हा ब्लॉग शोधा

शनिवार, १२ जून, २०२१

*कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) : योजनेत मोफत उपचार उपलब्ध आहेत, नियम जाणून घ्या आणि संपूर्ण माहिती*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

*कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) : योजनेत मोफत उपचार उपलब्ध आहेत, नियम जाणून घ्या आणि संपूर्ण माहिती*

ईएसआयसी योजना काय आहे: केंद्रीय श्रम मंत्रालय कमी उत्पन्न असलेल्या पगारदार कर्मचाऱ्यांच्या आरोग्य लाभासाठी ही योजना चालवते.या अंतर्गत रुग्णालये राज्य सरकारद्वारे चालवली जातात.या योजनेचा लाभ खासगी कंपन्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे. ईएसआयसी अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ईएसआय दवाखान्यात किंवा रुग्णालयात जावे लागेल या योजनेत नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक कार्ड दिले जाईल.या कार्डच्या माध्यमातून हॉस्पिटल किंवा दवाखान्यात जाऊन मोफत उपचार करता येतात.

पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला विम्याचा तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला PF चे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी (ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

(ESIC) ईएसआय कार्डचे फायदे

या योजनेत समाविष्ट कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतात.  सर्वप्रथम, विमाधारक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचार मिळतात. याव्यतिरिक्त, आजारी रजेसाठी 91 दिवसांची रोख रक्कम दिली जाते.प्रसूती रजेवर असलेल्या स्त्रियांना प्रसूतीच्या 26 आठवड्यांपर्यंत सरासरी वेतनाच्या 100% आणि गर्भपात झाल्यास 6 आठवड्यांपर्यंत दिले जाते. तात्पुरते अपंगत्व असल्यास, पुनर्प्राप्ती होईपर्यंत आणि कायमचे अपंगत्व असल्यास, संपूर्ण आयुष्य मासिक पेन्शनची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, आश्रितांना पेन्शन, बेरोजगारी भत्ता, निवृत्तीनंतर मोफत उपचार, महिलेची ESIC रुग्णालयाबाहेर प्रसूती झाल्यास 7500 रुपयांपर्यंत मिळते. याशिवाय उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च म्हणून 15 हजार रुपये दिले जातात.


ईएसआयसी योजना ही स्वयं-वित्तपुरवठा करणारी सामाजिक सुरक्षा आणि कामगारांसाठी आरोग्य विमा योजना आहे.ज्यासाठी
कर्मचारी राज्य विमा महामंडळ ईएसआय अधिनियम नियम आणि विनियम तयार करण्यात आले आहेत. आरोग्य संबंधित सामान्य आजार, प्रसूती, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, व्यावसायिक इजा किंवा रोजगाराच्या दुखापतीमुळे मृत्यू इत्यादी बाबतीत ईएसआय कायदा 1948 द्वारे परिभाषित केलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सहाय्य प्रदान करणे.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी ( ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

*ESIC (कर्मचारी राज्य विमा योजना) चा लाभ कोण घेऊ शकतो?*

संस्था, कंपनी, कारखाने, रस्ते वाहतूक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिनेमा, वर्तमानपत्रे, दुकाने, शैक्षणिक / वैद्यकीय संस्था इत्यादी कर्मचाऱ्यांची संख्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त असावी, तर अनेक राज्यांमध्ये आस्थापनांमध्ये कव्हरेज आवश्यक आहे.मर्यादा अद्याप 20 आहे.भारत सरकारच्या एका योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्याचा पगार 21,000 रुपये प्रति महिना आहे (जेव्हा 2017 पूर्वी 15000 मर्यादा होती), त्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. 21,000 ची ही मर्यादा सर्व कायम आणि करार/आउटसोस कामगारांना लागू आहे. 21,000 च्या या मर्यादेत ओव्हरटाइम किंवा बोनसची रक्कम समाविष्ट नाही.याद्वारे तुम्ही ठरवू शकता की तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहात की नाही.

जर एखाद्या कामगाराचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांना मिळणार पेन्शन

कोरोना संकटाच्या वेळी सरकारने अनेक प्रकारच्या दिलासादायक घोषणा केल्यात.अलीकडेच सरकारने ईएसआयसी पेन्शनबाबतचे नियम बदलले होते. जर एखाद्या कामगाराचा मृत्यू कोरोनामुळे झाला आणि तो ईएसआयसीच्या कक्षेत आला तर त्याला ईएसआयसी पेन्शनचा लाभ मिळेल, असंही कामगार मंत्रालयाच्या वतीने सांगितले गेले, यासह काही अटी देखील समाविष्ट केल्यात.

नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला

कोरोना संकटाच्या वेळी जे लोक ईएसआयसी योजनेंतर्गत जोडले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या उद्देशाने हा त्वरित बदल नियमात करण्यात आलाय.

नवीन नियम 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आणि पुढील दोन वर्षांसाठी म्हणजे 24 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. ईएसआयसी पेन्शनचा लाभ घेण्यापूर्वी आम्हाला आवश्यक अटींबद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेणाऱ्याची पात्रता अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून ESIC मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा जर कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाल सहज याचा लाभ घेता येईल. 

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी (ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असावे

प्रथम पात्रतेच्या अटीनुसार, ईएसआयसी पोर्टलवर विमा काढलेल्या व्यक्तीची (आयपी) नोंदणी कोविड शोधण्यापूर्वी कमीत कमी तीन महिने आधी झाली पाहिजे. दुसरी अट अशी आहे की, विमाधारकाच्या मृत्यूचे एक वर्ष आधीचे योगदान कमीत कमी 78 दिवस असले पाहिजे. जर दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर पीडित कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळेल.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे ESI आणि पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

पेन्शनचा लाभ कोणाला मिळतो?

जर विमाधारक व्यक्ती विवाहित असेल तर त्याची पेन्शन पत्नी, आई, मुलगा आणि मुलगीमध्ये विभागली जाईल. आयुष्यभरासाठी पेन्शन रेटपैकी 60 टक्के पत्नीला मिळतील. आईला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन रेटचा 40 टक्के हिस्सा मिळेल. 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलाला पेन्शन दराच्या 40 टक्के रक्कम मिळेल आणि मुलीचे लग्न होईपर्यंत पेन्शनचा लाभ मिळेल. निवृत्तीवेतनाचा दर सरासरी वेतनाच्या 90 टक्के आहे. लक्षात ठेवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पेन्शनच्या एकूण रकमेपेक्षा एकूण पेन्शनची रक्कम जास्त असू शकत नाही. जर ती जास्त असल्यास त्याची कपात केली जाईल.

तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

ESIC Pension योजनेंतर्गत रोजंदारीच्या सरासरी 90 टक्के वेतन पेन्शन म्हणून मिळणार आहे. जर एखाद्या कामगारांचे सरासरी वेतन 20 हजार रुपये असेल तर त्याच्या सरासरी वेतन काढण्याचा नियमही देण्यात आलाय. प्रत्येक आर्थिक वर्षात दोन योगदान कालावधी असतात. प्रथम योगदानाचा कालावधी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत योगदानाचा दुसरा कालावधी आहे. एप्रिल ते सप्टेंबरच्या योगदानाच्या कालावधीसाठी येत्या वर्षाच्या जानेवारी ते जून या कालावधीस लाभाचा कालावधी म्हणतात. त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्या वर्षाच्या जुलै ते डिसेंबर या कालावधीला लाभ कालावधी म्हणतात. आयपीसाठी शेवटच्या योगदान कालावधीचा सरासरी पगार पेन्शनचा आधार असेल.

 नोकरी गमावलेल्या बेरोजगार लोकांना दिलासा देण्यासाठी श्रम मंत्रालयाने सुरू केलेली अटल बीमीत व्यक्ती कल्याण योजना 

बेरोजगारांना तीन महिन्यांच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम देणारी ही योजना अलीकडेच जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती, पण आता त्यात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे केवळ अर्जाच्या अटी कमी केल्या नाहीत तर लाभार्थींची संख्या देखील वाढवली जाणार आहे.कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) प्राप्त माहितीनुसार कोरोनाची दुसरी लाट निघून गेली आणि कोरोनाची प्रकरणे कमी झाली व परिस्थिती सामान्य झाली, तरी आतापर्यंत देशभरातून अर्ज येत आहेत. 

ABVKY या योजनेअंतर्गत, पगाराच्या 50 टक्के जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जातात. तीन महिने म्हणजे अशी वेळ जेव्हा कोणतीही बेरोजगार व्यक्ती स्वतःसाठी नवीन नोकरी शोधू शकते.

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय सी ( ESIC) संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

दरम्यान, जर कोणाला नोकरी मिळाली आणि ESICमध्ये त्याचे योगदान येऊ लागले, तर ही रक्कम तीन महिन्यांपूर्वी थांबवली जाते. मात्र, जर तो पुन्हा नोकरीवर गेला तर तो उर्वरित हप्त्यांचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.अर्जदाराला आता नोंदणीचा ​​एक वर्ष आणि एक योगदान कालावधीनंतरही योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो, तर आतापर्यंत नोंदणीची दोन वर्षे आणि ईएसआयसीमध्ये दोन योगदान कालावधीसाठी अर्ज केला जाऊ शकतो.

तसेच, आता योजनेच्या अटी पूर्वीपेक्षा अधिक सोप्या करण्यात आल्या आहेत. ESIC मध्ये सहा महिन्यांचा योगदान कालावधी आहे, ज्यात योगदान किमान 78 दिवस असावे. मात्र, आता एका योगदान कालावधीच्या फायद्यामुळे, त्याच्या कार्यक्षेत्रात येणारे बरेच लोक अर्ज करण्यास सक्षम असतील

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

*अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ*

   ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                वाचाल तर...  वाचाल !!! 


*अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ*

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाते. या योजनेतील विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत या उत्पन्नाची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता ही उत्पन्न मर्यादा वाढवल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. 

विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाची योजना

राज्य शासनाकडून मिळालेल्या भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते.18 ते 32 वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. तर 3 टक्के इतक्या व्याजदराने हे कर्ज दिले जाते.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

अधिक माहितीसाठी यावर संपर्क साधण्याचे आवाहन

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यानंतर 5 वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्याने या कर्जाची परतफेड करावयाची असते. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https://malms.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे. पुढील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


विविध शैक्षणिक कर्जाच्या योजना उपलब्ध

याशिवाय, केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येते. या योजनेतून लाभासाठी शहरी भागाकरीता विद्यार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. तर ग्रामीण भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 98 हजार रुपये इतकी आहे. यासाठीही विद्यार्थी अर्ज करु शकतात, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

12 जून बालकामगार प्रतिबंध दिवस (कायदा) (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६

   ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६

बालकामगार म्हणजे काय ? ज्या कामगाराचे वय १४ वर्षाच्या आत असते अशा बालकास बालकामगार असे म्हटले जाते. सुधारित कायद्यानुसार नाजुक आणि शरीरास धोका असणारा व्यवसाय किंवा कारखान्यात १८ वर्षाखालील काम करणाऱ्या कामगारांनाही बाल कामगार कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे.

बालकामगार प्रतिबंध कायदा १९८६

१४ वर्षांच्या आतील बालकांना हा कायदा लागू आहे .

 कुटुंबातील लहान मुला-मुलींना घरातील ,शेतातील , वीट भट्टीवर माती कालवणे ,कारखान्यांवर मोळी वाहने ,पाणी भरणे ,स्वयंपाक करणे अशी कामे लावणे आणि त्यांना शिक्षनाप्सून वंचित ठेवणे हा बाल कामगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा आहे .१४ वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे अगर त्यांचेकडून घरातील आणि शेतातील कठीण कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे .अशा सर्व प्रकारच्या कामना हा कायदा लागू आहे .

वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे . विशेषतः, १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो. दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या, किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. मात्र, या अधिनियमाच्या कक्षेमधून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे. नियमभंग करणा-याना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत रु.१०,००० ते रु.२०,०००/- दंड होऊ शकतो. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी "राष्ट्रीय बालकामगार योजना" राबवण्यात आलेली आहे.


बालकामगार मुक्ती अभियान

चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल, कपडे यांसारख्या वस्तूंची दुकाने आदी ठिकाणी आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करावयास लावणे ही खरे तर अत्यंत अनिष्ठ प्रथा आहे. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच पण शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात.

बालकामगाराची प्रथा हा समाजाला लागलेला कलंक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. हा कलंक दूर करुन बालकामगारांचे शिक्षण करणे ही सामाजिक गरज बनली आहे. गरीबीमुळे शाळा न शिकणारी मुले, मुली कामधंदा करुन अर्थार्जन करतात. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग, व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारिरीक व मानसिक वाढ होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.

बालकामगार निर्माण होण्यास आईवडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आदी पारंपारीक व्यवसाय करतात.


गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा/भंगार वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. काही मुले कारखान्यात काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सामान्यत: बालकामगार मुली या नाईलाजास्तव काम करतात.

शिक्षणासाठी येणारा खर्च पालकांना परवडणारा नसतो. जो थोडा बहुत पैसा मिळतो तो घरखर्चावर तसेच व्यसनावर खर्च होतो. अनेक मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निरनिराळ्या वस्तू पुनप्रक्रियेसाठी गोळा करतात. सतत घाणीत काम करुन त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. रोजगाराच्या समस्येमुळे सेवाक्षेत्रासह कारखानदारीतही बालकामगार आढळतात.


