हा ब्लॉग शोधा

बुधवार, १४ जुलै, २०२१

बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ?




2024-25 बांधकाम कामगार योजना. लाभ कोणाला घेता येणार ? 

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित कामगारांसाठी सध्या विविध प्रकारच्या 29 योजना राबविण्यात येत आहेत. त्यांमध्ये शैक्षणिक साहाय्य, सामाजिक, सुरक्षेसंबंधी, आरोग्यविषयक आणि अर्थसाहाय्याच्या योजनांच्या समावेश आहे.

कामगारांची सोय लक्षात घेऊन मंडळाने जुलै 2020 पासूनच ऑनलाइन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण आणि लाभवाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात.

बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधावा 👇


Santosh Salve - 7900094419

नोंदणी करून लाभ घेण्यासाठी कामगार खालील प्रमाणे असतील.

1) खुदाई कामगार

2) फर्णिचर, 

3) सुतार कामगार 

4) गवंडी कामगार

5) फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)

6) पेंटींग कामगार

7) सेंट्रींग कामगार

8) वेल्डिंग

9) फॉब्रीकेटर्स 

बाधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे


कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी

बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…

  1. इमारती,
  2. रस्त्यावर,
  3. रस्ते,
  4. रेल्वे,
  5. ट्रामवेज
  6. एअरफील्ड,
  7. सिंचन,
  8. ड्रेनेज,
  9. तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
  10. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
  11. निर्मिती,
  12. पारेषण आणि पॉवर वितरण,
  13. पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  14. तेल आणि गॅसची स्थापना,
  15. इलेक्ट्रिक लाईन्स,
  16. वायरलेस,
  17. रेडिओ,
  18. दूरदर्शन,
  19. दूरध्वनी,
  20. टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
  21. डॅम
  22. नद्या,
  23. रक्षक,
  24. पाणीपुरवठा,
  25. टनेल,
  26. पुल,
  27. पदवीधर,
  28. जलविद्युत,
  29. पाइपलाइन,
  30. टावर्स,
  31. कूलिंग टॉवर्स,
  32. ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
  33. दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
  34. लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
  35. रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
  36. गटार व नळजोडणीची कामे.,
  37. वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
  38. अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  39. वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  40. उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
  41. सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
  42. लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
  43. जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
  44. सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
  45. काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
  46. कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
  47. सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
  48. स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
  49. सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
  50. जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
  51. माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
  52. रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
  53. सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.


आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल.

1) नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा 5,000/- रुपये दिले जातील.

2) नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास 30,000/- रुपये दिले जातील.

3) बांधकाम कामगाराच्या पत्नीस 2 आपत्या पर्यंत

नैसर्गिक प्रसुतीसाठी – 15,000/-

शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – 20,000/-

4) बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी

1 ली ते 7 वी पर्यंत प्रतीवर्षी 2,500/- रुपये दिले जातील.

8 वी ते 10 वी पर्यंत प्रतीवर्षी 5,000/-रुपये दिले जातील.

11 वी 12 वी पर्यंत प्रतीवर्षी 10,000/- रुपये दिले जातील.

पदविका अभ्यासक्रम साठी  20,000/-रुपये दिले जातील.

अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000/-

वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000/-

MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती केली जाईल.

5) बांधकाम विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगाराला एका मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. 

6) बांधकाम कामगाराचा अपघाती वा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठविण्यासाठी लागणारा खर्च मंडळाकडून केला जाणार आहे.

7) बांधकाम कामगाराचा हात वा पाय निकामी झाल्यास कृत्रिम हात वा पाय बसविण्याच्या शस्त्रक्रियेचा खर्चदेखील मंडळाकडून केला जाणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का? फ्री मध्ये मिळतायेत हे 5 विमा कव्हर. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

5) कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1,00,000/- मुदत बंद ठेव. 

बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी 6000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास 2,00,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी 10,000/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे  24,000/- अर्थसाहाय्य

नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला 5,00,000/- अर्थसाहाय्य

घर बांधणी साठी 4,50,000/- अर्थसहाय्य (केंद्र शासन 2,00000 /- कल्याणकारी मंडळ 2,50,000/-) अर्थसाहाय्य

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू केली जाईल आणि त्याचा लाभ घेता येईल.

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.


बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

1) नोंदणी अर्ज

2) पासपोर्ट आकारातील 2 फोटो

3) रेशन कार्ड झेरॉक्स

4) आधार किंवा मतदान कार्ड

5) बँक पासबुक झेरॉक्स

6) ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )

महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र 

दूरध्वनी क्रमांक :- (022) 2657-2631

ई-मेल :- bocwwboardmaha@gmail.com

सहायता क्रमांक - टोल फ़्री :-  (10:00 AM - 18:00 PM)

1800-8892-816

कार्यालय

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस,प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व),मुंबई – 400051, महाराष्ट्र

बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधावा 👇


Santosh Salve - 7900094419

-----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...