( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
जीएसटीचे नेमके प्रकार किती? SGST, CGST, IGST. यात नेमका फरक काय?
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू करण्यात येणार अप्रत्यक्ष कर आहे.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.7900094419
तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )
जीएसटीचा उद्देश देशभरातील करांच्या दरातील असमानता दूर करणे हा होता. जगातील अनेक देशांमध्ये यापूर्वीच जीएसटी प्रणाली लागू केली गेली आहे. यामध्ये केंद्र व राज्यांचे अनेक कर विलीन केले गेले आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर संपूर्ण कर प्रणाली ही ऑनलाईन झाली आहे. जीएसटी नोंदणीपासून ते रिटर्न फाईलिंगपर्यंत काम ऑनलाईन केले जात आहे.
अस्तित्वात असलेले कोणते कर GST मध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे?
निम्नलिखित कर GST मध्ये अंतर्भूत आहे.
(1) सांप्रत केंद्र शासनाव्दारे आकारले जाणारे आणि केंद्र शासनाकडे जमा होणारे कर :-
(क) केंद्रीय उत्पादन शुल्क.
(ख) उत्पादन शुल्क (औषधे व प्रसाधन सामग्री)
(ग) अतिरिक्त उत्पादन शुल्क (विशेष महत्वाचा विक्री माल)
(घ) अतिरिक्त उत्पादन शुल्क (वस्त्र व वस्त्रनिर्मित माल)
(ङ) अतिरिक्त सीमा शुल्क (सामान्यतः CVD म्हणून ओळखले जाते.)
(च) विशेष अतिरिक्त सीमा शुल्क (SAD)
(छ) सेवा कर
(ज) वस्तू व सेवा पुरवठा संबंधित केंद्रीय अधिभार व उपकर
जाणून घ्या आयकर विभाग (incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
(2) राज्य शासनाव्दारे आकारले जाणारे निम्नलिखित कर GST मध्ये अंतर्भूतहोतील.
(क) राज्य शासन मूल्य वर्धित कर (VAT)
(ख) केंद्रीय विक्री कर
(ग) ऐषआरामी वस्तंूवरील कर (लक्झरी टॅक्स)
(घ) प्रवेश कर (सर्व प्रकारचे)
(ङ) मनोरंजन व करमणूकीच्या साधनांवरील कर (स्थानिक संस्थांनी कर आकारलेला नसल्यास)
(छ) खरेदी कर.
(ज) लॉटरी, पैज, जुगार इत्यादींवरील कर.
(झ) वस्तू व सेवा पुरवठासंबंधित राज्य शासनाचे अधिभार व उपकर.
आपण आयकर विवरणपत्र भरले नाही तर काय होईल हे जाणून घ्या.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
GST मध्ये अंतर्भूत होऊ शकणारे केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक संस्था आकारणी करत असलेले कर, उपकर व अधिभार यांच्याबाबत GST परिषद केंद्र शासन व राज्य शासन यांना शिफारसी करील.
जीएसटीचे चार प्रकार आहेत. यामध्ये इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर (IGST), राज्य वस्तू व सेवा कर (SGST), केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू व सेवा कर (UTGST) यांचा समावेश आहे. यातील काही कर हा राज्य सरकारला तर काही कर हा केंद्र सरकारकडे जातो. तसेच केंद्रशासित प्रदेशांनाही जीएसटी मिळतो.
जीएसटीचे नेमके प्रकार किती?
आयजीएसटी (IGST)
जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा एका राज्यातून दुसर्या राज्यात पुरविली जाते तेव्हा आयजीएसटी (IGST) लागू होतो. एखाद्या वस्तू किंवा सेवांची विक्री, हस्तांतरण, विनिमय यांसह इत्यादींचा पुरवठा या अंतर्गत केला जातो. बर्याच वेळा व्यापारी एकाच राज्यात व्यवसाय करतात. पण त्यासाठी लागणारा माल हा इतर राज्यातून खरेदी केला जातो. अशा परिस्थितीत त्याला दुसर्या राज्यात खरेदी केलेल्या वस्तूंवर आयजीएसटी द्यावा लागतो.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
एसजीएसटी (SGST)
जेव्हा कोणतीही वस्तू किंवा सेवा एकाच राज्यात पुरवली जाते, तेव्हा त्यावर एसजीएसटी (SGST) आकारला जातो. हा कर राज्याला मिळतो. जीएसटी कायद्यांतर्गत हा कर राज्यातील सर्व वस्तूंच्या किंवा सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर आकारला जातो. मात्र, यातून काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. एसजीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा व्हॅट (VAT), लक्झरी टॅक्स (Luxury Tax), करमणूक कर इत्यादी आकारल्या जाणाऱ्या इतर करांचे अस्तित्व बंद झाले.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
सीजीएसटी (CGST)
एका राज्यात खरेदी केल्यानंतर त्याच राज्यात विकल्या जाणार्या वस्तू किंवा सेवांवर सीजीएसटी आकारला जातो. जेव्हा एखादा दुकानदार तुमच्याकडून एसजीएसटी शुल्क आकारतो, त्याच वेळी तो तुम्हाला सीजीएसटी देखील आकारतो. आता प्रत्येक वस्तू ही निर्धारित केलेल्या कर दराखाली येते. म्हणजे समजा एखाद्या वस्तूवरील कराचा दर हा 28 टक्के आहे. तर त्यातील 14 टक्के कर हा एसजीएसटी आणि उर्वरित 14 टक्के कर हा सीजीएसटी म्हणून आकारला जातो. हा कर केंद्र सरकारकडे जातो.
यूटीजीएसटी (UTGST)
हा कर एसजीएसटीप्रमाणेच असतो. यातील मुख्य फरक म्हणजे हा कर वसूल करण्याचा अधिकार केवळ केंद्रशासित प्रदेशांना आहे. म्हणजेच ज्याप्रकारे राज्य सरकार एसजीएसटी गोळा करते. तसेच केंद्रशासित प्रदेश यूटीजीएसटी (UTGST) गोळा करतात.
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf