हा ब्लॉग शोधा

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

आता रुग्णांना मिळणार ‘हक्क’ जाणून घ्या..



आता रुग्णांना मिळणार ‘हक्क’ जाणून घ्या..

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रात 15 ऑगस्टपासून नि:शुल्क आरोग्य सेवा दिली जाणार आहे. नि:शुल्क उपचार नाकारल्यास 104 डायल करा.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रात 15 ऑगस्टपासून नि:शुल्क आरोग्य सेवा दिली जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने जिल्हा आणि तालुकास्तरावर संनियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारेच या सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे. बाह्यरुग्ण विभागामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णांना बाहेरून औषषे खरेदी करण्याकरिता चिठ्ठी देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयाची योग्य अंमलबजावणी न केल्यास तक्रार करण्यासाठी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणं आणखी सोपं झालं!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्यासाठी 8650567567 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी 15 ऑगस्ट पासून करण्यात येत आहे.


नि:शुल्क सेवेत काय काय?

1) शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे नि:शुल्क नोंदणी.
2) सर्व प्रकारच्या तपासण्या नि:शुल्क.
3)ओपीडीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना.
4) क्वचित प्रसंगी बाहेरील औषधे रुग्णाला देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून खरेदी करून रुग्णाला मोफत उपलब्ध करून देणे.
5) ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या नि:शुल्क.
6) आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल रुग्णाला डिस्चार्ज देताना कोणतेही शुल्क लागणार नाही.


अत्यंत महत्त्वाची सूचना

रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश

 संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण

1) हिंदुजा हॉस्पिटल

2) कोकिलाबेन हॉस्पिटल

3) जसलोक हॉस्पिटल

4) दि. बॉम्बे हॉस्पिटल 

5) लीलावती हॉस्पिटल

6) ब्रीच कँडी हॉस्पिटल

7) केईएम हॉस्पिटल

8) टाटा हॉस्पिटल

9) नानावटी हॉस्पिटल

10) दि. बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल

11) हिरानंदानी हॉस्पिटल

12) होली स्पिरिट हॉस्पिटल

या किंवा अश्या महागड्या पंचतारांकित चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, गरीब  रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल.यासाठी संपर्क - सौ. वीणा सोनार, दादर, मुंबई - 400028 केव्हाही संपर्क साधा. मो. 7028982041

आवश्यक कागदपत्रे-

1) 2 फोटो

2) आधार कार्ड

3) रेशन कार्ड

4) उत्पन्नाचा दाखला

5) हॉस्पिटलचे इस्टिमेट

6) रोग निदान झाल्याचे रिपोर्ट

आता रुग्णांना ‘हक्क’ मिळणार. जाणून घ्या..

नर्सिंग होम कायद्याच्या नियमावलीतील रुग्णांचे हक्कदवाखान्यात किंवा रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे काही हक्क आहेत. हे हक्क समजून उमजून त्याचा योग्य वापर केल्यामुळे आरोग्यसेवा सुधारतील. सेक्शन 16, नियम क्र. 14


नर्सिंग होम कायद्याच्या नियमावलीतील रुग्णांचे हक्क

1) जखमी रुग्णाला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जखमी व्यक्तीला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क आहे.


2) रुग्णाला/आप्तेष्टांना माहिती मिळण्याचा अधिकार आहे.डॉक्टरांना कोणत्या आजाराची शंका येते आहे किंवा पक्के निदान झाले आहे? रुग्णाला झालेल्या आजाराचे स्वरुप; त्याची गंभीरता; उपचारामुळे होऊ शकणारे दुष्परिणाम; उपचारासाठी येणारा खर्च याची पुरेशी माहिती. आजा-याची परिस्थिती बदलली तर त्याची माहिती व उपचारामध्ये बदल केल्यास खर्चामध्ये किती बदल होणार आहे याची माहिती. 

रुग्णाने किंवा रुग्णाने निर्देशित केलेल्या आप्तेष्टाने मागणी केल्यावर इनडोर केसपेपरची फोटोकॉपी, फोटेकॉपीसाठीचा सुयोग्य खर्च भरल्यानंतर मिळाली पाहिजे. (ऍडमिट असताना 24 तासात, डिस्चार्ज मिळाल्यावर 72 तासात) डिस्चार्ज मिळतांना पुढील किमान माहिती देणारे डिस्चार्ज कार्ड मिळायला हवे. : दाखल करण्यामागचे कारण डॉक्टरी तपासणीत आढळलेल्या महत्त्वाच्या बाबी व तपासणीचे निष्कर्ष, निदान, केलेले उपचार, घरी पाठवताना रुग्णाची स्थिती. डिस्चार्ज मिळाल्यानंतर घ्यायची काळजी, घ्यायची औषधे, इतर सूचना तातडीने वैद्यकीय मदत हवी असल्यास कशी मिळवावी याची माहिती. (सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत).

सामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

3) उपचार नाकारण्याचा अधिकार, उपचारासाठी संमती: रुग्णाला धोका पोचू शकेल असे कोणतेही उपचार (शस्त्रक्रिया, रक्त देणे, धोक्याची शक्यता असलेल्या तपासण्या) देतांना रुग्णाला त्याबाबत पुरेशी माहिती मिळून (सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत) संमती देण्याचा, नाकारण्याचा अधिकार.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

4) गोपनीयतेचा व खाजगीपणाचा अधिकार: रुग्णाने डॉक्टरांना स्वत:च्या आरोग्यासंबंधीची दिलेली माहिती व डॉक्टरांना तपासणीतून मिळालेली माहिती ही खाजगी राहील व रुग्णाच्या परवानगीशिवाय रुग्णाची आयडेंटीटी (अपवादात्मक परिस्थिती वगळता) इतरांना कळवली जाणार नाही हा अधिकार.

5) सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क: रुग्णाने किंवा रुग्णाने निर्देशित केलेल्या आप्तेष्टाने मागणी केल्यास रुग्णाच्या पसंतीच्या दुस-या तज्ज्ञ डॉक्टरला त्याच इस्पितळात बोलावून सल्ला घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व रिपोर्टस् रुग्णाला मिळण्याचा हक्क आहे.

6) रुग्णाची मानवी प्रतिष्ठा राखली जाण्याचा अधिकार: रुग्ण असहाय असतात हे लक्षात घेऊन उपचार करणा-या डॉक्टरांनी व आरोग्य सेवकांनी रुग्णाच्या मानवी प्रतिष्ठेचा सन्मान केला पाहिजे. स्त्री रुग्णांना पुरुष डॉक्टर तपासत असताना स्त्री-कर्मचारी वा स्त्री आप्तेष्ट सोबत असायला हवी. अशा प्रथा इस्पितळांनी पाळायला हव्या.

7) एच.आय.व्ही. रुग्णांना भेदभावरहित वागणूक मिळण्याचा हक्क: एच.आय. व्ही. रुग्णांना भेदभाव न करता केवळ माणूस या नात्याने वागणूक मिळण्याचा हक्क आहे.

8) उपचारात पर्याय उपलब्ध असतील तर(उदा. कर्करोगावर कोणत्या प्रकारचा उपचार करायचा, हृदयविकारावर शस्त्रक्रिया करायची की नाही) त्यापैकी पर्याय निवडण्याचा किंवा उपचार नाकारण्याचा अधिकार रुग्णाला आहे.


तर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही घरबसल्या बनवू शकता. आणि या करता तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. संपर्क करा.सृष्टी महा ई सुविधा  *संतोष विठ्ठल साळवे..7900094419 

9) तक्रार करण्याचा हक्क: रुग्णांचे उपर्निर्देशित हक्कांची पायमल्ली होत आहे असे रुग्णाला / आप्तेष्टांना वाटल्यास त्याबाबत तक्रार करण्याचा रुग्णाला हक्क आहे. ही तक्रार इस्पितळ प्रमुखाकडे करण्याची पध्दत व तक्रार निवारण्याची पध्दत रुग्णाला कळायला हवी.

10) रुग्णावर संशोधन होणार असेल तर

त्याबाबतची नैतिक तत्त्वे ICMR ने निर्देशित केलेल्या धोरणाप्रमाणे आणि प्रक्रियेप्रमाणे पाळली जाण्याची हमी.

11) पुरुष डॉक्टर जेव्हा महिला रुग्णाची शारीरिक तपासणी करीत असतील त्या वेळी स्त्री रुग्णासोबत असण्याचा हक्क. 

12) रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सेवा व उपलब्ध सुविधांच्या दरांची माहिती मिळण्याचा हक्क. प्रत्येक रुग्णालयाने ही माहिती दर्शनी भागात स्थानिक आणि इंग्रजी भाषेत लावावी.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------------------  


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...