( BLOGGER )
संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
सोन्याची शुद्धता कशी तपासावी? जाणून घ्या.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. 'BIS Care app' या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
नमस्कार, तुम्ही फक्त एका स्पर्शाच्या अंतरावर आहात, तुमच्या बाजूने मानकांच्या सामर्थ्याने, प्रत्येक निवडीला जबाबदार बनवा. BIS CARE अॅप डाउनलोड करा! https://play.google.com/store/apps/details?id=com.bis.bisapp
तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.
21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.
18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.
14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.
हॉलमार्किंग म्हणजे काय? सोने हॉलमार्किंगबाबत सरकारचे नवे नियम काय आहेत? व त्याचा ग्राहकांना काय फायदा? जाणून घ्या.
देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे केंद्र सरकारने १५ जून २०२१ पासून बंधनकारक केले आहे. यामुळे आता कोणत्याही सराफ व्यापाराला विना हॉलमार्कचे दागिने विकता येणार नाहीत. तसेच ज्वेलर्सने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आता सोने दागिने खरेदी किंवा विक्री करताना ग्राहकांनाही नव्या नियम आणि अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.
सोने हॉलमार्किंगबाबत सरकारचे नवे नियम
१) १६ जून २०२१ पासून २५६ जिल्ह्यांत १४, १८ व २२ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंवर हॉलमार्क असेल तर त्या विकण्याची परवानगी.
२) देशातील इतर जिल्ह्यांत २०, २३ व २४ कॅरेट सोन्याच्या दागिने/ कलात्मक वस्तूंसाठी हॉलमार्क टप्प्याटप्प्याने बंधनकारक करण्यात येईल.
घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419
गुणवत्ता नियंत्रण आदेशात पुढीलप्रमाणे आणखी काही मुभा देण्यात आल्या आहेत.
१) दागिन्यांच्या विशेष श्रेणी- कुंदन, मिना, पोलकी, जडाऊ (जडाव)
२) दरवर्षी ४० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणारे सराफ
३) सोन्याचे घड्याळ व फाउंटन पेन
४) ज्वेलर्सनी एकदाच नोंदणी करायची असून, त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
५) मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या कोणत्याही उत्पादक, आयातदार, वितरक अथवा किरकोळ विक्रेत्यास बीआयएस म्हणजे भारतीय मानके संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल.
६) हॉलमार्किंगच्या प्रक्रियेचे पूर्णपणे संगणकीकरण होणार असून, प्रत्येक कामाचे तारीख व वेळेनुसार सर्व तपशील नोंदवले जाणार आहेत. हॉलमार्कमध्ये सहा अंकी संकेतांक, भारतीय मानक ब्यूरोचा शिक्का आणि शुद्धतेची खूण समाविष्ट असेल. याच्या सॉफ्टवेअरचा आज प्रारंभ झाला आहे.
७) हॉलमार्क नसलेले जुने दागिने अजूनही ज्वेलर्सना किंवा ज्वेलरी दुकानांना विकता येतील. तशा दागिन्यांच्या खरेदीनंतर त्यांचे हॉलमार्किंग अथवा गुणवत्तेची काळजी घेत त्यांपासून नवीन दागिन्यांची निर्मिती, ही जबाबदारी ज्वेलर्सची राहील.
८) नोंदणी न केलेल्या ज्वेलरी दुकाने/ ज्वेलर्सविरोधात ग्राहकांना बीआयएस केअर (BIS Care) नामक ऍपच्या माध्यमातून किंवा भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards) च्या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येईल.
यापूर्वी सोने खरेदी-विक्री, सोन्याच्या शुद्धतेची परिपूर्ण माहितीसाठी कोणतीही केंद्रीय यंत्रणा अस्तित्वात नव्हती. यामुळे अनेकदा सराफांकडून किंवा ग्राहकांकडून सोन्याच्या व्यवहारात फसवणूक सुरु होती. मात्र हॉलमार्किंगचा (Gold Jewellery Hallmarking) नियम लागू झाल्याने आता सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. अर्थात अनेक सराफ प्रामाणिकपणे योग्य त्या सोन्याच्या दागिन्यांचे व्यवहारदेखील करतच होते. हॉलमार्किंगच्या नियमामुळे मात्र आता देश पातळीवर यात सुसूत्रता येणार आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने देशभर सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंत्रालयाने या संदर्भात दागिने उत्पादक आणि इतरांशी चर्चा केली आहे. त्यानंतर सुरुवातीला 15 जानेवारी 2020 पर्यंत देशभर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नवे नियम काय आहेत.
दागिने क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण व्हावी, देशभर दागिन्यातील सोन्याच्या शुद्धतेत एकसमानता असावी याकरिता सरकारने हॉलमार्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्या दागिने उत्पादकांची उलाढाल 40 लाख रुपयांच्या आत आहे त्यांच्यासाठी या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व सरकारने मान्यता दिलेल्या बिजनेस टू बिजनेस देशांतर्गत प्रदर्शनासाठी हॉलमार्किंग बंधनकारक नाही. घड्याळ, पेन, विशेष प्रकारचे दागिने ज्यामध्ये कुंदन, पोलकी, जडाऊ इत्यादींचा समावेश आहे. अशा दागिन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक नाही. 20, 23 आणि 24 कॅरेटच्या दागिन्यासाठी हॉलमार्किंग करण्यास परवानगी दिली आहे.
काल मर्यादेत वाढ
देशभर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यासाठी बऱ्याच कालावधी देण्यात आलेला आहे. मात्र तरीही काही जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडलेली नाहीत. कारण दरम्यानच्या काळामध्ये लॉकडाउनमुळे या संबंधातील कामकाजावर परिणाम झाला होता. दागिने उत्पादकांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले. यानंतर सरकारने यासाठीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. दरम्यानच्या काळात सरकारचे प्रतिनिधी दागिने उत्पादक आणि इतरांशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
हॉलमार्किंग म्हणजे काय
प्लॅटिनम, सोने, चांदी इत्यादीचे दागिने ग्राहकांना विकले जातात. या दागिन्यातील धातूच्या शुद्धतेला प्रयोगशाळेकडून प्रमाणित करण्यात येते आणि त्यावर शुद्धतेच्या मूल्यांकनाचा शिक्का मारला जातो. ज्या देशामध्ये दागिन्यांचा मोठा व्यापार आहे अशा दुबई आणि ब्रिटनमध्ये दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलेले आहे. भारतामध्ये दागिन्यातील धातूची शुद्धता तपासण्यासाठी आतापर्यंत 256 जिल्ह्यांमध्ये आवश्यक असे हॉलमार्किंग सेंटर उभारण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सध्या तरी या 256 जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी दागिने उत्पादकांना ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस्कडे नोंदणी करावी लागणार आहे.
कोणत्या गोष्टींना हॉलमार्किंगच्या नियमातून सूट?
केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.
*(Health Insurance) आरोग्य विमा : मेडिक्लेम पॉलिसीचे महत्त्व !!!* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
सरकारचा पुढाकार कशासाठी
देश विदेशाचे नागरिक मौल्यवान धातूचे दागिने हौस म्हणून किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करतात. त्यामुळे दागिन्यातील धातूच्या शुध्दतेला महत्त्व असते. कारण नंतर हे दागिने विकताना शुद्धतेसंदर्भात शंका निर्माण होतात. यामुळे देशांतर्गत ग्राहकाबरोबरच परदेशी ग्राहक भारतातील दागिन्यांची खरेदी शंका न येता करू शकतात. हॉलमार्किंग बंधनकारक केल्यानंतर भारताचा दागिने निर्मितीचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढू शकतो.
