आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा. 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही )
आज त्यांची जयंती. त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी जयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना मानंवदना दिली जाते. त्यांनी समता, बंधूतेचा संदेश दिला. दलितांवरील अन्याय दूर करण्यासाठी ते अखंड झटले.
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा संदेश!
राजातील माणूस आणि
माणसातील राजा
लोकराजा
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
समता, बंधुता यांची शिकवण देणारे
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत
दीन-शोषितांचे तारणहार,
थोर समाजसुधारक
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. अस्पृश्य, दलितांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी आरक्षण लागू केले. जातीयता कमी करुन समाजात समता आणण्यासाठी त्यांनी प्रचंड कार्य केले. त्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. विधवा विवाहास मान्यता दिली. स्त्रियांवरील अत्याचार दूर करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. व्यापार, कला, क्रीडा, साहित्य व इतर कलांना प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे कार्य संस्थांनापुरते मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले होते.शाहु महाराजांचे गुरु फ्रेझर (आय. पी. एस.) बुध्दीमान व हुशार होते. जरी शाहू महाराजांचा विवाह त्यावेळेच्या प्रथेनुसार 17 वर्षे होते व राणीसाहेबांचे वय 11 वर्षे होते. परंतु गुरुंनी महाराजाकडून वचन मागितले. राणी साहेबांचे जीवनमान आनंदी रहावे यासाठी ता. 16 डिसेंबर 1891 रोजी वचन दिले.

शाहू महाराजांचा राज्याधिकार प्राप्तीचा दिवस ता. दोन एप्रिल 1894 हा होता. त्यावेळेचे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड हॅरीस कोल्हापूरला आले होते. या कार्यक्रमास ब्रिटीश अधिकारी, जहागीरदार, वतनदार, इत्यादी अनेक स्त्री-पुरुष उपस्थित होते. या प्रसंगी प्रजेला उद्देशून एक जाहीरनामा काढला त्यात असे लिहिले होते की, ''आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृध्दी व्हावी व आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदीत भरभराट व्हावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परीपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदी करुन तमाम प्रजाजन शुध्द अंतकरणापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हा साहय करतील. अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकीर्द दिर्घ कालपर्यंत चालवून सफल करावी अशी मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एक भावे प्रार्थना करतो''. प्रजेचे सुख व कल्याण हेच हिंदवी स्वराज्याचे अंतिम ध्येय होते.महाराजांनी राज्यारोहनापूर्वी सर्व भागाचा दौरा करून खेडयापाड्यातील डोंगराळ भागातील गरीब जनतेची अवस्था पाहिली होती. राजवाड्यात न राहता प्रजा जनास भेटत असत. त्यांच्या दृःख, वेदना याची विचारपूस करीत असत. आणि त्यावर काही मार्ग काढता येतो का यावर सतत विचार करीत असत.
1896- 97 मध्ये देशात भयानक दुष्काळ पडला. लोक अन्नधान्य अभावी मरत असत. गुर ढोरे जगवणे अवघड झाले होते. या भयानक परिस्थितीवर न घाबरता महाराज स्वतः दुष्काळ भागात दौरे करत असत आणि जनतेला दिलासा देत असत. म्हैसूर राज्यातून धान्य मागवून गावागावात स्वस्त धान्य दुकान काढली, एवढ्यावर न थांबता रस्ता तयार करणे, विहिर तलाव खोदणे इत्यादी कामे करवून घेतली. त्यातून लोकांना पैसा मिळाला. तसेच शासकीय जंगल जमिनी जनावरांसाठी खुली केली. अनेक ठिकाणी दुष्काळ निवारण कार्यालय उभी करुन अनेक उपाय योजना सुरु केल्या. या दुष्काळात अपंग, वृध्द, निराधार लोकांसाठी भुकबळी होवू नये म्हणून ''निराधार आश्रम'' काढले. जवळपास 50 हजार निराधारांनी मदत केली. रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला मजुराच्या मुलांसाठी ''पाळणाघरे'' स्थापन केली.
