हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा? तुम्हाला माहिती आहे का? (POCSO)

 

अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा? तुम्हाला माहिती आहे का? (POCSO)

महाराष्ट्रातल्या बदलापूर इथल्या एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. शाळेतल्या स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन्ही मुलींचा लैंगिक छळ केला. ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली.

अशा घटनांपासून अल्पवयीन मुलींचं संरक्षण करण्यासाठी पॉक्सो कायदा (POCSO) आणण्यात आला आहे. काही वेळा या कायद्याचा गैरवापर होत असल्याच्याही बातम्या येतात. तरीदेखील लैंगिक छळापासून संरक्षणासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे.


पॉक्सो कायद्याचं स्वरूप कसं आहे?

'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अॅक्ट'

 असं पॉक्सो कायद्याचं पूर्ण नाव आहे. याला मराठीत 

बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा असं म्हणतात. 

हा कायदा 2012मध्ये करण्यात आला आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन (18 वर्षांखालच्या) मुला-मुलींना संरक्षण प्रदान करणं, हा कायद्याचा मूळ हेतू आहे. पॉक्सोअंतर्गत दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. पूर्वी या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद नव्हती. नंतर त्यात फाशी आणि जन्मठेपेसारखी शिक्षाही समाविष्ट करण्यात आली.


महिलांनी एकट्याने प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे. येथे काही टिपा आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/08/blog-post_21.html

पॉक्सो कायद्यातल्या शिक्षेच्या तरतुदी

पॉक्सो कायद्यात विविध प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये दोषीला 20 वर्षं तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो.

1) अल्पवयीन व्यक्तीचा पोर्नोग्राफीसाठी वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

2) एखाद्या लहान मुलाचा पोर्नोग्राफीसाठी दुसऱ्यांदा वापर करताना पकडलं गेलं, तर सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड भरावा लागू शकतो.

3) लहान मुलांचे अश्लील फोटो जमा केल्यास किंवा ते इतरांशी शेअर केल्यास शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये, दोषीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.

4) 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास 20 वर्षांच्या तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

5) अशा प्रकरणात अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोषीला फाशीची शिक्षादेखील होऊ शकते.


कोण दोषी असू शकतं?

पॉक्सो कायद्यांतर्गत फक्त पुरुषांनाच नाही तर एखाद्या महिलेलाही शिक्षा होऊ शकते. लैंगिक गुन्हे केल्याप्रकरणी एखादी महिला दोषी आढळल्यास तिला पुरुषासारखीच शिक्षा दिली जाते. अल्पवयीन मुलांच्या आणि मुलींच्या लैंगिक छळाच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. गुन्हा करणाऱ्या प्रत्येकाला या कायद्यांतर्गत समान शिक्षेची तरतूद आहे.


-------------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...