( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
गावचा महसूल गोळा करणाऱ्या तलाठ्यांना शासनाकडून दिलेले अधिकार आणि कर्तव्य माहिती आहेत का?
आपला देश सर्वात जास्त खेड्यानी जोडला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पद्धती बऱ्यापैकी एकमेकांवर अवलंबून असते. गावातील शासकीय कार्यालयातील कामांची माहिती घेण्यासाठी शेतकरी अथवा गावातील सामान्य माणूस सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत असतो.त्यामुळे गावातील चावडी ग्रामपंचायत नेहमी गजबजलेली असते. दरम्यान गावच्या महसूलाबाबत सर्वात जास्त माहिती तलाठ्यांना असते तसे अधिकारही त्यांना असतात परंतु तलाठी नेमके काय काम करतात याबाबत बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते यासाठी तलाठीची कामे काय असतात हे जाणून घेऊया.
तलाठ्यांना असलेले अधिकार
१) शेतकऱ्याच्या मागणीनुसार सर्व प्रकारचे उतारे व दाखले देणे.
२) वारस रजिस्टरला वारसाची नोंद करणे. वारस ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची नोंद फेरफार पुस्तकात करणे.
३) फेरफार पुस्तकात खरेदीखताची नोंद करणे.
४) पिक पाहणीची नोंद करणे. स्वतः मालक जमीन करत असल्यास खुद्द अशी नोंद करणे. अन्य व्यक्ती जमीन कसत असल्याचे आढळल्यास वहिवाट सदरी सदर व्यक्तीची नोंद करण्यासाठी फॉर्म नं. १४ भरून तहसिलदारांकडे पाठवणे.
५) तहसिलदारांनी जमीन वाटपाचा आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून वाटपानुसार वेगवेगळे ७/१२ करणे.
६) जमीन महसूलाची वसूली करणे.
७) शासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे. उदा. निवडणूक काम, नुकसानीचे पंचनामे, तगाईचे वाटप, न्यायालयाच्या हुकूमाची अंमलबजावणी करणे आदि.
८) जमिनीत असलेली विहिर, बोअर तसेच फळझाडे, इकदार याची नोंद ७/१२ वर करणे.
*शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यापुढे "ई-केवायसी" केल्याशिवाय PM Kisanचे पैसे मिळणार नाही*
पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.म्हणजे
मार्च 2023 पासून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला त्याआधी ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. *संपर्क करा.. साळवे ईटंरप्राजेस... सुष्टी महा ई सुविधा / संतोष साळवे...7900094419
तलाठीला या गोष्टीचा अधिकार नाही :
१) तलाठ्यास खाते फोडीचा अधिकार नाही. जमीन महसूल अधिनियमानुसार कलम ८५ अन्वये असे अधिकार तहसिलदारांकडे आहे. तहसिलदारांनी दिलेल्या खाते फोडीच्या आदेशाची अंमलबजावणी तलाठ्यास करायची असते.
२) ७/१२ वर होणारा कोणताही बदल हा फेरफार नोंदी द्वारेच करणे तलाठ्यावर बंधनकारक असते.
३) फेरफार नोंद मंजूर करण्याचा अधिकार तलाठ्यास नसून तो अधिकार मंडळ अधिकारी अगर सर्कल यांना आहे.
४) कोणत्याही मंजूर अगर रद्द केलेल्या नोंदीत फेरबदल करण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.
५) पिक पाहणी सदरी मूळ मालकाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीचे नाव लावण्याचा अधिकार तलाठ्यास नाही. अन्य व्यक्तीची वहिवाट आढळल्यास तलाठ्याने फॉर्म नं. १४ भरून तहसिलदारांकडे पाठवावी. तहसिलदार त्याबाबत निर्णय घेतात.
६) नवीन शर्तीची जमीन विक्री करण्यास परवानगी देण्याचा अधिकार तलाठ्यास नाही.
७) ७/१२ वरील कुठलाही शेरा कमी करण्याचा अधिकार तलाठ्यास नसतो. आणेवारी लावण्याचा अधिकार तलाठ्यांना नसून तहसिलदारांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी तलाठ्यांना काय अधिकार असतात पाहून त्यांच्याकडे मागणी करावी.
( तलाठ्याची कर्तव्ये.) सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास*
महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे 'तलाठी' होय. तलाठयांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम व त्याखालील विविध नियमांनुसार वेगवेगळी कार्ये करावी लागतात.
*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने * स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419
तलाठ्यांना महसुली अभिलेखे ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय, गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागामार्फत केली जाणारी विविध कामे तालांठ्यांमार्फत पार पाडली जातात. जसे, निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीची कामे,
मतदार याद्या तयार करणे, शिधापत्रिकांची कामे,
कृषी गणना करणे अशी निरनिराळी कामे करावी लागतात.
तलाठ्याची कर्तव्ये.
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 154 नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे.
*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना* अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://digitalsalve.blogspot.com/2021/07/blog-post_8.html
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 1 ते 3 गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील 10 ते 15 गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.
तलाठी - मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार - तहसीलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी- अशी पदांची चढती रचना आहे.
*सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास*
प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला समोर जावं लागत, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ. जेणेंकरून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.
खरेदीखत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. प्रत्येक अर्जावर तलाठयाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक असते.
अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठ्याने फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद केली पाहिजे. तलाठी फेरफार नोंदवहीमध्ये ज्या नोंद करील, त्या नोंदीची संपूर्ण प्रत चावडीमध्ये ठळक ठिकाणी लावली पाहिजे, आता ऑनलाईन चावडी वर सूचना टाकली जाते. त्यानंतर अधिकार अभिलेख किंवा फेरफार नोंदवहीवरून त्या फेरफारांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींना लेखी कळवले पाहिजे. सदर फेरफार नोंद पेन्सिलीने लिहिली जाते आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यास आलेली नाही असा शेरा लिहावा लागतो.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
*फेरफारवर हरकत न आल्यास*
1) फेरफारवर आक्षेप अथवा हरकत घेण्याचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो.
2) पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आक्षेप अथवा हरकत न आल्यास मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी फेरफार नोंदवहीमधील नोंद प्रमाणित करतो.
3) सदर प्रमाणित नोंद तलाठ्याने अधिकार अभिलेखामध्ये शाईने अभिलिखित करायची असते. या संपूर्ण प्रक्रियेला जास्तीत जास्त तीस दिवस लागू शकतात.
4) म्हणजे हरकत न आल्यास जास्तीत जास्त 30 दिवसात तुमचे नाव सातबारा व मिळकत पत्रिकेवर लागले पाहिजे.
*भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा* आधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://digitalsalve.blogspot.com/2021/05/blog-post_86.html।
*फेरफारवर आक्षेप आल्यास*
1) फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या नोंदीवर तलाठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास, तलाठ्याने विवादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद केली पाहिजे.
2) तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला आक्षेप मिळाल्याबद्दलची विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब दिली पाहिजे.
3) त्यानंतर दोन्ही पक्षकारांचे म्हणणे एकूण घेऊन मंडळ निरीक्षक किंवा भूमापन अधिकारी फेरफार नोंद प्रमाणित करतात किंवा रद्द करतात.
4) नोंद प्रमाणित केल्यास तलाठ्याने ती अधिकार अभिलेखामध्ये शाईने अभिलिखित करायची असते, आणि नोंद रद्द केल्यास अधिकार अभिलेखात पेन्सिलीने केलेली नोंद खोडून टाकायची असते.
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
*तलाठी टाळाटाळ करत असल्यास*
काही अप्रामाणिक आणि भ्रष्ट तलाठी (वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वादाने) फेरफार नोंदी धरण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता असते. त्यामुळे तलाठ्याला अर्ज केल्यावर चौथ्या पाचव्या दिवशीच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुम्ही खालील माहिती घ्या.
1) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजी केलेल्या अर्जावर आपल्या कार्यालयाने केलेल्या कार्यवाहीसंबंधित कागदपत्रांची साक्षांकित प्रत द्यावी.
2) जमीन महसूल अधिनियम कलम 150(2) अन्वये सूचना काढली असल्यास त्याची एक प्रत देण्यात यावी. तसेच सदर फेरफारवर हरकत आली असल्यास विवादग्रस्त नोंदवहीतील संबंधित हरकत नोंद असलेल्या पृष्ठाची साक्षांकित प्रत देण्यात यावी.
3) (अर्ज केल्याचा दिनांक) रोजीच्या अर्जानंतर मंडळ अधिकारी यांनी आपल्या कार्यालयास भेट दिली असल्यास त्या दिवसाच्या मंडळ निरीक्षक यांच्या भेटीच्या नोंदींची साक्षांकित प्रत देण्यात यावी.
*जर तलाठी दाद देतच नसेल तर?*
जर तलाठी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करूनही तुमच्या अर्जास दाद देत नसेल तर मात्र तुम्ही *शासकीय कर्तव्य पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 ( यालाच दप्तर दिरंगाई कायदा असेही म्हणतात ) कायदाचे कलम 10 चे उल्लंघन केल्याबाबत तलाठी आणि मंडळ निरीक्षक अथवा भूमापन अधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रधान सचिव (महसूल), विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करा. सदर तक्रार पॊष्टाने पाठवा त्यानंतर प्रधान सचिव महसूल, विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून तुमच्या तक्रारींवर केलेल्या कारवाई बाबत माहिती मागा, पाठपुरावा घ्या.
दप्तर दिरंगाई कायदा मधील कलम 10 च्या तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आलेल्या अर्जावर 7 दिवस कार्यवाही सुरु करायची आहे. तसेच अर्ज 45 दिवसात निकाली काढायचा असतो.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!