ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला अॅक्टीव्ह लर्नर बनावे लागेल. यामध्ये केवळ तुम्हीच तुमच्या शिक्षणास जबाबदार आहात. तुमच्याकडून कोणी अभ्यास करवून घेणार नाही. स्वप्न पूर्ण करण्याची ठिणगी*विविध कोर्सेस ऑनलाईन शिकवणाऱ्या विविध वेबसाइट्स*
गुगल कोर्सेस*
गुगलने देखील ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे.
1) Google UX Design Professional Certificate
Google UX डिझाइन प्रोफेशनल प्रमाणपत्र कोर्सद्वारे एक्सपिरिअन्स डिझायनर, युझर इंटरफेस डिझायनर तसेच व्हिज्युअल डिझायनर बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येतं. कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पदवी किंवा कोणत्याही पूर्व अनुभवाची आवश्यकता नाही. यामध्ये वायरफ्रेम, लो-फिडेलिटी प्रोटोटाइपिंग, UX संशोधन कसे करायचे आदी माहिती देण्यात येणार आहे. हा २०० तासांचा स्टडी प्रोग्राम आहे.
2) Google Project Management Professional Certificate
हा सुमारे १४० तासांचा स्टडी प्रोग्राम आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एंट्री-लेव्हल प्रोजेक्ट मॅनेजमेंट रोलमध्ये सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य यामार्फत शिकायला मिळतात. प्रोजेक्टची निर्मिती, योजना, प्रत्यक्ष अंमलबजावणीविषयी यात शिकायला मिळू शकतं. यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, स्क्रम मास्टर्स, प्रोग्राम मॅनेजर आणि प्रोजेक्ट अॅनालिस्ट्सच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
3) Google Data Analytics Professional Certificate
Google Data Analytics Professional Certificate यातून व्यवसायाचे निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण मिळू शकतं. कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नसली तरी, व्यवस्थित आकलनासाठी Google Analyticची मुलभूत माहिती असणे या अभ्यासक्रमासाठी गरजेचे आहे. असोसिएट डेटी एनॅलिस्ट, डेटा तंत्रज्ञ आणि मार्केटिंग एनॅलिस्ट यांसारख्या भूमिकांसाठी कौशल्य यामार्फत मिळू शकतं. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मूल्यांकनावर ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.
4) Associate Android developer certificate
हा कोर्स गुगलने ऑफर केला आहे. हा कोर्स कोटलिन प्रोग्रामिंग भाषेच्या मूलभूत गोष्टी आणि Android अॅप्स विकसित करणे, चाचणी करणे आणि डीबग करणे यासाठी आवश्यक गोष्टी शिकवतो. येथे तुम्ही अँड्रॉइड कोअर, यूजर इंटरफेस, डेटा मॅनेजमेंट, डीबगिंग आणि टेस्टिंग यासारखे आवश्यक विषय शिकाल.
5) learndigital.withgoogle.com या वेबसाइटवर विविध विषयांवरचे १२५ गुगल कोर्सेस उपलब्ध आहेत. आपल्या आवडत्या विषयासंबंधीचे मॉड्युल आणि वैयक्तिक वेळेच्या नियोजनानुसार तुम्ही हे कोर्सेस पूर्ण करू शकतात. तसेच कोर्स सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोर्सच्या शेवटी दिलेली क्विझ किंवा प्रश्नमंजुषा पूर्ण करणे गरजेचे आहे.
गूगल कोर्सेस पुढीलप्रमाणे आहेत-
1) फंडामेंटल्स ऑफ डिजिटल मार्केटिंग
2) गेट बिसिनेस ऑनलाईन
3) इंप्रुव्ह युअर ऑनलाईन सिक्युरिटी
4) इफेक्टिव्ह नेटवर्किंग
5) बिझिनेस कम्युनिकेशन
6) सोशल सायकोलॉजी
7) टेक्निकल सपोर्ट फंडामेंटल
8) फंडामेंटल्स ऑफ ग्राफिक डिझाईन
9) इंग्लिश फॉर करियर डेव्हलपमेंट
10) बिझिनेस रायटिंग
*टाटा ई -लर्निंग कोर्सेस*
टाटा ई -लर्निंग कोर्सेस हे बहुतांशी टेक्निकल आहेत. या कोर्सेसचा उद्देश कौशल्य विकसित करणे असून त्यांची फी केवळ नाममात्र रुपये तीनशे आहे.
पुढील विषयांसाठी ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत-इण्डस्ट्री ४.० (२महिने/३००रुपये फी ) ( www.youtube.com/watch?v=mD9wLNNPK7g)ही डेमो लिंक चेक करू शकता
टोटल क्वालिटी मॅनेजमेंट(२महिने/३००रुपये फी https://youtu.be/JxUA4jvycOI ही डेमो लिंक चेक करू शकता
इंग्लिश प्रोफिशिअन्सी ((२महिने/३००रुपये फी)
मेकॅनिकल (या विषयांतर्गत १४कोर्सेस आहेत)
मेटॅलर्जी (या विषयांतर्गत ७ कोर्सेस आहेत)
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स (या विषयांतर्गत १२ कोर्सेस आहेत)
कम्प्युटर सायन्स (या विषयांतर्गत एम एस ऑफिस, अॅडव्हान्स एक्सेल, मशीन लर्निंग)
मॅनेजर (बिझनेस स्किल्स फॉर मॅनेजर्स-फी रुपये ३०००/१२महिने)
*स्वयं कोर्सेस https://swayam.gov.in
स्वयं कोर्सेस हा भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम असून ५०० हून अधिक 'फ्री' कोर्सेस या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे कोर्सेस बंगाली, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड अशा आठ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419
या वेबसाईटवर पुढील विषयाचे कोर्सेस उपलब्ध आहेत.
प्रोग्रामिंग C++, क्लाउड कम्प्युटिंग, इंट्रोडक्शन टू इंटरनेट, मॉडर्न अल्जेब्रा, सॉफ्ट स्किल्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टु रिसर्च मेथोडॉलॉजी, लँग्वेज अँड माईंड, इमोशनल इंटेलिजन्स इत्यादी.
या कोर्सेसचं वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत ई-बुक्स आणि व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत..
*कोर्सेरा (https://www.coursera.org/)*
कोर्सेरा कोर्सेसचे निर्माण जगातील नामांकित विद्यापीठांनी आणि कंपन्यांनी होतकरू तरुणांना त्यांच्या उपयुक्त करिअरमध्ये 'स्किल डेव्हलपमेंट' (कौशल्य विकास)साठी उपयोग होईल यासाठी केले आहेत. आयबीएम, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेंच्युएट्स, युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटो, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हिया इत्यादींचा त्यात समावेश होतो. हे कोर्स पूर्ण करून कोर्सच्या स्वरूपानुसार अथवा टाइपनुसार सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री एखादा तरुण अथवा तरुणी प्राप्त करू शकतो/शकते. यातील काही कोर्सेस मोफत असून काहींसाठी फी आकारली जाते.
कोर्सेरा पुढील विषयाचे कोर्सेस आयोजित करतात-
आर्ट अँड हुमॅनिटीज (हिस्टरी,फिलॉसॉफी,म्युझिक अँड आर्ट),
बिझनेस (लीडरशिप मॅनेजमेंट, फायनान्स, मार्केटिंग, बिझनेस स्ट्रॅटेजी इत्यादी),
डेटा सायन्स (पायथॉन, एक्सेल, SQL, Tableau, TensorFlow, आर्टिफिशल इंटेलिजन्स, इत्यादी),
कम्प्युटर सायन्स (जावा, C++, ब्लॉकचेन, HTML, Agile इत्यादी),
इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (AWS, सायबर सिक्युरिटी, गुगल , SAP),
हेल्थ (बेसिक सायन्स, हेल्थ इन्फोमॅटीक्स, हेल्थकेअर मॅनेजमेंट, नुट्रीशन, पेशंट केयर इत्यादी),
फिजिकल सायन्स अँड इंजिनीरिंग (इलेट्रीकल इंजिनीरिंग, मेकॅनिकल इंजिनीरिंग, केमिस्ट्री , फिसिक्स अँड ऍस्ट्रॉनॉमी इत्यादी), सोशल सायन्सेस
*खान अकॅडेमी ( www.khanacademy.org )*खान अकॅडेमी मुळात लर्निंग रिसोर्सेसची लायब्ररी आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विदयार्थ्यांसाठी त्यांच्या इयत्तेप्रमाणे विषयांची मांडणी केली आहे. इयत्ता पहिलीपासून ते बारावी पर्यंत गणित विषयावरच्या व्हिडीओ लेक्चरची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नववी ते बारावी पर्यंत सायन्स विषयावर व्हिडीओ लेक्चर्स उपलब्ध आहेत. (IIT-JEE) तसेच SAT, GMAT या परीक्षांची तयारी ऑनलाईन करून घेतली जाते. हे कोर्सेस मोफत असून आपण आपल्या वेळेच्या नियोजनानुसार आणि सोयीप्रमाणे पूर्ण करू शकतात.
*ओपन कल्चर कोर्सेस (http://www.openculture.com/freeonlinecourses)*
ओपन कल्चर कोर्सेस हे विविध विषयांवर रिसोर्स कोर्स वेब पोर्टल आहे. या वेबसाईटवर तुम्ही जसे विविध विषयावरचे कोर्सेस पाहाल तसेच त्या कोर्सच्या अनुषंगाने त्या विषयावरचे पॉडकास्ट, ऑडिओबुक्स व ई-बुक्स पाहू शकतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये हे कोर्स पोर्टल प्रसिद्ध आहे. आर्ट अँड आर्ट हिस्टरी, ऍस्ट्रॉनॉमी, बायलॉजी, बिझनेस, केमिस्ट्री, प्राचीन जग, इंजिनीरिंग, कम्प्युटर सायन्स इत्यादी विषयांवर मोफक कोर्सेस उपलब्ध आहेत.
*युडेमी (https://www.udemy.com/)*
युडेमी ऑनलाईन कोर्सेस केवळ मात्र रुपये ४२० रुपये फीच्या माफक दरात उपलब्ध आहेत आणि www.udemy.com या वेब संकेतस्थळावर जाऊन कॅटेगरीज या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या आवडीचा कोर्स निवडू शकता.
*11.मोफत कोर्सेस देणारे अन्य वेबसाईट्स पुढीलप्रमाणे आहेत-*1) हॉवर्ड युनिव्हर्सिटी :- (https://online-learning.harvard.edu/catalog/free)
2) ओपन याले युनिव्हर्सिटी :- (https://oyc.yale.edu/)
3) युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया :- (https://extension.berkeley.edu/)
4) MIT ओपनवेर कोर्सेस :- (https://ocw.mit.edu/index.htm)
5) युनिव्हर्सिटी ऑफ लंडन पॉडकास्ट :- (https://podcasts.ox.ac.uk/series)
6) https://www.coursera.org/search?query=free
7) https://eskillindia.org/
8) https://www.learnvern.com/
9) https://www.openculture.com/
10) https://www.khanacademy.org/
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------------