भारतामध्ये परंपरागत दागिन्यांचा व्यवसाय विस्कळीत स्वरूपाचा आहे. त्यामुळे या क्षेत्राबाबत अनेक शंका घेतल्या जातात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारावेळी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तिसऱ्या पक्षाकडून दागिन्यातील धातूची शुद्धता प्रमाणित केल्यानंतर एकूणच वातावरण पारदर्शक होते.
भारतातील दागिन्यांचे आकर्षण जागतिक ग्राहकांना आहे. मात्र दागिन्यातील धातूची शुद्धता प्रमाणीत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहकांना खरेदी करताना मनात शंका येतात. भारताला या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवायचा असेल तर दागिन्यातील धातूची शुद्धता प्रमाणित करणे अपरिहार्य आहे. महिला वर्गाला दागिणे घेण्याची हौस असते. मात्र दागिन्यातील धातूच्या शुद्धतेबाबत शंका असल्यानंतर ग्राहकांची कुचंबणा होते. भारत हा सोने वापरणाऱ्या जगातील मोठ्या देशांपैकी एक आहे. जानेवारी ते मार्च 2019 मध्ये भारतामध्ये 140 टन सोन्याचा वापर करण्यात आला, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.
प्रमाणित सोने बाहेर येईल
हॉलमार्किंगमुळे सोन्याच्या दागिन्याचा व्यवसाय प्रमाणित होण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये हॉलमार्किंग नसलेले बरेच सोने ग्राहकाकडे पडून आहे. यावर हॉलमार्किंग नसल्यामुळे या दागिन्यांचा व्यवहारात उपयोग करताना टाळाटाळ होते. जर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आणि जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध झाली तर तब्बल दीड लाख कोटी डॉलरच्या सोन्यावर नव्याने हॉलमार्किंग होण्याची शक्यता खुली होईल.
होऊ शकते जेल
सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय बीआयएस कायदा, 2016 च्या सेक्शन 29 अंतर्गत 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी .संपर्क करा.
*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे*
ग्राहकांना कसा फायदा होतो.
हॉलमार्किंगमुळे प्रमाणित सोने बाजारपेठेत उपलब्ध होईल. अशा प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांचे व्यवहार अधिक विश्वासार्ह पद्धतीने होऊ शकतील. यामुळे ग्राहक कसलीही शंका न बाळगता सोन्याची खरेदी करू शकतील. त्याचबरोबर सरकारने हॉलमार्किंगशिवाय जुने सोने खरेदी करण्याची परवानगी दागिने उत्पादकांना दिली आहे. त्यामुळे जुने सोने बाळगणाऱ्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही. ते जुन्या सोन्याला प्रमाणित करून घेऊ शकतील.
ऑगस्ट महिन्यापर्यंत दागिने उत्पादकांना दंड न करण्याचा निर्णय
गेल्या आठवड्यापासून 356 जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले असले तरी आता सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंत दागिने उत्पादकांना दंड न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या ऍपवर ग्राहकाने तक्रार केल्यानंतर त्यावर कृती केली जाणार आहे. ऑगस्टपर्यंत देशातील जास्तीत जास्त दागिने उत्पादकांनी हॉल मार्किंग संबंधातील कार्यवाही पूर्ण करावी असा यामागे उद्देश आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (बीआयएस) चे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी सांगितले की, अगोदर देशभर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती.
मात्र यासाठीच्या पायाभूत सुविधाचा आढावा घेण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला 715 पैकी 256 जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर, लडाख, अंदमान -निकोबार या ठिकाणी हॉलमार्किंगसाठी पुरेशा पायाभूत सुविधा नसल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात या क्षेत्रात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. मात्र ज्या दागिने उत्पादकाची उलाढाल 40 लाख रुपयांच्या खाली आहे. अशा दागिने उत्पादकांना अडचणी येतील म्हणून त्यांना हा निर्णय बंधनकारक करण्यात आलेला नाही.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-----------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा