हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

लहान मुलांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' सोप्या भाषेत शिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

 

लहान मुलांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' सोप्या भाषेत शिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

मुलांच्या लैंगिक छळाच्या संतापजनक घटनेने महाराष्ट्र हेलावून टाकला आहे. दररोज लैंगिक अत्याचाराच्या उघड होणाऱ्या या घटनेंमूळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान मुलांला शाळेत, पार्कमध्ये, घराबाहेर खेळण्यासाठी पाठवण्याआधी पालकांना अनेक वेळा विचार करावा लागतोय. आपले बालक सुरक्षित असेल का? असे शेकडो प्रश्न सध्या पालकांसमोर आहेत.


दरम्यान या घटना घडत असताना बालकांना घरी आई-वडिलांनी तसेच शाळेत शिक्षकांनी Good Touch- Bad Touch संदर्भात शिकवण दिल्यास लहान बालक अश्या घटनेचा शिकार होणार नाही.

Good Touch- Bad Touch संदर्भात मुलांना शिकवण मिळाल्यास घडलेला प्रसंग पालकांपर्यंत पोहोचवू शकले आणि त्यानंतर त्यावर कायद्याने देखील कारवाई करण्यात येईल.

चांगला स्पर्श (Good Touch) : स्पर्श म्हणजे शारीरिक संपर्क, असा शारीरीक संपर्क ज्यामुळे मुलाला सुरक्षित आणि आरामदायक वाटते. शरीराला कुठलाही त्रास होत नाही, चांगल्या स्पर्शांच्या उदाहरणांमध्ये मिठी मारणे, केसांवरून हात फिरवणे. हे स्पर्श सहसा पालक, काळजीवाहू किंवा विश्वासू व्यक्तींद्वारे दिले जातात.

वाईट स्पर्श (Bad Touch): वाईट स्पर्श म्हणजे इथेही शारीरिक संपर्काचा समावेश होतो ज्यामुळे मुलाला अस्वस्थता, भीती किंवा धोका निर्माण होतो. हे शरीराच्या खाजगी अवयवांना मारणे, ढकलणे किंवा नकोसा स्पर्श करणे.

Good Touch Bad Touch : या '3' भागांना कोणालाही हात लावू देऊ नका; लहान मुलांसोबतचा आमिरचा Video होतोय व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

https://dhunt.in/Wfesj

गुड टच बॅड टच शिकवण्यासाठी टिप्स

स्पर्शाबद्दल शिकवणे : तुमच्या मुलांना लहान वयातचं चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल शिकवणे सुरू करा. त्यांना समजेल अशी सोपी भाषा आणि वयोमानानुसार उदाहरणे वापरा. त्यांना दिवसभरात काय घडले, कोण भेटले या गोष्टींची विचारणा करा...

शरीराच्या अवयवांची नावे शिकवा: तुमच्या मुलाला सोप्या भाषेत त्यांच्या शरीराच्या अवयवांची नावे शिकवा, खाजगी भागांची माहिती द्या.


सुरक्षित वातावरण : तुमच्या मुलाला प्रश्न विचारण्यास आणि मनातल्या गोष्टी सांगताना भावना सांगताना भीती वाटणार नाही असे वातावरण त्यांना द्या. त्यांना कळू द्या की ते कोणत्याही समस्यांसह तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांचे ऐकाल आणि मदत कराल.

शरीराचे महत्व शिकवा : तुमच्या मुलाला हे समजण्यास मदत करा की त्यांचे शरीर हे त्यांचेच आहे. त्या शरीराला त्यांच्या परवानगी शिवाय कोणी स्पर्श करू शकणार नाही. त्यांना कोणत्याही स्पर्शाला "नाही" म्हणण्याचा अधिकार आहे.

विश्वासू आणि अविश्वसनीय व्यक्तींची ओळखा : आपल्या आजूबाजूला, शाळेत, पार्कमध्ये वावरताना विश्वासू माणसं कोणती आणि ज्या व्यक्तीसोबत असुरक्षित, भिती वाटत असल्यास त्यांच्यापासून दुर राहण्याचा सल्ला द्या..

बालकांची देहबोली : तुमच्या मुलाची देहबोली आणि अंतःप्रेरणा ओळखण्याचा प्रयत्न करा..त्यांच्या मनातली अस्वस्थता किंवा शांतता समजून घ्या.. त्यांच्या वागण्यात बदल जाणवत असल्यास त्यांना बोलतं करा.

पुस्तके आणि शैक्षणिक संसाधने : वयोमानानुसार मुलांना शरीराते ज्ञान द्या, पुस्तके आणि संसाधने उपलब्ध आहेत जी मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याविषयी शिकवण्यात मदत करू शकतात. अश्या गोष्टींचा पुरवठा त्यांना करा..


शाळेत सहभाग : तुमच्या मुलाच्या शाळेला चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल वयानुसार योग्य धडे दिले जातात का? मुलांची काळजी घेतली जाते का याची शहानिशा करत रहा.

मुलांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल शिकवणे ही पालकत्वाची आणि शिक्षणाची एक आवश्यक बाब निर्माण झाली आहे. या टिपांचे पालन केल्याने तुमच्या मुलास सुरक्षित आणि असुरक्षित शारीरिक स्पर्शाबद्दल माहिती मिळेल.. चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल फरक समजून घेण्यास मदत होईल.

------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...