दडपलेलं विषमतेचं भयाण वास्तव कोरोनाच्या निमीत्ताने पृष्ठभागावर आलं. अशावेळी कामगारांच्या घामाची चोरी होऊ न देण्यासाठी, त्यांना सन्मानाने व समाधानाने जगता यावं यासाठी संविधानाच्या, कायद्याच्या कक्षेत राहून आपापल्या परीने काहीना काही कृती करण्याचं बळ साने गुरुजींच्या स्मृतीतून आपल्याला मिळायला हवं.

समाजातील जातिभेद, दलित लोकांना मिळणारी वागणूक, अस्पृश्यता या सारख्या अनेक रूढी व परंपराना साने गुरुजी यांनी कडाडून विरोध केला.

साने गुरुजी मातृह्रदयी होते. भावनाशील होते. आणि त्याचबरोबर लढवय्ये सुद्धा होते. खरे तर ज्याच्या मनातील संवेदनशीलता जागी आहे आणि ज्याच्या काळजातील भावना अद्याप थिजलेल्या नसतात अशी माणसेच नवनिर्माणकारी संघर्षात स्वतःला झोकून देवू शकतात. आज ११ जूनला साने गुरुजींच्या स्मृतीदिनीखरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावेअस सांगत वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींची आठवण तर काढुयाच आणि त्याचबरोबर शेतकरी, कामगार आणि शोषित जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी ठोस कृती करणाऱ्या, निर्धाराने संघर्ष करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींनाही अभिवादन करुया....

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।     https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*शिक्षणाचा अधिकार कायदा' (RTE)'अंतर्गत मोफत शाळा प्रवेशास सुरुवात*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 

*शिक्षणाचा अधिकार कायदा' ( RTE ) अंतर्गत मोफत शाळा प्रवेशास सुरुवात*

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९' मधील कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली आहे.

त्यानुसार सन २०२१-२२ या वर्षाकरीता दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी 'लॉटरी' काढण्यात आली.

'लॉटरी' द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ११ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांची 'लॉटरी' द्वारे निवड झाली असेल, त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश ३० जून २०२१ पूर्वी निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे का? तसे नसेल तर पॅनला तातडीने आधार कार्डशी लिंक करा कारण आता तारीख वाढविण्यात येणार नाही आणि तुम्हाला दंड भरावा लागेल. हे लक्षात घेता आता बँक आपल्या ग्राहकांना सतर्कतेचा मेसेज पाठवत आहे जेणेकरुन ग्राहक 30 जूनपूर्वी पॅनबरोबर आधार लिंक करू शकतील. वास्तविक, आयकर विभागाने पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख म्हणून 30 जून 2021 निश्चित केले आहे. 30 जूनपर्यंत आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यासाठी  संपर्क करा ...संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419


4) पालकांनी प्रवेशाकरीता घेऊन जाण्याची कागदपत्रेः

- प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.

- 'आर. टी. ई.' पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर 'click' करुन 'हमीपत्र' आणि 'ऍलोटमेंट लेटर' (Allotment Letter) ची प्रिन्ट काढून शाळेत घेऊन जावे.

5) फक्त निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांनीच 'Allotment Letter' ची प्रिन्ट काढावी.

6) निवड यादीतील बालकांच्या पालकांना 'लॉकडाऊन' मुळे / बाहेरगांवी असल्याने / किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि 'whatsapp / email' किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करुन आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

7) विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधीत पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

8) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे, त्याच पत्त्यावर 'Google location' मध्ये 'red' बलून दर्शविणे आवश्यक आहे. 'Location' आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.

9) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरुन (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

10) निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादी (Waiting List) मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर सूचना 'आर. टी. ई.' पोर्टलवर दिल्या जातील.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

बारावी विज्ञान ( सायन्स ) नंतर काय ? | बारावी Science नंतरचे कोर्स

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

वाचाल तर... वाचाल!!!

बारावी विज्ञान ( सायन्स ) नंतर काय ? | बारावी Science नंतरचे कोर्स

हा प्रश्न प्रत्येक विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलाचा व त्यांच्या पालकांच्या मनात येत असणार . बारावी झाली आता पुढे नक्की करायचं काय कोणता कोर्स करायचा सर्वकृष्ट कोर्स खाली दिले आहेत.

*नीट ( NEET ) शिवायही करता येतो वैद्यकीय अभ्यास; 'हे' आहेत १२ वी नंतरचे पर्याय* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे.

१२ वी विज्ञान पीसीएम (PCM)  ग्रुप नंतर अभ्यासक्रमांची यादी –

1) बीई किंवा बीटेक. (अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी)

2) अभियांत्रिकी पदविका

3) बी.एससी. (विज्ञान शाखेचा पदवीधर)

4) बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर Applicationsप्लिकेशन्स)

5) बी. आर्च. (आर्किटेक्चर बॅचलर)

6) बी.फार्म. (बॅचलर ऑफ फार्मसी)

7) बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)

8) कमर्शियल पायलट ट्रेनिंग (फ्लाइंग ट्रेनिंग)

9) सांख्यिकी पदवी

10) सागरी प्रशिक्षण कार्यक्रम

11) इतर डिप्लोमा प्रोग्राम

12) बी.डेस. (बॅचलर ऑफ डिझाईन)

13) बीआयडी (बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन)

14) फार्म डी (फार्मसीचे डॉक्टर)

15) बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)

16) बीबीएस (बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज)

17) बीआयबीएफ (आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्त पदवी)

18) बी.एड. (प्राथमिक शिक्षण पदवी)

19) डीपीईडी. (शारीरिक शिक्षण पदविका)

20) एकात्मिक बीएड अभ्यासक्रम

21) इंटिग्रेटेड लॉ कोर्सेस

22) बीएचएम (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)

23) बी.व्ही.(B.Voc) (व्होकेशन बॅचलर)

24) बी कॉम  (B.Com) (वाणिज्य पदवीधर)

25) बीए (BA) (कला स्नातक)

26) बीजेएमसी (बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन)

27) बीएसडब्ल्यू (बॅचलर ऑफ सोशल वर्क)

28) सीए (चार्टर्ड अकाउंटन्सी)

29) सीएस (कंपनी सचिव)

30) सीएमए (प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल)

31) डी.एड. (विशेष शिक्षण)

 १२ वी सायन्स पीसीबी ग्रुपनंतर अभ्यासक्रमांची यादी

1) एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी)

2) बीडीएस (डेंटल सर्जरी बॅचलर)

3) बी.फार्म. (बॅचलर ऑफ फार्मसी)

4) BAMS (आयुर्वेद चिकित्सा व शस्त्रक्रिया पदवी) (Read more: BAMS course information in Marathi)

5) फार्म डी (फार्मसीचे डॉक्टर)

6) बी.एससी. (विज्ञान शाखेचा पदवीधर)

7) बीएचएमएस (बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन and सर्जरी)

8) बीपीटी (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी)

9) डिप्लोमा कोर्स (पॅरामेडिकल)

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल 

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

इतर डिप्लोमा कोर्स

1) बीएएमएस (BAMS) (मेडिसिन अँड सर्जरी बॅचलर)

2) बीएएसएलपी (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी)

3) बीओटी (बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी)

4) बीआरएससी (पुनर्वसन विज्ञान पदवी)

5) बीपीओ (प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्समध्ये बॅचलर)

6) बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)

7) बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)

8) बीबीएस (बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज)

9) बीआयबीएफ (आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्त पदवी)


10) बी.एड. (प्राथमिक शिक्षण पदवी)

11) डीपीईडी. (शारीरिक शिक्षण पदविका)

12) एकात्मिक बीएड अभ्यासक्रम

13) इंटिग्रेटेड लॉ कोर्सेस

14) बीएचएम (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)

15) B.Voc. (व्होकेशन बॅचलर)

16) बी.कॉम. (वाणिज्य पदवीधर)

17) बीए (कला स्नातक)

18) बीजेएमसी (बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन)

19) बीएसडब्ल्यू (बॅचलर ऑफ सोशल वर्क)

20) डी.एड. (विशेष शिक्षण)

21) एकात्मिक विशेष शिक्षण अभ्यासक्रम 

22) बी. फार्म. 



काही कोर्सबद्दल थोडक्यात:

गणिताच्या ग्रुपचे विद्यार्थीही बी.फेर्मसाठी जाऊ शकतात.

फार्मसी कोर्स सर्व औषधनिर्माण क्षेत्रातील आहे. यात औषधे तयार करणे, औषधे बनविण्यातील रसायने, औषधांचा वापर इत्यादी विषयांचा अभ्यास केला जातो. हा कोर्स ४ वर्षांचा आहे.

बी. फार्म पूर्ण केल्यावर कोणीही त्याचा पाठपुरावा मास्टर डिग्री एम. फार्म बरोबर करू शकेल.! नोकरीच्या संधींबद्दल बोलताना, फार्मास्युटिकल कंपन्या मुख्य नोकरी पुरवठादार आहेत.

एखाद्याला केमिस्टला भाड्याने देणाऱ्या रूग्णालयातही नोकरी मिळू शकते. शासकीय क्षेत्रातील नोकर्या पदवीधरांसाठी देखील उपलब्ध आहेत, जसे की- शासकीय रुग्णालयांमध्ये, औषध विभागात अधिकारी म्हणून , स्वतःचे दुकान उघडणे हा आणखी एक पर्याय आहे! बी.फार्म यांचे संयोजन. आणि एम. फार्म. आपल्याला संशोधन क्षेत्र तसेच अध्यापन क्षेत्रातही नोकरी मिळवून देऊ शकते.

व्यावसायिक पायलट प्रशिक्षण

बारावीनंतर गणित गटातील विद्यार्थी व्यावसायिक पायलट प्रशिक्षण घेण्यासाठी जाऊ शकतात आणि व्यावसायिक पायलट बनू शकतात ! यासाठी त्यांना फ्लाइट ट्रेनिंग स्कूलमध्ये जावे लागेल. 

कोर्सचा कालावधी एका संस्थेत बदलून दुसर्‍या इन्स्टिट्यूटमध्ये असतो! सर्वसाधारणपणे, ते 2-3 वर्षांच्या दरम्यान असते. प्रशिक्षण संपल्यानंतर, एखादी व्यक्ती फेरी पायलट किंवा कमर्शियल पायलटची खासगी किंवा राष्ट्रीयीकृत एअरलाईन कंपन्यांमध्ये काम करू शकते. सेवानिवृत्तीनंतर एखादा माणूस प्रशिक्षकही होऊ शकतो. हे या क्षेत्राचा अतिरिक्त फायदा आहे.

अग्निसुरक्षा आणि तंत्रज्ञान पदविका कोर्स

 हा एक नोकरीभिमुख फायर आणि सेफ्टी कोर्स आहे जो १२ वी सायन्स मॅथेमॅटिक्स ग्रुपचे विद्यार्थी घेऊ शकतात. जेव्हा या कोर्सची चर्चा केली जाते तेव्हा डिप्लोमा तसेच प्रमाणपत्र प्रोग्राम देणारी बर्‍याच खाजगी संस्था आहेत. कोर्सचा कालावधी एका संस्थेतून दुसर्‍या संस्थेत बदलू शकतो. पण सहसा ते १- 1-3 वर्षांच्या दरम्यान असते.

मर्चंट नेव्ही संबंधित कोर्सेस

करिअरच्या संभाव्यतेच्या दृष्टीकोनातून पाहता मर्चंट नेव्ही एक चांगला फायदा देणारे क्षेत्र आहे! मोबदला सामान्यतः जास्त असतो. परंतु त्यातील कामासाठी कठोर परिश्रम आणि निश्चय आवश्यक आहे.


एमबीबीएस (MBBS)

जीवशास्त्र गटातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर्वात जास्त प्रयत्न केला जातो. या कोर्सचा कालावधी साडेपाच वर्षे आहे. शैक्षणिक कालावधी साडेचार वर्षे आहे. यानंतर वर्षभर टिकणारी इंटर्नशिप आहे. तर, त्यांना एकत्रित करून, एमबीबीएस प्रोग्रामचा कालावधी 5.5 वर्षे असेल.

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की डॉक्टर होणे फार सोपे नाही. सर्व प्रथम, एखाद्या खाजगी किंवा शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसची जागा मिळवणे खूप कठीण काम आहे. मग,अर्थात खूप सोपे नाही.

तरीही, एमबीबीएस केल्याने आणि पीजी कोर्सचा पाठपुरावा केल्याने आपणास फायद्याचे कारकीर्द तयार होते. हेल्थकेअरचा व्यवसाय तेजीत आहे आणि भविष्यात योग्य प्रकारच्या डॉक्टरांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. एखाद्यास सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते. तसेच, स्वतःची क्लिनिक उघडणे देखील एक चांगला पर्याय आहे.

 बीडीएस (BDS)

बीडीएस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी.कोर्स कालावधी 5 वर्षे आहे. त्या ५ वर्षांपैकी, वर्ग अभ्यास 4 वर्षांचा असतो. इंटर्नशिपसाठी 1 वर्ष समर्पित. एमबीबीएस प्रोग्राममध्ये येणे खूप कठीण आहे. परंतु बीडीएसची जागा मिळवणे तुलनेने सोपे आहे! परंतु त्याच वेळी, एमबीबीएसशी तुलना केली असता करियरची शक्यता थोडीशी मंद आहे. तरीही, एखादी व्यक्ती बीडीएस पूर्ण करू शकते, पीजी कोर्ससह त्याचा पाठपुरावा करेल आणि एक चांगले करियर बनवू शकेल.  


बीएएमएस (BAMS)

बीएएमएस म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा व शस्त्रक्रिया पदवी. जर तुम्हाला आयुर्वेद डॉक्टर व्हायचे असेल तर बीएएमएस कोर्स तुमच्यासाठी आहे! कोर्स कालावधी साडेपाच वर्षे आहे. साडेचार वर्षे वर्ग अभ्यासक्रम आणि उर्वरित 1 वर्ष इंटर्नशिपसाठी समर्पित आहेत. एमबीबीएस आणि बीडीएस कार्यक्रमांच्या तुलनेत बीएएमएस प्रोग्राममध्ये जागा मिळवणे सोपे आहे! आणि करिअरच्या संभावनांबद्दल बोलताना या क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल ठरले आहे! 

बी.एससी (BSC). नर्सिंग

आरोग्य सेवा क्षेत्रात, प्रशिक्षित आणि पात्र परिचारिकांची मागणी मोठी आहे! मागणी काळाबरोबर वाढत आहे, परंतु पुरवठा, दरवर्षी पदवीधर असलेल्या पात्र नर्सांची संख्या ही मागणी पूर्ण करीत नाही! थोडक्यात, पात्र परिचारिका चांगल्या मूल्यवान आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी त्यांना चांगले प्रतिफळ दिले जाते. बी.एससी. नर्सिंग कोर्स 3 वर्षांचा आहे. याचा पाठपुरावा एम.एस्सी. पदवी असा असा समज आहे की हा कोर्स केवळ मुलींसाठी आहे. पण हे अजिबात खरे नाही! पुरुष उमेदवारदेखील हा कोर्स करू शकतात.  

 करिअरसाठी बारावी सायन्स नंतर हा कोर्स करा*

इयत्ता दहावी आणि बारावी पर्यंत सायन्स विषय घेतल्या नंतर इंजिनियर ,डॉक्टरच नव्हे तर सायंटिस्ट देखील बनू शकता. जर आपली आवड रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये असल्यास तर हे काही कोर्स करून आपण चांगले करिअर बनवू शकता.

सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्याय हे आहोत.

1) नॅनोटेक्नोलॉजी- 

बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक आणि त्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता.

2) स्पेस सायन्स-

हे विज्ञानाचे खूप विस्तृत क्षेत्र आहे. या अंतर्गत कॉस्मॉलॉजी,स्टेलर सायन्स ,प्लॅनेटरी सायन्स ,ऍस्ट्रॉनॉमी अशी अनेक क्षेत्रे येतात. यामध्ये तीन वर्ष बीएससी आणि चार वर्षे बीटेक ते पीएचडी पर्यंतचे अभ्यासक्रम विशेषतः बंगलोरमध्ये असलेल्या इस्रो आणि आयआयएससी (IISC)मध्ये घेतले जातात.


3) अ‍ॅस्ट्रोफिजिक्स - 

जर आपण तारका आणि अवकाशगंगेत आवड ठेवता तर बारावी नंतर आपण अ‍ॅस्ट्रोफिजिक्स मध्ये करिअर बनवू शकता.या साठी आपण एमएससी फिजिकल सायन्स मध्ये आणि बी एस सी फिजिक्स मध्ये करू शकता.अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये

डॉक्टरेट केल्यावर विद्यार्थी इस्रोसारख्या संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक होऊ शकतात.

4) एन्व्हायर्नमेंटल सायन्स-

या क्षेत्रात मानवी क्रियांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जातो.या अंतर्गत इकॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट,वाईल्डलाईफ मॅनेजमेंट,पोल्युशन कंट्रोल,सारखे विषय शिकवले जातात.या सर्व विषयात एनजीओ आणि यूएनओ चे प्रकल्प वेगाने वाढत आहे.अशा परिस्थितीत नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

5) वॉटर सायन्स-

हे पाण्याच्या पृष्ठभागाशी संबंधित विज्ञान आहे. यामध्ये हायड्रोमेटिओलॉजी, हायड्रोजीओलॉजी, ड्रेनेज बेसिन मॅनेजमेंट, वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, हायड्रॉइनफॉर्मॅटिक्स या विषयांचा अभ्यास करावा लागेल. हिमस्खलन आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता या क्षेत्रातील संशोधकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

6) मायक्रो बायोलॉजी -

या क्षेत्रात प्रवेश साठी आपण लाईफ सायन्स मध्ये बीएससी किंवा मायक्रो बायोलॉजी मध्ये बीएससी करू शकता. या नंतर मास्टर डिग्री आणि पीएचडी देखील पर्याय आहे.या व्यतिरिक्त आपण पेरॉमेडिकल,मरीन बायोलॉजी,बिहेव्हियरल सायन्स, फिशरीज सायन्स अशा अनेक क्षेत्रात विज्ञानाची आवड ठेवणारे आपले उत्तम करिअर करू शकतात.


7) डेयरीसायन्स-

दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात भारत एक महत्वाचा देश आहे. दुग्ध उत्पादनात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. डेयरी टेक्नॉलॉजी किंवा डेयरी सायन्स अंतर्गत दुग्ध उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठा आणि वितरण याविषयी माहिती दिली जाते. भारतातील दुधाचा वापर पाहता या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टुडन्ट ऑल इंडिया आधारावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांच्या पदवीधरडेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. काही संस्था दुग्ध तंत्रज्ञानाचा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स देखील देतात.

8) रोबोटिक सायन्स-

रोबोटिक सायन्सचे क्षेत्र अतिशय वेगाने वाढत आहे.या विषयाचा वापर सर्व क्षेत्रात होत आहे.जसे की हृदय शस्त्रक्रिया, कार असेंब्लींग, लँडमाइन्स.आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास,आपण या क्षेत्राशी संबंधित काही स्पेशलायझेशन कोर्स देखील करू शकता.जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सिस्टम, कॉम्प्युटर सायन्स मधून पदवी घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला योग्य असतात.रोबोटिक मध्ये एमईची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या नामांकित संस्थेत संशोधन कार्यात नोकरी मिळू शकते.

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा  

https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

शनिवार, १२ जून, २०२१

*कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) : योजनेत मोफत उपचार उपलब्ध आहेत, नियम जाणून घ्या आणि संपूर्ण माहिती*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

*कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) : योजनेत मोफत उपचार उपलब्ध आहेत, नियम जाणून घ्या आणि संपूर्ण माहिती*

ईएसआयसी योजना काय आहे: केंद्रीय श्रम मंत्रालय कमी उत्पन्न असलेल्या पगारदार कर्मचाऱ्यांच्या आरोग्य लाभासाठी ही योजना चालवते.या अंतर्गत रुग्णालये राज्य सरकारद्वारे चालवली जातात.या योजनेचा लाभ खासगी कंपन्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे. ईएसआयसी अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ईएसआय दवाखान्यात किंवा रुग्णालयात जावे लागेल या योजनेत नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक कार्ड दिले जाईल.या कार्डच्या माध्यमातून हॉस्पिटल किंवा दवाखान्यात जाऊन मोफत उपचार करता येतात.

पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला विम्याचा तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला PF चे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी (ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

(ESIC) ईएसआय कार्डचे फायदे

या योजनेत समाविष्ट कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतात.  सर्वप्रथम, विमाधारक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचार मिळतात. याव्यतिरिक्त, आजारी रजेसाठी 91 दिवसांची रोख रक्कम दिली जाते.प्रसूती रजेवर असलेल्या स्त्रियांना प्रसूतीच्या 26 आठवड्यांपर्यंत सरासरी वेतनाच्या 100% आणि गर्भपात झाल्यास 6 आठवड्यांपर्यंत दिले जाते. तात्पुरते अपंगत्व असल्यास, पुनर्प्राप्ती होईपर्यंत आणि कायमचे अपंगत्व असल्यास, संपूर्ण आयुष्य मासिक पेन्शनची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, आश्रितांना पेन्शन, बेरोजगारी भत्ता, निवृत्तीनंतर मोफत उपचार, महिलेची ESIC रुग्णालयाबाहेर प्रसूती झाल्यास 7500 रुपयांपर्यंत मिळते. याशिवाय उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च म्हणून 15 हजार रुपये दिले जातात.


ईएसआयसी योजना ही स्वयं-वित्तपुरवठा करणारी सामाजिक सुरक्षा आणि कामगारांसाठी आरोग्य विमा योजना आहे.ज्यासाठी
कर्मचारी राज्य विमा महामंडळ ईएसआय अधिनियम नियम आणि विनियम तयार करण्यात आले आहेत. आरोग्य संबंधित सामान्य आजार, प्रसूती, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, व्यावसायिक इजा किंवा रोजगाराच्या दुखापतीमुळे मृत्यू इत्यादी बाबतीत ईएसआय कायदा 1948 द्वारे परिभाषित केलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सहाय्य प्रदान करणे.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी ( ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

*ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना) चा लाभ कोण घेऊ शकतो?*

संस्था, कंपनी, कारखाने, रस्ते वाहतूक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिनेमा, वर्तमानपत्रे, दुकाने, शैक्षणिक / वैद्यकीय संस्था इत्यादी कर्मचाऱ्यांची संख्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त असावी, तर अनेक राज्यांमध्ये आस्थापनांमध्ये कव्हरेज आवश्यक आहे.मर्यादा अद्याप 20 आहे.भारत सरकारच्या एका योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्याचा पगार 21,000 रुपये प्रति महिना आहे (जेव्हा 2017 पूर्वी 15000 मर्यादा होती), त्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. 21,000 ची ही मर्यादा सर्व कायम आणि करार/आउटसोस कामगारांना लागू आहे. 21,000 च्या या मर्यादेत ओव्हरटाइम किंवा बोनसची रक्कम समाविष्ट नाही.याद्वारे तुम्ही ठरवू शकता की तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहात की नाही.

जर एखाद्या कामगाराचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांना मिळणार पेन्शन

कोरोना संकटाच्या वेळी सरकारने अनेक प्रकारच्या दिलासादायक घोषणा केल्यात.अलीकडेच सरकारने ईएसआयसी पेन्शनबाबतचे नियम बदलले होते. जर एखाद्या कामगाराचा मृत्यू कोरोनामुळे झाला आणि तो ईएसआयसीच्या कक्षेत आला तर त्याला ईएसआयसी पेन्शनचा लाभ मिळेल, असंही कामगार मंत्रालयाच्या वतीने सांगितले गेले, यासह काही अटी देखील समाविष्ट केल्यात.

नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला

कोरोना संकटाच्या वेळी जे लोक ईएसआयसी योजनेंतर्गत जोडले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या उद्देशाने हा त्वरित बदल नियमात करण्यात आलाय.

नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आणि पुढील दोन वर्षांसाठी म्हणजे 24 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. ईएसआयसी पेन्शनचा लाभ घेण्यापूर्वी आम्हाला आवश्यक अटींबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेणाऱ्याची पात्रता अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून ESIC मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा जर कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाल सहज याचा लाभ घेता येईल. 

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी (ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असावे

प्रथम पात्रतेच्या अटीनुसार, ईएसआयसी पोर्टलवर विमा काढलेल्या व्यक्तीची (आयपी) नोंदणी कोविड शोधण्यापूर्वी कमीत कमी तीन महिने आधी झाली पाहिजे. दुसरी अट अशी आहे की, विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असले पाहिजे. जर दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर पीडित कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळेल.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे ESI आणि पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

पेन्शनचा लाभ कोणाला मिळतो?

जर विमाधारक व्यक्ती विवाहित असेल तर त्याची पेन्शन पत्नी, आई, मुलगा आणि मुलगीमध्ये विभागली जाईल. आयुष्यभरासाठी पेन्शन रेटपैकी 60 टक्के पत्नीला मिळतील. आईला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन रेटचा 40 टक्के हिस्सा मिळेल. 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलाला पेन्शन दराच्या 40 टक्के रक्कम मिळेल आणि मुलीचे लग्न होईपर्यंत पेन्शनचा लाभ मिळेल. निवृत्तीवेतनाचा दर सरासरी वेतनाच्या 90 टक्के आहे. लक्षात ठेवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पेन्शनच्या एकूण रकमेपेक्षा एकूण पेन्शनची रक्कम जास्त असू शकत नाही. जर ती जास्त असल्यास त्याची कपात केली जाईल.

तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

ESIC Pension योजनेंतर्गत रोजंदारीच्या सरासरी 90 टक्के वेतन पेन्शन म्हणून मिळणार आहे. जर एखाद्या कामगारांचे सरासरी वेतन 20 हजार रुपये असेल तर त्याच्या सरासरी वेतन काढण्याचा नियमही देण्यात आलाय. प्रत्येक आर्थिक वर्षात दोन योगदान कालावधी असतात. प्रथम योगदानाचा कालावधी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत योगदानाचा दुसरा कालावधी आहे. एप्रिल ते सप्टेंबरच्या योगदानाच्या कालावधीसाठी येत्या वर्षाच्या जानेवारी ते जून या कालावधीस लाभाचा कालावधी म्हणतात. त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्या वर्षाच्या जुलै ते डिसेंबर या कालावधीला लाभ कालावधी म्हणतात. आयपीसाठी शेवटच्या योगदान कालावधीचा सरासरी पगार पेन्शनचा आधार असेल.

 नोकरी गमावलेल्या बेरोजगार लोकांना दिलासा देण्यासाठी श्रम मंत्रालयाने सुरू केलेली अटल बीमीत व्यक्ती कल्याण योजना 

बेरोजगारांना तीन महिन्यांच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम देणारी ही योजना अलीकडेच जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती, पण आता त्यात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे केवळ अर्जाच्या अटी कमी केल्या नाहीत तर लाभार्थींची संख्या देखील वाढवली जाणार आहे.कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) प्राप्त माहितीनुसार कोरोनाची दुसरी लाट निघून गेली आणि कोरोनाची प्रकरणे कमी झाली व परिस्थिती सामान्य झाली, तरी आतापर्यंत देशभरातून अर्ज येत आहेत. 

ABVKY या योजनेअंतर्गत, पगाराच्या 50 टक्के जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जातात. तीन महिने म्हणजे अशी वेळ जेव्हा कोणतीही बेरोजगार व्यक्ती स्वतःसाठी नवीन नोकरी शोधू शकते.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी ( ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

दरम्यान, जर कोणाला नोकरी मिळाली आणि ESICमध्ये त्याचे योगदान येऊ लागले, तर ही रक्कम तीन महिन्यांपूर्वी थांबवली जाते. मात्र, जर तो पुन्हा नोकरीवर गेला तर तो उर्वरित हप्त्यांचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.अर्जदाराला आता नोंदणीचा ​​एक वर्ष आणि एक योगदान कालावधीनंतरही योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो, तर आतापर्यंत नोंदणीची दोन वर्षे आणि ईएसआयसीमध्ये दोन योगदान कालावधीसाठी अर्ज केला जाऊ शकतो.

तसेच, आता योजनेच्या अटी पूर्वीपेक्षा अधिक सोप्या करण्यात आल्या आहेत. ESIC मध्ये सहा महिन्यांचा योगदान कालावधी आहे, ज्यात योगदान किमान 78 दिवस असावे. मात्र, आता एका योगदान कालावधीच्या फायद्यामुळे, त्याच्या कार्यक्षेत्रात येणारे बरेच लोक अर्ज करण्यास सक्षम असतील

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ*

   ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 


*अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ*

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाते. या योजनेतील विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत या उत्पन्नाची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता ही उत्पन्न मर्यादा वाढवल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 

विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची योजना

राज्य शासनाकडून मिळालेल्या भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते.18 ते 32 वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. तर 3 टक्के इतक्या व्याजदराने हे कर्ज दिले जाते.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

अधिक माहितीसाठी यावर संपर्क साधण्याचे आवाहन

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यानंतर 5 वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्याने या कर्जाची परतफेड करावयाची असते. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https://malms.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे. पुढील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


विविध शैक्षणिक कर्जाच्या योजना उपलब्ध

याशिवाय, केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येते. या योजनेतून लाभासाठी शहरी भागाकरीता विद्यार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. तर ग्रामीण भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 98 हजार रुपये इतकी आहे. यासाठीही विद्यार्थी अर्ज करु शकतात, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...