1896 साली मुंबई प्रात प्लेगची लागण झाली. हळूहळू परसत 1898 मध्ये कोल्हापूर संस्थानात प्लेगची सुरूवात झाली. कार्य मार्ग काढायचा या बाबत सतत विचार करीत असत. अनेक लोक घर सोडून उघड्या जागेवर, शेतात झोपड्या करून राहू लागले. अशा वेळेस महाराजांनी झोपड्यासाठीचे साहित्य मोफत पुरवले. प्लेगची काळजी कशी घ्यावी या बाबत माहिती सांगत असत. हजारो पत्रे गावोगावी जनजागृतीसाठी पाठवित असत. महाराजांनी एक आदेश काढून प्लेग उपाय योजनेचे जबाबदारी पाटील- कुलकर्णी वतनदार यांच्यावर सोपविली. अंमलबजावणी व्यवस्थित नाही केल्यास त्यांची वतने जप्त करत असत. महाराज नुसते फर्मान काढले नाही तर स्वतः घोड्यावरून 40 मैल जावून प्लेगबाबत लोकांशी चर्चा करीत असत.
वाहनधारकांनाे लक्ष द्या:ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट किंवा इतर कागदपत्र हरवले असेल किंवा फाटली असेल तर डुबलीकेट बनवून मिळेल संपर्क करा. संतोष साळवे .7900094419*
कोल्हापूरचे कर्नल रे या पाॅलिटिकल एजंटने महाराजावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. 1906 मध्ये काही मंडळींनी मुंबई सरकारकडे अर्ज पाठवून तीन तरूण स्त्रियांना भ्रष्ट केल्याचा आरोप केला. ब्रिटीश सरकारकडून पदावरून दूर करण्याचा प्रयत्न होता. पण तो यशस्वी झाला नाही. ता. 21 मार्च 1908 रोजी महाराजांची कन्या आक्कासाहेब महाराज यांचा विवाह मोठ्या थाटात आयोजन केले होते. गव्हर्नर क्लार्क, मधोळचा महाराजा, ब्रिटीश आधिकारी, अनेक संस्थानिक उपस्थित रहाणार होते. परंतु अशा प्रसंगी कोल्हापूरातील दामू जोशी, गणपतराव मोडक इत्यादींना पुणे येथून बॉम्ब आणण्याचा बेत केला. परंतु वेळेवर पोहचू न शकल्याने हा अनर्थ टळला.
भारतात हजारो वर्षापासून बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणात मागासलेल्या समाजातील मुलां- मुलींसाठी शाळा काढल्या. राज्यकर्त्यांनी व मिशनरींनी सुरू केलेल्या शाळेतून ब्राम्हण वर्गातील मुले मुली शिक्षण घेत असत, परंतु बहुजनांचा मुलांचा प्रश्न असाच खितपत पडला होता. म्हणून महाराजांनी 18 एप्रिल 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग (वसतीगृह) ची स्थापना केली. या वसतीगृहासाठी 500 अनुदान दिले. पुढे चालून 47 हजार रुपये वेगळे देवून वसतीगृह सुरु केले.
प्रत्येक समाजासाठी एकूण 24 वसतीगृह सुरु करण्यात आले. व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग 1901, दिगंबर जैन बोर्डींग 1901, वीरशैव लिंगायत बोर्डींग 1908, मुस्लीम बोर्डींग, मिस क्लार्क बोर्डींग (महार, मांग, ढोर, चांभार मुलांसाठी) , श्री नामदेव बोर्डींग 1911, पांचाळ ब्राम्हण वसतीगृह 1912, इंडियन ख्रिश्चन वसतीगृह 1915, वैश्य होस्टेल 1918, भोई समाज बोर्डींग 1921, नाभिव विद्यार्थी बोर्डींग 1921, ढोर, चांभार होस्टेल 1916, अशा विविध 24 जातीसाठी विविध वसतीगृहाची स्थापना करून विद्यार्थ्यांना अन्न, वस्त्र, निवाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढ्यावरच महाराज थांबले नाही तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून प्राथमिक शाळेची सुरूवात केली. राज्यरोहनाच्या वेळी 5 शाळा व 168 मुले होती तर 1907-08 मध्ये 16 शाळा व 416 विद्यार्थी संख्या झाली. तर 1912 पर्यंत 27 शाळा होत्या तर 636 विद्यार्थी होते. 25 जुलै 1917 ला मोफत व सक्तीचे शिक्षण हा कायदा केला.
अस्पृश्य व्यक्तीवर लावलेला हजेरी पध्दत 27 जुलै 1918 ला मंजुर झाला आणि कोल्हापूर गॅझेटमध्ये 3 ऑगस्ट 1918 रोजी प्रसिध्द झाला. हजेरी निर्मलणाची कारणे बघीतली तर गरीब लोकांवर व कामगार लोकांवर अधिकारी वर्ग फुकटची कामे करून घेत असत. म्हणून महाराजांनी महार, मांग, रामोशी व बेरड या चार जातीच्या लोकांची दररोज पोलिस पाटलाकडे हजेरी द्यावी लागत असे. त्या हजेरीच्या पध्दतीचे निर्मुलन केले. तसेच 29 सप्टेंबर 1918 रोजी दुसरे हुकूम गॅझेट काढले. ज्या लोकांना गुन्हेगारीचा कायमचा शिक्का बसलेल्या गट्टेचोर जातीची हजेरी महाराजांनी माफ केल्याचे जाहीर करून शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीस शिक्षा संपल्यानंतर पाच वर्षापर्यंत वर्तनात सुधारणा झाल्यास हजेरीतून मुक्त करावे असेही म्हटले आहे. हजेरी प्रमाणेच अस्पृश्य जातींना विशेषतः महार समाजातील व्यक्तींना सरकारी अधिकारी अनेक कामे लावत. पाटील, कुलकर्णी, दशमुख, देशपांडे हे ही मोफत कामे करवून घेत होती. ही एक प्रकारची सामाजिक गुलामगिरीच होती. हे वतन खालसा करून या गुलामगिरीपासून मुक्त केले.
शाहु महाराज यांनी स्त्रियांसाठी देखिल कायदे केले. हजारो वर्षापासून असंख्य जखडलेल्या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी इ. स. 1917 मध्ये कोल्हापूर संस्थानात विधवांना पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा संमत केला. तसेच 1919 मध्ये पुरूषांचे वय 18 तर स्त्रियांचे वय 14 वर्षे असावे अशी एक तरतुद केली. एवढ्यावर महाराज थांबले नाहीत तर जो कोणी स्त्रियास क्रुरपणाची वागणूक देईल त्यास 6 महिने कारावास व 200 रू दंड देण्याची तरतुद केली. घटस्फोट व वारसासारखे कायदे पास केले. देवदासी प्रथा बंद केली. राजाराम काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

1902 मध्ये 50 टक्के आरक्षणाचा कायदा आणून त्याची अंमलबजावणी आपल्या संस्थानिकात केली. 8 व 10 ऑगस्ट रोजी वटहुकूम काढून तलाठी भरतीत अस्पृष्य वर्गाला प्राधान्य दिले. 6 सप्टेंबर 1919 रोजी जाहीरनामा प्रसिध्द केला. त्यात असे नमुद केले आहे की, संस्थानातील सर्व शासकीय विभागात व सार्वजनिक ठिकाणी कोणीही अस्पृष्यता पाळू नये. दप्तर दिरंगाई व लाच लुचपत हे दोन महाभयंकर रोग प्रशासनाला लागले होते. प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडली होती म्हणून महाराजांनी इन्स्पेक्टर ऑफ ऑर्डर ह्या खास अधिकाऱ्यांची नेमणूक केली. जो अधिकारी नियमाचा भंग करील त्यास 15 रुपये दंड केला जात असे. काही अधिकाऱ्यांनी कामावर दिरंगाई केल्यास प्रत्येक दिवशी एक रुपया दंड आकारला जात असे. म्हणून आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून कानपूर येथील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय जातीय परिषदेत इ. स. 1919 मध्ये राजर्षी ही पदवी शाहू महाराजांना दिली. अशा या महामानवास 26 जून महाराजांच्या जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन साजरा करतात.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा. साळवे इंटरप्रायजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*
1) ८ मे १८८८ : मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामात शाहूंच्या हस्ते प्रारंभ
2) १८८८ : करवीर दरबाराचे गॅझेट प्रसिद्ध.
