हा ब्लॉग शोधा

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

अमृत' तर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना

अमृत' तर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (अमृत) राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. पात्र व्यक्तींनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा,

प्रबोधिनीतर्फे खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळातर्फे योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिक दुर्बल घटकांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात उद्योजकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व परशुराम गट कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते.

रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम 

  1. कृषी उत्पन्नाधारित उद्योग प्रशिक्षण
  2. शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा
  3. ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण
  4. रोजगार, नोकरी सहाय्य
  5. तसेच औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी तांत्रिक रोजगारक्षम प्रशिक्षण
  6. सी-डॅक माहिती तंत्रज्ञान
  7. व्यवसाय, उद्योग इन्क्युबेशन सेंटर
  8. किशोर विकास उपक्रम आदी राबवले जाते

आयआयटी, आयआयएम, आयुर्विज्ञान संस्था अशा संस्थांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य, तसेच युपीएससी नागरी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि एमपीएससी राजपत्रित व अराजपत्रित पदांच्या परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य ही योजना राबविण्यात येत आहे, माहिती

www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे

रोजगारक्षम कौशल्य विकासासाठी स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम बद्दल अधिक माहिती तुम्हाला पुढील लेख मध्ये मिळेल
--------------------------------------------------------------
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" लातूर जिल्ह्यात 1 हजार 115 पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार !

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" लातूर जिल्ह्यात 1 हजार 115 पदांची भरती; आता सुशिक्षितांना सहा महिने रोजगार !

शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली आहे. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिने रोजगार मिळणार आहे.

राज्यातील सुशिक्षित युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. आयटीआय, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने रोजगार अर्थात विद्यावेतन देण्यात येणार आहे.

असे मिळणार विद्यावेतन (रु.)...

  • बारावी - 6 हजार
  • आयटीआय - 8 हजार
  • पदवी - 10 हजार रुपये

जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा...

  1. सामान्य प्रशासन - 55
  2. वित्त विभाग - 01
  3. पंचायत - 31
  4. आरोग्य - 44
  5. कृषी - 01
  6. बांधकाम - 11
  7. पशुसंवर्धन - 08
  8. महिला व बालकल्याण - 04
  9. शिक्षण - 281
  10. जिल्हा बँक - 110
  11. एसटी महामंडळ - 100

प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटर...

योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटरची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यात एकूण 786 ग्रामपंचायती असल्याने तेवढ्या सुशिक्षितांची निवड करण्यात येणार आहे.

इच्छुकांसाठी अशा आहेत अटी...

उमेदवाराचे वय 18 ते 35 असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असावी. महाराष्ट्रातील रहिवासी, आधार कार्ड असावे. बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

ऑनलाईन करा अर्ज...

जिल्ह्यात एकूण 31 अस्थापनांमध्ये 1 हजार 115 पदांची भरती केली जाणार आहे. त्यात जिल्हा परिषद, बँका, कारखाने अशा शासकीय, निमशासकीय, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिक्षणानुसार निवड करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित युवकांना कामाचा अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर रोजगार क्षमता वाढणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षितांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.

इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क साधावा...

अनुभवामुळे नोकरी, व्यवसाय मदत...

योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच अनुभव येईल. नोकरी, व्यवसायासाठी मदत होईल. युवकांनी नोंदणी करावी.

-----------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

एससी, एसटी जातींच्या वर्गवारीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, ओबीसीप्रमाणे क्रिमीलेअरचा निकष लागू होणार

एससी, एसटी जातींच्या वर्गवारीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, ओबीसीप्रमाणे क्रिमीलेअरचा निकष लागू होणार

सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींबाबत (एसटी) एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल दिला. त्यानुसार आता प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वर्गवारी करुन आऱक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे.

यापूर्वी 2004 साली सर्वोच्च न्यायालयानेच राज्यांना एससी आणि एनटी प्रवर्गात वर्गवारी करण्याचा अधिकार देता येणार नाही, असा निकाल दिला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सहा विरुद्ध एक अशा मताधिक्याने राज्यांना एससी आणि एसटी प्रवर्गात वर्गवारी करण्याच्या अधिकाराला मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

एससी-एसटी आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांचे घटनापीठ आज म्हणजेच गुरुवारी (1ऑगस्ट 2024) निकाल दिला आहे.

