खासगी तसंच सरकारी अनेक कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आता आधार कार्डसाठी UIDAI कडून नवं फीचर जारी करण्यात आलं आहे. या नव्या फीचरमुळे 12 अंकी आधार नंबर कव्हर केला जाऊ शकतो, जेणेकरुन तो अधिक सुरक्षित केला जाऊ शकेल. याला आधार मास्क (Aadhaar Masked) करणं असं म्हटलं आहे. ज्यावेळी तुमचा आधार नंबर इतर कोणाशी शेअर करायचा नसेल, त्यावेळी आधार मास्क करण्याची सुविधा वापरता येऊ शकते.
आधार कार्ड Masked केल्यानंतर Aadhaar नंबरमधील पहिले 8 अंक लपवले जातात. लपवलेल्या 8 अंकाच्या जागी ती संख्या XXXX-XXXX अशी दिसेल. या Masked Aadhaar मध्ये शेवटचे केवळ चार अंकच दिसतील. अशाप्रकारे UIDAI द्वारे जारी करण्यात आलेली ही Masked Aadhaar ची सुविधा जवळपास सर्व ठिकाणी वैध मानली जाणार आहे. जिथे महत्त्वाचं कागदपत्र म्हणून आयडेंटिटी प्रुफ Aadhaar Card दाखवण्याची गरज असते, त्या सर्व ठिकाणी हे Masked Aadhaar Card वैध मानलं जाणार आहे. उज्ज्वला योजना, LPG सबसिडी या सरकारी योजनांसाठी हे Masked Aadhaar वापरता येणार नाही.
Masked e-Aadhaar कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी संपर्क करा.. 7900094419 संतोष साळवे
नमस्कार मित्रांनो आज पण जाणून घेऊया आपलं आधार कार्ड कशाप्रकारे आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकता.
सर्वात प्रथम तुम्ही गूगल ला जाऊन Download aadhar card असं लिहून सर्च करा. त्या नंतर तुम्हाला Uidai.gov.in ची लिंक दिसेल त्या वरती क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तिथे एक Get Aadhar Card असं ऑप्शन दिसेल त्या मध्ये Download aadhar card त्या वरती क्लिक करा.
*त्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज दिसू लागेल.*
तुमच्याकडे enrolment number असेल तर तो सिलेक्ट करा. आणि आधार असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करून तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे. तसेच खाली तुमचे पूर्ण नाव (जसे आधार कार्ड वर दिलं असेल तसेच ) नतंर तुम्हाला पिनकोड , सेक्युरीटी कोड टाकायचा आहे.
सर्व माहिती टाकून झाल्यावर Confirm वर क्लिक करा त्या नंतर आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वर तुम्हाला एक One Time Password मिळेल.
Passwrd इथे टाकल्या नंतर खाली तुम्हाला एक Survey दिसेल. कोणत्याही Options वर सिलेक्ट करून तुम्हाला खाली Download Aadhar वर क्लिक करून तुमचं आधार PDF फॉरमॅट मध्ये डाउनलोड होईल.
डाउनलोड केल्या नंतर तुम्ही ती डाउनलोड केलेली फाईल जेव्हा ओपन करायला जाल तेव्हा तुम्हाला एक paasword टाकण्यासाठी बोलले जाईल. तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले चार अक्षरे आणि तुमचं birth Year टाकायचं आहे.
उदा. (Sumit).SUMI1990
नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आधार कार्ड दिसू लागेल.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाइल मध्ये अथवा कॉम्पुटर मध्ये सेव्ह करू शकता जेणेकरून अनेकवेळा आधार कार्ड नसताना जी अडचण येते ती तुम्हाला येणार नाही.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- साळवे इंटरप्राईजेस..सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे 7900094419













