( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या तुम्हाला माहीती आहे का?
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. पुर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जात, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जात असे अज ही काही प्रमाणात असे प्रकार होताना अढळून येतात.
लग्न ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी भारतामध्ये कायद्याने त्यासाठी वयाची बंधने आहेत. भारतात 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम' 2006' करण्यात आला आणि 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अमलात आला.
बालविवाहाची कारणे :-
मुलगी सामान्यत: एक ओझे मानली जाते आणि पारंपरिकरित्या समाजात तिचे लग्न लवकरात लवकर केले जाण्याची वृत्ती आहे. बालविवाहाचे समर्थन करताना मुलीचे पालक असे म्हणतात की लहान वयात जर मुलांचा विवाह करुन दिला तर, हुंडा कमी द्यावा लागतो. पण ते हे विसरुन जातात कि 'हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961' नुसार हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे. मुलींना आपला साथीदार शोधण्याची समज येण्याच्या आधीच तिचे लग्न केले तर पालकांसाठी आपल्या जातीतच, आपल्या तोलामोलाचं कुटुंब मुलीसाठी शोधण्यास सहजता असते.
मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे पाहतात. लवकर विवाह म्हणजे वधूची पवित्रता आणि कौमार्य याची खात्री करण्याचा एक मार्ग आहे. संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली सुध्दा अनेक बाल विवाह केले जातात. शिक्षणाचा अभाव, बाल विवाहाच्या दूष्परिणामाविषयी जागृतीचा अभाव. कायद्याची अंमलबजावणी आणि इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाकडून कार्यवाहीत उदासिनता ही बालविवाह सुरु असण्याची महत्वपूर्ण कारणे आहेत.
यांचा बालविवाह होण्याची शक्यता आहे :-1) शाळेत अनियमित शिक्षण अर्धवट सोडलेल्या आणि नापास झालेल्या मुली.
2) स्थलांतरित कुटुंबातील मुली, वयात येणारे मुले - मुली,
3) घरातील कर्ती व्यक्ती मृत्यू पावल्यास,
4) जास्त मुले असणारे कुटुंब,
5) गरीब घरातील, मुला मुलींची जबाबदारी टाळणारी कुटुंब,
6) कर्जबाजारी कुटुंबातील मुलगी,
7) व्यसनी कुटुंबातील मुलगी,
8) एखादी अत्याचारग्रस्त मुलगी,
9) प्रेमात गुंतलेली मुलगी,
10) सामाजिक परंपरा, रुढी या प्रभावामुळे होणारे लग्न,
11) असुरक्षित वातावरण असल्यामुळे होणारे लग्न,
12) दुर्लक्षित मुलींचे कुटुंब,
13) निराधार मुली,
14) वस्तीतील मुलीसोबत एखादी घटना, एखाद्या मुलीसोबत लैंगिक शोषणाची घटना
15) अथवा एखादी मुलगी प्रेमविवाहात निघून गेली असल्यास
16) अशा घटनेवरुन वस्तीत, गावात भीतीपोटी इतर मुलींचे लग्न.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
बालविवाह का करु नये?बालविवाह हा मुलाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. बालविवाह झालेल्या मुलींचा शारीरिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्षे गाठायच्या आतच गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, मन, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या साऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाहीत. लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच मागासलेपणाचे लक्षण आहे.
दिनांक 3 जून 2013 व दिनांक 18 ऑगस्ट 2016 च्या अधिसूचनेनुसार ग्रामसेवक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना अंगणवाडी ताई सहाय्य करतात. याशिवाय पोलीस, ग्रामसेवक, ग्रामसेविका, शिक्षक व समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची बालविवाह रोखण्याची जबाबदारी आहे.
शिक्षा :-बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने बालविवाह होत असल्याची तक्रार लगेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 नुसार प्रथम श्रेणी न्यायपीठासमोर तक्रार अर्ज दाखल करुन बालविवाह रोखण्याबाबत आदेश मिळावेत. बालकल्याण समिती सुध्दा निर्णय घेऊ शकते. बालविवाह अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी आणि सीआरपीसीच्या कलम 151 नुसार पोलिसांना अपराध रोखण्यासाठी अटक करण्याचे सर्वतोपरी अधिकार आहेत.
18 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
बालविवाह झाल्यास, संबधित वर व वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, व जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वाना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.
मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायद्याने अल्पवयीन ठरविलेल्या व्यक्तिचे लग्न झाल्यास पोस्को, 2012 कायद्यानुसार सुध्दा गुन्हा दाखल होऊ शकतो.
अशी होते बालविवाह करणाऱ्यांवर कारवाई
- गावागावात बालसंरक्षण समिती तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून एखादा बालविवाह होत असल्याची माहिती या विभागाला मिळते. यानंतर शिक्षण विभागाच्या माध्यमातून अत्यंत गोपनिय पद्धतीने त्यांच्या वयाची पडताळणी केली जाते. बालविवाह असल्यास याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात येते. यानंतर लग्न होण्यापूर्वीच त्यावर कारवाई केली जाते. यावेळी होणारे वधू आणि वर यांचे समुपदेशन केले जाते. तसेच त्यांच्या पालकांना आम्ही आमच्या मुलांचे ते वयस्क होण्यापूर्वी लग्न लावून देणार नाही, असे बालकल्याण समितीसमोर लिहून द्यावे लागते.
जर लग्न झाले तर यांच्यावर होते कारवाई -
जर लग्नाची प्रक्रिया पार पडली, तर केवळ पालकांवरच नाही तर लग्नपत्रिका छापणारा मुद्रक, पुरोहित, फोटोग्राफर, कॅटरिंग व्यावसायिक, बिछायत केंद्र संचालक, सरपंच यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जात असल्याची माहितीही साखरकर यांनी यावेळी बोलताना दिली.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यासाठी किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची 'बालविवाह प्रतिबंध अधिकारी' म्हणून नेमणूक करण्यात येते. तसेच शासन त्या त्या विभागातील समाजसेवक संस्था, ग्रामपंचायती, सरकारी कार्यालये, गैरसरकारी संस्था यांना बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यास मदत करावी अशी विनंती करू शकते.
बालविवाह जबरदस्तीने झाल्यास जर बालवधू वा बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर तो विवाह रद्दबातल करण्यासाठी संबंधित वर वा वधू जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतात.
असा अर्ज दाखल करताना जर अर्जदार वर वा वधूचे वय किमान कायदेशीर वयापेक्षा कमी असल्यास थोडक्यात अर्जदार सज्ञान नसल्यास अर्जदाराला असा खटला त्याच्या पालकांच्या किंवा मित्राच्याद्वारे व बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याच्या सोबत दाखल करावा लागतो.
हा अर्ज बालविवाह झाल्यापासून अर्जदार वर असल्यास वयाच्या २३ वर्षापर्यंत व वधू असल्यास वयाच्या २० वर्षापर्यंत केव्हाही दाखल करू शकतात.
या अर्जानंतर संबंधित बालविवाह रद्दबातल झाल्याचा आदेश देताना न्यायालय सोबतच दोन्ही पक्षाकडून विवाहाच्या वेळी दिल्या गेलेल्या दागदागिने, रोख रक्कम, व इतर भेटवस्तू इत्यादी सर्व गोष्टी किंवा त्या वस्तूंची किंमत पैशाच्या स्वरूपात ज्याची त्याला परत करावी हा आदेश देईल. मात्र असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेईल.
*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने * स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
विवाह रद्दबातल झाला असा आदेश देतांनाच न्यायालय वर मुलाला वा त्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांना, वधूचा पुनः विवाह होईपर्यंत तिच्या निर्वाहासाठी विशेष भत्ता देण्याचे व तिच्या राहण्याची योग्य सोय करण्याची जबाबदारी संबंधीही आदेश देईल.
हा निर्वाहभत्ता एक रकमी असावा किंवा मासिक असावा. याबाबत निर्णय घेतांना न्यायालय दोन्ही पक्षांची परिस्थिती व जीवनमान लक्षात घेईल.
बालविवाह जरी रद्दबातल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते.
बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च यांचे आदेश दोन्ही पक्षांची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय देईल.
बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी अर्ज कुठे करता येईलजिथे वादी राहतो किंवा
जिथे प्रतिवादी राहतो किंवा
जिथे त्यांचा विवाह झाला किंवा
जिथे विवाहानंतर ते एकत्र राहत होते
यापैकी कोणत्याही एका जिल्हा दिवाणी न्यायालयात
बालविवाहासंबंधी वरील स्वरुपाचे कायदे करण्यात आलेले असले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे.
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------------