हा ब्लॉग शोधा

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

दहा हजार कुशल बेरोजगार युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी.बघा संपूर्ण माहिती

दहा हजार कुशल बेरोजगार युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी.बघा संपूर्ण माहिती

युरोपियन युनियन मधील बहुतांशी देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न असून मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब विचारात घेवून राज्यातून पहिल्या टप्प्यात 10 हजार कुशल मनुष्यबळ जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग राज्यास उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला आहे.

या प्रकल्पासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, राज्यस्तरीय सनियंत्रण समिती व तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे मुख्य समन्वयक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य असतील. जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त, औद्यागिक प्रशिक्षण संस्था व तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य, सहायक कामगार आयुक्त वशिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य असतील.

जर्मनीमधील बाडेन-वुटेनबर्ग राज्यास पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवांमधील व्यावसायिक मनुष्यबळ,

परिचारिका (रुग्णालय), 

वैद्यकीय सहाय्यक (एमएफए), 

प्रयोगशाळा सहायक, 

रेडियोलॉजी सहायक, 

दंतशल्य सहाय्यक, 

आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक, फिजिओथेरपीस्ट, 

दस्तऐवजीकरण आणि संकेतीकरण (डॉक्युमेंटेशन अँड कोडींग) /तृतीय पक्ष प्रशासन (थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन), लेखा व प्रशासन मधील कर्मचारी यांचा समावेश असेल.

बस, ट्राम, ट्रेन, ट्रक आदींचे वाहन चालक, 

सुरक्षा रक्षक, 

टपाल कर्मचारी, 

सामान बांधणी व वाहतूक करणारे (पॅकर्स व मुव्हर्स), विमानतळावरील सहाय्यक, 

स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे (बॅगेज हँडलर्स), 

हाऊसकीपर, 

विक्री सहाय्यक व गोदाम सहाय्यक आदी कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

जर्मन भाषेचे किमान पर्याप्त प्रशिक्षण:

युवक-युवतींना जर्मन भाषेचे प्रशिक्षण गोएथे या प्रख्यात संस्थेकडून देण्यात येणार असून या संस्थेमार्फत पथदर्शी तत्त्वावर विविध क्षेत्रातील किमान 10 हजार उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

या अनुषंगाने गोएथे संस्था, मॅक्समुलर भवन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर जर्मन भाषा शिकवणीचे 5 वर्ग पहिल्या टप्प्यात सूरू करण्यात येणार आहेत. वर नमूद केलेले अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि जर्मनीत रोजगारासाठी जाऊ इच्छिणारे विद्यार्थी आपली नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा.

 खाली दिलेला व्हिडिओ पहा👇👇👇👇👇

क्षेत्रनिहाय कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण

बाडेन वुटेनबर्ग राज्यास उपलब्ध करुन द्यावयाच्या मनुष्यबळास त्या राज्यातील अनुरुप कौशल्याशी संबंधित पात्रतेच्या अनुषंगाने आवश्यक अतिरिक्त तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी सुयोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात येणार आहे. शासनाच्या अटी शर्ती प्रमाणे सुयोग्य प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविलेल्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्थांना प्रति महिना प्रति विद्यार्थी ग्रामीण भागासाठी 7 हजार व शहरी भागासाठी (सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रे) 10 हजार रूपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.

देशांतराच्या अनुषंगाने करावयाची कृती

प्रशिक्षणार्थीचा पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रे यांच्या पूर्ततेसाठी निश्चित अशी कार्यपद्धती करण्यात येणार आहे. जर्मनीत पोहोचल्यानंतर उमेदवार योग्यप्रकारे स्थीरस्थावर होतील यासाठी तेथील संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून व त्यांच्या सहकार्याने आवश्यक ती उपाययोजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे. प्रशिक्षक नोंदणीसाठी संपर्क करा

जीवनमान उंचावण्याची मोठी संधी

या प्रकल्पांतर्गत राज्यातील कुशल, अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे नोकरी मिळविण्यासाठी राज्यातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्ट साठी संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. ही राज्यातील युवा- युवतींना त्यांचे आर्थिक, सामाजिक स्थान तसेच जीवनमान उंचावण्याची मोठी संधी आहे.

------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?

महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?

सध्या महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनेदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचे स्वरुप काय आहे? हे जाणून घेऊ या....

पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत

ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. 

या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?

लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यांमंध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहेत. पात्रतेचे सामान्य निकष खालीलप्रमाणे

या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात

लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी. 

त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 (तीन लाखांपेक्षा) कमी असणे आवश्यक. 

महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे 

या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.

 कोणती कागदपत्र लागणार?

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडं आधार कार्ड, 

पॅन कार्ड, 

उत्पन्न प्रमाणपत्र, 

पत्त्याचा पुरावा, 

शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, 

पासबूक, 

मोबाईल नंबर, 

पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे. 

महिला कशा होणार लखपती?

लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही टिप्स दिले जातील. त्याचबरोबर आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप्स, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते. त्याचबरोबर व्यवसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्विस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते

------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

लहान मुलांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' सोप्या भाषेत शिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

लहान मुलांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' सोप्या भाषेत शिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

मुलांच्या लैंगिक छळाच्या संतापजनक घटनेने महाराष्ट्र हेलावून टाकला आहे. दररोज लैंगिक अत्याचाराच्या उघड होणाऱ्या या घटनेंमूळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान मुलांला शाळेत, पार्कमध्ये, घराबाहेर खेळण्यासाठी पाठवण्याआधी पालकांना अनेक वेळा विचार करावा लागतोय. आपले बालक सुरक्षित असेल का? असे शेकडो प्रश्न सध्या पालकांसमोर आहेत.

दरम्यान या घटना घडत असताना बालकांना घरी आई-वडिलांनी तसेच शाळेत शिक्षकांनी Good Touch- Bad Touch संदर्भात शिकवण दिल्यास लहान बालक अश्या घटनेचा शिकार होणार नाही.

Good Touch- Bad Touch संदर्भात मुलांना शिकवण मिळाल्यास घडलेला प्रसंग पालकांपर्यंत पोहोचवू शकले आणि त्यानंतर त्यावर कायद्याने देखील कारवाई करण्यात येईल.

चांगला स्पर्श (Good Touch) : स्पर्श म्हणजे शारीरिक संपर्क, असा शारीरीक संपर्क ज्यामुळे मुलाला सुरक्षित आणि आरामदायक वाटते. शरीराला कुठलाही त्रास होत नाही, चांगल्या स्पर्शांच्या उदाहरणांमध्ये मिठी मारणे, केसांवरून हात फिरवणे. हे स्पर्श सहसा पालक, काळजीवाहू किंवा विश्वासू व्यक्तींद्वारे दिले जातात.

वाईट स्पर्श (Bad Touch): वाईट स्पर्श म्हणजे इथेही शारीरिक संपर्काचा समावेश होतो ज्यामुळे मुलाला अस्वस्थता, भीती किंवा धोका निर्माण होतो. हे शरीराच्या खाजगी अवयवांना मारणे, ढकलणे किंवा नकोसा स्पर्श करणे.

Good Touch Bad Touch : या '3' भागांना कोणालाही हात लावू देऊ नका; लहान मुलांसोबतचा आमिरचा Video होतोय व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

https://dhunt.in/Wfesj

गुड टच बॅड टच शिकवण्यासाठी टिप्स

स्पर्शाबद्दल शिकवणे : तुमच्या मुलांना लहान वयातचं चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल शिकवणे सुरू करा. त्यांना समजेल अशी सोपी भाषा आणि वयोमानानुसार उदाहरणे वापरा. त्यांना दिवसभरात काय घडले, कोण भेटले या गोष्टींची विचारणा करा...

शरीराच्या अवयवांची नावे शिकवा: तुमच्या मुलाला सोप्या भाषेत त्यांच्या शरीराच्या अवयवांची नावे शिकवा, खाजगी भागांची माहिती द्या.

सुरक्षित वातावरण : तुमच्या मुलाला प्रश्न विचारण्यास आणि मनातल्या गोष्टी सांगताना भावना सांगताना भीती वाटणार नाही असे वातावरण त्यांना द्या. त्यांना कळू द्या की ते कोणत्याही समस्यांसह तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांचे ऐकाल आणि मदत कराल.

शरीराचे महत्व शिकवा : तुमच्या मुलाला हे समजण्यास मदत करा की त्यांचे शरीर हे त्यांचेच आहे. त्या शरीराला त्यांच्या परवानगी शिवाय कोणी स्पर्श करू शकणार नाही. त्यांना कोणत्याही स्पर्शाला "नाही" म्हणण्याचा अधिकार आहे.

विश्वासू आणि अविश्वसनीय व्यक्तींची ओळखा : आपल्या आजूबाजूला, शाळेत, पार्कमध्ये वावरताना विश्वासू माणसं कोणती आणि ज्या व्यक्तीसोबत असुरक्षित, भिती वाटत असल्यास त्यांच्यापासून दुर राहण्याचा सल्ला द्या..

बालकांची देहबोली : तुमच्या मुलाची देहबोली आणि अंतःप्रेरणा ओळखण्याचा प्रयत्न करा..त्यांच्या मनातली अस्वस्थता किंवा शांतता समजून घ्या.. त्यांच्या वागण्यात बदल जाणवत असल्यास त्यांना बोलतं करा.

पुस्तके आणि शैक्षणिक संसाधने : वयोमानानुसार मुलांना शरीराते ज्ञान द्या, पुस्तके आणि संसाधने उपलब्ध आहेत जी मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याविषयी शिकवण्यात मदत करू शकतात. अश्या गोष्टींचा पुरवठा त्यांना करा..

शाळेत सहभाग : तुमच्या मुलाच्या शाळेला चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल वयानुसार योग्य धडे दिले जातात का? मुलांची काळजी घेतली जाते का याची शहानिशा करत रहा.

मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल शिकवणे ही पालकत्वाची आणि शिक्षणाची एक आवश्यक बाब निर्माण झाली आहे. या टिपांचे पालन केल्याने तुमच्या मुलास सुरक्षित आणि असुरक्षित शारीरिक स्पर्शाबद्दल माहिती मिळेल.. चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल फरक समजून घेण्यास मदत होईल.

------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

सखी सावित्री समिती काय आहे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?

सखी सावित्री समिती काय आहे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?

मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या शाळेच्या सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि विश्वासाची जागा असते, ती त्यांची शाळा.

पण ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का?

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं जसं बंधनकारक आहे, तशीच विशाखा समिती आता शाळांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे.

काय आहे ही सखी सावित्री समिती? ती काय काम करते? सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना असणं आवश्यक आहे?

शाळांमधला अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम यासाठी जसे काही नियम असतात, तसेच नियम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही करण्यात आले आहेत.

शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी, अशी घोषणा मार्च 2022 मध्ये करण्यात आली.

'राज्यातील सर्व शाळाांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून 'सखी सावित्री' समितीचे गठन करण्यात येत आहे' असं शासनाच्या परिपत्रकात म्हटलंय.

'सखी सावित्री'मध्ये कोण कोण असत?

शाळेच्या व्यवस्थापन समितीचे म्हणजेच मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतात.

सदस्य :

शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी

समुपदेशक

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला)

अंगणवाडी सेविका

पोलीस पाटील

ग्रामपंचायत सदस्य (महिला)

पालक (महिला)

शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (2 मुलगे, 2 मुली)

या समितीचे सचिव शाळेचे मुख्याध्यापक असावेत, असं सांगण्यात आलंय.

सखी सावित्री समितीची कामं काय आहेत?

आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या परिसरातल्या सगळ्या मुलांची शाळेमध्ये नोंदणी करणं आणि त्यांची 100 टक्के उपस्थिती राहील यासाठी प्रयत्न करणं.

स्थलांतरित पालकांच्या आणि शालाबाह्य असणाऱ्या मुलांचं सर्वेक्षण आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं.

विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकास, त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं समुपदेशन

सजग पालकत्वासाठी कार्यशाळांचं आयोजन

शाळेत समतेचं वातावरण रहावं यासाठी लिंगभेदविरहित आणि सर्वसमावेशक उपक्रम राबवणं.

विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत, असं निकोप वातावरण निर्माण करणं.

शासकीय योजनांची माहिती देऊन अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं

डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबीर आणि आरोग्य समुपदेशन

बालविवाह, त्याचे दुष्परिणाम याविषयी जागृती निर्माण करणं, बालविवाह रोखणं

सामाजिक, आर्थिक, भौगोलिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल घटकांमधल्या मुलांच्या शिक्षणासाठी CSR च्या माध्यमातून मदत

या सखी सावित्री समितीने आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे.

शाळेतल्या विद्यार्थ्यांना अत्याचारांबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी POCSO कायद्यातल्या ई-बॉक्सची माहिती देणं, 

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या CHIRAG अॅपबद्दलची माहिती , 

1908 या चाईल्ड हेल्पलाईनबद्दलचे सूचना फलक शाळेत लावण्याची खातरजमा या समितीने करणं अपेक्षित आहे.

प्रत्येक शाळेच्या किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागावर सखी सावित्री समितीचा बोर्ड लावलेला असणं आवश्यक आहे.

अशाच धर्तीवरच्या केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीचीही घोषणा करण्यात आली होती.

शाळांमधले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीचे इतर नियम काय आहेत?

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक आहे, अशी घोषणा मार्च 2022मध्ये तेव्हाच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.

शाळेमधला सीसीटीव्ही बंद असेल तर कारवाई करण्यात येणार असल्याचं सध्याचे शिक्षणमंत्री यांनी म्हटलंय.

महाराष्ट्र शासनाच्या 2017च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळा, आश्रमशाळा, हॉस्टेलमध्ये दर्शनी भागात तक्रारपेटी बसवणं आवश्यक आहे. ही तक्रारपेटी आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात यावी आणि त्यानुसार कारवाई करावी असं मूळ पत्रकात म्हटलं होतं.

पण ही तक्रार पेटी रोज उघडून त्यातली तक्रार मुख्याध्यापक आणि पोलीस प्रतिनिधींनी वाचावी असं 20 ऑगस्ट रोजी शिक्षणमंत्री म्हणाले.

ऑफिसांप्रमाणेच शाळांमध्येही आता विशाखा समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षण मंत्री यांनी जाहीर केलंय. 

यामध्ये 9वी ते 12वी च्या विद्यार्थिनींचाही समावेश असेल. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 2005 साली तयार करण्यात आलेल्या विशाखा गाईडलाईन्सला त्याचवर्षी कायद्याचं स्वरुप देण्यात आलं होतं. 

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी विशाखा समिती बंधनकारक आहे.

यासोबतच शाळेमध्ये नेमणूक करण्यात येत असलेल्या व्यक्तीची वैयक्तिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी तपासली जाणंही महत्त्वाचं आहे.

------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

प्रत्येक पालकांसाठी महत्वाचे! मुली शाळेतून घरी आल्याबरोबर विचारा हे प्रश्न

प्रत्येक पालकांसाठी महत्वाचे! मुली शाळेतून घरी आल्याबरोबर विचारा हे प्रश्न

प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलींना शाळेत पाठवताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यासह मुली शाळेतून घरी आल्यावर दररोज त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारलेच पाहिजेत.

आजचा दिवस कसा होता

मुली शाळेतून घरी आल्यावर त्यांचा आजचा दिवस कसा होता असं त्यांना विचारा. तसेच मुलींची बॅग तपासा. मुलींना हा प्रश्न अगदी प्रेमाणे आणि आपुलकीने विचारा. यामुळे दिवसभरात त्यांच्याबरोबर काय काय झाले हे तुम्हाला समजेल.

शाळेत काय शिकवले?

शाळेत आपल्या मुलींना काय काय शिकवले जाते हे त्यांना विचारा. आज मुलींना काय अभ्यास दिला, त्यांना कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली हे विचारा. त्याने मुलींच्या बुद्धीत आणि ज्ञानात काय भर पडली आहे हे तुम्हाला समजेल.

शाळेतून व पालका कडून पोरींना गुड टच आणि बॅड टचची माहिती मिळाली पाहिजे.

कोणते शिक्षक ओरडले का?

शाळेत जाण्यासाठी अनेक लहान मुलांना कंटाळा येतो. तुमच्या मुलांना सुद्धा कंटाळा येत असेल किंवा मुली शाळेत जात नसतील तर त्यांना कोणते शिक्षक ओरडतात का? हा प्रश्न नक्की विचारा. तसेच का ओरडतात आणि ओरडताना ते काय बोलतात हे देखील विचारा.

शाळेत कुणी त्रास देतं का?

मुली सतत रडत असतील आणि शाळेत पाठवू नये म्हणून गोंधळ करत असतील तर त्यांना कोणी त्रास देत आहे का हे विचारून घ्या. मुली त्याची उत्तरे निट देत नसतील घाबरत असतील तर त्यांना चॉकलेट द्या आणि प्रेमाणे त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्या.

