( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
*#तुमच्याविरुद्ध खोटी #FIR दाखल झाली तर काय कराल? समजून घ्या…*
आपसातील भांडणातून खोटे एफआयआर दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. कायदा आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे, परंतु याचा गैरवापर टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे.
आजकाल, अशा प्रकारच्या अनेक घटना झाल्या आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविण्यासाठी खोटे एफआयआर दाखल केले आहेत.
जरी त्या व्यक्तीने कायद्यांतर्गत आपले निर्दोषत्व सिद्ध केले तरी समाजात त्याच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहिले जाते.
तो आधीसारखा आदर मिळवू शकत नाही. आपल्याला खोटा एफआयआर टाळण्यासाठी कायद्याची काय तरतूद आहे, एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कोणती कारवाई केली जाऊ शकते आणि कसे करावे याची माहिती सदर लेखातून दिली आहे.
*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
एफआयआर (FIR) म्हणजे काय?
जेव्हा पोलिसांना एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळते, त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या प्रथम लेखी दस्तऐवजाला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात एफआयआर (FIR) म्हणतात. पोलिसांना एखाद्या घटनेची पहिली माहिती मिळते, तेव्हा एफआयआर हा त्याचा पहिला अहवाल असतो. हा सहसा पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर लिहिलेला अहवाल असतो. कोणतीही व्यक्ती त्याच्यावर किंवा जवळच्या आणि प्रियजनांसोबत झालेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसांत मौखिकरित्या किंवा लेखी तक्रार देऊ शकते. कॉलद्वारे देखील पोलिसांत तक्रार दाखल केली जाऊ शकते.
एका गुन्ह्यात पोलिसांना एखाद्याला अटक करण्याचा अधिकार आहे. त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकारही दिले आहेत. यासाठी त्यांना कोर्टाची परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र, अज्ञात गुन्ह्यामध्ये पोलिसांना ना कुठल्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार आहे आणि ना ते या खटल्याचा तपास करू शकतात.
एफआयआरचे (FIR) महत्त्व काय?
कुठल्याही गुन्ह्यात किंवा घटनेच्या तपासासाठी एफआयआर (FIR) हा सर्वात महत्वाचा दस्तऐवज असतो, कारण त्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. एफआयआर लिहिल्यानंतरच पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करतात.
एफआयआर (FIR) कोण दाखल करू शकतो?
एखाद्याला एखाद्या संज्ञेय घटनेची माहिती असल्यास, तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवू शकतो. ज्या व्यक्तीबरोबर ही घटना घडली आहे, त्याच व्यक्तीने एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला एखाद्या संज्ञेय गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास, ते स्वत: देखील एफआयआर दाखल करू शकतात. आपल्यासोबत एखादी घटना घडली असेल, जर आपल्याला नकळत काही गुन्हा घडला असेल तर, किंवा या वेळी घटनास्थळी उपस्थित असेल, तर आपण एफआयआर दाखल करू शकता.
एफआयआर (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया काय?
दंड प्रक्रिया संहिता, 1973च्या कलम 154मध्ये एफआयआर (FIR) नमूद केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या घटनेची / गुन्ह्यांची तोंडी माहिती देते, तेव्हा पोलिस ती लिहून घेतात. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्याला नागरिक म्हणून, आपण दिलेला मौखिक माहिती, पोलिसांना लिहून घेतल्यानंतर, पुन्हा वाचून दाखवण्याचा अधिकार आहे. आपण दिलेली माहिती पोलिसांनी लिहून काढल्यानंतर आपण त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
जर आपल्याला पोलिसांनी लिहिलेली माहिती योग्य आहे, आपले विधान किंवा तथ्ये तोड-फोड झालेली नाही, तरच त्यावर स्वाक्षरी करावी. ज्यांना लिहिता किंवा वाचता येत नाही, ते या अहवालावर अंगठा देखील लावू शकतात. एफआयआर नोंदवल्यानंतर त्याची प्रत अवश्य घ्यावी. एफआयआरची प्रत पूर्णपणे विनामूल्य मिळवणे, हा आपला अधिकार आहे.
एफआयआरमध्ये कोणत्या प्रकारची माहिती द्यावी?
एफआयआरमध्ये आपले नाव, पत्ता, तारीख, वेळ, रिपोर्ट देण्याचे ठिकाण इत्यादीबद्दल माहिती असलीच पाहिजे. घटनेची / गुन्ह्यांची खरी माहिती व त्यात तथ्य असणारी व्यक्तींची नावे व इतर माहिती तसेच काही प्रत्यक्षदर्शी असतील तर त्यांची माहितीही एफआयआरमध्ये द्यावी.
एफआयआर नोंदवताना आपण कोणतीही चुकीची माहिती सांगू नये किंवा वस्तुस्थिती बदल करून सांगू नये. असे केल्यास आपल्या विरूद्ध भारतीय दंड संहिता, 1860च्या कलम 203 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यात आपणास स्पष्ट माहिती नसलेले कोणतेही विधान असू नये.
जर आपला एफआयआर नोंदविला जात नसेल तर काय करावे?
जर आपला एफआयआर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला जात नसेल, तर आपण पोलीस अधीक्षक (एसपी) किंवा त्याहून वरच्या पदाचे पोलीस उपनिरीक्षक (डीआयजी) आणि पोलिस महानिरीक्षक (आयजी) यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता. आपण आपली तक्रार पोस्टाद्वारे या अधिकाऱ्यांना लेखी पाठवू शकता. ते त्यांच्या पातळीवरून या प्रकरणाची चौकशी करतील किंवा चौकशीचे निर्देश देतील. आपण इच्छित असल्यास, खाजगी स्तरावर कार्यक्षेत्रात येत असलेल्या न्यायालयात याबद्दल तक्रार करू शकता.
एफआयआर नोंदवूनही पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकत नसतील तर?
आपण एफआयआर नोंदवल्यानंतर, जेव्हा प्रकरण फारसे गंभीर नसते तेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत नाहीत किंवा पोलिसांना वाटते की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे कोणतेही पुरेसे कारण नाही. मात्र, यासाठी पोलीस या प्रकरणाची चौकशी का करत नाहीत, याची नोंद घ्यावी लागेल. त्यांनादेखील आपल्याला याबद्दल माहिती द्यावी लागेल.
एखाद्याने खोटा एफआयआर दाखल केल्यास काय करावे?
अनेक प्रकरणात असे दिसून आले आहे की, काही लोक वादविवाद झाल्यास परस्परांविरुद्ध खोटे किंवा बनावट एफआयआर दाखल करतात. ज्यांच्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल केला जातो, त्याला पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकवले जाते.
त्यामुळे त्या व्यक्तीचा वेळ, पैसा इत्यादी विनाकारण खर्च होत असतात.
परंतु खोटे एफआयआर दाखल होण्याविरूद्ध काही मार्ग आहेत होणारा त्रास टाळला जाऊ शकतो. फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम ४८२ असा कायदा आहे ज्याचा उपयोग अशा हेतुपरस्पर घटनांपासून दूर राहण्यासाठी केला जाऊ शकतो.
फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ काय आहे?
या कलमाच्या अंतर्गत वकीलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. यांत ज्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते.
म्हणजे, फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२अन्वये, ती व्यक्ती दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते.
त्यासाठी, वकीलच्या मदतीने यासंबंधीचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जातो आणि खोट्या एफआयआरच्या विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.
*आधारकार्ड अपडेट करणे झाले सोपे घरबसल्या दुरुस्त करा तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता व जन्म तारीख*
जर तुमच्याही आधारकार्ड मध्ये काही चुका असल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. यासाठी जर तुमच्या आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख याबाबत चुका असल्यास त्या अपडेट करणे गरजेचे आहे.
तुमच्या आधारमधील नाव, पत्ता व जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी संपर्क करा.. साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून काम केले जातील )
फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्ती उच्च न्यायालयात खालील आधार घेऊन अर्ज दाखल शकते आणि खोटे एफआयआर रद्द करू शकते,
1) – जर खोटा एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
2) – जो गुन्हाच झालेला नाही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
3) – एफआयआरमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप असतील तर
इथे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की,दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा यांच्यात काय फरक आहे.
जर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र गुन्हा असतो आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा अदखलपात्र समजला जातो. या दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र नोंदवही असणे कायद्याने बंधनकारक आहे.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल.
असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस त्याला लेखी स्वरूप देऊन, तक्रार देणाऱ्याला ते वाचून दाखवले पाहिजे. तसेच त्यावर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्याची प्रत मोफत देण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवर आहे.
अशी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते आणि अधिकाऱ्याला त्याची नोंद घेत तपास सुरु करावा लागतो.
अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेणे पोलिसांना बंधनकारक असले तरी न्यायालयाचा आदेश आल्यावरच ते या गुन्ह्यात तपास सुरु करू शकतात. तेव्हा हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल झाली की लगेच तपास सुरु होतो.
अर्थात कुठला गुन्हा दखलपात्र आहे किंवा अदखलपात्र आहे हे ठरवत असतांना पोलिसांची भूमिका देखील महत्वपूर्ण असते.
1) जर कोणी खोटा एफआयआर दाखल केला असेल तर आपण आधी अटकपूर्व जामीन घेऊ शकतो ज्यामुळे अटक टळू शकते आणि जर ते शक्य नसेल तर अटक झाल्यानंतर नियमित प्रक्रियेतून जामीन मिळवता येतो.
एखाद्या व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल झाला असेल तर त्याच्याकडे आपण गुन्हा केलेला नाही याबाबत जर काही पुरावा असेल तर उच्च न्यायालयात अर्जासोबत पुरावा म्हणून, ऑडिओ,व्हिडिओ, फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अशा कोणत्याही स्वरूपात देता येतो.
जसे कोणी आपल्याविरुद्ध चोरी करण्यासाठी आपल्याविरुद्ध खोटे एफआयआर करते तसे आपण त्या वेळी तेथे नसल्याचे पुरावे म्हणून देऊ शकता आणि स्थान कोठे आहे ते पुरावे दिले जाऊ शकतात. वकीलच्या मदतीने पुरावे योग्य रीतीने मांडू शकतात.
आपल्या बाजूने कोणताही साक्षीदार असल्यास, त्याचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करतांना नक्की उल्लेख करा.
जेव्हा उच्च न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दिला जातो तेव्हा त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाते आणि न्यायालयासमोर आपण सबळ पुराव्यांच्या आधारे आपले निर्दोषत्व सिद्ध केले तर न्यायालय एफआयआर रद्द करण्याचा आदेश देऊ शकतो.
परंतु जर आपण न्यायालयात आवश्यक पुरावा देऊ शकत नाही ज्याने तुमची निर्दोषता सिद्ध केली असेल तर न्यायालय हा अर्ज नाकारते. त्यानंतर एफआयआर दाखल झालेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जातात आणि न्यायालयात सुनावणी सुरु होते.
उच्च न्यायालयात अर्ज नाकारल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो. येथे एक महत्वपूर्ण मुद्दा देखील आहे की जर कोणी आपल्या विरूद्ध खोटा एफआयआर करतो.
आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अन्वये एक अर्ज द्याल, तेव्हा न्यायालय निर्णय देईपर्यंत पोलिस आपल्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि आपल्याला अटक करू शकत नाही.
चौकशीसाठी तपासणी अधिकाऱ्याला न्यायालय आवश्यक ते निर्देश देखील देऊ शकतात. जर न्यायालयाने यांत आपले निर्दोषत्व मान्य केले तर आपण वरील खोटे एफआयआर,आपली बदनामी या प्रकरणात त्या व्यक्तीच्या विरोधात होते मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतात.
(फौजदारी प्रक्रिया संहिता २५०) यांत ज्यांनी खोटा एफआयआर दाखल केला आहे त्यांना सुद्धा शिक्षा मिळू शकते.
अजून एक पर्याय म्हणजे भारतीय दंड विधानाच्या कलम २११ नुसार आपण त्याविरुद्ध एक केस दाखल करू शकता, ज्यामध्ये खोटा एफआयआर देणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा तसेच दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही या स्वरूपात शिक्षा हो शकते.
तसेच, भारतीय दंड विधानाच्या कलम १८२ नुसार, ज्या पोलिस अधिकाऱ्याने खोटे एफआयआर दाखल केला आहे,त्याच्यावर देखील कारवाई होते आणि तो अधिकारी शिक्षेस पात्र असतो.
2) संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत आपण उच्च न्यायालयात खोट्या एफआयआरच्या विरूद्ध अर्ज करू शकता:
जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीविरूद्ध खोट्या एफआयआर दाखल केला असेल तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने संविधानच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत एक रिट याचिका दाखल करू शकतो ज्याद्वारे खोटा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज देऊ शकता.
उच्च न्यायालयाने पुरावे तपासल्यानंतर, असे सिद्ध झाले की ज्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे तो निर्दोष आहे, मग तो खोटा एफआयआर रद्द होतो.
अशा पद्धतीने कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन आपण खोट्या एफआयआर विरुद्ध लढा देऊ शकतो...
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-----------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf