कर्ज परतफेड करू न शकल्यास काळजी करू नका !! काय आहे तुमचा अधिकार
बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन आपल्या गरजा पूर्ण करणे सहज झाले आहे. पण कर्ज घेणे आजच्या काळात जितके सोपे झाले आहे तेवढेच कर्जाची परतफेड करणे कठीण आहे.
बहुतेक वेळा कर्जाचा हप्ता चुकला तर बँक कर्जदाराला डिफॉल्ट घोषित करतात ज्यामुळे कर्जदाराला केवळ मानसिक त्रासच होत नाही तर आर्थिक स्थिरतेलाही नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत, तुमचा ईएमआय देखील चुकला असेल किंवा कर्जाची परतफेड करण्याची तुमची स्थिती नसेल तर तुम्ही कर्ज देणाऱ्या बँक किंवा संस्थेशी बोलून तात्पुरता दिलासा मागावा.
लक्षात घ्या की कर्जाचा एखादा हप्ता चुकला तर त्याला नियमांचे उल्लंघन मानले जाते पण कायदेशीर गुन्हा नाही. अशा प्रकरणांमध्ये बँका आणि वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या काही मानकांचे पालन करून कर्जदाराशी जबाबदारीने वागण्याचे निर्देश दिले आहेत.वरील प्रकरणांमध्ये तुमच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था डिफॉल्ट नोटीस जारी करेल. कारवाई सुरू करण्याच्या दोन महिन्यांपूर्वी ही नोटीस जारी केली जाईल तर काही प्रकरणांमध्ये पूर्वीही जारी केली जाऊ शकते. या नोटीसमध्ये कर्जाची थकबाकी, चुकलेल्या ईएमआयचा तपशील आणि कर्जाची परतफेड न केल्यामुळे होणाऱ्या परिणामाचा ठळकपणे उल्लेख केलेला असेल.
कर्जदारांना योग्य वागणूकआरबीआयच्या मार्गदर्शक नियमानुसार, कर्जदाराने बँकेचा हप्ता चुकवला तरी त्याच्यासोबत योग्य वागणूक करण्यास बँका आणि वित्तीय संस्था बांधील आहेत. एवढेच नव्हे तर कर्जदार कायदेशीर नोटीसला आव्हानही देऊ शकतो पण नोटीस जारी केल्यापासून एक महिन्याच्या आत आव्हान करणे अनिवार्य असते.
लक्षात घ्या की बँक तुमच्याशी अनादर शब्दात बोलू शकत नाही तसेच कर्जदारावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर न्यायालय अनेकदा शिक्षा किंवा दंडाऐवजी कर्जाच्या वसुलीवर भर देते त्यामुळे तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर तुम्हाला कर्जदार म्हणून तुमच्या अधिकारांची जाण असली पाहिजे.
रिकवरी एजंटअशा गोष्टी करू शकत नाही
1) कर्ज वसुलीसाठी रिकवरी एजंट वारंवार फोनवर धमकी देत असेल, शिवीगाळ करत असेल किंवा नको ते मेसेज पाठवत असेल किंवा नको ते शब्द बोलताना वापरत असेल तर ही कृती छळ मानली जाते.
2) एजंट तुमच्या ऑफिस पर्यंत किंवा तुमच्या बॉस पर्यंत जात असेल
3) तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा तुमच्या सोबत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्रास देत असेल
4) तसेच काही कायदेशीर कारवाईची व अटकेची धमकी देत असेल
5) घरी किंवा ऑफिसमध्ये येऊन इतरांसमोर धमकी देत असेल किंवा अपमान करत असेल
6) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत असेल
7) तुमचा पाठलाग करत असेल किंवा इतरांची मदत घेऊन तुम्हाला त्रास देत असेल
रिकव्हरी एजंटकरिता रिझर्व बँकेचे काय आहेत निर्देश?1) सर्वात आधी बँकांनी रिकवरी एजंटची नेमणूक करताना त्याची योग्य तपासणी म्हणजेच व्हेरिफिकेशन करून नंतर नेमणूक करावी.
2) तसेच बँकांनी रिकवरी एजंट आणि तो कोणत्या एजन्सीचा आहे त्याबद्दलची माहिती ग्राहकांना द्यावी.
3) बँकेने रिकवरी एजंटला दिलेली नोटीस आणि ऑथरायझेशन लेटरमध्ये संबंधित रिकव्हरी एजंटचे नंबर असले पाहिजेत आणि ग्राहकांशी कॉल वर जे बोलण होते ते रेकॉर्ड केलं पाहिजे.
4) ग्राहकांची जर रिकवरी प्रक्रियेबद्दल तक्रार असेल तर ती सोडवण्यासाठी बँकेने व्यासपीठ निर्माण करून द्यावी व ते असणे गरजेचे आहे.
5) जेव्हा रीकव्हरी एजंट ग्राहकांना भेटेल तेव्हा त्याने त्याचे ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे. समजा रिकवरी एजंटने आयडी कार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवले नाही तर ग्राहक त्याबाबत तक्रार करू शकतात.
6) गैरवर्तन करू शकत नाही किंवा तुमचा कोणासमोर अपमान देखील करू शकत नाही. धमकी किंवा शिवीगाळ करणे तर
रिकवरी एजंट त्रासदेत असेल तर तुमचे काय आहेत अधिकार?
1) रिकवरी एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार नोंदवू शकतात. पोलिसांनी तुमची तक्रार दाखल करून घेतली नाही तर तुम्ही थेट मॅजेस्ट्रेटकडे देखील जाऊ शकतात.
2) अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला पोलिसांकडून मदत मिळाली नाही तर तुम्ही सिविल कोर्टात जाऊ शकतात. त्यामध्ये कोर्ट रिकवरी एजंटला थांबवू शकते किंवा दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर उपाय सुचवू शकते.
3) याबाबतची तक्रार तुम्ही रिझर्व बँकेत देखील करू शकतात व बँक अशा रिकवरी एजंटवर बंदी घालू शकते.
4) एजंट कडून तुमच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होत असेल तर तशी तक्रार तुम्ही बँकेकडे करू शकता किंवा तुम्ही मानहानीचा खटला देखील दाखल करू शकता.
-------------------------------------------------------------
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------