कारखान्याचे मालक व पालकांची बेपर्वाई यामुळे अजूनही विडी उद्योग व वस्त्रोद्योगामध्ये बालकामगार काम करीत आहेत. हॉटेल, बूटपॉलिश, गाडया पुसणे इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले आजही आढळतात. आपण विविध कामानिमित्त बाहेर जात असतो, अशा बऱ्याच ठिकाणी बालकामगार सर्रास काम करीत असल्याचे निदर्शनास येते. राहण्याची अपुरी जागा, मोठे कुटुंब, व्यसनी पालक या समस्येमुळे मुले धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करतात.

समाजामध्ये बालमजूर हा अत्यंत उपेक्षित घटक आहे. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे त्या वयात या मुलामुलींना धोकादायक उद्योगात ढकलले जाते. गरीबी, निरक्षरता, अंधश्रध्दा इत्यादी कारणे आहेत. पण यामुळे लाखो मुलांचे जीवन कोमेजून जात आहे. ज्या उद्योग, व्यवसायामध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करुन त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.


बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे. त्यांची पिळवणूक थांबली पाहिजे. त्यांचे हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे. केवळ चरितार्थ चालत नाही म्हणून बालवयात कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

बालकामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगार विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे. त्यांना शासनाकडून शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्न भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांनी एका ठिकाणी बसावे, अंकांची, अक्षरांची ओळख व्हावी यासाठी आनंददायी वातावरण निर्मिती विशेष शाळेतील कर्मचारी करतात. मुलांच्या कलाने शिकवितात. गाणी, गोष्टी, देशभक्तीपर गीते, परिसरातील माहिती दिली जाते. विविध सण व दिनविशेष शाळेत साजरे केले जातात. त्यांचे हरविलेले बालपण मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांना या विशेष शाळेत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शासनामार्फत बालकामगारांचेसर्वेक्षण करण्यात येते. बालकामगार शिक्षणापासून वंचित असतात. त्यांच्या घरी व परिसरामध्ये शिक्षणाचे, स्वच्छतेचे वातावरण नसते. त्यामुळे त्यांच्यावर याबाबतीतील संस्कार करुन, शिकण्याची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.

बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहे. उज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तरच भारत देश महासत्ता बनू शकतो.

 बालमजूरीची कारणे

युनिसेफ (UNICEF) च्या मते, मुलांचे शोषण करणे सोपे असते म्‍हणून त्‍यांना कामावर ठेवण्‍यात येते. लहान मुले त्यांच्या वयाला अयोग्य अशा ठिकाणी व अशा प्रकारची कामे का करत असतात यासाठी सामान्यतः त्यांची गरीबी हे पहिले कारण दिले जाते. परंतु यामागे लोकसंख्येचा भडका, स्वस्त मजूर, उपलब्‍ध असणार्‍या कायद्यांची अंमलबजावणी न होणे, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणे (पालक अनेकदा मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी कामावर पाठवितात जेणेकरून कुटुंबाचे उत्पन्न वाढेल) व ग्रामीण क्षेत्रांतील प्रचंड गरीबी अशी इतर ही कारणे आहेत. आणि जेथे बाल श्रम हेच कुटुंबाच्‍या उपजीविकेचे साधन असेल तेथे कोण काय करू शकते?


ऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण

आपली तक्रारी / समस्या नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा. https://mahakamgar.maharashtra.gov.in

कृपया आपण नोंदविलेल्या तक्रारी / समस्याचा क्रमांक पाठविण्याकरिता आपला मोबाईल नंबर / ई-मेल आयडी द्यावा.

नोंद : तक्रारी / समस्यादेना-यांनी आपला नोंदणी क्रमांक, नाव, संपर्क क्रमांक भरावा. सूचना / अभिप्रायांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत होईल.

तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्या

क्लिक करा https://mahakamgar.maharashtra.gov.in

आपल्या तक्रारीची तक्रारी / समस्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला तक्रारी / समस्या क्रमांक येथे भर व त्याची सद्यस्थिती जाणून घ्या.

तक्रारी प्रक्रिया

सर्व तक्रारी / समस्या नेमून दिलेले मुख्य विभागाचे अधिकारी पाहतील.

त्या नंतर विभाग प्रमुख आपल्या अधिका-यांशी चर्चा करतील.

तक्रारी / समस्या योग्य आसेल तर त्याचा विचार केला जाईल.

जर ई-मेल / पत्र व्यवारासाठी पत्ता / संपर्क क्र. दिला आसेल तर, ज्या व्यक्तीने तक्रारी / समस्या दिली आहे त्यांना प्रतिउत्तर दिले जाईल.


बाल कामगारांना मदत

बालकामगार विषयक तक्रारींकरिता येथे संपर्क साधावा

दूरध्वनी : 022 - 26572929

ई-मेल : childlabourcellmaharashtra@yahoo.com

बालकामगारांकरिता "प्रथम" हेल्पलाईन.

दूरध्वनी : 022 - 65134884

भ्रमणध्वनी : 09869467157

ई-मेल : kishorbhamre1@rediffmail.com

पोलीस स्थानक

आपण नजीकच्या कोणत्याही पोलीस स्थानकावर बालकामगार विषयक तक्रारी नोंदवू शकता भारतातील सर्व पोलीस स्थानकांचा तपशील पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.     

वेबसाइट :  येथे क्लिक करा. www.karmayog.org

राज्याचे कामगार आयुक्त

महाराष्ट्र राज्य शासनाचा कामगार विभाग

वेबसाइट : येथे क्लिक करा.  www.childlabourcellmaharashtra.com

मुंबई व उर्वरित महाराष्ट्राकरिता "रेस्क्यू" हेल्पलाईन

वेबसाइट : येथे क्लिक करा.

www.pratham.org 

ई-मेल : childlabourcellmaharashtra@yahoo.com

संकटग्रस्त मुलांकरिता देशातील ७२ शहरांमध्ये दूरध्वनी क्रमांक १०९८ ही सेवा दिवसातील २४ तास विनामुल्य उपलब्ध आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

बुधवार, ९ जून, २०२१

पहिल्याच पावसात मुंबई तुंबली' का? या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची 'तुंबई' होते.

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 


पहिल्याच पावसात मुंबई तुंबली' का? या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची 'तुंबई' होते.

दरवर्षी मुंबईत सलग काही तास पाऊस कोसळल्यानंतर सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात नाले सफाईचे काम सुरू करते. यंदा मुंबई महानगरपालिकेने मोठ्या नाल्यांमधून 3 लाख 24 हजार मेट्रिक टन गाळ काढला असल्याची माहिती देण्यात आली आहे.पावसाळापूर्व नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा दरवर्षी पालिकेकडून केला जातो पण काही तासांच्या पावसातच हा दावा फोल ठरताना दिसतो. गेल्या काही वर्षांपासून दर पावसाळ्यात किमान एकदा तरी मुंबईची अवस्था अशीच होते, असं निरीक्षण आहे. पण हे असं का घडतं?

आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे का? तसे नसेल तर पॅनला तातडीने आधार कार्डशी लिंक करा कारण आता तारीख वाढविण्यात येणार नाही आणि तुम्हाला दंड भरावा लागेल. हे लक्षात घेता आता बँक आपल्या ग्राहकांना सतर्कतेचा मेसेज पाठवत आहे जेणेकरुन ग्राहक 30 जूनपूर्वी पॅनबरोबर आधार लिंक करू शकतील. वास्तविक, आयकर विभागाने पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख म्हणून 30 जून 2021 निश्चित केले आहे. 30 जूनपर्यंत आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यासाठी  संपर्क करा ...संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419

1) भौगोलिक परिस्थिती

सात बेटं एकमेकांना जोडून तयार केलेलं शहर, ही मुंबईची ऐतिहासिक ओळख आहे. पण या सात बेटांवर एकूण 22 टेकड्याही होत्या. दोन बाजूंना खाड्या आणि समुद्र आणि मध्ये 22 छोट्या मोठ्या टेकड्या यामुळे मुंबईची भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल आहे.घाटकोपर ते भांडूप यांदरम्यान आजही टेकड्यांची रांग दिसते, तर या टेकड्यांच्या पूर्वेकडचा प्रदेश खाडीजवळ आहे. पूर्वी याच भागातून ठाणा नदी वाहायची, असे उल्लेख बाँबे गॅझेटिअरमध्ये आढळतात. त्यामुळे एका बाजूला टेकडी, दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधला सखल प्रदेश यामुळे या भागात पाणी तुंबतं.त्याच प्रमाणे शीव ते कुर्ला या दरम्यान खाडी आणि दलदलीचा भाग होता. रेल्वेचा पहिलावहिला मार्ग बांधताना या भागात भराव टाकण्यात आला. त्यानंतरही शहर विकसित होताना अनेक ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात भराव टाकला.हा भरावाचा भाग सखल प्रदेशातच असल्यानं तिथं पाणी तुंबतं. सायन चुनाभट्टी, दादर पश्चिम आणि मुंबईतली अनेक ठिकाणं ही भराव टाकून अस्तित्वात आली आहेत. यातले काही भाग भरावानंतरही सखल आहेत; तिथं दरवर्षी पाणी तुंबतं.



2) खारफुटी आणि मिठागरांचा नाश

मुंबई तीन बाजूंनी समुद्रानं वेढलेली आहे. समुद्र आणि खाडी ते जमीन यांच्यामध्ये दलदलीच्या प्रदेशात असलेल्या खारफुटी जंगलांमुळे मुंबईचा किनारा सुरक्षित राहतो. खारफुटीचं जंगल समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करतं आणि जमिनीवर पाणी पसरू देत नाही.पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईला पडलेल्या बेकायदेशीर झोपड्यांच्या आणि काही इमारतींच्याही विळख्यामुळे ही खारफुटीची जंगलं आणि मिठागरं नष्ट होत चालल्याचं मत पर्यावरणतज्ज्ञ आणि अभ्यासकांचं आहे.भरतीचं पाणी खाडीतून थेट मुंबईच्या किनारपट्टीवर येण्याऐवजी ते या खारफुटी जंगलांमध्ये अडतं. त्यामुळे किनाऱ्यावरील जमिनीची धूप होत नाही. परिणामी शहर सुरक्षित राहतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये या खारफुटी जंगलांची कत्तल झाली आहे,""मुंबईभोवती असलेल्या खारफुटीच्या जंगलांच्या कवचापैकी 70 टक्के कवच आपण नष्ट केलं आहे. ही हानी प्रचंड आहे."त्याप्रमाणे मिठागरंही मुंबईला सुरक्षित ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बाजूला असलेल्या या मिठागरांमध्ये खाडीचं खारं पाणी साठतं. हे पाणी थेट मुख्य शहरात आलं, तर समस्या गंभीर होतील,

3) पावसाचं प्रमाण आणि भरती

मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची समस्या काही नवीन नाही, तरीही शहरात राहणारे अनेक वयोवृद्ध लोक सांगतात की, एवढ्या मोठ्या प्रमाणात सातत्यानं पाणी तुंबण्याच्या घटना गेल्या 10-15 वर्षांपासून घडायला लागल्या आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल झाला.खूप कमी वेळात खूप जास्त पाऊस पडल्यानं पाणी साचतं. तसंच भरती-ओहोटी या गोष्टींचाही प्रभाव पडतो. मुसळधार पाऊस असताना चार मीटरच्या वर भरती असेल, तर मुंबईच्या सखल भागांमध्ये हमखास पाणी तुंबत.मात्र हा मुद्दा मुंबईच्या हवामानखात्याचे संचालक कृष्णानंद होसाळीकर मान्य करत नाहीत. "मुंबईतल्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे किंवा नाही, हे ठरवण्यासाठी किमान गेल्या 10-15 वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय याबद्दल काही ठोस सांगता येणार नाही," ते म्हणतात.

मुंबईत पावसाचा एक ठराविक पॅटर्न दिसतो. या शहरात पाऊस तुकड्या तुकड्यांमध्ये पडतो. त्यात जास्त, खूप जास्त आणि अतितीव्र या तीन श्रेणींचा समावेश आहे. अतितीव्र श्रेणीत दिवसभरात 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. अशा घटना दर पावसाळ्यात पाचपेक्षा कमी वेळा घडतात. तर सर्वसाधारणपणे मुंबईत 'जास्त' पाऊस पडतो,"अतितीव्र पावसाच्या वेळी भरती आली, तर मुंबई संकटात येतं.मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा पर्जन्य जलवाहिन्यांमार्फत समुद्रातच केला जातो. पण प्रचंड पाऊस पडला, तर हे पाणी समुद्रात सोडणारे दरवाजे भरतीच्या वेळी बंद केले जातात. त्यामुळे पाणी तुंबतं.

4) शहराची वाढ आणि नियोजनाचा अभाव

काही वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईचं क्षेत्रफळ साडेचारशे चौरस किमीच्या आसपास होतं. आता हेच क्षेत्रफळ 603 चौरस किलोमीटर एवढं पसरलं आहे. ही वाढ भराव टाकून झाली आहे, 

ही वाढ करताना रस्ते, मलनि:सारण, पाण्याचा निचरा या गोष्टींचा काहीच नियोजनबद्ध विचार झाला नाही, "शहरांचं नियोजन करताना प्रामुख्यानं डोंगर, डोंगराचा उतार, नद्या आणि नाले या चार भौगोलिक गोष्टींचा विचार होणं गरजेचं असतं. या गोष्टी नकाशावर नोंदवल्या की, कोणताही विकास करताना या गोष्टींना त्याची झळ पोहोचणार नाही, याची खात्रीही करावी लागते. मुंबईचा विकास होताना या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं,"पाणी तुंबण्याची सर्वांत जास्त प्रकरणं उपनगरांमध्ये घडतात.

