( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत संपुर्ण देशातील लोकसहभागातून घरोघरी भारतीय तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे ज्यात सर्व सरकारी आणि खाजगी आस्थापनांचा समावेश असेल. यासोबतच सर्व नागरिकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा दाखवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. पाहुया काय आहे हर घर तिरंगा अभियान आणि ते का राबवले जात आहे.
’हर घर तिरंगा' अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
या मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जुलै रोजी ट्विट केले होर घर तिरंगा अभियान: जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल. या मोहिमेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन दिले जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हे महत्त्वाचे अभियान आहे.
'हर घर तिरंगा' मोहिमेचा उद्देश काय?
नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज संहिता काय आहे. त्याच्या वापराचे नियम काय आहेत. यासाठी भारत सरकारने 'फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002' तयार केला आहे. यात राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि फडकवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहिता लागू झाली. ज्या द्वारे खाजगी सार्वजनिक आणि सरकारी संस्थांद्वारे ध्वज फडकवण्याची नियमावली स्पष्ट करते.
'हर घर तिरंगा' : तुमच्या घरावर झेंडा फडकावणार असाल, तर 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असं आवाहन लोकांना केलं आहे.
मात्र घरी झेंडा फडकावायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत. त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावात हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी भारताची ध्वजसंहिता काय आहे ते पाहूया.
ध्वजसंहिता काय आहे?
राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी ध्वजसंहिता 2002 चं पालन करावं लागतं. तसंच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा 1971 चंही पालन करावं लागतं.या संहितेच्या 2.1 या कलमानुसार सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान ठेवून कोणत्याही ठिकाणी ध्वज फडकावण्यावर बंदी नाही.राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास मात्र तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे.
26 जानेवारी 2002 ला ही संहिता अस्तित्वात आली. याआधी राष्ट्रीय प्रतिकं आणि नावं कायदा 1950 आणि राष्ट्रीय प्रतीक अपमान विरोधी कायदा 1971 अस्तित्वात होता.या संहितेत नुकतेच दोन मोठे बदल करण्यात आलेत.
20 जुलै 2022 ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे.या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती.
30 डिसेंबर 2021 ला केलेल्या बदलानुसार पॉलिस्टरच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी दिली होती. याआधी फक्त खादीच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती.
*आयटीआर भरल्यानंतर ई व्हेरिफाय करणे आवश्यक, रिटर्न फाइल केल्यानंतर 30 दिवसांत करा ई व्हेरिफाय*
जर तुम्ही आयटीआर भरला असेल तर आता त्याचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्याशिवाय फॉर्म अपूर्ण मानला जातो. ITR फाइल करण्याची शेवटची स्टेप म्हणजे फॉर्म सबमिशन नाही तर व्हेरिफिकेशन आहे. तुम्ही ही ऑनलाइन व्हेरिफिकेशन करा. 30 दिवसांच्या आत व्हेरिफाय आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन न करता आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. व्हेरिफिकेशन नंतरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची आयटीआरवर प्रक्रिया करतो. याशिवाय जर आयटीआरचे व्हेरिफिकेशन नाही तर तुमचा रिफंड अडकेल.जर तुम्ही व्हेरिफिकेशन केले नाही तर तुमचा आयटीआर फाइल म्हणून गणला जाणार नाही. (online verification) ई फिकेशन करण्यासाठी संपर्क करा.
साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा-ई-सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे. 7900094419
राष्ट्रध्वज फडकावताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात?
सरकारची ध्वजसंहिता याआधी अतिशय कडक होती. आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आली आहे. तरीही राष्ट्रध्वज फडकावताना खालील गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे.
1) ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा.
2) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये.
3) कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
4) ध्वज फडकावताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.
5) ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये.
6) ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.
7) ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील.
8) राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा.
9) कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.
10) जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की 'हर घर तिरंगा अभियाना'शी संबंधित उपक्रमांसाठी कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधी खर्च करू शकतात. मंत्रालयाने एका परिपत्रकात म्हटले आहे की या मोहिमेशी संबंधित राष्ट्रध्वजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि पुरवठा, पोहोच आणि इतर संबंधित कामासाठी सीएसआर निधी खर्च करणे हे कंपनी कायद्याच्या अनुसूची VII अंतर्गत पात्र आहेत. संस्कृतीशी संबंधित शिक्षणाला चालना देण्यासाठी. परिपत्रकात असेही म्हटले आहे की कंपन्या कंपनी (CSR ) धोरण नियम, 2014 आणि संबंधित परिपत्रके किंवा मंत्रालयाने जारी केलेल्या स्पष्टीकरणांनुसार ही कामे करू शकतात.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
हर घर तिरंगा मोहिमेवर किती खर्च :
ध्वज बनवणाऱ्या कंपन्या सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारला कर्जावर ध्वज पुरवतील. त्या देशातील सर्व नागरिकांना स्वतःच्या पैशाने ध्वज विकत घ्यावा लागेल. जे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी ध्वजारोहण करणार आहेत. 1 ऑगस्टपासून पोस्ट ऑफिसमध्येही ध्वज उपलब्ध केले आहेत. केंद्र सरकारच्या 20 कोटी घरांवर ध्वज फडकवण्याचे उद्दिष्ट आहे, जर राष्ट्रध्वजाची किमान किंमत देखील 10 रुपये असेल. त्यामुळे या मोहिमेसाठी एकूण 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे 200 कोटी त्याच लोकांच्या खिशातून येणार आहेत.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ.. 7900094419*