वॉशरुमला जाताना सोबत कोण आलं होतं

प्रत्येक शाळेत लहान मुलींना वॉशरुमला जाताना शाळेतील शिपाई बाई सोबत असतात. त्यामुळे तुमच्या मुली शाळेत वॉशरुमला जातात तेव्हा त्यांच्यासोबत कोण असतं हे त्यांना विचारून घ्या. जर त्यांनी कोणत्या पुरुषाचे किंवा मुलाचे नाव घेतले तर शाळेत याबद्दल चौकशी करून तक्रार करा. तसेच महिला कर्मचाऱ्यांना मुलींसोबत वॉशरुमला पाठण्यास सांगा.

-------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा? तुम्हाला माहिती आहे का? (POCSO)

अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा? तुम्हाला माहिती आहे का? (POCSO)

महाराष्ट्रातल्या बदलापूर इथल्या एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. शाळेतल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन्ही मुलींचा लैंगिक छळ केला. ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली.

अशा घटनांपासून अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा (POCSO) आणण्यात आला आहे. काही वेळा या कायद्याचा गैरवापर होत असल्याच्याही बातम्या येतात. तरीदेखील लैंगिक छळापासून संरक्षणासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे.

पॉक्सो कायद्याचं स्वरूप कसं आहे?

'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अॅक्ट'

 असं पॉक्सो कायद्याचं पूर्ण नाव आहे. याला मराठीत 

बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा असं म्हणतात. 

हा कायदा 2012मध्ये करण्यात आला आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन (18 वर्षांखालच्या) मुला-मुलींना संरक्षण प्रदान करणं, हा कायद्याचा मूळ हेतू आहे. पॉक्सोअंतर्गत दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. पूर्वी या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद नव्हती. नंतर त्यात फाशी आणि जन्मठेपेसारखी शिक्षाही समाविष्ट करण्यात आली.

महिलांनी एकट्याने प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिपा आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/08/blog-post_21.html

पॉक्सो कायद्यातल्या शिक्षेच्या तरतुदी

पॉक्सो कायद्यात विविध प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये दोषीला 20 वर्षं तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो.

1) अल्पवयीन व्यक्तीचा पोर्नोग्राफीसाठी वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

2) एखाद्या लहान मुलाचा पोर्नोग्राफीसाठी दुसऱ्यांदा वापर करताना पकडलं गेलं, तर सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड भरावा लागू शकतो.

3) लहान मुलांचे अश्लील फोटो जमा केल्यास किंवा ते इतरांशी शेअर केल्यास शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये, दोषीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.

4) 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास 20 वर्षांच्या तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

5) अशा प्रकरणात अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोषीला फाशीची शिक्षादेखील होऊ शकते.

कोण दोषी असू शकतं?

पॉक्सो कायद्यांतर्गत फक्त पुरुषांनाच नाही तर एखाद्या महिलेलाही शिक्षा होऊ शकते. लैंगिक गुन्हे केल्याप्रकरणी एखादी महिला दोषी आढळल्यास तिला पुरुषासारखीच शिक्षा दिली जाते. अल्पवयीन मुलांच्या आणि मुलींच्या लैंगिक छळाच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. गुन्हा करणाऱ्या प्रत्येकाला या कायद्यांतर्गत समान शिक्षेची तरतूद आहे.

-------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

महिलांनी एकट्याने प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिपा आहेत:

महिलांनी एकट्याने प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिपा आहेत:

गेल्या काही दिवसांपासून महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षा हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

एकट्याने प्रवास करताना महिलांन काही बाबींची काळजी घेण्याची आवश्यकता असते, महिलांनी प्रवासाला निघताना काय काळजी घ्यावी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

बॅगमध्ये 'हे' ठेवाच

घरातून बाहेर पडताना आपल्या सेफ्टीसाठी आवश्यक असे सर्व साहित्य बॅगेत ठेवा, यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपला फोन, चार्जर, पॉवर बँक, इअरबड्स यासह २-३ वीमेन सेफ्टी डिव्हाइस देखील बॅगेत कॅरी करा.

नम्रपणे कपडे घाला: स्थानिक ड्रेस कोड आणि रीतिरिवाजांचा आदर करा.

फोनमध्ये कायम चार्जिंग ठेवा

घरातून बाहेर पडतानाचा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचा फोन कायम चार्ज असेल. वाईट काळात हे खूप महत्वाचे शस्त्र ठरू शकतो. यामध्ये इमर्जन्सी नंबर म्हणून आपल्या जवळच्या लोकांचे नंबर क्वीक डायलवर ठेवा.