"ब्रिटिशांनी जुन्या मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी उत्तम जागा तयार ठेवल्या होत्या. यात वरळीच्या मोठ्या नाल्याचा समावेश आहे. पण उपनगरांचा समावेश त्या वेळी महापालिकेच्या कक्षेत नव्हता. उपनगरं 1951 मध्ये महापालिकेच्या कक्षेत आली. पण त्यांचा विकास होताना वरील महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्यानं दर वर्षी मुंबई तुंबते,"

रस्ते उभारताना मध्यभागी रस्ता उंच हवा आणि दोन्ही बाजूंना निमुळता झाला पाहिजे. तसंच दोन्ही बाजूंना पाणी वाहून नेण्यासाठी गटारं हवीत. हा विचार रस्ते बांधणीच्या वेळी होत नाही, तसंच प्रत्येक विभागातील नागरिकांशी, स्थानिक पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या त्या विभागातील समस्येवर उपाय शोधणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी नाला बांधायचा असेल, तर तशी सोय व्हायला हवी, 



5) 'परळ-हिंदमाता'ची समस्या

स्वातंत्र्यापूर्वीही मुंबईच्याच हद्दीत असलेल्या परळ आणि हिंदमाता या परिसरात आता प्रचंड पाणी तुंबतं. याआधी हे पाणी तुंबत नव्हतं, "लालबाग-परळ या भागात असलेल्या गिरण्यांच्या आवारात तळी होती. या तळ्यांमधलं पाणी गिरण्यांमधल्या कामांसाठी वापरलं जायचं. या तळ्यांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत होता. पण 'विकासा'च्या नावाखाली आपण सगळी तळी बुजवली. त्यामुळे आता इथे पडणारं पावसाचं पाणी वाहून जायला जागा उरलेली नाही," "ब्रिटिशांनी कोणत्याही ठिकाणी भराव टाकताना स्थानिकांकडून हरकती वगैरे मागवण्याची प्रक्रिया पाळली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र ही प्रक्रिया कमीत कमी पारदर्शक झाली. त्यामुळे लोकांचा सहभाग कमी होत गेला. परिणामी भराव टाकल्यानंतर काय काय समस्यांना तोंड द्यावं लागेल, याचा विचार झालेला नाही,"

6) विविध यंत्रणांचा गुंता

पूर्वीच्या काळी मुंबईत खूप कमी यंत्रणा एकाच वेळी कार्यरत होत्या. यात महापालिका, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे अशा प्रमुख यंत्रणांचा समावेश होता. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतल्या यंत्रणा वाढल्या आहेत,सध्या मुंबईत MMRDA, MSRDC, MHADA, MMRC, महावितरण, रिलायन्स एनर्जी, रेल्वे, मुंबई महापालिका, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोर्ट ट्रस्ट, पोस्ट, लष्कर, विमानतळ प्राधिकरण अशा वेगवेगळ्या यंत्रणा एकाच वेळी काम करतात.या सगळ्या यंत्रणांचा एकमेकांशी काहीच समन्वय नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर यातली किमान एक यंत्रणा काही ना काही काम करत असते.त्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. पण जबाबदारी ढकलायच्या वेळी फक्त मुंबई महापालिकेचं नाव पुढे येतं, रेल्वेच्या हद्दीतले नाले साफ करण्यासाठी महापालिका रेल्वेला दरवर्षी चार कोटी रुपये देते. तरीही रेल्वेची अवस्था बिकटच आहे, ही जबाबदारी कोणाची.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

7) बेजबाबदार कारभार

या सगळ्याबरोबरच जवळपास 35 हजार कोटी रुपयांचा, म्हणजेच युरोपमधल्या एखाद्या छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेचा बेजबाबदार कारभारही मुंबईची तुंबई होण्यास कारणीभूत ठरत पालिका शहरातल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी 150 कोटी रुपयांचं कंत्राट देते, साधारण एवढंच कंत्राट नालेसफाईसाठी दिलं जातं. पण यात कुठेही पारदर्शकता नसते. तसंच एखादा रस्ता बांधल्यानंतर काही महिन्यांतच त्या रस्त्यावर खड्डे पडत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित केली जात नाही,"पावसाळ्यात कोणत्या सखल भागात पाणी तुंबतं, याचा अभ्यास करून महापालिकेने जवळपास 225 जागा हेरल्या होत्या. या जागांवर 298 पंप बसवण्यात आले होते," 

8) ड्रेनेज यंत्रणा

मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या ब्रिटिशांनी बांधल्या आहेत. 100 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी बांधलेल्या या पर्जन्य जलवाहिन्या त्या वेळच्या लोकसंख्येचा आणि शहराचा विचार करून बांधण्यात आल्या होत्या.पण उपनगरांचा विकास 1960नंतर झपाट्यानं झाला. या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची गरज होती, पण त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही."26 जुलै 2005च्या पुरानंतर माधवराव चितळे समितीनं ही यंत्रणा अपुरी असल्याचा निष्कर्ष काढला. मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी 25 मिमी पावसाचे पाणी वाहून नेण्याची आहे. ती वाढवून 50 मिमी करावी, अशी शिफारस या समितीने केली," तासभर मुसळधार पाऊस पडला, तर मुंबई तुंबते. हे टाळण्यासाठी मुंबईत ब्रिमस्टोवॅड म्हणजेच पर्जन्य जलवाहिन्यांचं जाळं तयार करण्याची शिफारसही या समितीनं केली. या शिफारशीनुसार शहर आणि उपनगरांमध्ये 58 प्रकल्प हाती घेण्यात आले.2006पासून सुरू झालेल्या या प्रकल्पातली फक्त 17 ते 18 कामं पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला या प्रकल्पासाठी 1800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. आता हा खर्च पाच हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे,ही कामं पूर्ण होण्यात ठिकठिकाणची अतिक्रमणं, बेकायदेशीर झोपड्या यांचा अडथळा असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.या पर्जन्य जलवाहिन्यांबरोबरच शहरात पंपिंग स्टेशन उभारण्याची शिफारसही चितळे समितीने केली होती. त्यानुसार शहर आणि उपनगरांमध्ये आठ पंपिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. त्यापैकी पार्ल्याजवळील इर्ला, वरळीजवळील हाजीअली, शिवडी येथील ब्रिटानिया आउटफॉल आणि गजगरबंद ही पंपिग स्टेशन सुरू आहेत, "या पंपिंग स्टेशनमधल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी समुद्राच्या मुखाशी 27 फ्लड गेट्स बांधण्यात आली आहेत. भरती आणि मुसळधार पाऊस या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या, तर ही फ्लड गेट्स बंद ठेवावी लागतात. हे दरवाजे उघडले, तर भरतीचं पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गेट्स बंदच ठेवली जातात. परिणामी पंपिंग स्टेशनमधून पाणी समुद्रात जात नाही आणि शहर तुंबतं," 

9) नद्यांचा ऱ्हास

मुंबईत दहिसर, मिठी, ओशिवरा आणि पोयसर अशा चार प्रमुख नद्या आहेत. तसंच मुंबईच्या जवळून वैतरणा, तानसा, उल्हास अशा नद्या वाहतात. मुंबईतल्या नद्या आज फक्त नाल्यांच्या रूपात अस्तित्त्वात आहेत.

वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणताही विकासप्रकल्प आखताना पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं असतं. पण मुंबईतल्या नद्यांवर भराव टाकून विकास झाला."पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याची पातळी किती जास्त वाढते, ते नोंदवलं जातं. त्यानंतर त्या पातळीपासून दोन्ही बाजूंना 30 मीटर जागा मोकळी सोडावी लागते. जेणेकरून पावसाळ्यात पूर आला, तरी निवासी भागाला त्याचा फटका बसणार नाही. मुंबईत हे कुठेच झालं नाही. उलट लोकांनी नदी, नाले यांच्यात भराव टाकून 'विकास' केला,"वांद्रे रेक्लमेशनचा प्रस्ताव आला तेव्हाही लोकांना विश्वासात घेतलं गेलं नाही. रेक्लमेशनची घोषणा न करता, शास्त्रीय अभ्यास न करता इथे भराव टाकला. त्याचप्रमाणे MMRDA, MHADA या यंत्रणांनीही मिठी नदीवर भराव टाकून BKC चा भाग विकसित केला. त्यामुळे मिठी नदी आक्रसली आणि 26 जुलैच्या वेळी हाहा:कार झाला," मिठी नदीबरोबरच दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या नद्याही गाळात गेल्या आहेत.

"पर्यावरणाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवून विकास होऊ शकतो. त्या विकासामुळे आर्थिक भरभराटही होईल. पण ही भरभराट विनाशाकडे वाटचाल करेल. मुंबईत नेमकं हेच होत आहे," 

(सध्याची मुंबईतील पावसाची स्थिती आणि आजही मुंबईत पाणी तुंबण्याला कारणीभूत असलेल्या परिस्तितीचा आढावा वृत्तपत्रकाच्या बातमीतून घेण्यात आला आहे.)

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

-----------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

मंगळवार, ८ जून, २०२१

जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                 वाचाल तर...  वाचाल !!! 


 जुना फोन रिसायकल करून मिळवा पैसे; या वेबसाइट्सवर मिळेल चांगली किंमत  

टेक्नॉलॉजी रोज बदलत असते. चार ते पाच महिन्यानंतर गॅजेट्सचा नवीन व्हर्जन बाजारात येतो. कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह नवीन फोन सतत लाँच करत असतात. अश्यावेळी आपण ट्रेंड पाहून नवीन गॅजेट्स विकत घेतो. त्यामुळे जुने फोन्स, गॅजेट्स तसेच पडून राहतात किंवा आपण घाई घाईत ते कमी किंमतीत विकून टाकतो. आज आम्ही तुम्हाला अश्या काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या जुन्या गॅजेट्सची चांगली किंमत देतील. म्हणजे तुमचा फोन रिसायकल देखील होईल आणि तुमची कमाई देखील होईल. या वेबसाईट्सवर फोन्स, टीव्ही, लॅपटॉप आणि इतर अनेक गॅजेट्स देखील विकता येतील. काही वेबसाइट्सवर तुम्ही जुन्या गॅजेट्सची खरेदी पण करू शकता.

जुना फोन विकण्याआधी किंवा Exchange करण्यापूर्वी ही महत्त्वाची 3 कामं कराच; अन्यथा येईल मोठी समस्या

अनेक जण नवा फोन (Smartphone) खरेदी करताना, आधीचा जुना फोन विकतात किंवा एखाद्याला वापरायला देतात. पण जुना फोन विकताना (Selling Phone) किंवा दुसऱ्याला वापरायला देताना किंवा Exchange करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. बँकेसंबंधी माहिती, प्रायव्हेट फोटो, पासवर्ड, सोशल मीडिया अकाउंट अशा अनेक गोष्टी सेव्ह असतात. त्यामुळे जुना फोन विकताना काळजी घेणं गरजेचं आहे.

Factory Reset -

जुन्या फोनमध्ये तो विकण्यापूर्वी किंवा दुसऱ्याला देण्याआधी Factory Reset करणं अतिशय आवश्यक आहे.

असं केल्याने मोबाईलमधील डेटा डिलीट होईल. फोनच्या सेटिंगमध्ये बॅकअप अँड रिसेटचा ऑप्शन दिसेल. त्यातून फॅक्टरी रिसेट करता येईल.

डेटा बॅकअप -

स्मार्टफोन विकण्यापूर्वी Data Backup घेणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या फोनमधील डेटा लीक होण्याची तसंच डिलीट होण्याची भीती राहणार नाही. यासाठी सेटिंगमध्ये बॅकअप ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा डेटा आपोआप Google Drive वर सेव्ह होईल.

Google ID -

फोन विकण्याआधी Google ID डिलीट करणं गरजेचं आहे. यामुळे खासगी माहिती, पासवर्ड्स लीक होणार नाहीत. यासाठी सेटिंगमध्ये User and Accounts ऑप्शनमध्ये जावं लागेल. इथे Remove पर्यायावर क्लिक केल्यानंतर अकाउंट डिलीट होईल. नेहमी सोशल मीडियाचा वापर होत असल्याने अनेकदा आपल्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड सेव्ह असतात. Facebook, Instagram, Gmail सारखे अकाउंट्स फोनमध्ये ओपन असल्याने ते फोनमधून डिलीट करणं गरजेचं आहे. तसंच फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर्सचाही बॅकअप घेणं गरजेचं आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 
 
कॅशीफाय (cashify)

या वेबसाइटवर तुम्ही फोन विकण्यासोबतच रिसायकल आणि रिपेअर पण करू शकता. इथे स्मार्टवॉच, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप, गेमिंग कन्सोल, डीएसएलआर एवढंच काय तर  इयरबड्स विकण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. www.cashify.in   या  वेबसाइट्सवर वर जाऊन योग्य तो पर्याय निवडा.  

बुडली (budli)

www.budli.in हि अजून एक वेबसाईट आहे जी जुने फोन विकत घेते. जर तुमचा मॉडेल तर तुम्हाला त्वरित त्याची किंमत सांगितली जाते. तुम्हाला ती किंमत मान्य असेल तर तुमचा डिवाइस तुमच्या दारात येऊन ताब्यात घेतला जातो आणि चौवीस तासांच्या आत तुमच्या बँक अकॉउंटमध्ये पैसे पाठवले जातात.  

इन्स्टाकॅश (getinstacash)

www.getinstacash.in वर तुम्ही तुमचा कोणताही जुना गॅजेट  सहज विकू शकता आणि चांगली किंमत मिळवू शकता. इथे तुम्ही बुकिंग केल्यावर कंपनीचा कर्मचारी स्वतःहून तुमच्या घरात येऊन फोन घेऊन जाईल आणि किंमत देईल. 

यांत्रा (yaantra)

www.yaantra.com हि अजून एक वेबसाईट आहे जी तुमच्या जुन्या गॅजेट्सना चांगली किंमत मिळवून देते. कंपनी दावा करते कि या वेबसाइटवर फक्त 60 सेकंदात जुना फोन विकत घेतला जातो. 

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 




पुढील काही महीन्यात टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं?  तुम्हाला लवकरच याबद्दल अपडेट मिळेलल....

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. लॉकडाऊनमध्ये झालेली पगार कपात किंवा कमी उत्पन्न यामुळे त्यांना ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल इत्यादी वेळेवर भरता आलेले नाही. यामुळे काही बँका ग्राहकांवर वेगवेगळ्या कारवाई करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहे, यात क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्याच्या नावाखाली ग्राहकांसोबत गैरवर्तवणूक केली जात आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास वसुलीच्या नावाखाली एजंट कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतात किंवा तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल मर्यादेच्या आत भरण्यास सांगितले जाऊ शकते? याबाबतचे ग्राहकांचे नेमके अधिकार काय असतात, तसेच जर तुम्ही बिल भरण्यास सक्षम नसाल तर तुम्ही काय करु शकता, याची माहिती असणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत नसाल तर काय?

जर ग्राहक वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर बँक त्यांच्यावर बर्‍याच प्रकारे कारवाई करू शकते. तसेच बँक कायदेशीररित्या ग्राहकांविरूद्ध तक्रार दाखल करु शकते. त्यामुळे तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. जर एखादा ग्राहक क्रेडिट कार्डचे बिल भरत नसेल तर त्याला सर्वप्रथम डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते. त्यानंतर त्याचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले जाते.या नंतरही जर त्याने बिल भरले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येऊन बिलाची वसूली करतो. यामुळे तुमच्या सिबिल स्कोर वर परिणाम होतो.

ग्राहकांचे अधिकार काय?

💠जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल बाकी असल्यात तुम्ही सर्वप्रथम त्याची कमीत कमी रक्कम देऊ शकता. दर तुम्ही ते करण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही ग्राहक सेवा अधिकाऱ्याची मदत घ्या. यानंतर तुम्हाला काही पर्याय आणि वेळ मिळू शकतो. ज्याद्वारे तुम्ही सहज क्रेडिट कार्डचे बिल भरु शकता.

💠जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सक्षम नसाल, तर कोणताही बँक कर्मचारी तुम्हाला धमकी देऊ शकत नाही. तसेच तुमचे शारीरिक नुकसान करू शकत नाही. त्याशिवाय तुमच्यासोबत सामाजिक आणि सार्वजनिकरित्या गैरवर्तन करू शकत नाही.

💠कित्येदा क्रेडिट कार्डच्या बिलाच्या वसूलीसाठी काही तृतीयपंथीय लोकांना पाठवले जाते. मात्र ते देखील तुम्हाला केवळ कर्ज परत करण्याबाबतच सांगू शकतात. तसेच, हे लोक फक्त दिवसा तुमच्याकडे येऊ शकतात. रात्रीच्यावेळी तुमच्याकडे कोणीही व्यक्ती येत नाही. त्यांना त्यांच्या काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत.

💠जर तुम्ही क्रेडिट कार्डचा हप्ता भरण्यास सक्षम नसाल, तर प्रथम आपल्याला बँकेकडून काही नोटीसा दिल्या जातात. तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. तसेच रिकव्हरी एजंटही तुम्हाला काही दिवसांचा कालावधी देतो.

💠यानंतरही तुम्ही बिल न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. ज्यात तुमची संपत्ती गहाण ठेवणे, त्याचा लिलाव केला जातो. ज्याद्वारे बँक त्यांची थकबाकी वसूल करते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत करते.

क्रेडिट कार्डातील पैसे वापरण्याची लिमिट कशी वाढवाल? जाणून घ्या सर्व काही

नोकरी करणाऱ्या अनेकांकडे हमखास क्रेडीट कार्ड पाहायला मिळतात. मात्र बरेच जण त्यांच्या क्रेडीट कार्डच्या लिमिटवर नाखूष असतात. आपल्या क्रेडीट कार्डची मर्यादा जास्त असावी, असे अनेकांवा वाटत असते. या मर्यादेद्वारे संबंधित व्यक्तीला विविध सेवांसाठी पैसे उधार घेता येतात. याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड रिवार्ड, कॅशबेक, व्याजमुक्त वेळेवर लोन मिळते असे अनेक फायदे आहेत. 

*Star Health Insurance*

मित्रानों आजार आणि अपघात कधी सांगून येत नाही ! आजकालचा माणूस आजारापेक्षा हॉस्पिटलच्या खर्चाला जास्त घाबरत आहे.

1) कोविडमुळे हॉस्पिटलच्या खर्चाची चिंता ?

2) इनकम टॅक्स मध्ये सूट हवी ?

3) माझा विमा आहे पण संपूर्ण कुटुंबाचा नाही, आता ? 

4) अपघात परिस्थितीमध्ये पैसे कुठून येणार ?

प्रश्न अनेक पण उत्तर मात्र एक *"Medical Health Insurance"*

आपल्या परिवाराच्या आर्थिक व आरोग्य सुरक्षासाठी Star Health पॉलिसी साठी आजच मला संपर्क करा...🙏🏻

*आपला मित्र .. Star Health Insurance प्रतिनिधी...*

*श्री.सुनील आवारे , मुंबई*

*मो.नं. 73036 81406*

क्रेडिट कार्डावर मर्यादा असणे याचा अर्थ म्हणजे तुम्ही बँकेकडून निश्चित करण्यात आलेली ठराविक रक्कम खर्च करता येते. ही रक्कम तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकता. जर तुमच्याही क्रेडीट कार्य कमी असेल तर ती कशी वाढवता येऊ शकते, याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो? याचीही माहिती सांगणार आहे.तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो? 

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड म्हणजे एखाद्या ठराविक बँक किंवा वित्तीय संस्था जारी करण्यात आलेले प्लास्टिक किंवा मेटलचे कार्ड. या कार्डद्वारे तुम्हाला Pre-Approve लिमिटमधून काही ठराविक रक्कम उधार घेण्याची सुविधा दिली जाते. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ती बँकेला परत करावी लागते.

क्रेडीट कार्डची मर्यादा कशी निश्चित होते?

क्रेडीट कार्डचे लिमिट ही आपल्या बँकेवर आधारित असते. तसेच तुमच्या व्यवहाराच्या इतिहासाच्या आधारावर कार्डचे लिमिट अवलंबून आहे. बँकने जारी केलेल्या वेगळे-वेगळे कार्डवर लिमिट वेगळ्या असतात. यासाठी कोणतेही निश्चित मानक ठरवण्यात आलेले नाही. प्रत्येक बँक ही बर्‍याच गोष्टी लक्षात ठेवून क्रेडिट कार्डची मर्यादा ठरवते. कोणतीही बँक ही क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित करताना खर्च, मासिक कमाई आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची माहिती गोळा करते. यासाठी बँक स्टेटमेंट, पगाराची स्लिप, टॅक्सची कागदपत्रे आणि क्रेडीट अहवाल तपासला जातो. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर बँकेचा अधिकारी दर महिन्याची मिळकत ही 2 किंवा 3 ने गुणाकार करतो.

या प्रक्रियेमध्ये, बँक निश्चित खर्च वजा करते. त्यानंतर बँक आपल्या कर्जाची उत्पन्नाच्या प्रमाणाचा आलेख काढते. यांसह इतर काही गोष्टींचा अभ्यास केल्यानतंर तुमच्या क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित केली जाते.

इतर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही घरबसल्या बनवू शकता. आणि या करता तुम्हाला कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. *संपर्क करा ..  सृष्टी महा ई सुविधा  *संतोष विठ्ठल साळवे..7900094419* https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf

क्रेडीट कार्डची मर्यादा कशी वाढवाल?

इतर लोकांप्रमाणे जर तुम्हीही तुमच्या क्रेडीट कार्डच्या मर्यादेवर खूश नसाल तर आपण ते वाढवू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडी प्रतिक्षा करावी लागेल. तुमच्या बँकेच्या अकाऊंटचा अभ्यास केल्यानतंर ही मर्यादा वाढवली जाते. जर तुम्ही नियमितपणे तुमचे क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि त्याचे बिल वेळेवर भरत असाल, तर काही बँक आपोआपच तुमच्या कार्डची क्रेडिट मर्यादा वाढवते.

या व्यतिरिक्त जो ग्राहक क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरतो त्याचा क्रेडीट स्कोर चांगला असतो. त्यामुळे बँक त्याच्या कार्डची मर्यादा वाढवते. अनेकदा बँक आपल्याला मर्यादा वाढवण्याची ऑफर देते. पण तुम्ही स्वत: त्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही नेटबँकिंगद्वारे किंवा बँक शाखेत भेट देऊन याबाबतची प्रक्रिया करु शकता. यानंतर, जर बँकेला योग्य वाटत असेल, तर बँक स्वत:हून क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवते. 

आपण बँकेत खाते असल्यास  नवीन डेबिट कार्ड घेत असल्यास आपण ग्रीन पिनबद्दल ऐकलेच असेल. मात्र ग्रीन पिन म्हणजे काय?

आपण बँकेत खाते उघडत असल्यास किंवा नवीन डेबिट कार्ड घेत असल्यास आपण ग्रीन पिनबद्दल ऐकलेच असेल. मात्र ग्रीन पिन म्हणजे काय याबाबत अद्याप अनेकांना माहित नाही. हा शब्द आता आपल्यासाठी नवीन असेल तर आपल्याला याबाबच माहित असणे आवश्यक आहे. कारण माहिती नसेल तर आपण आपल्या डेबिट कार्डवर कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. ज्यांनी नवीन डेबिट कार्ड बनविले आहे त्यांच्यासाठी  प्रत्येक डेबिट कार्ड धारकाला हा पिन जनरेट करणे आवश्यक आहे.

ग्रीन पिन म्हणजे काय?

वास्तविक, ग्रीन पिन नावाने गोंधळ होण्याची आवश्यकता नाही. हा तुमच्या डेबिट कार्डचा पिन आहे, ज्याद्वारे आपण व्यवहार करता. तथापि, आजकाल याला ग्रीन पिन असेही नाव दिले जात आहे आणि डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याऐवजी ग्रीन पिन तयार करण्यास सांगितले जाते. पण प्रश्न असा आहे की जेव्हा तो डेबिट कार्ड पिन असतो तेव्हा त्याला ग्रीन पिन का म्हणतात आणि त्यामागील कारण काय आहे?

खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

का म्हटले जाते ग्रीन पिन?

पूर्वी तुम्ही डेबिट कार्ड घेतल्यानंतर आधी डेबिट कार्ड तुमच्या घरी यायचे आणि त्यानंतर डेबिट कार्डचा पिनदेखील कार्डसोबत यायचा. तथापि, ही प्रक्रिया बंद झाली. आता डेबिट कार्ड आल्यानंतर आपण आपल्या डेबिट कार्डचा पिन टोल फ्री नंबरद्वारे किंवा एटीएमद्वारे ओटीपीद्वारे जनरेट करता. या संपूर्ण यंत्रणेत घरी पिन मिळण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. यामुळे वेळेसोबतच कागदाचीही बचत होत आहे. कागदाची बचत झाल्यामुळे त्याला ग्रीन पिन म्हटले जात आहे, कारण त्यात कुरिअर, कागद इत्यादींचा वापर केला जात नाही आणि डेबिट कार्डधारक काही मिनिटांतच कार्डचा पिन तयार करतात.

का आवश्यक आहे?

आपण डेबिट कार्ड घेतले असेल आणि त्याचा पिन जनरेट केला नसेल तर आपण कोणताही व्यवहार करु शकणार नाही. जोपर्यंत पिन जनरेट होत नाही, तोपर्यंत तुमचे कार्ड एटीएममध्ये अवैध दर्शविले जाईल, अशा परिस्थितीत कार्ड वापरणे आवश्यक आहे.

कसा जनरेट करायचा पिन?

आपण बँकांच्या टोल-फ्री आयव्हीआर प्रणालीद्वारे आपल्या डेबिट कार्डची ग्रीन पिन तयार करू शकता किंवा एटीएमला भेट देऊन ओटीपीद्वारे देखील तयार केले जाऊ शकते.

डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड वेगळे आहेत का?

एटीएम कार्डचे मुख्य कार्य म्हणजे फक्त एटीएम कार्डमधून पैसे काढणे. यात आपण एटीएम पिनद्वारे एटीएम कार्डमध्ये कार्ड घाला आणि पैसे काढून घ्या. हा आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला असतो. आपण यातून केवळ पैसेच काढू शकत नाही, त्याचबरोबर डेबिट कार्डद्वारे बर्‍याच गोष्टी केल्या जाऊ शकतात. याद्वारे तुम्ही पैसे काढू शकता, बिले भरू शकता, ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून व्यवहार करू शकता आणि एका बँकेतून दुसर्‍या बँकेत पैसे हस्तांतरीत करू शकता.

पुढील काही महीन्यात। टोकनद्वारे केलं जाणार पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डचं टोकन कसं करायचं?  तुम्हाला लवकरच याबद्दल अपडेट मिळेलल....

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

----------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा

https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...