हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, 'असा' घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                      वाचाल तर... वाचाल !!! 


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, 'असा' घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

शेतात अपघात किंवा मृत्यू आणि अपंगत्व या साठी शेतकर्‍यांना मदत म्हणून शेतकरी आपघात विमा योजना ही 2006 पासून सुरू आहे परंतु आता या योजनेचे नाव बदलून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही कंपनी मध्ये विमा भरण्याची गरज नाही , ही निशुल्क विमा योजना आहे. यासाठी शासन रक्कम भरते .ही योजना सन 2021-2022 मध्ये राबवण्यासाठी 8 मार्च 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मंजूरी मिळाली आहे . ही योजना राबवण्यासाठी निधि रक्कम ही विमा कंपनीस एका वर्षासाठी सुपूर्द करण्यात आली आहे.


राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता Insurance मिळतो.

अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास Insurance योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते.

शेतात काम करताना वेगवेगळय़ा कारणांनी जसे वीज पडून ,उंचावरून कोसळून इत्यादि कारणाने अपघातात मृत्यू आणि अपंगत्व आल्यानंतर आर्थिक साहाय्य देण्यासाठी Insurance गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली ज्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा विमा Insurance मिळतो.

 

*शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


कोणत्या अपघात बाबीवर किती विमा वितरित केला जाईल ?
* जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला 2 लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.

योजनेतंर्गत देण्यात येणारी मदत
अपघाती मृत्यू: रु. 2.00 लाख
दोन डोळे/दोन अवयव निकामी होणे: रु. 2.00 लाख
एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे: रु. 1.00 लाख

विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबी

1) रस्ता/रेल्वे अपघात
2) पाण्यात बुडून मृत्यू
3) वीज पडून
4) जंतुनाशक हाताळताना/अन्य कारणांमुळे विषबाधा
5) वीजेचा शॉक लागून
6) खून
7) उंचावरुन पडून मृत्यू
8) सर्पदंश
9) नक्षलवाद्याकडून झालेली हत्या
10) जनावराने खाल्यामुळे/चावण्यामुळे - मृत्यू किंवा अपंगत्व
11) दंगल
12) बाळंतपणातील मृत्यू
13) अन्य कोणतेही अपघात

शेतकऱ्याला विमा लाभ केव्हा देय असेल:

योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीसाठी प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी हि योजना लागू असेल. या कालावधीत शेतकऱ्याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असेल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. तसेच यापूर्वी शेतकऱ्याने अथवा त्याच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास किंवा आधीच विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध असणार आंही .या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. असे शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

शेतकरी लाभार्थी कधी या योजनेस पात्र असणार नाही ?

सदर योजनेस जर शेतकरी किंवा शेतकऱ्याचे कुटुंब लाभ घेण्यासाठी पात्र असेल. परंतु त्यांनी इतर शासनाच्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल. तर तो शेतकरी किंवा त्याचे कुटुंब गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत कोणत्याही लाभास पात्र नसतील, याची नोंद घ्यावी.

विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.

या शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसांपर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय किंवाआदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी पात्रता कोणती?
महाराष्ट्रतील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल, लाभार्थी चे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.


गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?

या योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. शेतकऱ्याला दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात येईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी शासन निर्णय 27 एप्रिल 2021:
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत विहितधारक खातेदार शेतकरी व यांच्या कुटुंबियांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय 31 ऑगस्ट 2020 घेण्यात आला होता. सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास, सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थीस लाभास पात्र ठरणार नाही. असा निर्णय 27 एप्रिल 2021 रोजी च्या बैठकीत घेण्यात आला.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*  संतोष साळवे.. 7900094419*  

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा.साळवे इंटरप्रायजेस...  *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  

विमा हप्ता किती भरायचा?
शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही. कारण सरकार शेतकऱ्याच्या वतीने विमा कंपनीस प्रति शेतकरी रु. 32.23 रुपये विमा कंपनीस भरते.


पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती होणार मालामाल!!! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


अर्ज करण्यास लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
* अ. दावा दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
i ) पूर्वसूचनेचे अर्ज कागदपत्रे
* 7/12 आणि 8-अ प्रमाणपत्र यांची मूळ प्रत
* मृत्यूचे प्रमाणपत्र
* अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल.
* वयाचा दाखला ( उपलब्ध नसल्यास शपथपत्र)
* घटना स्थळ पंचनामा

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.   


लाभ मिळवण्यासाठी सदरचा दावा अपघातानंतर 30 दिवसांच्या आत नोंदवण्यात यावा. म्हणजे शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल.

खातेदार लाभार्थी शेतकऱ्याचे राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले रेशन कार्ड (शिधापत्रिका)
ब. प्रस्तावासोबत सादर करावी लागणारी कागदपत्रे

ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.6 ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.
i) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपा नुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागद पत्रे.
ii) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग) (मुळ प्रत.)
iii) शेतकरी लाभार्थ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं.6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*

१) उंचावरून पडून झालेला मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
२) विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.
३) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
४) जंतू नाशक अथवा अन्य कारणा मुळे विषबाधा- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
५) अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे- अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतीम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
६) दंगल- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
७) रस्ता/रेल्वे अपघात- इन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.
८) सर्प दंश/ विंचू दंश- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.
९) पाण्यामध्ये बुडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
१०) जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होवुन मृत्यू- औष धोपचाराची कागदपत्रे.
११) जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवुन मृत्यू-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल
१२) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
१३) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्ये संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.
१४) अन्य कोणतेही अपघात- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
१५) खून- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र
.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...