  1. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड,                  
  2. न्यायमूर्ती बीआर गवई, 
  3. न्यायमूर्ती विक्रम नाथ, 
  4. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी, 
  5. न्यायमूर्ती पंकज मित्तल, 
  6. न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि 
  7. न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठ

सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना एससी आणि एसटी प्रवर्गात वर्गवारी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार देताना म्हटले की, केंद्रापेक्षा राज्यांकडूनच एससी आणि एसटी प्रवर्गातील वर्गवारी अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. एससी आणि एसटी हे दोन्ही प्रवर्ग एक नाहीत, त्यामध्ये उपजाती, पोटजाती आहे. ते ओळखण्याचे काम राज्य सरकारची यंत्रणाच अधिक प्रभावीपणे करु शकते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायलयाच्या खंडपीठाने नोंदवले. कोटा असमानतेच्या विरोधात नाही. राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वर्गवारी अधिक चांगल्या पद्धतीने करु शकते, जेणेकरून मूळ आणि गरजू प्रवर्गांना आरक्षणाचे अधिक लाभ मिळतील, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

कोर्ट म्हणाले की, 'आरक्षण असूनही खालच्या वर्गातील लोकांना त्यांचा व्यवसाय सोडणे कठीण जाते.' न्यायमूर्ती भूषण आर गवई यांनी सामाजिक लोकशाहीची गरज या विषयावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा हवाला देत म्हटले की, 'मागासवर्गीयांना प्राधान्य देणे हे राज्याचे कर्तव्य आहे, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील काही लोकच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. परंतु अनुसूचित जाती/जमातीमध्ये अशा अनेक श्रेणीतील लोकं आहेत की, ज्यांना अनेक शतके अत्याचार सहन करावा लागत आहेत आणि हे सत्य नाकारता येणार नाही.

एससी आणि एसटीला क्रिमीलेअरचे निकष लागू होणार?

आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना क्रिमीलेअरचे निकष लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. आता हेच निकष एससी आणि एसटी प्रवर्गासाठीही लागू होणार आहेत. त्यामुळे एससी आणि एसटीमध्येही क्रिमीलेअर आणि नॉन-क्रीमिलेअर अशी वर्गवारी होईल. त्यामुळे एससी आणि एसटीमध्ये प्रवर्गातही क्रिमीलेअर वर्गात मोडणाऱ्यांना आरक्षणाचे सर्व लाभ मिळणार नाहीत.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय ?

  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात वर्गवारी करता येते . अनुसूचित जाती, जमातीतील उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता. सुप्रीम कोर्टाने 6 विरूद्ध 1 अशा बहुमताने दिला निकाल
  • इंपेरिकल डेटा गोळा करुन सरकारला जातीबाबत झालेला भेदभाव दूर करता येईल
  • सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येईल
  • न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा 6 विरुद्ध 1 असा बहुमताने निर्णय
  • न्या.बेला त्रिवेदी मात्र वर्गवारीविरोधात. वर्गवारी योग्य ठरवणाऱ्या सहा न्यायमूर्तींचे पाच स्वतंत्र मतं देणारे निकाल

------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, ३१ जुलै, २०२४

वेळेत करा कर्जाची परतफेड, नाहीतर आरबीआय करणार मोठी कारवाई, कुणावर करणार कारवाई जाणून घ्या.

वेळेत करा कर्जाची परतफेड, नाहीतर आरबीआय करणार मोठी कारवाई, कुणावर करणार कारवाई जाणून घ्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच विलफुल डिफॉल्टर्स आणि मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFCs) 25 लाख आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व नॉन-परफॉर्मिंग ॲसेट खात्यांमधील विलफुल डिफॉल्टरची चौकशी करावी लागणार आहे.

तपासात जर कोणी विलफुल डिफॉल्टर आढळले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आरबीआयने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आरबीआयने अनेक वेळा विलफुल डिफॉल्टर्सबाबत विधाने जारी केली आहेत आणि बँकांना सूचनाही दिल्या आहेत, यावेळी आरबीआयने डिफॉल्टर्सवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

विलफुल डिफॉल्टर कोण आहे?

विलफुल डिफॉल्टरचे पुरावे ओळख समितीद्वारे तपासले जाणार असून 'विलफुल डिफॉल्टर्स' म्हणजे कर्जदार किंवा जामीनदार ज्याने जाणूनबुजून कर्जाची परतफेड केली नाही आणि त्याची थकबाकी 25 लाखांपेक्षा जास्त असते.

कर्ज परतफेड करू न शकल्यास काळजी करू नका !! काय आहे तुमचा अधिकार

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/07/blog-post_20.html

विलफुल डिफॉल्टर आढळल्यास

आरबीआयने असे म्हटले आहे की, "बँका 25 लाख आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व एनपीए खात्यांमध्ये 'विलफुल डिफॉल्टर्स'ची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.

बँकांनी स्पष्ट निकष असणारे धोरण तयार केले पाहिजे ज्याच्या आधारावर विलफुल डिफॉल्टर घोषित केलेल्या व्यक्तीची छायाचित्रे छापण्यात येतील. यामध्ये असे म्हटले आहे की, कोणतीही बँक एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या संस्थेला कर्ज देणार नाही, ज्याने विलफुल डिफॉल्टर केले आहे. त्याला विलफुल डिफॉल्टरच्या यादीतून काढून टाकल्यानंतर एक वर्षासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

सोमवार, २९ जुलै, २०२४

आयुष्य संपवण्याच्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त कसं व्हाल? या 9 पॉइंटमधून घ्या समजून

आयुष्य संपवण्याच्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त कसं व्हाल? या 9 पॉइंटमधून घ्या समजून

सद्या आत्महत्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . मागील एका महिन्यात तीन आत्महत्याच्या घटनाने मनाला हेलावून टाकलं आहे. नुकताच अटल सेतुवर एका इंजिनिअरने समुद्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं तर दुसरीकडे चंद्रपुर मध्ये MBBS ची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणीने नदीत जाऊन आत्महत्या केली.

इतकच काय तर,भायंदरच्या रेल्वे रुळावर पिता पुत्राने आत्महत्या केली होती. आत्महत्याचं प्रमाण का वाढत चाललं आहे ? आत्महत्या करण्याची भावना मनात का येऊ लागली आहे ?

आपलं जीवन हे अनमोल आहे, आत्महत्या करणं हे एकमेव मार्ग नाही असं असतांना पण तरुणांमध्ये आत्महत्या करण्याची भावना का निर्माण होते ? आत्महत्या करण्यामागची अनेक कारणं आहेत, कौटुंबिक वादविवाद, नैराश्य , नकारात्मक विचार, अपयश, प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची आतापर्यंतची कारणं समोर आली आहे.

  • मुळात कोणत्याही समस्यातून मार्ग काढणं म्हणजे आत्महत्या नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे.
  • मनात आत्महत्याची भावना येत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मन मोकळं करा, आत्महत्याची भावना (Emotion)का निर्माण होते ? यावर आपल्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला.
  • नकारात्मक विचार मनात आणू नका, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली किंवा मनाविरुद्ध झाली की आपण निराश होतो. कधी कधी नकारात्मक विचाराचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो आणि त्यातूनच नैराश्यपणा येतो.
  • लक्षात घ्या यश (success)अपयश हे चढउतार आपल्या वाटेला येतच असतात म्हणून संयम राखा, आज ना उद्या गोष्टी सुरळीत होतील म्हणून मनात नकारात्मक विचार आणू नका.
  • अनुकूल परिस्थितीचा सामना करायला शिका, परिस्थिती हालाखीची असल्यास आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींशी बोला, त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
  • प्रेमसंबंधातून मनात नकारात्मक विचार येत असतील तर, काही दिवस बाहेर फिरून या. मनात सकारात्मक विचार आणा याकरता आपल्याला हवी ती गोष्ट करा, गाणं ऐका, एखादं पुस्तक वाचा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा, त्यांच्यासोबत फिरायला जावा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या.
  • डिप्रेशन मध्ये सतत राहिल्याने आपल्या मनात आत्महत्याची भावना येऊ शकते अशा वेळी समुपदेशनचा योग्य सल्ला घेऊ शकता.
  • लक्षात ठेवा आपलं जीवन हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अमूल्य आहे, काही गोष्ट विपरीत घडल्यास आपलं जीवन व्यर्थ आहे अशी भावना मनात आणू नका.
  • नेहमी आनंदित राहायला शिका. आहे त्या गोष्टींत समाधानी रहा. बिकट परिस्थितीत तडकेफाड निर्णय घेऊ नका.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २८ जुलै, २०२४

रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी

रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांना रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. उपलब्ध पदांचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक प्रशिक्षणार्थी संख्या अशी आहे - 

  1. विस्तार अधिकारी (सां), विज्ञान/कृषी/वाणिज्य/अर्थशास्त्र किंवा गणित विषयासह पदवीधर-1, 
  2. वरिष्ठ सहाय्य्क (लिपीक) कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT - 2, 
  3. वरिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT -2, 
  4. कनिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी टंकलेखक-30, इंग्रजी टंकलेखन-40 MS-CIT - 12, 
  5. वाहनचालक बारावी किंवा पदवीधर, जड वाहन चालविण्याचा परवाना- 2, 
  6. वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदवीधर, लेखाशास्त्र, वाणिज्यशास्त्र, वाणिज्य शाखा, MS-CIT -1, 
  7. कनिष्ठ सहाय्यक (लेखा) बारावी किंवा पदवीधर, मराठी टंकलेखन 30 MS-CIT-1, 
  8. ग्रामसेवक बारावी परीक्षा 60 टक्क्यांनी उत्तीर्ण, 
  9. कृषी पदवीका/पदवीधर, अभियांत्रिका पदविका, बीएसडब्लू, MS-CIT -32
  10. विस्तार अधिकारी (कृषी) कृषी विषयातील पदवीधर -1
  11. पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी/पदविका, MS-CIT -3, 
  12. पर्यवेक्षका पदवीधर(समाजशास्त्र/गृहविज्ञान) एमएसडब्लू -2
  13. मिश्रक/औषध निर्माण अधिकारी औषध निर्माणशास्त्रातील पदवी/पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार-3
  14. आरोग्य सेवक (पुरुष) बारावी/पदवी (दहावी विज्ञान विषयासह उत्तीर्ण)-10 
  15. आरोग्य सेविका (महिला) ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचारिका परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचारिका परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील - 24
  16. कनिष्ठ अभियंता (बांधकाम) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयासह पदवी/पदविका-3
  17. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी/पदविका/पदव्युत्तर पदवी -1
  18. प्राथमिक शिक्षक बारावी उत्तीर्ण, डीएड व टीएटी परीक्षा उत्तीर्ण - 370
  19. परिचर बारावी पास -27, 
  20. स्त्री परिचर बारावी पास -3
  21. सफाई कामगार -बारावी पास -3
  22. चौकीदार - बारावी पास -1

इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट MIDC, रत्नागिरी. (संपर्क क्र. 02352-299385) यांच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.

---------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, २७ जुलै, २०२४

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे

शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत मजूर बांधकाम कामगार म्हणून काम करतात. बांधकाम करत असतांना त्यांना एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर स्थलांतर करावे लागते.

अशावेळी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे भांडी अशा मजुरांना त्या ठिकाणी खरेदी करावी लागतात. परंतु तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता शासनाकडून मोफत भांडी मिळणार आहे.

2024-25 बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ?

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/07/2021.html

बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्हाला जर हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करू शकता.

भांडी जीआर डाउनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1y6IlkKvWmoBpcCzqcT4aF4fzA2x-y75o/view?usp=drivesdk

वरील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि बघा जीआर मध्ये कोणकोणती भांडी बांधकाम कामगारांना मिळणार आहेत तर भांडी तुम्हाला मिळाली आहेत का याची खात्री करून घ्या.

अर्ज डाऊनलोड करा.

https://drive.google.com/file/d/1LA5cjgCl6n1reO5dwkGsYFxz0NvzqpYw/view?usp=drivesdk

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अर्जासोबत ही कागदपत्र जोडावी लागणार आहे

  • पासपोर्ट फोटो.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • राशन कार्ड झेरॉक्स.
  • लेबर कार्ड झेरॉक्स.
  • 1 रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
  • आधार कार्डची झेरॉक्स

----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...