सेफ्टी डिव्हाइस कॅरी करा

आजकाल मार्केटमध्ये वीमेन सेफ्टीसंबंधी असंख्य डिव्हाइस उपलब्ध आहेत, यामधअये शॉकिंग टॉर्च, ई-अलार्म साउंड ग्रेनेज, विंडो ब्रेकर कटर, मिनी पेपर स्प्रे असे कुठलेही 2-3 डिव्हाइस सोबत असू द्यावेत.

सेफ्टी अॅप

महिलांनी आपल्या फोनमध्ये वीमेन सेफ्टी अॅप नक्की इंस्टॉल करा जेणेकरून गरज पडल्यानंतर तत्काळ यांची मदत घेता येईल.

सुरक्षा ॲपचा विचार करा: आपत्कालीन मदतीसाठी bSafe किंवा Life360 सारखे ॲप्स डाउनलोड करा.

रात्री सुरक्षित राहा: अंधुक प्रकाश असलेल्या किंवा वेगळ्या ठिकाणी एकटे फिरणे टाळा

लाइव्ह लोकेशन शेअर करा

घरातून बाहेर पडताना व्हॉट्सअॅप वर आपले लाइव्ह लोकेशन एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवून ठेवा, जेणेकरून तो तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला ट्रॅक करेल.

कनेक्टेड रहा: तुमचा प्रवास कार्यक्रम कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि नियमितपणे संपर्कात रहा.

वाहनाचा नंबर पाठवून ठेवा

जर तुम्ही एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असाल तर वाहनाचा नंबर कोणालातरी पाठवून ठेवा, तुम्ही शॉर्ट व्हिडीओ नोट देखील पाठवू शकता.

आपत्कालीन संपर्क सुलभ ठेवा: स्थानिक पोलिस आणि दूतावास यांसारखे महत्त्वाचे क्रमांक जतन करा.

फेक अभिनय करा.

जर तुम्हाला खूपच असुरक्षित वाटू लागलं तर लगेच एखाद्या व्यक्तीला कॉल केल्याचा अभिनय करू शकात, समोरचा व्यक्ती तुम्हाला भेटायला येतोय असं भासवा. फारच गरज वाटली तर मोठ्याने बोलताबोलता पोलिस स्टेशनमध्ये तुमच्या जवळचा कोणीतरी काम करत असल्याचंही तुम्ही सांगू शकता.

सावध रहा: तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि अपरिचित परिसरात सतर्क रहा.

लक्षात ठेवा, एकट्याने प्रवास करणे स्त्रियांसाठी आश्चर्यकारकपणे सक्षम बनू शकते. 

काही मूलभूत खबरदारी आणि जागरुकतेने, तुम्ही सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करू शकता!

भारतातील प्रत्येक महिलेला माहिती असावेत 'हे' हेल्पलाईन नंबर; आजच सेव्ह करून ठेवा

गरज पडल्यास मदतीसाठी वेळ वाया जाणार नाही. या क्रमांकांवर फोन करून तक्रार नोंदवता येईल.

घरगुती छळाला बळी पडलेल्या महिला राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करू शकतात.

घटनेची माहिती जर पोलिसांना घटनेची माहिती द्यायची असेल तर 100 आणि 112 या क्रमांकावर कॉल करा. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांक 011 - 26942369 26944754 आहेत.

रेल्वे सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक 182 वर कॉल करू शकतात.

दिल्ली महिला आयोगाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. DCW ला 011-23378044, 23378317, 23370597 वर कॉल करता येईल.

तुमच्या हक्कांसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाशी 011-23385368, 9810298900 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

अखिल भारतीय महिला कॉन्फरेंसशी 011-43389100, 011-43389101 आणि मुंबईतील स्नेहा एनजीओशी 98330 52684 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

महिलांच्या संरक्षणासाठी असणारे कायदे समजून घ्या.

महिलांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि त्यांचे संरक्षण करणारे कायदे जाणून घेणे आवश्यक आहे.

कृपया लक्षात घ्या की देशानुसार कायदे बदलतात, त्यामुळे स्थानिक कायदे आणि संरक्षणांशी परिचित होणे महत्त्वाचे आहे.  तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास, मोकळ्या मनाने विचारा!

-------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...