3) १८८९ ते १८९३ : धारवाड येथे एस एम फेझर यांच्या देखरेखीखाली अध्ययन
4) १ एप्रिल १८९१ : लक्ष्मीबाई गुणाजी राव खानविलकर बडोदा यांच्याशी विवाह
5) २० एप्रिल १८९१ : लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते रेल्वे सुरू
6) १८९३ : कोल्हापूर सरकारने कायदे पुस्तक छापले.
7) ३ एप्रिल १८९३ : शाहू महाराजांच्या हस्ते राजाराम कॉलेजमध्ये बक्षीस समारंभ
8) २ एप्रिल १८९४ : राज्यारोहण समारंभ मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांच्या हस्ते झाला. आर जी भंडारकर, गो ग आगरकर, जेके गोखले राज्य रोहन प्रसंगी उपस्थित.
9) ३ एप्रिल १८९४ : टिळकांनी केसरीत ' करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग' हा महाराजांचा अभिष्टचिंतन करणारा लेख लिहला. मेजर दादासाहेब निंबाळकर यांनी समाजाच्या १९७६ रोप्य महोत्सव अंकात ' श्री शाहू महाराज व ऋणानुबंध' हा लेख लिहिला
10) १ जानेवारी १८९५ : ब्रिटनची सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांनी शाहू महाराजांना जी सी आय एस हा किताब अर्पण केला. हा किताब त्यांना १८ सप्टेंबर १८९५ रोजी लॉर्ड सेंडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला.
11) २८ मार्च १८९५ : फरगुशन कॉलेज इमारतीचे उद्घाटन
12) १८९७ : दुष्काळी कामे, शेतकऱ्यांना तगाई, स्वस्त धान्य दुकाने स्थापन. महारोग यांसाठी उसगाव येथे आश्रम सुरू केला. त्यांना विक्टोरिया राणीचे नाव दिले. १९१० पर्यंत डॉक्टर वानलेस व नंतर डॉक्टर व्हेल फॅमिली डॉक्टर होते.
13) १८९८ ते १९०१ : ताईमहाराज प्रकरण
14) १९०० ते १९०१ : वेदोक्त चळवळ, सिद्धांत विजय ग्रंथ
15) २४ में १९०० : विक्टोरिया राणीने शाहू छत्रपतींना महाराज ही पदवी धारण करण्याचा अधिकार दिला
16) १० जून १९०२ : केंब्रिज विद्यालयाची शिक्षण व संस्कृती विषय एल एल डी ही पदवी ( डॉक्टर ऑफ लॉज)
17) १९०१ ते १९११ : निरनिराळ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती.
18) १९०१ : गोवध बंदी कायदा
19) २ मे ते ऑगस्ट १९०२ : लंडन चा प्रवास
20) ६ जुलै १९०२ : मागास जातींना नोकरीत 50 टक्के जागा राखीव ठेवणे
21) १९०६ सप्टेंबर : सहकारी तत्त्वावर शाहू मिल स्थापन
22) १९०८ ते १९०९ : दामू जोशी प्रकरण23) १९०९ : लक्ष्मी तलावाच्या कामास प्रारंभ.
24) ११ जानेवारी १९११ : कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना.
25) १९१२ : सहकारी नियोजनाचा कायदा, मराठ्यांच्या हस्ते वेदोक्त श्रावणी राजपुत्राच्या अध्ययनाची सोय करण्यासाठी लंडनला रवाना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची घोषणा.
26) १९१३ : सत्यशोधक शाळेला वर्षासन पाटील स्कूल ची निर्मिती, इनामे अविभाज्य, गहान व ठेवण्याचा आधी
27) १० जून १९१७ : शंकराचार्या पिठावर डॉक्टर कुर्तकोटी यांची स्थापना.
28) १९१७ जुलै : पुनर्विवाहाचा कायदा मंजूर.
29) २७ डिसेंबर १९१७ : अकराव्या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्ष
30) २३ फेब्रुवारी १९१८ : कुलकर्णी वेतने बंद,
31) तलाठी पद्धत सुरू, आंतरजातीय विवाह कायदा
32) ३ मार्च १९१८ : बलुते पद्धत बंद.
33) २५ जून १९१८ : महारकी ( महार वतने) बंद
34) ३१ ऑगस्ट : गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा रद्द.
35) १५ सप्टेंबर : डॉक्टर कुर्तकोटी चा शंकराचार्य पिठाचा राजीनामा.
36) १० नोव्हेंबर : सी के बोले यांच्या लोक संघाच्या विद्यमानाने मागासलेल्या वर्गातील लोकांची मुंबई येथे जाहीर सभा.
37) १४ डिसेंबर : नवसारी आर्यधर्म परिषदेचे अध्यक्ष
38) १९ ते २१ एप्रिल १९१९ : कानपूर येथे हिंदुस्थानातील सर्व कुरणी क्षत्रियांच्या तेराव्या परिषदेचे अध्यक्ष राजश्री किताब
39) ६ ते ८ मार्च १९२० : भावनगर येथे आर्य धर्म परिषदेचे अध्यक्ष.
40) २२ मार्च : अस्पृश्य वर्गाच्या परिषदेपुढे भाषण.
41) १५ एप्रिल : नाशिक येथे श्री उद्धवजी मराठा विद्यार्थी वस्तीगृहची कोनशिला समारंभ.
42) १६ एप्रिल : नाशिक येथे निरश्रित सोमवंशीय समाजाच्या परिषदेत भाषण.
43) ३० मे : नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे अध्यक्ष.
44) ६ जुलै : शिवाजी क्षत्रिय वैदिक पाठशाळेत ची स्थापना.
45) २७ जुलै : हुबळी येथे कर्नाटक ब्राह्मणेतर समाज परिषदेची स्थापना.
46) १९२१ जानेवारी : शास्त्र जगद्गुरु ची स्थापना
47) १९ नोवेंबर रायगड येथे शिवस्मारकाची पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाला. सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार, कोल्हापुरात
48) ताराराणीचा रथ सोहळा सुरू.
49) १६ फेब्रुवारी १९२२ : दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष
50) ६ मे : पन्हाळा लॉज मुंबई येथे मृत्यू.
शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य :सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा चिरा पेटी येथे सुरू केली.
कृष्णाबाई केळकर या हुशार विद्यार्थिनीला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले.
मोफत शिक्षणाचा आराखडा त्यांनी १९१३-१९१४ मध्ये तयार केला.
करवीर संस्थानाच्या शिक्षणाधिकारी मीच लिटिल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याजागी श्रीमंती रखमाबाई केळकर यांना नेमले.
मराठा एक्य सभा ( मे १८८७): एन एम लोखंडे, विके बांदेकर, डीएस यंदे, के आर कोरेगावकर, के ए केळुसकर, एस के बोले यांच्यासह.
१८४८ : कोल्हापूर, पन्हाळा, आळते, शिरोळ येथे मराठी शाळा स्थापन.
१८५१ : कोल्हापूर मध्ये पहिली इंग्रजी शाळा १८६७ मध्ये सुरु तिचे हायस्कूल मध्ये रूपांतर पुढे तिचे राजा राम महाराज कॉलेजचे नामकरण.
१८९४ : सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम वस्तीग्रह
१८९६ : राजाराम विद्यालयांमध्ये कृषी शास्त्राचा विशेष अभ्यासक्रम
१९०० : प्रथमेश राजवाड्यात काही विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. ते विद्यार्थी भीमराव पाटणकर, बाळासाहेब खानविलकर, कर्मवीर भाऊराव पाटील
नाशिकच्या उद्धवजी वस्तीगृह इमारत बांधकामास पंधरा हजार रुपये देणगी.
सांगलीच्या विलिंग्डन वस्तीगृहात तीस हजार रुपये तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी एक लाख रुपयांची देणगी
शंकर बाजी ढवळे यांना आय सी एस परीक्षेसाठी इंग्लंड ला जाण्यासाठी रुपये दोन हजार रुपयाची मदत. सिताराम केशव तावडे यांना इंग्लंडमधील उच्चशिक्षणासाठी दोन हजार रुपयांची मदत
१९११ : किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल ची स्थापना.
शाहू महाराजांच्या अस्पृश्योद्धाराचे कार्य :
गंगाराम कांबळे या नौकरास सत्य सुधारक हॉटेल कोल्हापुरातील रहदारीच्या रस्त्यावर काढून दिले.
अस्पृश्यांना त्यांनी पैलवान बनवले त्यांना ते जाट पैलवान म्हणत तर चांभारराना सरदार, भंग्याना पंडित तर अस्पृश्यांना सूर्यवंशी म्हणून संबोधत.
१ ऑगस्ट १९१८ : महार, मांग, रामोशी व बेरड यांची हजेरी हुकुमाने बंद केली.
वेदोक्त प्रकरणी लोकमान्य टिळकांनी केसरी व प्राध्यापक विजापूरकरांनी ग्रंथमाला व समर्थ मधून शाहू महाराजांवर टीका केली.
७ ऑक्टोंबर १९०१ : राजवाड्यातील सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने करावेत असा हुकूम काढला.
१९०१ : पंचगंगेचा घाट त्यांनी सर्व जातीधर्मांच्या लोकांना खुला केला.
१७ मे १९०२ : सातव्या एडवर्डच्या राज्य होण्यासाठी इंग्लंडला गेले
१४ सप्टेंबर १९०२ : महाराजांच्या दत्तक मातोश्री आनंदीबाई यांचे निधन.
घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा. 7900094419
शाहू महाराज व सत्यशोधक चळवळ :-
१८७७ : सत्यशोधक समाजाचे पहिले वृत्तपत्र दीनबंधू सुरू संपादक कृष्णराव भालेकर
१७ जून १८८८ : ब्राह्मण सभेची स्थापना.
१९१० : सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन चिकोडी तालुक्यात
१९०४ : मराठा दिन बंधू हे वर्तमानपत्र भास्करराव जाधव यांनी सुरू केले.
११ जानेवारी १९११ : कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना. ( अध्यक्ष परशुराम घोस वाडकर)
ब्राह्मणेतर मुलांसाठी कोल्हापूरला सत्यशोधक शाळा जुलै १९१३ मध्ये सुरू केली.
सातारा जिल्ह्यात १९१० नंतर सत्यशोधक चळवळ सुरू. नेतृत्व भास्करराव जाधव
१९१९ : साली साताऱ्यातील काली येथे सत्यशोधक समाजाची परिषद केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरली. तेथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्याचे जाहीर झाले.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्याला ध्वनीच्या बागेत स्थापन केलेल्या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डिंग ला शाहू बोर्डिंग असे नाव दिले.
१९१६ : डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना.
शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर चळवळ :
१८९५ साली महाराजांनी मथुरा येथे आर्य समाजाने मानपत्र दिले.
सत्यशोधक समाजाचे भीष्माचार्य प्रबोधनकार केशवराव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन मध्ये लिखाण केले.
१९१९ विजयी मराठा हे वृत्तपत्र श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केले. या वृत्तपत्रास ब्राह्मणेत्तरचा केसरी म्हणून संबोधले जाई.
इतिहास संशोधक मंडळ ( धुळे) स्थापना : १९१० संशोधक दिका राजवाडे
कोल्हापूर मुन्सीपालर्टी ची स्थापना: १८६८
प्रतिनिधी लोकसभा कोल्हापूर स्थापना : १८८५
शिवाजी क्लब स्थापना : १८९५ ( हनुमंत राव कुलकर्णी व दामोदर हरी जोशी)
२५ जून जून १९१८ : रोजी शाहूमहाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली. त्यावेळी कुलकर्णी संघटनेची दोन संमेलने भरली
१) पहिले संमेलन ५ एप्रिल १९१९ निपाणी अध्यक्ष न चि केळकर.
२) दुसरे संमेलन : १६ते १७ मे १९२० केश्वर अध्यक्ष दत्तोपंत बेळवी
२९ जुलै १९१८ रोजी त्यांनी तलाठी पद्धत सुरू केली.
३ ऑक्टोंबर १९२० : पुणे येथे शिवाजी सोसायटीची वार्षिक सभा भवानी पेठेतील विठ्ठल धर्मशाळेत शाहू महाराजांचे अध्यक्ष खाली.
सातारा येथील धनाजी शहा कपूर यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाला स्थापना मिळाली. १९२० नंतर ब्राह्मणेत्तर पक्षाचे मुंबई कौन्सिलचे पुढारी होते
१७ ऑगस्ट १९१९ रोजी ब्राह्मणी तरुणाने नारळी पौर्णिमेच्या दिवशी अंबाबाईची पूजा केली.
शाहू महाराजांचे अर्थकारण :
१९०५ साली 15 लाख रुपये भांडवली ची सूतगिरणी
१९१२ रायबाग ला श्री शाहू विणकरी संघटना
१८९५ मध्ये शेनगाव गारगोटी येथे काताचा कारखाना काढला.
राधानगरी येथे वूड डिस्टिलेशन फॅक्टरी सुरू. कोल्हापूर शाहुपुरी ही बाजारपेठ बसवली
१९१३ नागरी पतपेढी महाराजांनी सुरु केली
१९१८ लोकसंग्रह नावाची संस्था स्थापन सीताराम केशव बोले आणि महाराज या संस्थेचे आश्रयदाते होते
१९१९ फ्लू च्या साथीत कोल्हापूर शहरात उपचार केंद्रे उघडली
१८९१ शाहू महाराजांनी संस्थानाचे शास्त्रीय सर्वेक्षण तर १८९५ साली औद्योगिक सर्वेक्षण करून घेतले.
काळम्मावाडी व राधानगरी धरण योजना या जलसंपत्तीचे सर्वेक्षण १९०६ -१९०७ मध्ये गेले.
१९१४ शेतीविषयक प्रदर्शन भरवले
१९१२ सहकारी कायदा मंजूर केला
श्री लक्ष्मी तलावाची योजना महाराजांच्या काळात हाती घेण्यात आली. राधानगरी प्रकल्प १९०७ रोजी भोगावती नदीवर कोल्हापूरच्या पश्चिमेकडे दाजीपूर नावाच्या गावाजवळ फेजिवडे येथे 1909 साली राधानगरी प्रकल्पाचा शुभारंभ महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते झाला.
कला व क्रीडाप्रेमी राजे शाहू महाराज :-
१९१२ संगीता कलांसाठी उत्कृष्ट थेटर बांधले. त्याला केशवराव भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले थेटर म्हणून संबोधले गेले. करमणुकीच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला १८९३ मध्ये देवल क्लब ची स्थापना
१८९५ साली प्रसिद्ध मोतीबाग तालीम बांधली. ए लोरीस हे रोमन कॅथलिक जातीचे धाडसी व धिप्पाड पैलवान महाराजांचे सुरक्षारक्षक म्हणून होते. मल्लांना गदा देण्याची पद्धत सुरु केली .१९१२ साली इमाम बक्ष यास गदा दिली
१९१२ साली धोरा सुतार यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करून पन्हाळगडावर बसवला. कोल्हापूरला घोड्यांची शर्यत सुरू आप्पाजी धोंडीराज मुरले ऊर्फ कवी सुमंत यासारखे कवी महाराजांच्या आश्रयाखाली होता. शौकत रागिनी, मुक्तीकमला, गीतावली, भाव निनाद हे काव्य त्याने लिहिली. त्यात कवी मौत्तिक ही पदवी दिली.
१९२० कोल्हापूर संस्थानात घटस्फोटाचा कायदा पास केला.
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf