हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

ट्रेनमधून प्रवास करताना अडचणी येताच ? 'या' टोल-फ्री नंबरवर करा तक्रार

ट्रेनमधून प्रवास करताना अडचणी येताच ? 'या' टोल-फ्री नंबरवर करा तक्रार

तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महतवाची आहे. कधी कधी रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या सुविधांबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कशी रिझर्व्ह केलेली सीट मिळत नाही तर कधी रेल्वेची वेळ गाठता येत नाही.

मग अशावेळी कोणाशी संपर्क करायचा ? हा मोठा प्रश्न असतो. आता मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नाही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक ( IRCTC Helpline ) सुरु केला आहे.

भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. प्रवासादरम्यान एखाद्याशी भांडण झाल्यास किंवा इतर समस्या आल्यास तुम्ही मदत घेऊ शकता किंवा तक्रार दाखल करू शकता. भारतीय रेल्वेने प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सर्व प्रकारच्या शंका, तक्रारी, सहाय्य यासाठी एकात्मिक 'रेल मदत ' हेल्पलाइन क्रमांक "139" सुरू केला आहे.

"भारतीय रेल्वेने सांगितले. ट्रेनमधून प्रवास करताना तुम्हाला मदत हवी असल्यास तुम्ही भारतीय रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करू शकता. हा क्रमांक टोल-फ्री आहे आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवण्यासाठी त्याचा वापर करू शकता.

विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेचा टोल-फ्री क्रमांक 139 विविध सेवा प्रदान करतो - तुम्ही फोन कॉल करण्याव्यतिरिक्त या नंबरवर एसएमएस (संदेश) पाठवू शकता. तक्रार नोंदवण्याव्यतिरिक्त, तुम्ही सुरक्षा, वैद्यकीय आणीबाणी, रेल्वे अपघात, ट्रेनशी संबंधित इतर कोणतीही तक्रार, सामान्य तक्रारी किंवा सतर्कतेबद्दल माहितीसाठी या नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय, तुमच्या तक्रारीच्या स्थितीची माहिती या क्रमांकावर उपलब्ध असेल.

हेल्पलाइन क्रमांक 139 भारतीय 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रवासी IVRS (इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) * ची निवड करू शकतात किंवा दाबून कॉल-सेंटर एक्झिक्युटिव्हशी थेट कनेक्ट होऊ शकतात.

सुरक्षितता आणि वैद्यकीय सहाय्यासाठी, प्रवाशाला 1 दाबावे लागेल, जे कॉल सेंटर एक्झिक्युटिव्हशी त्वरित कनेक्ट होते.

चौकशीसाठी, प्रवाशाला 2 दाबावे लागेल 

आणि 3 दाबावे उप मेनूमध्ये, PNR स्थिती, ट्रेनचे आगमन/निर्गमन, निवास, भाडे चौकशी, तिकीट बुकिंग, सिस्टम तिकीट रद्द करणे, वेक अप अलार्म सुविधा/गंतव्य सूचना, व्हीलचेअर बुकिंग, जेवण यासंबंधी माहिती. बुकिंग मिळू शकते.

सामान्य तक्रारींसाठी, प्रवाशांना 4 दाबावे लागेल

दक्षता संबंधित तक्रारींसाठी, प्रवाशांना 5 दाबावे लागेल

पार्सल आणि वस्तू संबंधित प्रश्नांसाठी, प्रवाशाला 6 दाबावे लागेल

IRCTC संचालित ट्रेनच्या प्रश्नांसाठी,

प्रवाश्यांना 7 दाबावे लागेल

तक्रारींच्या स्थितीसाठी, प्रवाशांना 9 दाबावे लागेल

कॉल सेंटर एक्झिक्युटिव्हशी बोलण्यासाठी प्रवाशाला * दाबावे लागेल.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

स्वत:चा व्यवसाय करायचाय? PM SVANidhi योजना करेल आर्थिक मदत, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

  ( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!!

स्वत:चा व्यवसाय करायचाय? PM SVANidhi योजना करेल आर्थिक मदत, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..

भारत सरकार स्वयंरोजगाराला चालना देत आहे. यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना पीएम स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) आहे. या योजनेत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.

पीएम स्वानिधी योजना (PM SVANidhi Yojana) –

पीएम स्वानिधी योजनेत कर्जाद्वारे नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. कोविड महामारीनंतर ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत सरकार 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 10,000 रुपयांचे कर्ज मिळणार आहे. 

दुसऱ्यांदा 20,000 रुपये आणि 

तिसऱ्यांदा 50,000 रुपये कर्ज दिले जाईल. या योजनेंतर्गत मिळालेली कर्जाची रक्कम 12 महिन्यांच्या आत परत करावी लागते.

पीएम स्वानिधी योजनेचे फायदे –

यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.

-कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीवर 7 टक्के सबसिडी दिली जाते.

-डिजिटल पेमेंट करताना सरकार कॅशबॅकचा लाभ देते.

-लाभार्थ्याला 25 रुपये ते 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो.

अर्ज कसा करायचा ?

तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

– या योजनेसाठी तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडाल.

– आता तुम्ही हे कर्ज कोणत्या व्यवसायासाठी घेत आहात हे सांगावे लागेल.

– यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाते.

आवश्यक कागदपत्र काय आहे?

-आधार कार्ड

-बँक खाते क्रमांक (बँक खाते तपशील)

-पत्त्याचा पुरावा

– मोबाईल नंबर

– पॅन कार्ड

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल

बऱ्याचदा आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा रात्री- बेरात्री किंवा दिवसा देखील गाडीचे पेट्रोल किंवा डिझेल संपते. त्यामुळे रस्त्यात आपली तारांबळ उडते व खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते.

आपल्याला माहित आहे की रस्त्यावर जर कधी अपघात झाला तर मदतीला देखील जास्त करून कोणी धावून येत नाही. अशा प्रसंगी आपल्याला काय करावे हे उमजत नाही. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून जर अशा काही घटना प्रवासाच्या दरम्यान घडल्यात तर तुम्ही एका टोल फ्री नंबरवर कॉल करून उभ्या राहिलेल्या या समस्यांचे निराकरण करू शकतात.

आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा रस्त्यांवर टोलनाके असतात व या टोलनाक्यांवर आपण टॅक्स म्हणून पैसे भरत असतो. हा टॅक्स आपण त्या रस्त्यावरून गाडी चालवतो म्हणून भरतो. परंतु या टॅक्स भरल्यामुळे आपल्याला काही सुविधा देखील या माध्यमातून मिळतात.

मित्रांनो तुमचे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, PF KYC, Final PF Withdrawal, PF Nominee ad,  date claim

आणि ESIC संबंधित Aadhar KYC,  Family Ad, ESIC Card, व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.👇🏻

-----------------------------

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

परंतु बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसते. टोल टॅक्स भरल्यानंतर तुम्ही तो रस्त्याचा वापर तर करू शकतात परंतु कोणत्याही मेडिकल इमर्जन्सी मध्ये किंवा पानांमध्ये काही बिघाड झाला किंवा पेट्रोल, डिझेल संपले तर अशा प्रसंगी तुम्हाला मदत देखील मिळू शकते. याकरिता फक्त तुम्हाला देण्यात आलेल्या काही हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे गरजेचे असते. यातील महत्त्वाचे म्हणजे…

1)  पेट्रोल संपले तर :–

बऱ्याचदा आपण हायवेवरून प्रवास करत असताना अचानक पेट्रोल किंवा डिझेल संपते. दूर दूर पर्यंत आपल्याला पेट्रोल पंपाचा सुगावा लागत नाही व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. परंतु अशाप्रसंगी चिंता न करता तुमच्या टोल टॅक्स पावतीवर दिलेला जो काही हेल्पलाइन क्रमांक असतो त्यावर तुम्ही कॉल करणे गरजेचे आहे.

त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल दिले जाते किंवा पुरवले जाते. साहजिकच यामध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागतात परंतु होणारी समस्या मिटते. याकरिता पेट्रोल हेल्पलाइन क्रमांक पाहिले तर 8577051000 आणि 7237999944 यावर तुम्ही कॉल करू शकता.

2) वाहनामध्ये बिघाड झालातर :–

बऱ्याचदा प्रवास करत असताना दुचाकी असो किंवा कार यामध्ये काही बिघाड झाला तर समस्या निर्माण होऊ शकते. अशाप्रसंगी तुम्ही मेकॅनिक किंवा कार सेवेची देखील मदत घेऊ शकतात. याकरिता तुम्हाला 8577051000 आणि 7237999955 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात. त्यामध्ये मेकॅनिक येण्याची सुविधा ही फ्री मध्ये आहे. परंतु वाहनामध्ये काही समस्या निर्माण झाली असेल तर मेकॅनिक शुल्क आकारतो. जागेवर जर संबंधित वाहन दुरुस्त करता आले नाही तर ते सर्विस स्टेशनकडे देखील नेले जाते.

3) मेडिकल इमर्जन्सी मध्ये :–

बऱ्याचदा प्रवास करत असताना रस्त्यातच कोणी आजारी पडते व अशावेळी आपल्याला काय करावे हे समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेळ न घालवता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेला 8577051000 आणि 7237999911 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून मोफत ॲम्बुलन्स मिळवू शकतात.

याशिवाय तुम्हाला रस्त्यावर कुठल्याही प्रकारची इतर समस्या आली तर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1033 किंवा 108 वर कॉल करू शकतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस? तुम्हाला माहितीये याचा इतिहास?

 ( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस? तुम्हाला माहितीये याचा इतिहास?

भारतीय घटनेत नमूद केलेले कायदे, हक्क आणि अधिकार आणि तत्त्वांचं पालन भारतीय नागरिक करतात ती राज्यघटना सर्व प्रथम 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं स्वीकारली. हा दिवस साजरा करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय राज्यघटना दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो.

या घटनेत मूलभूत राजकीय संहिता, रचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्य, मूलभूत हक्क आणि नागरिकांची कर्तव्यं नमूद केलेली आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी शपथ घेण्यासाठी सरकार आणि नागरिकांसाठी भारतीय राज्यघटना हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.पृथ्वीवरील लिखित स्वरूपातील सर्वांत मोठी राज्यघटना असा या घटनेचा गौरव केला जातो. भारतीय राज्य घटनेला एक सुंदर कलाकृतीच समजलं जातं आणि ही कलाकृती घडवणाऱ्या संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात.

26 नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली त्यामुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मात्र 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संसदेने संविधानाचा स्वीकार केला त्यामुळे तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. हे संविधान लागू झाल्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1935 हा कायदा संपुष्टात आला. भारतीय संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर साजरा करण्याचा निर्णय सन 2015 मध्ये अंमलात आणला गेला. केंद्र सरकारने नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यानुसार सामाजिक न्याय मंत्रालयाने आदेश काढला होता.

भारतीय संविधानाने निश्चित केलेल्या यंत्रणा आणि प्रशासनाची पद्धत यावर भारतीय नागरिकांचा असलेला विश्वास हा दिवस साजरा केल्याने दृढ होतो. राज्यघटनेत नमूद केलेल्या देशाच्या लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांची आठवण हा दिवस आपल्याला करून देतो.

जगातील आदर्श ''भारतीय संविधान''

ज्यघटना हा देशाचा मूलभूत पाया आहे. राज्यघटनेद्वारे सरकारचे अधिकार, मर्यादा आणि नागरिकांचे हक्क, कर्तव्ये यांची स्पष्टता मांडलेली आहे. राज्यघटना एक अत्यावश्यक दस्ताऐवज आहे, जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करतो.त्याद्वारे जुलूम आणि सत्तेच्या गैरवापरापासून संरक्षक म्हणून काम करतो.

अनेक जाती, भाषा, धर्म, पंथ, रीतीरीवाज, ठराविक अंतरावर बदलणारी भौगोलिक परिस्थिती इतक्या सगळ्या हजारो वेगवेगळ्या घटकांना संविधानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न घटनाकारांनी केला आहे.

संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.

1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची सभेचे स्थायी अध्यक्ष आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.मसुदा तयार करण्यासाठी 13 समित्यांची स्थापना केली. संविधान निर्मितीमध्ये 389 सदस्य होते. काही कारणांमुळे त्यातील काही जण बाहेर पडले. त्यामुळे संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 299 राहिली.

जवळपास तीन वर्षे संविधान निर्मितीचे काम चालले. अनेक सदस्य आरोग्य समस्यांमुळे आणि देशातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असल्याने प्रवास करताना येणाऱ्या अडचणींमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मसुदा बनवण्याची जबाबदारी मुख्यत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पार पाडावी लागली.

घटनादुरुती

भारताची घटना दृढता आणि लवचिकतेचे मिश्रण आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये घटनादुरुस्तीबद्दल तरतुदी देण्यात आल्या आहे. यात प्रामुख्याने दोन प्रकारे घटनादुरुस्ती करता येईल, हे विशद केलेले आहे.घटनेच्या काही भागांत विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करता येऊ शकते. इतर भागांत घटनादुरुस्ती करण्यासाठी विशेष बहुमतासह अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांच्या मंजुरीची गरज असते.

संविधान हे केवळ एक कायद्याचे पुस्तक आहे का?

आम्ही भारताचे लोक... ही ओळ वाचली की, आपल्याला आठवते ती भारतीय संविधानातील उद्देशिका. आपल्या संविधानाची निर्मिती ही भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटना समितीने म्हणजेच आम्ही भारतीयांनी तयार केली आहे.

आपल्या संविधानाने आपल्याला मुख्यतः दोन प्रकारचे हक्क दिले आहेत. एक कायदेशीर हक्क आणि दुसरे मूलभूत हक्क. संविधानाने आपल्याला ज्या मूलभूत हक्कांची हमी दिली आहे तीच मुळात नागरिकांना आपले आयुष्य एक मनुष्यप्राणी म्हणून अर्थपूर्ण जगता यावे, प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार स्व-विकास साधता यावा, सुसंस्कृत जीवन जगता यावे म्हणून. मूलभूत हक्क व्यक्तीच्या, विचार, उच्चार, हिंडण्या-फिरण्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करते. आपल्याला शिक्षण, कौशल्ये आणि रोजगाराची समान संधी मिळते ती मूलभूत हक्कांमुळे. अभिव्यक्ती-धार्मिक-शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यामुळे व्यक्तीला स्व-विकासाची संधी मिळतेच, पण सोबत समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी आणि लोकशाही टिकवून ठेवण्यास मदत होते. 

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ! हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकले असेल. असे म्हटले जाण्याचे एक कारण, आपण सर्वजण आपल्या हक्कांविषयी जितके जागरूक असतो त्या प्रमाणात आपल्या कर्तव्याबाबत दक्ष असतोच असे नाही. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी संविधानाने सुरुवातीपासूनच आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. इतकेच नाहीतर त्यांचे संरक्षण व्हावे याची ' अनुच्छेद-32 ' द्वारे तरतूद करून ठेवली आहे. यासोबतच संविधानात लोककल्याण आणि राज्याच्या विकासाला प्राथमिकता देत कोणतेही धोरण आखताना किंवा कायदा करताना सरकारने ' राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे ' लक्षात घ्यायला हवीत, असे निर्देश राज्याला दिले आहेत. आपण स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीत आपले लोकप्रतिनिधी आपल्या वतीने शासन आणि प्रशासन चालवतात. जर का आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ठरवून दिलेली काही कर्तव्ये पार पाडली तर लोककल्याण आणि राज्याच्या विकासात आपला देखील प्रत्यक्ष सहभाग राहू शकेल.

सहज पाळता येणारी कर्तव्ये 

लोकशाहीचे दायित्व स्वीकारणारे नागरिक तयार व्हावेत, नागरिकांचा लोकशाहीतील प्रत्यक्ष सहभाग वाढावा, समाज विघातक कृतीपासून नागरिकांनी दूर राहावे व आपल्या देशाची सुरक्षा, एकात्मता आणि सार्वभौमत्व टिकून राहावे यासाठी भारतीय संविधानाचे पालन करणे, राष्ट्रीय आदर्शांची जोपासना करणे, भारताची सार्वभौमत्वता, एकता व एकात्मतेचे संरक्षण करणे, देशवासीयांमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, आपल्या संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे जतन करणे, वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे, राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे, यासारखी कुणाही नागरिकाला सहज पाळता येणारी कर्तव्ये दिली आहेत.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

तुम्ही घर खरेदी करण्यापूर्वी या कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा मालकी धोक्यात येईल

तुम्ही घर खरेदी करण्यापूर्वी या कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा मालकी धोक्यात येईल

बहुतेक लोकांसाठी, घर खरेदी करणे हे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा बरेच काही आहे. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग घर खरेदी करण्यासाठी खर्च करते.

तथापि, घर खरेदी करण्याची प्रक्रिया अवघड असू शकते, विशेषत: जर कोणी प्रथमच घर खरेदी करत असेल तर. आपण कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी करू इच्छित आहात यावर अवलंबून आवश्यक कागदपत्रे बदलतात. त्यामुळे जे लोक पहिल्यांदाच घर खरेदी करत आहेत, त्यांच्यासाठी येथे आम्ही व्यवहार करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे ही माहिती मिळेल.

सेल डीड (Sale Deed)

विक्री करार (सेल डीड) हा एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये बिल्डरकडून एखाद्या व्यक्तीला मालमत्ता विक्री आणि हस्तांतरणाचा पुरावा असतो. अनेकदा घर विकत घेतल्यानंतर काही कारणास्तव घर विकायचे असेल तर ही कागदपत्रे आवश्यक असतात. विक्री करार सामान्यत: विक्री करारापूर्वी आणि करारात प्रवेश केलेल्या व्यक्तींनी मान्य केलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर तयार केला जातो.

मदर डीड (Mother Deed)

मदर डीड हा देखील मालमत्तेची मालकी दर्शविणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जेव्हा खरेदीदार मालमत्तेवर कर्ज घेतो तेव्हा सामान्यत: बँकांना या दस्तऐवजाची आवश्यकता असते. हे दस्तऐवज तयार करताना आपण मदतीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.

खरेदी-विक्री करार (Purchase and Sale Agreement)

विक्री आणि खरेदी करारामध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोघेही स्वीकारतात अशा अटी आणि शर्तींची यादी असते. याचे सोपे उदाहरण म्हणजे फ्लॅटची किंमत. या करारामध्ये खरेदीदार आणि विक्रेते या दोघांकडून फ्लॅटला मान्य झालेल्या रकमेचा समावेश असेल.

इमारत मंजुरी आराखडा (बिल्डिंग अप्रूवल प्लान) (Building Approval Plan)

बांधकाम सुरू करण्यापूर्वी बिल्डरला बिल्डिंग बायलॉज, मास्टर प्लॅन आणि स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात. या मंजुरीमध्ये दोन बाबींचा समावेश आहे - 

अ) इमारत आराखडा आणि ब) लेआऊट मंजुरी. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांची एक चूक म्हणजे बिल्डरने इमारत आराखडा आणि लेआऊट मंजुरीच्या अटी व शर्तीची पूर्तता केली आहे की नाही याची त्यांना खात्री नसते. नवीन इमारतींमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या जागेच्या तपासणीसाठी स्थानिक अधिकारी आले, तर अटी व शर्तींची पूर्तता न केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

ताबा पत्र (पोझिशन लेटर) (Position Letter)

पोझिशन लेटर हे बिल्डरने तयार केलेले दस्तऐवज आहे, ज्यात खरेदीदारांनी मालमत्तेचा ताबा घेतल्याची तारीख नमूद केली आहे. हे दस्तऐवज बिल्डरच्या नावाने तयार केले जातात आणि पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर तयार केले जातात. मात्र, हे पत्र कोणाच्याही मालमत्तेच्या मालकीचा पुरावा नाही. त्यासाठी घर खरेदीदाराला भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

इतर तीन कागदपत्रे (Three other documents)

आणखी तीन कागदपत्रे तपासावी लागतील. यामध्ये कंप्लीशन सर्टिफिकेट, खाते सर्टिफिकेट आणि अलॉटमेंट लेटर यांचा समावेश आहे. जर तुम्ही सध्या बांधकाम सुरू असलेले घर बुक करण्याचा विचार करत असाल तर हे पत्र खूप महत्वाचे आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

आकाशात वीजा चमकत असताना घराबाहेर असाल तर जीव वाचवण्यासाठी काय करावं? NDRF ने दिल्या महत्वाच्या सूचना

 ( BLOGGER ) संतोष साळवे...790009441

वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

आकाशात वीजा चमकत असताना घराबाहेर असाल तर जीव वाचवण्यासाठी काय करावं? NDRF ने दिल्या महत्वाच्या सूचना

आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा बळी जातो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर खुल्या आकाशाखाली राहूनही आकाशातून पडणाऱ्या विजेपासून आपला जीव वाचू शकतो.

लाइटनिंग, ज्याला वीज चमकणे देखील म्हणतात, आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे दरवर्षी ग्रामीण भागात हजारो लोकांचा बळी घेतात. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर जीव वाचू शकतो.

विजा मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसात पडतात. जे लोक मोकळ्या आकाशाखाली, हिरव्यागार झाडांखाली, पाण्याजवळ किंवा वीज आणि मोबाईल टॉवरजवळ आहेत, त्या लोकांना याचा धोका जास्त असतो. 

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट (NDRF) ने जारी केलेल्या जागरूकता लेख मधे लोकांना विजेपासून वाचणयाचे मार्ग सांगण्यात आले आहेत. 

अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, 'असा' घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

त्यानुसार, जर आकाशात वीज चमकत असेल आणि तुम्ही घराबाहेर असाल तर प्रथम सुरक्षित ठिकाणी (मजबूत छप्पर) पोहोचण्याचा प्रयत्न करा.

1) हे शक्य नसल्यास पाणी, विजेच्या तारा, खांब, हिरवीगार झाडे, मोबाईल टॉवर इत्यादीपासून ताबडतोब दूर जा.

2) जर तुम्ही आकाशाखाली असाल तर कानावर हात ठेवा, जेणेकरून विजेच्या जोरदार आवाजाने कानाचे पडदे फुटणार नाहीत.

3) आपल्या टाचा जोडून जमिनीवर स्क्वॅट स्थितीत बसा.

4) या काळात तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्ती असाल तर एकमेकांचा हात अजिबात धरू नका, तर एकमेकांपासून अंतर ठेवा.

5) छत्री किंवा रॉडसारख्या काही गोष्टी असतील तर त्या तुमच्यापासून दूर ठेवा, अशा गोष्टींवर वीज पडण्याची शक्यता असते.

6) वाळलेला गवत किंवा पेंढा इत्यादींच्या ढिगाऱ्यांपासून दूर राहा, त्याला आग लागू शकते

विजेची प्रक्रिया काही सेकंदांपर्यंत चालते, परंतु त्यातील विद्युत प्रवाहाचा बोल्ट इतका जास्त असतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्यास ते पुरेसे असते. कारण त्यात विद्युत गुणधर्म आहेत, जेथे विद्युत प्रवाह शक्य आहे तेथे ते अधिक प्रभावी आहे. आकाशातून पडणारी वीज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जमिनीवर पोहोचते आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सजीवांना इजा होते.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या.

पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या.

देशात पोलिसांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील कायद्यांचे संरक्षण करण्यात पोलिसांची निर्णायक भूमिका असते. अशातच पोलीस हे देशातील कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक आहेत.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

पोलीस नसेल तर कोणत्याही देशाच्या आणि राज्याच्या प्रशासन व्यवस्थेची कल्पना करणे कठीण आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था नीट पाळली जात आहे का? त्यावर लक्ष ठेवणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र, अशी अनेक प्रकरणे देशात उघडकीस आली आहेत, जिथे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला मारहाण केली. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...

सर्वातआधी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ताब्यात घेणं आणि अटक यात काय फरक आहे? ताब्यात असलेल्या व्यक्तीला चौकशीसाठी काही तासांसाठी कारागृहात नेले जाते.

तर अटकेत असलेली एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास किंवा गुन्हा केल्याचा संशय असल्यास त्याला तुरुंगात पाठवले जाते. मात्र अटक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले जाते. या काळात त्याला चौकशीसाठी किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात पाठवले जाते.

आता प्रश्न असा आहे की, अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीला मारहाण करू शकतात का? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही जारी केला आहे. जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेतल्यावर त्याला मारहाण केली, तर याला कस्टोडियन हिंसा, असे म्हटले जाईल. देशात ते बेकायदेशीर मानले जाते. न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलिसांना मारहाण करता येत नाही.

अटकपूर्व जामीन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय असते? अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला मारहाण केली, तर अशा परिस्थितीत दंडाधिकारी पोलिसांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 अंतर्गत वॉरंट जारी करतात. दंडाधिकारी येथे अटक किंवा कारवाईचे आदेशही देऊ शकतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...