हा ब्लॉग शोधा

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त

सध्या भारतात डिजिटल देवाण घेवाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी भारतीय गुगल पे, पेटीएम आणि फोन पे इत्यादी युपीआय आधारित अ‍ॅप्सचा वापर करत आहेत. तसे पाहता हे खूप उपयुक्त अ‍ॅप्स आहेत, परंतु चुकीच्या लोकांच्या हातात तुमचा फोन गेल्यास हे महागात पडू शकतात. परंतु यावर देखील उपाय आहे, जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही Paytm, Google Pay आणि PhonePe ब्लॉक करू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

PhonePe अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी

  • PhonePe युजर्स 08068727374 किंवा 02268727374 नंबरवर कॉल करू शकतात.
  • भाषा निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या PhonePe अकॉउंटमधील प्रॉब्लम रिपोर्ट करू शकता.
  • यासाठी योग्य त्या ऑप्शनची निवड करा. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
  • त्यावर एक OTP येईल तो मिळाला नाही हे सांगणारा पर्याय निवडा.
  • त्यानंतर फोन किंवा सिम हरवल्याचा पर्याय निवडा.
  • त्यानतंर एक प्रतिनिधीशी तुमचा कॉल जोडला जाईल. तुम्हाला फोन पे प्रतिनिधीला फोन नंबर, ईमेल, लास्ट पेमेंट इत्यादी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमचं अकॉउंट ब्लॉक करण्यात येईल.
  • पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.7900094419 

  • तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )

  • Paytm अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी
  • फोन हरवल्यास तुमचा पेटीएम अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम Paytm Payments Bank हेल्प लाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.
  • आता फोन हरवल्याचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर वेगळा नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा आणि हरवलेल्या फोनचा नंबर एंटर करा.
  • त्यानंतर सर्व डिवाइसमधून लॉग आउट करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा.
  • कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

    प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

  • त्यांनतर Paytm वेबसाइटवर जाऊन 24×7 हेल्प ऑप्शनची निवड करा.
  • Report a Fraud सिलेक्ट करून कोणत्याही कॅटेगरीवर क्लिक करा.
  • आता Any Issue वर क्लिक करून सर्वात खाली दिलेल्या Message Us बटणवर क्लिक करा.
  • तुम्हाला ट्रांजेक्शन किंवा एखादा ईमेल, डेबिट कार्ड स्टेटमेंट अकॉउंटचे मालक म्हणून पुराव्यासाठी पाठवावी लागले.
  • त्यानंतर Paytm तुमचे अकॉउंट ब्लॉक करेल आणि तुम्हाला मेसेज पाठवला जाईल.
  • Google Pay अकॉउंट ब्लॉक करण्यासाठी
  • Google Pay युजर्स असाल तर 18004190157 वर कॉल करून तुमची भाषा निवडा.
  • त्यानंतर इतर समस्या हा पर्याय निवडा. त्यानंतर तज्ज्ञांशी बोलण्याचा पर्याय निवडा, जे तुमचं Google Pay अकॉउंट ब्लॉक करण्यास मदत करतील.
  • तसेच अँड्रॉइड आणि आयओएस युजर्स दुसऱ्या डिवाइसवरून हरवलेल्या डिवाइसवरील डेटा डिलीट करू शकतात. यामुळे फक्त पेमेंट अ‍ॅप्स नव्हे तर इतर कोणतेही अ‍ॅप्स आणि त्यांचा डेटा इतर कुणालाही वापरता येणार नाही.

  • मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

    पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
  • तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

    ------------------------------------------------------------------------   

  •                                 

  • संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

पगारावरील Tax वाचवण्यासाठी हे पर्याय वापरुन भविष्याची तरतूद आत्ताच करा....

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                    वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

पगारावरील Tax वाचवण्यासाठी हे पर्याय वापरुन भविष्याची तरतूद आत्ताच करा....

आपल्या पगराची तारीख जेव्हा जवळ येते तेव्हा आपल्याला खूप आनंद होते. कारण त्यामुळे आपल्या हातात पैसे येता आणि त्यामुळे आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी विकत घेऊ शकतो. या पगारावर लागणारा कर हा आपल्या चिंतेचा विषय आहे. परंतु एक जागरुक नागरीक असल्यामुळे आपल्याला आपल्या पगाराचा काही भाग सरकारला कर स्वरुपात द्यावा लागतो. त्याला जर भरले नाही तर सरकार आपल्या विरुद्ध कठोर कारवाई देखील करू शकते.

जर तुम्हाला पगार मिळाला असेल, तर बाजारात कोणती उत्पादने किंवा योजना आहेत ज्यातून कर वाचविला जाऊ शकतो हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. या योजनांच्या मदतीने कराचे नियोजन करून तुम्हाला बचतीचे मार्ग उघडता येतील.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.7900094419

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

या साठी तुम्ही आयकर कायदा 1961 पाहू शकता, ज्यात बचतीची संपूर्ण माहिती मिळेल. यामध्ये पगारदार लोकं 10 प्रकारे आपले कर कसे वाचवू शकतात हे माहित करुन घ्या.

1) ईपीएफ

ही सर्वात लोकप्रिय कर बचत योजना आहे. या निधीमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघांचेही योगदान आहे. कर्मचार्‍याच्या खात्यात जमा झालेल्या पैशांवर आणि त्याद्वारे मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही.

2) पीपीएफ

याला सार्वजनिक भविष्य निधी म्हणतात. पगारदार लोक पीपीएफमध्ये गुंटावणुक करुण कर वाचू शकतात. रिटार्मेंटच्या वेळी यामधून तुम्हाला गॅरेंटीड निधी मिळेतो ज्यावर कर लागत नाही.

आपण आयकर विवरणपत्र भरले नाही तर काय होईल हे जाणून घ्या.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

3) इक्विटी लिंक्विड बचत योजना

त्याला ELSS असे म्हणतात, जो पगारदारांसाठी कर वाचविण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. आपण कर्मचारी असल्यास आपल्या पगाराच्या करपात्र उत्पन्नात सूट देण्यात आली आहे. या अंतर्गत गुंतवलेल्या पैशांवर कर आकारला जात नाही. परंतु जर यातील परतावा 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 10% दराने कर लागू होईल.

4) राष्ट्रीय पेन्शन सिस्टम किंवा NPS

NPS हा दीर्घकालीन बचत पर्याय आहे. ज्यांना लवकर सेवानिवृत्ती घ्यायची आहे त्यांनी या योजनेत गुंतवणूक करू शकता. पीपीएफ, एफडीच्या तुलनेत NPS जास्त परतावा देते. त्याअंतर्गत तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंतच्या करात सूट मिळवू शकता.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

5) कर बचत FD

टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट FDमध्ये गुंतवणूक करून आपण पैसे वाचवू शकता. ज्यामुळे तुम्हा मोठा फंड देखील जमा करु शकता. ही एक प्रकारची FD योजना आहे, ज्यात तुमची 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर कर सूट दिली जाते. पगार घेणाऱ्या लोकांसाठी 5 वर्षांची कर बचत सर्वोत्तम मानली जाते. गुंतवणूकीच्या पैशावर करामध्ये सूट मिळते, परंतु याच्या परताव्यावर कर आकारला जातो.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

6) जीवन विमा

पगारदार लोक जीवन विमा घेऊन आपला कर वाचवू शकतात. यामध्ये विमा संरक्षणासह कर बचतीची संधी आहे. यासह, मॅच्यूरीटीवर प्राप्त झालेला पैसा देखील बचतीचा एक मोठा मार्ग बनतो. आयकर कलम 80 सी अंतर्गत जीवन विमा प्रीमियमवर कर सूट आहे. त्याच बरोबर सर्व्हायवल बेनिफिट आणि डेथ बेनिफिटच्या रुपात मिळालेले पैसेही करमुक्त असतात.

7) घरभाडे भत्ता

जर पगारदार लोकं भाड्याच्या घरात राहतात, तर ते भाडेवर कर माफी मागू शकतात. घरभाडे भत्ता हा तुमच्या पगाराचा एक भाग आहे. ज्यावर पूर्ण कर लावला जात नाही. आपण आपल्या स्वत: च्या घरात राहून कंपनीच्या वतीने घरभाडे भत्ता घेतल्यास त्यावर कोणत्याही प्रकारची कर सूट मिळत नाही.

जाणून घ्या आयकर विभाग (incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

8) प्रवास भत्ता LTC

LTC अंतर्गत कर सहजतेने वाचविला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला यात्रा भत्ता द्यावा लागेल. करमुक्तीचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा कर्मचारी प्रवासाला जाईल. LTC अंतर्गत सवलत केवळ घरगुती प्रवासातच मिळू शकते. कराचा लाभ बस किंवा ट्रेनच्या भाड्याने घेतला जाऊ शकतो, परंतु प्रवासी खर्चावर नाही.

9) ग्रॅच्युटी

कंपनीकडून मिळालेल्या ग्रॅच्युटीवर कर सूटचा फायदा घेऊ शकता. कर्मचार्‍यांना वेतन, राजीनामा, सेवानिवृत्ती, मृत्यू किंवा काढून टाकण्यावर ग्रॅच्युटी दिली जाते. कर्मचाऱ्याने कोणत्याही एका कंपनीमध्ये कमीतकमी 5 वर्षे काम केले पाहिजे. कर्मचार्‍यांकडून मिळालेल्या ग्रॅच्युटीच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. परंतु या रक्कमेची मर्यादा 20,00,000 रुपये निश्चित केली गेली आहे.

10) आरोग्य विमा

आरोग्य विमा योजनेद्वारे आपण कर देखील वाचवू शकता. आरोग्य विम्यास भरलेल्या प्रीमियमवर कोणताही कर लागत नाही. आपण कुटुंबातील पत्नी आणि मुलांसाठी आरोग्य विमा काढल्यास आपण त्यावरही कर लाभाचा दावा करू शकता.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------   

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करायचाय?, मग हे नियम वाचा आणि असा मिळवा पास.!

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करायचाय?, मग हे नियम वाचा आणि असा मिळवा पास.!

दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी

लसीचे दोन डोस घेतले आहेत, आणि दुसरा डोस घेऊन 14 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस झाले आहेत, अशा प्रवाशांनाच लोकलने प्रवास करता येईल, किंवा लोकलचा पास वगैरे मिळवता येईल.

कोरोना प्रतिबंधत्मक लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही.

रेल्वे प्रवासासाठी पास कसा मिळवायचा?

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील… सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.7900094419

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

लोकलचा प्रवासी पास कसा मिळवायचा, वाचा हे  नियम…

1) मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकीट खिडकी नजीक 358 मदत कक्ष असतील.

2) मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.

पहिल्याच पावसात मुंबई तुंबली' का? या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची 'तुंबई' होते.  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

3) ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत , त्यासोबत ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

4) रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष असतील. हे मदत कक्ष सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

5) मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट – दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.

6) सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.

7) कोविड लशीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

8) मुंबई महानगर तसेच मुंबई प्रदेशातील लोकसंख्या लक्षात घेवून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जेवढ्या तिकिट खिडक्या असतील, तेवढ्याच संख्येने मदत कक्ष देखील असतील. तसेच सकाळी 7 ते रात्री 11 अशी तब्बल 16 तास पडताळणी सुविधा सुरु राहणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वे स्थानकांवर जावे. मात्र विनाकारण गर्दी करु नये, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

9) जर कोणीही बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची सक्त नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

10) अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरु राहील. त्यामुळे त्यांनी नियमित पद्धतीने उपनगरीय रेल्वे प्रवास करावा, असे कळविण्यात येत आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

आता रुग्णांना मिळणार ‘हक्क’ जाणून घ्या..

आता रुग्णांना मिळणार ‘हक्क’ जाणून घ्या..

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रात 15 ऑगस्टपासून नि:शुल्क आरोग्य सेवा दिली जाणार आहे. नि:शुल्क उपचार नाकारल्यास 104 डायल करा.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रात 15 ऑगस्टपासून नि:शुल्क आरोग्य सेवा दिली जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने जिल्हा आणि तालुकास्तरावर संनियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारेच या सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे. बाह्यरुग्ण विभागामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णांना बाहेरून औषषे खरेदी करण्याकरिता चिठ्ठी देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयाची योग्य अंमलबजावणी न केल्यास तक्रार करण्यासाठी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणं आणखी सोपं झालं!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्यासाठी 8650567567 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्ट पासून करण्यात येत आहे.

नि:शुल्क सेवेत काय काय?

1) शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे नि:शुल्क नोंदणी.
2) सर्व प्रकारच्या तपासण्या नि:शुल्क.
3)ओपीडीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना.
4) क्वचित प्रसंगी बाहेरील औषधे रुग्णाला देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून खरेदी करून रुग्णाला मोफत उपलब्ध करून देणे.
5) ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या नि:शुल्क.
6) आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल रुग्णाला डिस्चार्ज देताना कोणतेही शुल्क लागणार नाही.

अत्यंत महत्त्वाची सूचना

रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश

 संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण

1) हिंदुजा हॉस्पिटल

2) कोकिलाबेन हॉस्पिटल

3) जसलोक हॉस्पिटल

4) दि. बॉम्बे हॉस्पिटल 

5) लीलावती हॉस्पिटल

6) ब्रीच कँडी हॉस्पिटल

7) केईएम हॉस्पिटल

8) टाटा हॉस्पिटल

9) नानावटी हॉस्पिटल

10) दि. बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल

11) हिरानंदानी हॉस्पिटल

12) होली स्पिरिट हॉस्पिटल

या किंवा अश्या महागड्या पंचतारांकित चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, गरीब  रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल.यासाठी संपर्क - सौ. वीणा सोनार, दादर, मुंबई - 400028 केव्हाही संपर्क साधा. मो. 7028982041

आवश्यक कागदपत्रे-

1) 2 फोटो

2) आधार कार्ड

3) रेशन कार्ड

4) उत्पन्नाचा दाखला

5) हॉस्पिटलचे इस्टिमेट

6) रोग निदान झाल्याचे रिपोर्ट

आता रुग्णांना ‘हक्क’ मिळणार. जाणून घ्या..

नर्सिंग होम कायद्याच्या नियमावलीतील रुग्णांचे हक्कदवाखान्यात किंवा रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे काही हक्क आहेत. हे हक्क समजून उमजून त्याचा योग्य वापर केल्यामुळे आरोग्यसेवा सुधारतील. सेक्शन 16, नियम क्र. 14

नर्सिंग होम कायद्याच्या नियमावलीतील रुग्णांचे हक्क

1) जखमी रुग्णाला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जखमी व्यक्तीला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क आहे.

2) रुग्णाला/आप्तेष्टांना माहिती मिळण्याचा अधिकार आहे.डॉक्टरांना कोणत्या आजाराची शंका येते आहे किंवा पक्के निदान झाले आहे? रुग्णाला झालेल्या आजाराचे स्वरुप; त्याची गंभीरता; उपचारामुळे होऊ शकणारे दुष्परिणाम; उपचारासाठी येणारा खर्च याची पुरेशी माहिती. आजा-याची परिस्थिती बदलली तर त्याची माहिती व उपचारामध्ये बदल केल्यास खर्चामध्ये किती बदल होणार आहे याची माहिती. 

रुग्णाने किंवा रुग्णाने निर्देशित केलेल्या आप्तेष्टाने मागणी केल्यावर इनडोर केसपेपरची फोटोकॉपी, फोटेकॉपीसाठीचा सुयोग्य खर्च भरल्यानंतर मिळाली पाहिजे. (ऍडमिट असताना 24 तासात, डिस्चार्ज मिळाल्यावर 72 तासात) डिस्चार्ज मिळतांना पुढील किमान माहिती देणारे डिस्चार्ज कार्ड मिळायला हवे. : दाखल करण्यामागचे कारण डॉक्टरी तपासणीत आढळलेल्या महत्त्वाच्या बाबी व तपासणीचे निष्कर्ष, निदान, केलेले उपचार, घरी पाठवताना रुग्णाची स्थिती. डिस्चार्ज मिळाल्यानंतर घ्यायची काळजी, घ्यायची औषधे, इतर सूचना तातडीने वैद्यकीय मदत हवी असल्यास कशी मिळवावी याची माहिती. (सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत).

सामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

3) उपचार नाकारण्याचा अधिकार, उपचारासाठी संमती: रुग्णाला धोका पोचू शकेल असे कोणतेही उपचार (शस्त्रक्रिया, रक्त देणे, धोक्याची शक्यता असलेल्या तपासण्या) देतांना रुग्णाला त्याबाबत पुरेशी माहिती मिळून (सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत) संमती देण्याचा, नाकारण्याचा अधिकार.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

4) गोपनीयतेचा व खाजगीपणाचा अधिकार: रुग्णाने डॉक्टरांना स्वत:च्या आरोग्यासंबंधीची दिलेली माहिती व डॉक्टरांना तपासणीतून मिळालेली माहिती ही खाजगी राहील व रुग्णाच्या परवानगीशिवाय रुग्णाची आयडेंटीटी (अपवादात्मक परिस्थिती वगळता) इतरांना कळवली जाणार नाही हा अधिकार.

5) सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क: रुग्णाने किंवा रुग्णाने निर्देशित केलेल्या आप्तेष्टाने मागणी केल्यास रुग्णाच्या पसंतीच्या दुस-या तज्ज्ञ डॉक्टरला त्याच इस्पितळात बोलावून सल्ला घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व रिपोर्टस् रुग्णाला मिळण्याचा हक्क आहे.

6) रुग्णाची मानवी प्रतिष्ठा राखली जाण्याचा अधिकार: रुग्ण असहाय असतात हे लक्षात घेऊन उपचार करणा-या डॉक्टरांनी व आरोग्य सेवकांनी रुग्णाच्या मानवी प्रतिष्ठेचा सन्मान केला पाहिजे. स्त्री रुग्णांना पुरुष डॉक्टर तपासत असताना स्त्री-कर्मचारी वा स्त्री आप्तेष्ट सोबत असायला हवी. अशा प्रथा इस्पितळांनी पाळायला हव्या.

7) एच.आय.व्ही. रुग्णांना भेदभावरहित वागणूक मिळण्याचा हक्क: एच.आय. व्ही. रुग्णांना भेदभाव न करता केवळ माणूस या नात्याने वागणूक मिळण्याचा हक्क आहे.

8) उपचारात पर्याय उपलब्ध असतील तर(उदा. कर्करोगावर कोणत्या प्रकारचा उपचार करायचा, हृदयविकारावर शस्त्रक्रिया करायची की नाही) त्यापैकी पर्याय निवडण्याचा किंवा उपचार नाकारण्याचा अधिकार रुग्णाला आहे.

तर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही घरबसल्या बनवू शकता. आणि या करता तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. संपर्क करा.सृष्टी महा ई सुविधा  *संतोष विठ्ठल साळवे..7900094419 

9) तक्रार करण्याचा हक्क: रुग्णांचे उपर्निर्देशित हक्कांची पायमल्ली होत आहे असे रुग्णाला / आप्तेष्टांना वाटल्यास त्याबाबत तक्रार करण्याचा रुग्णाला हक्क आहे. ही तक्रार इस्पितळ प्रमुखाकडे करण्याची पध्दत व तक्रार निवारण्याची पध्दत रुग्णाला कळायला हवी.

10) रुग्णावर संशोधन होणार असेल तर

त्याबाबतची नैतिक तत्त्वे ICMR ने निर्देशित केलेल्या धोरणाप्रमाणे आणि प्रक्रियेप्रमाणे पाळली जाण्याची हमी.

11) पुरुष डॉक्टर जेव्हा महिला रुग्णाची शारीरिक तपासणी करीत असतील त्या वेळी स्त्री रुग्णासोबत असण्याचा हक्क. 

12) रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सेवा व उपलब्ध सुविधांच्या दरांची माहिती मिळण्याचा हक्क. प्रत्येक रुग्णालयाने ही माहिती दर्शनी भागात स्थानिक आणि इंग्रजी भाषेत लावावी.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------  

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...